विश्वचषक क्रिकेट २०१९

Submitted by Adm on 25 May, 2019 - 01:57

WC2019.jpg
*

वेळापत्रक

होऊ दे चर्चा !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"उगाच तू चौकड्यांचा शर्ट नि चष्मा लावून टाईप करतोस असे वाटत राहते रे" - Rofl

"आजची मॅच वाहून गेली. हा वर्ल्ड कप ९१ च्या मार्गाने जातोय की काय पाकिस्तानसाठी" - ९२. हीच शंका मला त्यांच्या मागच्या २ मॅचेस नंतर आली होती.

असामी. रोहित चा खेळ बघुन मला देखील डेवीड गावर ची आठवण येते. Lazy elegance. त्याचीही बॅटींग मी मुंबईला पाहिली होती. त्या दोघांनाही खेळायला जास्त वेळ मिळतो. रोहीतने काल मारलेले स्क्वेअर कट पण क्रिस्प या सदरात मोडू शकतात. त्याने हुक वर मारलेली सिक्स तर सणसणीत कानाखाली.

त्रिविक्रम, सहीच !! माझ्याकडे भारत-बांग्ला मॅचची तिकीटं होतं. पण काही कारणांनी प्लॅन रद्द झाला आणि अत्यंत जड अंतःकरणानी तिकीटं विकून टाकली. Sad नाहीत क्रिकेट वर्ल्डकप + विंबल्डन असा डबल धमाका प्लॅन होता.

फॉर द रेकॉर्ड्स, माझा आक्षेप त्याच्या टेस्ट मधल्या टेंपरामेंट ला आहे. >>>>> फेफ आता हे लिहून लिहून दमणार आहे. Proud

स्टेडियम मधली कालची सचिन प्रेमाची अजून एक गंमत.
आम्ही पॅविलियनच्या आपोझिट ( फारएंड Happy ) हिल्टन एंड ला होतो. तिकडे कुणाच्या तरी लक्षात आल वर काचे आड सचिन आहे. मग मॅच कडे पाठ करून सगळ पब्लिक पिछे मुड. सचिन सचिन चा गजर चालू. सचिनच्या लक्षात येईपर्यंत तीन चार बाॅल झाले. ( India was fielding). त्याने acknowledge केल्यावरच पब्लिक परत मॅच कडे वळले. Happy
मुंबई इंडियन्सच्या मालकीण बाई पण आपल्या यजमानांना घेउन आल्या होत्या. मॅच संपल्यावर त्या जनतेला त्यांच्या बरोबर फोटो काढून देत होत्या. मुकेशभाईंकडे कोणी बघतही नव्हतं. Happy

९२. हीच शंका मला त्यांच्या मागच्या २ मॅचेस नंतर आली होती. >>>कशामुळे तसे वाटले? तेव्हाचे मला स्पेसिफिक्स काही आठवत नाहीत आता. प्लीज रिमाईंड मी ?!

"फेफ आता हे लिहून लिहून दमणार आहे" - Happy एक बार कह दिया, तो कह दिया| बस, इतनाही काही है| Happy

"तेव्हाचे मला स्पेसिफिक्स काही आठवत नाहीत आता." - डळमळीत सुरूवात, वॉश-आऊट (इंग्लंड विरूद्ध ७५ धावात ऑल-आऊट झाल्यावर) आणी नंतर एकदम सापडलेली लय.

हा वर्ल्ड कप ९१ च्या मार्गाने जातोय की काय पाकिस्तानसाठी" - ९२. हीच शंका मला त्यांच्या मागच्या २ मॅचेस नंतर आली होती. >> अजून कन्फर्मेटोरी एविडंस हवा असल्यास

८३-८७-९२
भारत-ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान

११-१५-१९
भारत-ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान? Proud

Historical performance is not indicative of future results but history does repeat itself more often than not Wink

Historical performance is not indicative of future results but history does repeat itself more often than not >>
७५-७९-८३ : WI-WI-India
99-2003 : Aus, Aus , तेंव्हा २००७ India असे वाचलेले आठवले.

मग मॅच कडे पाठ करून सगळ पब्लिक पिछे मुड. सचिन सचिन चा गजर चालू. > >देसी पब्क्लिक कुठे पण सचिन सचिन म्हणून सुरू होते. मी इथल्या लीग मॅच मधे पण ऐकलाय हा गजर Happy

>देसी पब्क्लिक कुठे पण सचिन सचिन म्हणून सुरू होते. >>>>> मागे मुंबईला जस्टीन बिबरचा शो झाला होता. त्यातपण लोकं "सचिन सचिन" ओरडली होती. Proud तो व्हिडियो फिरत होता फेबु आणि व्हॉअ‍ॅवर.

"मी इथल्या लीग मॅच मधे पण ऐकलाय हा गजर" - क्रिकेट = सचिन!! मेरे (क्रिकेट) प्यार की उमर हो इतनी सचिन| तेरे नाम से शुरू, तेरे नाम पे खत्म| Happy

स्टेडियममधली कालची सचिन प्रेमाची अजून एक गंमत. >>> भारी! Lol

मी आज लिहिणारच होते, की धागाकर्ता धागा काढून गायब झालाय; बहुधा टेनिसप्रतिच्या ईमानापोटी; तेवढ्यात दिसला इथे Proud

९२ च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान सलग ४-५ मॅचेस हरले होते... आणि शेवटी थेट चँपियन बनले. त्या वर्ल्ड कपच्या वेळचं गाणं मस्त होतं. आम्ही पुढे कितीतरी दिवस ते गुणगुणायचो. (Who's gonna be number one.... Who's gonna take the cup.... Who'll rule the world असे काहीतरी शब्द होते)

*रोहीतने काल मारलेले स्क्वेअर कट पण क्रिस्प या सदरात मोडू शकतात. त्याने हुक वर मारलेली सिक्स तर सणसणीत कानाखाली* -
आपल्याला नाही बुवा डेअरिंग आतां रोहितबद्दल असं काहीतरी इथं लिहायचं !! Wink

आपल्या सलामीवीरांनी सुरुवात तरी चांगली करुन दिली आहे.
पण ऑस्ट्रेलिया सध्याचा रेकॉर्ड पाहता ३५० सुद्धा कमीच पडतील त्यांच्यापुढे !
बघुया काय करतात..

त्याला एखाद्या मॅच मधे ३ वर वगैरे पाठवून बघायला हवे एक प्रयोग म्हणून. >> अगदी तीन वर नाही तर पिच बघून पांड्याला चार वर पाठवण्याचा प्रयोग कामाला आला .

वॉर्नर ल एव्हढा झगडताना आधी कधीच पाहिले नव्हत.ए पहिल्या १० ओव्हर्स एकद्मच भारी होत्या.

व्हॉट अ गेम!! वर्ल्डकप च्या दर्जाला साजेशी पहिली मॅच (ह्या एडिशन मधली). दोन्ही टीम्स टिच्चून खेळल्या. भारताचा खेळ एकदम ‘क्लिनिकल’ होता. प्रतिस्पर्ध्यावर संपूर्ण मॅचभर दबाव ठेवत, त्यांना चुका करायला भाग पाडून, त्या संधीचं विजयात रूपांतर करण्याच्या ‘ऑसी टेक्निक‘ चा आज भारतानेच ऑस्ट्रेलिया ला नमुना दाखवला.

वॉर्नर झगडला त्यात भूवी आणि बुमराह च्या बॉलिंगचा वाटा फार जास्त होता, त्याला खेळताच येत नव्हतं..
मॅक्सवेल आणि कॅरी नी फटकेबाजी करून थोडी धाकधूक निर्माण केली होती पण मॅक्सवेल मोठा फटका मारण्यात अडकला, आणि कॅरी थोडा उशिरा आला.. 37, 38, 39 ओव्हर्स मध्ये चांगलाच हाणला मॅक्सवेलने पण चाहल नी त्याला काढला, आणि मग शेवटी परत बुमराह आणि भूवी नी जबरी 4 ओव्हर्स टाकल्या.

सामना ऊत्तमच झाला. आपल्या गोलंदाजांनी चांगलाच दबाव ठेवला. त्यातही ३५०+ असल्याने आपल्या फायद्याचे ठरले. in hindsight,, Warner's slow game costed Aussie
पण मला वाटते ऑसी ने ख्वाजा च्या जागी काल मॅक्स ला वर पाठवले असते तर कदाचित वेगळे चित्र बघायला मिळाले असते? आपण जसे हार्दिक ला बरोबर मोक्याच्या वेळी वर पाठवले तसे. कॅरी ने हे दाखवून दिले की खेळपट्टी शेवट्पर्यंत फलंदाजी धार्जिणी होती.
काहि काहि वेळा बुम्रा, पंड्या व भुवी कं ने बाऊंसरस चा मारा ऊगाच अधिक केला असे वाटले... त्यापेक्षा यॉर्कर्स परवडले असते.
असो. पुढील सामने जरा संतुलीत खेळपट्टीवर पहायला आवडतील. ईं मधल्या खेळपट्ट्यांवर गोलंदाजी व फलंदाजी यातला सामन अधिक रंगतो. २७० चे साममे देखिल चुरशीचे ठरू शकतात.
मुख्य म्हणजे आपल्या संघाचे संतुलन व एकंदरीत अ‍ॅप्रोच खूपच ऊत्तम दिसत आहे. क्लिनीकल आणि प्रोफेशनल.
रोहीत व धवन च्या दोन्ही सामन्यातील खेळीने पुन्हा अधोरेखीत झाले की विशेषतः ईंगलंड मध्ये तुम्ही खेळपट्टी नुसार तुमचा खेळ व डाव रचलात तर यशस्वी होता.

कांगारुंनी शेवटच्या १० षटकात ११६ धावा दिल्या...
झम्पा, मॅक्सवेल, स्टोयनिस यांच्या २० षटकात १५७ धावा निघाल्या
स्टार्कच्या शेवटच्या ३ षटकात ४० निघाल्या.

४५ व्या षटकात दोन्ही संघ समान २८२ धावावर होते. परंतु बळींमधला फरक आणि भुवी/बुमराह ची टिच्चून गोलंदाजी हा फरक भारतीय विजयास कारणीभूत ठरला.

अफ्रिका २ बाद २९, ८ व्या षटकात... पावसाचा अडथळा.....

>> बाकी, भारतातल्या स्टेडियममध्ये जाऊन मॅच पाहण्याची हिम्मत माझ्यात नाही...
लले, माझ्यात कुठल्याच स्टेडियममध्ये जाऊन मॅच पाहण्याची हिम्मत नाही. हे मी लॉर्ड्सवर आणि रोझ बोल स्टेडियम वर मॅचेस पाहिल्यानंतर बोलतोय. मॅच सगळ्यात छान फक्त टिव्हीवर दिसते. स्टेडियम मधे लोकं वातावरणासाठी जातात! घरी चार मित्र जमवले की पुरेसे वातावरण पण जमते. Lol

"उगाच तू चौकड्यांचा शर्ट नि चष्मा लावून टाईप करतोस असे वाटत राहते रे" - Rofl
किती गोंधळ. तो फा फे , फे फ नाही

Pages