विश्वचषक क्रिकेट २०१९

Submitted by Adm on 25 May, 2019 - 01:57

WC2019.jpg
*

वेळापत्रक

होऊ दे चर्चा !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"Because the bails are now witty" - Happy Happy

पंत कव्हर म्हणून चाललाय. १५ मधे नाहीये. संघव्यवस्थापनाला धवन ला अजून रिप्लेस करायचं नाहीये. कारण जर त्याला रिप्लेस केलं तर तो इंज्युरी रिप्लेसमेंट म्हणूनच संघात परत येऊ शकेल. त्यामुळे पंत लंडन-दर्शन चा पास घेऊन जातोय असं म्हटलं तरी चालेल.

"झिंग बेल्स हलक्या असल्या तरी स्टंप्स सोबत कॉन्टॅक्ट रहाण्यासाठी स्टंप चे ग्रूव्ज डीप कट करतात, जेणेकरून नुसत्या हवेनी थरथरल्यामुळे दिवे लागू नयेत." - झिंग बेल्स वापरायच्या असतील, तर नियम शिथील करून, लाईट्स चमकल्यावर फलंदाजाला आऊट द्यायला हरकत नसावी. नवीन टेक्नॉलॉजी वापरताना, जुने नियम सुद्धा अपडेट करायला हवेत. उदा. अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज करणं हे ज्या क्रिकेट मधे पाप मानलं जायचं, त्याच क्रिकेट ने आता डीआरएस सारखी अंपायरच्या निर्णयाला अधिकृतरीत्या आव्हान देणारी प्रणाली राबवली आहे.

त्यामुळे पंत लंडन-दर्शन चा पास घेऊन जातोय असं म्हटलं तरी चालेल. >> +१
अँकी, सॉरी पण पुन्हा म्हणतोय पंत ऑफिशिअल स्टँडबाय असो वा नसो धवन च्या ईंज्युरीनंतर ऊद्भवलेल्या टीम शफल नंतरसुद्धा १५ च्या टीम मध्ये माझ्या मते पंत कुठेच बसत नाही.
तो मला खेळाडू म्हणून आवडतो पण टीम चा बॅलन्स ईंटॅक्ट ठेऊन त्याला आत आणता येत नाही कारण तो स्क्वाडमधल्या कोणालाच डायरेक्टली रिप्लेस करू शकत नाही.

झिंग बेल्स वापरायच्या असतील, तर नियम शिथील करून, लाईट्स चमकल्यावर फलंदाजाला आऊट द्यायला हरकत नसावी. नवीन टेक्नॉलॉजी वापरताना, जुने नियम सुद्धा अपडेट करायला हवेत. उदा. अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज करणं हे ज्या क्रिकेट मधे पाप मानलं जायचं, त्याच क्रिकेट ने आता डीआरएस सारखी अंपायरच्या निर्णयाला अधिकृतरीत्या आव्हान देणारी प्रणाली राबवली आहे. >> +१
पण नुसते लाईट्स लागले तरच नाही तर बॉल स्टंप्सला लागला (पण लाईट्स लागले नाहीत) तरी आऊट मानायला हवं. परवा बुमराच्या बोलिंगवरची वॉर्नरची केस ह्याच पठडीतली होती. लाईट्स चा ऊपयोग सध्या फक्त रन-आऊट/स्टंपिंग पुरताच मर्यादित दिसतो आहे.

*नवीन टेक्नॉलॉजी वापरताना, जुने नियम सुद्धा अपडेट करायला हवेत * +1. गोलंदाजांचा पाय बोलींग क्रिजच्या आंत एक सूतही नसला , तरी तो ' नो बाॅल ' आणि बाॅल स्टंपवर आदळला तरीही बेलस पडल्या नाहीत म्हणून त्याना विकेट नाहीं, हें हास्यास्पदच !!

पाकिस्तानची तिसरी विकेट पडली! आता अवघड आहे त्यांचं !
त्या आधी—
मोहम्मद आमीर चा आजचा बाॅलिंग कोटा-
१० ओवर- २मेडन- २०रन-५ विकेट - टोटल रिस्पेक्ट !!!

१० ओवर- २मेडन- २०रन-५ विकेट - टोटल रिस्पेक्ट !!! >>> हो. आणि विशेषतः बाकी बोलर्स नी ४० ओव्हर्स मधे २७७ रन्स दिले आहेत ते धरले तर जास्तच! (बाय द वे - आमिर ने ३० रन्स दिले आहेत).

५ विकेट पडल्या, आता नाही जिंकत पाकडे .
मला शनिवारची भिती वाटतेय.. सेहवाग अँड कंपनीला म्हणाव आधीपासून गरमागरम ट्विट्स ठोकायला सुरवात करु नका !

टॉस पाक ने जिंकला होता ना? आधी फिल्डिंग काय घेतली मग ?!
सकाळी ऑसीज ची सुरुवात जाम धडाक्यात झाली होती. १६ ओवर्स मधे १०० झाले होते. मला वाटलं आता रेकॉर्ड स्कोर होणार काहीतरी. पण नंतर विकेट्स पडल्या.

आमिर च्या बॉलिंग मुळे पाकिस्तान ने मस्त कमबॅक केला होता. पण बॅटींग मधे अपरिपक्वता दाखवली. २५ व्या ओव्हरअखेरीस १३६/२ असताना नंतर शांतपणे खेळण्याऐवजी विकेट्स गमावल्या.

उद्या आपली मॅच होणार का 'घन घन माला, नभी दाटल्या' होऊन ते वर्थलेस लुईस भाव खाणार?

हा शाहिद आफ्रिडी म्हणजे तोच जुनाच आहे ना? तो तर रिटायर झाला होता ना? हा दूसरा असावा अन्यथा 11 नंबर वर कसा येईल?

तो अनंत काळासाठी १८ वर्षाचा शाहिद
आणि हा म्हणे १९ वर्षांचा शाहिन !!

हरले पाक..
आॅस्ट्रेलियाच्या तोंडचं पाणी पळालं होतं काही वेळा साठी..

आता मॅच नंतर संजय बांगरची पत्रकार परिषद दाखवली. त्यात त्याने स्पष्ट सांगितलं की राहुल ओपन करेल आणि चौथ्या नंबर साठी टीम मधे पर्याय उपलब्ध आहेत! म्हणजे पंत ही येत नाही आणि रहाणे ही येत नाही..
अर्थात ही बाकीच्या टीम्सना गाफिल ठेवण्यासाठी असलेली स्ट्रॅटजी वगैरे नसेल तर.

"म्हणजे पंत ही येत नाही आणि रहाणे ही येत नाही" - रहाणे नाहीचे टीम मधे. पंत कव्हर म्हणून गेलाय. तो १५ मधे नाहीये. तसं करण्यासाठी धवन ला बाहेर काढावं लागेल आणी ते करणार नाहीये. त्यामुळे जे मूळ १५ आहेत त्यातलेच ऑप्शन्स आहेत. उद्या कार्थिक की शंकर, इतकच बघायचं. मला कार्थिक वाटतय - बॅटींग स्ट्राँग करण्याच्या दृष्टीनं.

पाकिस्तान ने अपरिपक्व बॅटींग ने मॅच घालवली. जिंकू शकले असते. मागच्या आठवड्यात ऑस्ट्रेलिया विरूद्ध वेस्ट इंडीज ने सुद्धा अशीच आततायी बॅटींग केली होती. ऑस्ट्रेलिया प्रतिस्पर्ध्यांच्या अशा चुकांवर कॅपिटलाईझ करण्यात वाकबगार आहेत. ह्या पार्श्वभूमीवर परवा भारतानं केलेला खेळ अत्यंत प्रोफेशनल होता. अशी कुठलीही संधी आपण त्यांना दिली नाही.

अँकी, सॉरी पण पुन्हा म्हणतोय पंत ऑफिशिअल स्टँडबाय असो वा नसो धवन च्या ईंज्युरीनंतर ऊद्भवलेल्या टीम शफल नंतरसुद्धा १५ च्या टीम मध्ये माझ्या मते पंत कुठेच बसत नाही.
>> मी फक्त धवन ला रीप्लेस करायचं झालं तर स्टँडबाय पूल मधे ऑप्शन्स काय आहेत तेव्ढ्यापुरतंच बोलत होतो. ओव्हर ऑल केपेबिलिटीबद्दल नाही. म्हणूनच फक्त रायडू अन पंतला कन्सिडर करत होतो. टोटली अ‍ॅग्री की तो सध्यातरी लंडन दर्शनला चाललाय.

पण एकही डावरा बॅट्समन न घेता खेळणं मला ऑड वाटतं.
लेफ्टीजचा मुळातच थोडा स्टायलिश वाटणारा गेम असेल अथवा लेफ्ट राईट बॅलन्स.

म्हणून माझ्या ११ मधे तर मी सर जडेजाला ४थ्या नंबरवर पाठवायचं म्हणतोय. (पंत ला नाही)

उद्या कार्थिकला चौथ्यावर घेऊन खेळणे श्रेयस्कर ठरेल. लेफ्ट आर्म फास्ट बॉलिंग हा आपला नेहमीच कमकुवत दुवा राहिला आहे. त्यात बोल्ट सध्या परत मस्त बॉलिंग करतोय. अशा वेळी एक बॅटसमन असलेला बरा.

लेफ्ट आर्म फास्ट बॉलिंग हा आपला नेहमीच कमकुवत दुवा राहिला आहे. त्यात बोल्ट सध्या परत मस्त बॉलिंग करतोय>> म्हणूनच खलील अहमद कायमस्वरूपी नेट बोलर टीम बरोबर ठेवला आहे. त्याचा स्विंग काही starc, boult, amir एवढा भारी नाही पण अँगलच्या प्रॅक्टिस साठी बरा आहे.

Nottingham ग्राउंड आकाराने लहान, overcast conditions, त्यामुळे उद्या स्पिनर्सना मार पडू शकतो. जाधवला बोलिंग देण्याचा gamble अलीकडे फार यशस्वी होत नाहीये. एका स्पिनरला बसवून शमीला घ्यावे असे फार वाट्त आहे. पण असे होण्याची शक्‍यता कमी आहे.
कार्तिक की शंकर हा मोठाच गुंता आहे. जितका विचार करू तितका शंकर जास्त suitable वाटतो.

भारत व पाक विरुध्दच्या सामनयांमुळे ऑसीजच्या आत्मविश्वासाला ( किंवा, पारंपारिक गुर्मीला ) तडा गेला कीं नाहीं, हें सांगणं कठीण; पण उर्वरित सामन्यात त्यांच्या विरुद्ध खेळणारया संघांवरचा ऑसीजचा दबदबा निश्चितच कमी होईल व ते ऑसीज विरूद्ध अधिक विश्वासाने खेळायला उतरतील.

झिंग बेल्स वापरायच्या असतील, तर नियम शिथील करून, लाईट्स चमकल्यावर फलंदाजाला आऊट द्यायला हरकत नसावी. नवीन टेक्नॉलॉजी वापरताना, जुने नियम सुद्धा अपडेट करायला हवेत. >>> +१

आज चौथा/पाचवा पंच मेघराज काय म्हणतोय तिकडे ट्रेन्ट ब्रिज ला? मध्येच मैदान धुवायचा विचार नाही ना त्याचा?

कार्तिक खेळल्यास जादाचा यष्टीरक्षक, शंकर / जडेजा खेळल्यास जादाचा गोलंदाज उपलब्ध होईल...

"Because the bails are now witty" >> Happy

भाउक्रिकेट्मधे बॉलर असतो, बॅटस मन असतो. किपर असतो स्टंम्पा सांभाळायला. विट्या संभाळायलाच एक "विटी"मॅन पाहिजे, तुमच्या सारखा.

के एल राहुल
रोहित शर्मा
विराट कोहली
विजय शंकर
महेंद्र धोनी
केदार जाधव
रवींद्र जाडेजा
भुवनेश्वर कुमार
मोहम्मद शमी
जसप्रीत बुमरा
यजुर्वेंद्र चहल

के एल राहुल
रोहित शर्मा
विराट कोहली
विजय शंकर
महेंद्र धोनी
केदार जाधव
रवींद्र जाडेजा
भुवनेश्वर कुमार
मोहम्मद शमी
जसप्रीत बुमरा
यजुर्वेंद्र चहल>>>>>>

हार्दिक पंड्याला का बाजुला केले तुम्ही?

ते काही असो पावसाने तळ ठोकलायं तिथे...

पाऊस थांबतो पंच येतात खेळपट्टी /मैदानाची पाहणी करतात... थोडावेळाने पुन्हा पाहणी करु म्हणतात... पाठ फिरवली त्यांनी की परत वरुणराज येतात ... लगबगीने आच्छादने येतात सगळे मैदान झाकून टाकतात...

२०-२० देखिल होईल की नाही? किमान प्रत्येकी ४० षटकांचा तरी सामना व्ह्ययला हवा... बघुया काय होतयं ते...

Pages