तेलुगू चित्रपट- लेखनाचा धागा!

Submitted by अज्ञातवासी on 27 June, 2017 - 12:55

मंडळी धागा बदलतोय.
आतापासून फक्त तेलुगुच नाही तर

१. तेलगू
२. तमिळ
३. कन्नड
४. मल्याळम

या चार प्रमुख दक्षिण भारतीय भाषेमधील चित्रपट चर्चा करूयात.
अर्थात माझं पहिलं प्रेम तेलुगुच असेल Wink

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मन्या, वो हम दोनो को इच समजता है...
Wink
आणि सॉरी गो बाय, कुणालातरीच्या जागी बदल केला आहे.
इकडे नाशिकला ये, पुन्हा एकदा जाऊयात, खुश?

चित्रपट लईच भारी, बेस्ट इन महेश बाबू करियर!
आणि खरंच, खूप शिकण्यासारखं आहे, महर्षी मधून!!

मलापण घ्या की तुमच्यात. Wink
नाशिकला?आत्ता नको रे! घरीच बघते हया.तुनळीवर वा दुसरीकडे कुठेतरी.

एवढं काही सिरियस नव्हतं, मी काहीतरी चुकीची माहिती टाईप केली. श्रद्धाने ती माहीती करेक्ट केली. मी एडिट केली, तर श्रध्दानेही करेक्शन काढून टाकलं... उगाच रात्रभर तुला काही भुंगा नको... काय होतं म्हणून.

तुनळीवर लवकर येणार नाही वाटत. प्राईम वर येईल बहुतेक.

भुंगा आणि मला. Biggrin Biggrin
मला माहीत होत तु SOTY2 बद्दल कायतरी टाकलं होत!

खूप दिवसांपूर्वी होता, आता काढलाय बहुतेक. नेटवर सुद्धा नाहीये...
स्टार गोल्ड वर लागेल बहुतेक, THE REAL TIGER नावाने!

Ok Sad
अलु अर्जुनच्या लिस्टच काय झालं Uhoh

2003 Gangotri - प्रॉपर डेब्यु फिल्म. जास्त अपेक्षा ठेवू नका. एक मसाला इंटरटेनर.

2004 Arya - तेलगू चित्रपट सृष्टीतला नव्हे तर भारतीय चित्रपटसृष्टीतला एक मैलाचा दगड. आर्याने कॉलेज चित्रपटांना नविन शैली दिली. अल्लू अर्जुन साठी नव्हे पण सुकुमार साठी नक्की बघा.

2005 Bunny - ॲक्शन इंटरटेनर. बघावाच असा काही नाही.

2006 Happy - अल्लू अर्जुनला रोमँटिक हिरो म्हणून इस्टॅब्लिश करणारा चित्रपट. वन टाइम वॉच.

2007 Desamuduru - हाय ऍक्शन थ्रिलर. अल्लू अर्जुन च्या चाहत्यांसाठी मस्ट वॉच.

2008 Parugu - तद्दन मसाला चित्रपट. टायगर श्रॉफ चा हिरोपंती याचाच रिमेक होता.

2009 Arya 2 - पुन्हा फक्त सुकुमार साठी बघावा असा चित्रपट. यातील रिंगा रिंगा चुकवू नका

2010 Varudu - असा थ्रिलर चित्रपट तेलुगु चित्रपटसृष्टीत क्वचित बनतो. असा जबरदस्त व्हिलन तेलुगु चित्रपटसृष्टीत क्वचित आढळतो. नक्की बघा.

2010 Vedam - अल्लू अर्जुन च्या कारकीर्दीतलं सर्वोत्कृष्ट चित्रपट! अल्लू अर्जुन साठीच नव्हे तर दिग्दर्शन, स्टोरी आणि अनेक गोष्टींसाठी बघायला हवा

2011 Badrinath - मसाला ऍक्शन चित्रपट. मला तरी बोरिंग वाटलं

2012 Julai - त्रिविक्रम आणि अल्लू अर्जुन यांची जोडी पहिल्यांदाच जमली. क्लासिक त्रिविक्रम चित्रपट. नक्की बघा.

2013 Iddarammayilatho - पुन्हा एकदा ऍक्शन थ्रिलर. बघावाच असा काही नाही.

2014 Race Gurram - अल्लू अर्जुन चा कारकिर्दीतला मस्त चित्रपट. ॲक्शन कॉमेडी या सगळ्या एलिमेंटनी भरपूर असलेला. अल्लू अर्जुनचा अभिनय या चित्रपटासाठी फार नावाजला गेला

2015 Son Of Sathyamurthi - पुन्हा एकदा अल्लू अर्जुन त्रिविक्रम यांची जोडी या चित्रपटात जमली. अतिशय सुंदर चित्रपट. कुठेही बोर होत नाही. सोबत त्रिविक्रम धक्कातंत्र आहेच

2016 Sarrainodu - बोयापती श्रीनू यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट. अतिशय मसाला चित्रपट. हा चित्रपट प्रचंड हिट ठरला होता परंतु दिग्दर्शनतील उणिवा पावलोपावली जाणवतात. बोयापती श्रीनू हा माणूस चित्रपट बनवू शकत नाही हे माझं प्रांजळ मत आहे. त्याचे ताजे उदाहरण 'विनया विधेया रामा'

2017 Duvvada Jagannadham - अतिशय मस्त चित्रपट. कॉमेडी इंटरटेनर. ॲक्शन सुद्धा भरपूर आहे

2018 Naa Peru Surya, Naa Illu India - आपल्या रागावर ताबा नसलेल्या एका सैनिकाची भूमिका अल्लू अर्जुन यांनी या चित्रपटात साकारली. चित्रपट चांगला आहे

यातले मी बघितलेत बरेचसे.
सुरवात आर्या1 (telugu) पासुन केली होती.काहिच कळाला नव्हता तरी आवडला होता. Happy

एक वैयक्तिक मत.
अल्लू अर्जुनला अजूनही त्याच्या हायेस्ट पोटेनशीयलचा चित्रपट मिळालेला नाही, असं मला वाटतं. नो डाउट, त्याचे बरेचशे चित्रपट चांगले आहेत, पण
१.महेश बाबू - dokkudu, srimanthudu आणि महर्षी
२.Jr NTR - जनता गॅरेज, NANNAK PREMATHO
३.राम चरण - मगधीरा आणि रंगस्थलम
४. प्रभास - बाहुबली
५. पवन कल्याण - ATARINTIKI DARREDI आणि गब्बर सिंग.
असे ट्रेंडसेटर, ऑल टाईम ब्लॉलबस्टर म्हणावेत असा एकही चित्रपट त्याच्या खात्यावर जमा नाही.
आर्या जवळपास जाऊ शकेल, पण नाहीच...

मीपण! सेम पिंच! Happy
आर्यातली हिरोईन रडायची तेव्हा गंमत म्हणुन मुवी रिवाइंड करुन करुन रिमोट बिघडवला होता आम्ही. Lol

Good night

मी पाहिलेला सर्वात पहिला तेलुगु मुव्ही अल्लू अर्जुनाचा- आर्या
तेव्हा काही समजल नव्हते, आता तेलुगु येत म्हनुन, सर्व मुव्ही तेलुगु मध्येच बघते.

Rajsmi तुम्हाला खरंच तेलुगु येतं..मला वाटलं कि अज्ञा ने गंमत केली. Happy
तुम्ही शिकवणार असाल तर मलापण आवडेल तेलुगु शिकायला. Happy

अज्ञा - धन्यवाद अलु अर्जुनच्या लिस्टसाठी.

लकी द रेसर आणि डीजे बघितला आहे त्याचा . आणखी ही काही बघितले आहेत पण नावं आठवत नाही.

सुलू नाही, पण बरेच मुवि सबटायतल आणि विना सबटायतल सुद्धा बघितलेत. तेलगू चित्रपटांची मजाच वेगळी... गाणेही खूप सुंदर असतात.
येवाडू मध्ये छोटासाच रोल होता, पण हिरो अल्लू अर्जुनच होता.
Wink

JR NTR मला अजिबात नाय आवडत,म्हणून मला तरी नको त्याची लिस्ट.पण त्याचे काही चित्रपट चांगलेत यात वाद नाही.

Pages