तेलुगू चित्रपट- लेखनाचा धागा!

Submitted by अज्ञातवासी on 27 June, 2017 - 12:55

मंडळी धागा बदलतोय.
आतापासून फक्त तेलुगुच नाही तर

१. तेलगू
२. तमिळ
३. कन्नड
४. मल्याळम

या चार प्रमुख दक्षिण भारतीय भाषेमधील चित्रपट चर्चा करूयात.
अर्थात माझं पहिलं प्रेम तेलुगुच असेल Wink

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अरे इथे शांतता आहे? नविन धागा निघाला का?

अल्लू अर्जुन चा पुष्पा येतोय. त्यात हिंदी डबिंग श्रेयस तळपदे ने केलंय म्हणे. त्याचं एक गाणं गाजतं आहे सध्या - उ अंटवा मावा
देवी श्री प्रसाद ने भन्नाट म्युझीक दिलंय.
https://www.youtube.com/watch?v=u6BoyOceiPE

मी आत्ता सिनेमा बघावा म्हणून गेलो होतो. तिथे होतं पुष्पाचे पोस्टर. पण त्यात अल्लू अर्जुन ओळखू नाही आला.

हो भारी गेटप दिसतो आहे. माझा आवडता नायक आहे तेलुगू मधला अल्लू अर्जुन - अगदी आर्या पासून Lol

त्या वरच्या गाण्याचे हिंदी पण आले आहे. कनिका कपूर ( बेबी डॉल सोनेवाली) ने गायले आहे ते
https://www.youtube.com/watch?v=iCRh1IGw5wI

१. चिरुली: एक वेगळाच मल्याळम चित्रपट पाहिला. चित्रपट तसा slow आहे. Description मथ्ये horror वगैरे लिहीले होते, म्हणून बघायला घेतला, पण एकदम हटके था. धोडासा Nolan style वाटला. डोक्याला त्रास देणार. चित्रपटाची कथा सुरुवातीलाच एका पौराणिक गोष्टीतून दाखवली आहे. तरीदेखील चित्रपट बघायला interest वाटतो.

२. kannum kannum kollaiyadithaal: दुलकर सलमानचा tech thriller आहे. बर्‍यापैकी अ आणि आ सदरात मोडणारा आहे. But still Interesting to watch.

Pages