क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिसरा सामना जिंकण्याची संधी पावसामुळे गमावल्याने थोडा अँटी क्लायमॅक्स झाला खरा पण ऑस्ट्रेलियात जिंकण्याचे पाहण्याचे भाग्य लाभले हे कमी नसे. फारच उत्तम खेळला संघ. गोलंदाजी तुफान आहे सध्या भारताची

राहणे आणि राहुल सारखे लोक संघात जागा अडवून बसलेले असतात तेव्हा त्या नंबरावरचे किमान ५-५ नवोदित, होतकरू , आत यायची लायकी असलेले, खेळाडू बाहेर बसून, कधी कधी त्याम्चे करिअर संपून जाते असे नाही वाटत का? डोमेस्टिक क्रिकेट खेळून स्वतः:चा खेळ सुधारवण्याच्या ऐवजी काहीही ना करता नुसते चेक्स खिशात घालीत बसणार्याना कशाला ठेवायचे. गावसकर पहाटे विमानाने आल्यावर सकाळी कांगा लीग खेळायला गेला होता.

*आत यायची लायकी असलेले, खेळाडू बाहेर बसून, कधी कधी....*
दुसरी बाजू - लायकी सिद्ध करून आंत आलेल्या खेळाडूना फार घाईने बाहेर काढणं , हेंही आंत येवूं इच्छिणारयांना धडकी भरवणारं ठरूं शकतं .

अरे बाबा, त्या डॉक्टरकडे नकोच ! तो पटापट पेशंटना आंत घेतो कारण आंत घेतलेल्याना वर वर तपासून पटापट बाहेरही काढतो !!20181230_225207.jpg

भाऊ, अगदी बरोबर!
आत येणार्‍याला दडपण रहणार कि थोडेसे अपयश बाहेरचा रस्ता दाखवू शकते.. आणि असे बरेच होऊन गेले आहे २-३ कसोट्यांचे मानकरी..

परंतु राहुल एका शतकाच्या बळावर बरेच दिवस आत आहे!

*परंतु राहुल एका शतकाच्या बळावर बरेच दिवस आत आहे!* - आंत आला कीं त्याला कितीही अपयश माफ आहे , असं अजिबात नाहीं. पण जागतिक पातळीवर खेळण्याच॔ कसब व मानसिक घडण एखाद्या खेळाडूत निश्चितपणे जाणवत असेल , तर त्याचं अपयश कांहीं काळ सहन करणंच शहाणपणाचं. अर्थात , हें अचूक हेरण्याची कुवत निवडसमितीचीही असावी लागते. राहुल व रहाणेबद्दल याबाबतीत मला काय वाटतं यापेक्षा खराखुरा जाणकार काय म्हणतो , हेंच म्हणून सर्वाधिक महत्वाचं.

याबाबतीत मला काय वाटतं यापेक्षा खराखुरा जाणकार काय म्हणतो , हेंच म्हणून सर्वाधिक महत्वाचं.>> जाणकार असे लिहून भाऊंनी सगळा वादच संपवून टाकला Lol

असामीजी , मत मांडणं व चर्चा याची मलाही खुमखुमी आहेच . फक्त, कुणाला , केंव्हा संघातून डच्चू द्यावा, याबाबत मात्र ठामपणे मतप्रदर्शन करायला मीं कचरतो , हें खरं. राष्ट्रीय संघात येणारा खेळाडू प्रतिभा, तपश्चर्या याच्या बळावर प्रचंड स्पर्धेला तोंड देत तिथं पोहोचलेला असतो. त्याच्या खेळावर मत व्यक्त करणं क्रिकेटप्रेमी म्हणून माझा अधिकार असला तरीही त्याला डच्चू देण्याची भाषा करण्याचा अधिकार मला आहे का, याबद्दल मात्र मीं स्वत:च साशंक आहे.

भूतकाळ वगैरे विषय निघालाच आहे, तर कपिल, रवी शास्त्री, गावस्कर ह्या सगळ्या समालोचक लोकांना कोणीतरी विचारायला हवं, की चहापानानंतर पावसाचं भाकित असताना, १२० चं लक्ष्य असताना ते २५ षटकांत ५९/२ ह्या कूर्मगतीने का खेळले? शास्त्री मारे म्हणेल, पास्ट इज पास्ट, स्वतः काय केलं? चौथ्या दिवशी बॉर्डरने वाट पहायला लावली, आणि पाचव्या दिवशी स्वतःच टुकुटुकु लावलंन्.

At Melbourne, December 26, 27, 28, 29, 30. Drawn. Australia, who except for Matthews and Border batted poorly, were saved by the weather and by the Indians' lacking a sense of urgency. [... ] The weather forecast for the final day was unfavourable, yet the Indians seemed to have ignored it, judging by their tactics against Australia's last pair and by their approach afterwards to getting the required runs. (विस्डेनमधून)

मेलबर्न १९८६.

*रवी शास्त्रीला पब्लिकने धुतलेय कमेंटमध्ये* -

असतोच , बाईसाहेब, असा एखादा कोपरा
कितीही धुतला तरीही स्वच्छ न होणारा !!
bucket_0.jpg

भाऊ, एक नंबर!! Lol

ते मद्रास ड्रॉ चे श्रेय देखिल या शास्त्रीबुवांचेच!!

बाकी रहाणेने अ‍ॅडलेडमध्ये दुसर्‍या डावात ७० करून तिथे जिंकण्यात मोठा हातभार लावला होता, हे विसरता येणार नाही. त्याचबरोबर पर्थमध्ये कोहलीच्या शतकाबरोबर त्याचं अर्धशतक होतं. 'जागा अडवून बसला आहे' वगैरे जरा अति झालं. ह्या वर्षाच्या सुरवातीपर्यंत तो आपला परदेशातला सर्वोत्तम बॅट्समन होता बहुधा. (२०१६पर्यंत होता आणि २०१६मध्ये जो लांब घरचा ऋतू सुरू झाला तो मला वाटतं जानेवारी २०१८पर्यंत चालला. फारतर कोहलीनंतरचा सर्वोत्तम असेल.) तरी त्याला द. आफ्रिकेविरूद्ध (जाने. २०१८) बसवला होता 'करंट फॉर्म' ह्या मुद्द्यावरून. तरी तिथे इतरांनी विशेष काही केलं नाही. पुजारालाही इंग्लंडमध्ये संघातून वगळलं होतं. आता त्याने दिलंच दाखवून. रहाणेही करेल असं वाटतंय. असामीशी पूर्णतः सहमत.

उद्या कोहलीवरही एखादं वर्ष वाईट जाण्याची वेळ आली, तर त्याच्यासाठीही थांबायची तयारी हवी.

के एल राहुलच्या डोक्यात आधीच घोळ काय कमी होते म्हणून त्याने कॉफी विथ करणवर जाऊन अजून घोळ करून घेतले. Uhoh पंड्या तर विचारायलाच नको. आता बीसीसीआय आणि सीओए बंदीची भाषा करतायत.

सुनिल, सचिन हेही ' बॅड पॅच 'मधून सुटले नव्हते. पण त्याआधी त्यानी असामान्य कामगिरी केली होती. रहाणेला अशा भव्य कामगिरीचं पाठबळ नसल्याने खरी अडचण आहे व निवडसमितीची हीच खरी कसोटी आहे - गुणवत्तेबददल ठाम विश्वास असेल तर अपयशाकडे व टीकेकडे दुर्लक्ष करून धैर्यानं रहाणेला अजूनही संधी देण्याची !
*एल राहुलच्या डोक्यात आधीच घोळ काय कमी होते म्हणून .....हा पंड्या तर विचारायलाच नको. * -
उथळ पाण्याला खळखळाट फार !!

पंड्या तर विचारायलाच नको. आता बीसीसीआय आणि सीओए बंदीची भाषा करतायत >> मी कॉफी विथ करण बघितलेले नाहीये त्यामूले नक्की काय बोलला नि त्यापेक्षा मह्त्वाचे कसा बोलला नि काय काँटेक्स मधे बोलला हे माहित नाही. नुसते विधाने वाचल्याने वाचणार्‍याचा गोंधळ होऊ शकतो म्हणून योग्य अयोग्य ह्याविषयी बोलत नाही. फक्त BCCI ला इतरांबद्दल मोरल एथिकल स्टँस घेताना बघून गम्मत वाटते.

काल भाग बघूनच हा प्रतिसाद लिहिला. राहुल आक्षेपार्ह इतकं (प्रमाण आणि प्रत दोन्हींमध्ये) बोलला नाही, पण थोडं नक्कीच होतं. पंड्याला तसंही कुठे काय बोलावं हे कळणार नाही हे त्याच्या चेहर्‍यावर लिहिलं होतं, आणि त्याने भयंकर बडबड करून ते सिद्धही केलं. बीसीसीआय मॉरल स्टँडपेक्षा जास्त कंपनी डिसरीप्युटबद्दल विचार करत असावेत.

तसंही ह्या सगळ्यात करण जोहरचा सहभागही वादग्रस्त म्हणायला हवा. पण तो वेगळ्या धाग्याचा विषय आहे. (ऋऽऽन्मेष, वाचतोयस का?)

पंड्या २ हातांत २ फोन ठेवून ड्रेसिंग रूममध्ये फिरत असतो म्हणे. हे आयसीसी अँटी-करप्शन नियमांत बसतं का कोण जाणे.

करण जोहर चा शो ही आणखीन एक बिनडोक कॉपी आहे हे पहिलं. पंड्या आणी राहूल हे दोघं वेड्यासारखं बरळले हे दुसरं पण त्यातल्या स्त्रीयांविषयीच्या कॉमेंट्स अत्यंत आक्षेपार्ह होत्या. त्याबद्दल त्या दोघांना जाब विचारला जाणं योग्यच आहे.

ऑसीजचा कोच , जसटीन लॅगर, म्हणालाय, आमची गोलंदाजी चांगलीच होती पण पुजाराने आमच्या गोलंदाजांची दमछाक केली ; प्रत्येक चेंडू तो नीट बघूनच खेळतो. पुजाराची एकाग्रता सचिन , द्रविड यांच्यापेक्षाही सरस वाटते !
What a compliment !!

आमची गोलंदाजी चांगलीच होती पण पुजाराने आमच्या गोलंदाजांची दमछाक केली >>>
कांगारुंना ३ नविन चेंडू वापरावे लागले सलग दोन सामन्यातील पहिल्या डावात हेच पुजाराच्या बॅटिंगचे श्रेय!

*आता बीसीसीआय आणि सीओए बंदीची भाषा करतायत * -

बहुतेक आपल्याला स्टूल किंवा खुर्ची मिळणार बसायला ! ' त्या दोघांना बाहेर बसवायचंच ' , यावरच चर्चा चाललीय आंत ! 20190103_090650_1.jpg

"The definition of a world-class player is his ability to handle fame with dignity" - आज राहूल द्रविड चा वाढदिवस आहे. dignity personified!

ऑसीज 187 -4

तूं माझ्याबरोबर चहा घ्यायला येतोयस कीं तुला काॅफीच घ्यायचीय त्या करणबरोबर !20190102_225036_0.jpg

खलिद अहमद आंतर राष्ट्रीय दर्जाचा खेळाडू झालाय असे वाटत नाही... >>>> अहो पण असं म्हणून त्याला घेतलं नाही संघात तर तुम्हीच पुन्हा आताच सरकार कसं असहिष्णू आहे म्हणून गळे काढाल. Wink

बॅटींग चांगली करतायत ऑसीज.

भाऊ Biggrin

मागे एकदा लिहिलं होतं, की राहुल खराब फॉर्म मधे असला तरी बर्‍याच जाहिरातींमधे दिसतोय, त्यामुळे बाहेरचा रस्ता दाखवतील वाटत नाही. खालची बातमी वाचता, त्याचं आता एकंदर अवघड दिसतंय..
https://www.loksatta.com/krida-news/after-bcci-action-many-brand-compani...

Pages