क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लंच - 69 - 1 ! शाॅर्ट पीच गोलंदाजीला यशस्वी तोंड देत चांगला स्कोअर!!

' ऑफिसमध्ये नाही, टूरवर खरी कसोटी असते तुमची ' , म्हणता ना नेहमी . म्हणून सांगलीऐवजी सिडनी घातलंय टूर प्रोग्रॅममधे ! 20190103_072130.jpg

अगरवाल मारण्याच्या नादात आऊट.
भारत १२६ / २
अगरवाल ७७.
आपली बायको कॉमेंट्री करत असल्याचे बहुतेक स्टार्कला कळले असावे Biggrin त्यामुळे कॅच सोडल्या शिव्या खायला लागण्याची भीती वाटली असणार त्याला.

*हे बरोबर नाही टेस्ट मध्ये..* हा अनुभवाचा भाग आहे .पण तंत्र , टेंपरॅमेंट यात सलामीचा फलंदाज म्हणून भक्कम वाटतो मयांक !

फिरकीला पुढे येवून बचाव व आक्रमण करतांना आपल्या फलंदाजांना पहाणं समाधानकारक !
पुजाराचे लागोपाठ दोन अप्रतिम चौकार- ऑन ड्राईव्ह व स्क्वेअर ड्राईव्ह!!

पुजारा शतक ! अभिनंदन.
( फार पूर्वीपासून मीं पुजाराला " लंबे दौडका घोडा " म्हणत आलो व कसोटीत जेंव्हा जेंव्हा त्याला वगळलं तेव्हा मीं वैतागलो , हें सारं समर्थनीय ठरतंय याचंही समाधान आहेच )

अगरवाल परत एकदा मस्त खेळून बाद झाला.. बहुतेक विजय आणि राहुल साठी परत यायचे दरवाजे बंद होऊ शकतात. पृथ्वी शॉ तंदुरुस्त झाल्यावर तर नक्कीच..

हनुमा विहारी आपण आघाडीपेक्षा ६ व्या क्रमांकावर योग्य आहोत हे सिद्ध करुन दाखवतोय!
दिवसअखेर ४-३०३
पुजारा १३० ना.
हनुमा ३९ ना.
५ व्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी!!

हनुमा विहारी आपण आघाडीपेक्षा ६ व्या क्रमांकावर योग्य आहोत हे सिद्ध करुन दाखवतोय! >> अगदी अगदी

दिवसअखेर ४-३०३>> एकदम ऑसीज पिच वरचा स्कोर,, दिवसात ३००...

भारताकडून परदेशातील सिरीज मधे दोन पेक्षा जास्त शतके एकाच सिरीज मधे कोहली (ऑस्ट्रेलिया २०१५ - ४ शतके), गावसकर (विंडीज १९७१ - ४) आणि द्रविड (२०११ इंग्लंड - ३) यांनी मारल्याचे लक्षात आहे. आता पुजारा. अजून कोणी नसावे बहुधा.

गावस्कर ऑस्ट्रेलियात ३ शतके ७७-७८ च्या मालिकेत. ऑस्ट्रेलियात पुजारा तिसरा भारतीय एका मालिकेत ३ किंवा अधिक शतके मारणारा.

SM Gavaskar 3 4 1 577 220 192.33 4 0 0 19 Mar 1971 India
India in West Indies Test Series, 1970/71
V Kohli 3 4 0 572 169 143.00 4 0 0 9 Dec 2014 Australia
Border-Gavaskar Trophy (India in Australia), 2014/15
DN Sardesai 3 3 0 474 212 158.00 3 0 0 18 Feb 1971 India
India in West Indies Test Series, 1970/71
SM Gavaskar 3 3 0 358 127 119.33 3 0 0 2 Dec 1977 Australia
India in Australia Test Series, 1977/78
M Amarnath 3 3 2 332 120 332.00 3 0 0 10 Dec 1982 Pakistan
India in Pakistan Test Series, 1982/83
R Dravid 3 3 0 480 217 160.00 3 0 0 8 Aug 2002 drawn
India in England Test Series, 2002
R Dravid 3 3 2 366 146* 366.00 3 0 0 21 Jul 2011 England investigate this query
Pataudi Trophy (India in England), 2011
CA Pujara 3 3 1 359 130* 179.50 3 0 0 6 Dec 2018 - investigate this query
Border-Gavaskar Trophy (India in Australia), 2018/19

राहणे , के एल राहुल च्या मार्गावर. लवकर नारळ देउन होतकरू खेळाडूस सण्धी देने आवश्यक. मराठी असला म्हणून काय झालं . माण्जर्‍या नाही का मराठी....

अमरनाथ ८२-८३ मध्ये कसला तापला होता. द्रविडची २००२ मधली शतकं मला आठवतात. २०११ तर आठवतातच, पण कटू आठवण हरल्यामुळे.

कृष्णा, भा - धन्यवाद. हो मोहिंदर जबरी होता ८२-८३ मधे. पण तितकाच अनाकलनीय. त्यावेळच्या पाक विरूद्ध आणि विंडीज विरूद्ध त्यांच्या खेळपट्ट्यांवर यशस्वी झालेला पंटर भारतात नंतर त्यांच्याविरूद्ध एकेरी स्कोअर्स करून फेल गेला.

रहाणे खूप संधी वाया घालवतोय. नारळ एकदा वेक कप कॉल म्हणून द्यायला हरकत नाही.

<<<चला म्हणजे भारत दहा खेळाडू घेऊन खेळणार तर....>>
क्षेत्ररक्षणास पुरेसे असतील तर चालेल. फलंदाजीला तीन चार नि गोलंदाजीला चार असे आठ असले तरी पुरते.

रहाणेकडून बर्‍याच अपेक्षा होत्या. काहीतरी मानसिक स्ट्रेस असावा त्याला. लग्न झालय का त्याचे? घरी कुणि आजारी आहे का? कुणितरी त्याचे पैसे बुडवले का?

बचावात्मक खेळावं तर हे नवीन खेळाडू आक्रमक खेळून लाजवतात व आक्रमक खेळावं तर कुठं तरी माशी शिंकतेच , ह्या द्विधा मन:स्थितींत तर रहाणे अडकला नाहींय ना ? कदाचित, त्याला सलामीला ट्राय केलं तर हा दबाव न घेतां तो आपला खेळ आपल्या गतीने खेळेल व उपयुक्तही ठरेल.

Take a bow Pujara!! जबरदस्त बॅटींग. त्याहीपेक्षा, जबरदस्त टेक्निक, टेंपरामेंट आणी फोकस!! १४५+ च्या स्पीड ने येणारे बॉल्स त्याच्या पायाशी निपचित पडतात. बॅट चा नॅचरल अँगल, फुल फेस नसून, डिफेन्सीव्ह आहे. कितीही बॉल्स डोक्यावरून उडवा, ऑफ स्टंप च्या बाहेर टाका, पठ्ठ्या, ढुंकून बघत नाही. अगदी शेवटच्या क्षणी खेळून बॉलर्स आणी फिल्डर्स च्या हाती काही लागणार नाही ह्याची पुरेपूर दक्षता घेतो. पण तितक्याच तत्परतेनं वाईट बॉल चा समाचार घेतो. रनिंग बीटवीन द विकेट्स स्लो असेल, पण नॅथन लायन च्या थोड्याश्या आखूड टप्प्यावर टाकलेल्या बॉलवर चपळाईनं धावून जात, बॉल ला टप्प्यावर घेतो. प्रत्येक बॉल खेळायच्या आधी स्वतःला री-फोकस करतो. - कंप्लीट टेस्ट बॅट्समन! अप्रतिम!! काल शेन वॉर्न म्हणाला तसं, व्हॉट वुड ऑस्ट्रेलिया नॉट गीव्ह टू गेट अ बॅट्समन लाईक पुजारा टू बॅट फॉर देम.

मयंक चं शॉर्ट बॉल्स खेळायचं टेक्निक परिपूर्ण नसलं - आणी भारतात सगळं क्रिकेट खेळलेल्यांचं तसं क्वचितच असतं - तरी त्याची टिकून रहायची जिगर जबरदस्त होती. कुठलाही आततायीपणा न करता त्याने पहिल्या सेशनमधलं स्टार्क चं शॉर्ट बॉल्स चं स्पेल खेळून काढलं. बॉल्स अंगावर घेत, काही एजेस जात असताना सुद्धा तो खेळत राहिला - this is a test cricket - a test of a character and temperament. लायन विरूद्ध तो आऊट झाला ते फार बेंगरूळ वाटलं, पण त्याचा प्लॅन यशस्वी झाला असता, तर ऑस्ट्रेलिया हतबल झाले असते. फास्ट बॉलर्स ना मदत मिळत नव्हती. अशात जर लायन सुद्धा अयशस्वी ठरला असता, तर ऑस्ट्रेलियाकडे कुठलाच ऑप्शन नव्हता. पण ठीक आहे. अनुभवातून शिकू शकेल असं प्रॉमिस नक्की दाखवलं मयंक ने.

राहूल सिरियसली नीड्स हेल्प. दुर्दैवानं आता भारत फारश्या टेस्ट्स खेळणार नाहीये आणी डोमेस्टीक सीझन पण संपत आलाय (न्यूझिलंड दौर्यानंतर संपेल बहुदा). रहाणे चांगल्या बॉलवर आऊट झाला. विराट च्या अपयशावर बोलायची संधी मिळण्याआधीच तो काहीतरी विराट करतो. हनुमा विहारी हा एक गुणी खेळाडू आहे. ओपनिंग ला येऊन बॉल्स 'खाल्यावर' काल संधी मिळाल्यावर रन्स पण केले. त्याचा एक मोठा स्कोअर झाला तर बरं होईल.

भाऊ, तुम्ही लॉटरी चं तिकीट घ्या, जॅकपॉट लागायची शक्यता आहे. दौर्याच्या सुरूवातीपासून तुमचा आशावाद, पुजाराच्या बॅटींगप्रमाणे अमर्याद आणी अजेय होता.

*भाऊ, तुम्ही लॉटरी चं तिकीट घ्या, जॅकपॉट लागायची शक्यता आहे.* - फेफजी, दौरा सुरू होण्यापूर्वीची ( 15-11-2018) आपला संघ सरस कां वाटतो याची मीं दिलेली कारणं -
1 ) दोन संघांच्या सध्याच्या ' काॅनफिडनस ' पातळीतील फरक . स्मिथ व वाॅरनर यांच्या गैरहजेरीमुळे
त्यात पडलेली भर ;
2) इंग्लीश वातावरणात चेंडूच्या ' लॅटरल मूवहमेंट ' शी जुळवून घेणं ही भारतीय फलंदाजांसाठी सर्वात मोठी अडचण ठरते . त्यामुळे, ऑस्ट्रेलियात आपली नांवाजलेली फलंदाजी बहरणयाची व भक्कम असण्याची शक्यता खूपच अधिक ;
3) आपला संतुलीत संघ व चांगल्या पर्यायांची उपलब्धता ;
4) कितीतरी सुधारलेला आपल्या फास्ट बोलींग व क्षेत्ररक्षणाचा दर्जा.
( शिवाय , ऑसीजना चांगलाच धडा शिकवण्याची करोडो भारतीयांच्या प्रबळ इच्छाशक्तीचं पाठबळ !)

या सर्व कारणांत लाॅटरी कुठं डोकावते , तें तुम्हीच ठरवा .

Pages