क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाऊ, तुमच्या आशावादाला केलेला तो मनःपूर्वक सलाम आहे - योगायोग ह्या अर्थी नाही. माझा अंदाज सपशेल चुकला, तुमचं अ‍ॅनलिसीस अगदी बरोबर होतं.

फेफजी, महत्वाचं , चांगलं क्रिकेट पहायला मिळणं व आपले खेळाडू अभिमानास्पद खेळलयाने आपल्याला मिळणारं समाधान व आनंद. बाकी, अंदाज बांधणं , ॲनलेसीस , आंकडेवारी व चर्चा हा समांतर खेळ तर निरंतर चालू राहिलच ! Wink

विहारी अन्लकी ठरला :| लायनचा चेंडू अगदी हलकासा चाटून गेला नि विहारीला सुद्धा वाटत नव्हतं की तो आऊट आहे म्हणून...

*विहारी अन्लकी ठरला :| * +1 . मला तर अजूनही शंका वाटते बॅटचा खरंच स्पर्श झाल्याबद्दल.
(आतांच टीव्ही वर दाखवलेलया आंकडेवारीनुसार ऑस्ट्रेलियाच्या दौरयांवर 1000 वर धांवा करणारया
भारतीयांमधे विजय हजारेही ( 1947-48) आहेत ( 1100+ धांवा) ! लिंडवाॅल, मीलर या फास्ट गोलंदाजांच्या विरूध्द!! )

१९४७-४८मध्ये ४२९ धावा आहेत त्यांच्या कसोटी सामन्यांत. ते प्रथम श्रेणी सामने धरून ११००+ असावे. अ‍ॅडलेडमध्ये दोन्ही डावांत शतके आहेत त्यांची.

त्यावर एक छान लेख - Hazare's Adelaide Magic

तेच्या मायला , चहा पिउन आलं की काही तरी अपघात घडतोच. पॅन्ट चाण्गला खेलतोय. सर आक्रमक झालेत सांभाळा बुवा...

पंत शतक ! ग्रेट!! 500+ !!
तरीही, या पीचवर पहिल्या डावात मोठ्ठी आघाडी मिळणं सोपं
नसावं.

पंतचे १००!! भारी खेळतो आहे.
मला आधी वाटलं की पिच अगदीच पाटा आहे. पण तसं तर वाटत नाहीये. स्पिनर्सना मदत होते आहे. आपले लोकं आक्रमण आणि बचावाचं चांगल मिश्रण करत आहेत का?

१८ ओव्हर्स बाकी आज असे दाखवत आहेत. म्हणजे अजून ७-८ ओव्हर्स खेळून घोषित करणार का? तोपर्यंत ६०० होतील साधारण.

नाहीतर मग त्यांना "बॅट आउट" करून टाकायला ऑल आउट होईपर्यंत खेळत राहिले तरी चालतील. दोन दिवस ऑलरेडी झालेले असतील. त्यामुळे ऑसीज ना भारताला हरवण्याइतका लीड घ्यायला आणि पुन्हा भारताला लौकर आउट करायला उरलेला वेळ पुरणार नाही. त्यात त्यांच्या फलंदाजांची सरासरी पाहता ६००+ ते करणे अवघडच आहे.

हे दोघे असेपर्यंततरी डिक्लेर करणार नाहीत असं वाटतय. आता मात्र ऑसिज एकदम खांदे पाडून वगैरे खेळातायत.
सॉलिड झोडपलय दोघांनी !

पॅण्ट (पन्त) दीड शतकाकडे... भै वाह. या चमूत शॉ असता तर मजा आला असता . राहुल, विजय , धवन , राहणेसारख्या सारखी माती खाणार्‍या जुन्या खोडाना आता रस्ता दाखवण्याची वेळ आणि संधीही आली आहे.

आतां जडेजाच्या शतकाची पाळी आहे !
आपण हरणार नाही याचा पुरेपूर बंदोबस्त चाललाय. हया पीचवर तें समर्थनीयही असावं.

केलं की डिक्लेअर !
अजून १० ओव्हर्स. बुम बुम बुमराह आणि स्पिनर्सनी धमाल करावी आता.

कोहली टू ऑसीजः_ तुम्हारी आंखोमे मेरे लिये जो खौफ दिख रहा है उससे मुझे कितना सुकून मिल रहा है क्या बताउं..

ख्वाजाचा कॅच ड्रॉप्ड ! एकंदरीत ख्वाजाला आजतरी काही झेपत नाहीये असं दिसतय. कसाबसा टिकला आहे.

<<तुम्हारी आंखोमे मेरे लिये जो खौफ दिख रहा है उससे मुझे कितना सुकून मिल रहा है क्या बताउं..>>
व्वा, व्वा, क्या बात है! बहोत अच्छे!
अर्थ कळला नाही पण असं काही उर्दू शब्द वापरून काही म्हंटले की त्याला असाच प्रतिसाद द्यायचा असतो म्हणे. म्हणून!

<<<महत्वाचं , चांगलं क्रिकेट पहायला मिळणं व आपले खेळाडू अभिमानास्पद खेळलयाने आपल्याला मिळणारं समाधान व आनंद. बाकी, अंदाज बांधणं , ॲनलेसीस , आंकडेवारी व चर्चा हा समांतर खेळ तर निरंतर चालू राहिलच !>>>
अगदी बरोब्बर, अगदी खरे. बाकी अंदाज, अ‍ॅनॅलिसिस वगैरे जे आपण आज केले तेच आपल्याला महिन्यानंतर विनोदी वाटू लागते!

ऑस्ट्रेलियामध्ये पंतच्या एका मालिकेतल्या धावा (३५०*, अजून चालू) ह्या धोनीच्या तीन मालिका मिळून झालेल्या धावांपेक्षा (३११) जास्त झाल्या आहेत, हे आत्ता सहज लक्षात आलं.

भारताचा आणखी एक डॉमिनेटींग दिवस. पुजारा तर मुक्कामाला आल्यासारखा वाटत होता. १.५ दिवस (९ तास) बॅटींग केल्यावर पहिल्यांदा तो 'माणुस' असल्याची जाणीव झाली. टेस्ट मधे एकाग्रतेचं, फिजिकल आणी मेंटल फीटनेस चं मोल केव्हढं मोठं आहे हे काल पुजाराची विकेट पाहून पुन्हा एकदा जाणवलं. विहारी चं आऊट होणं जितकं दुर्दैवी होतं, तितकाच तो शॉट अनावश्यक होता. पण मयंक, विहारी आणी पंत ह्या यंगस्टर्स चं पोटेन्शियल आणी क्विक लर्निंग ची क्षमता पहाता टेस्ट क्रिकेट मधे भारताचं भवितव्य उज्ज्वल आहे हे नक्की. ह्याचं थोडं श्रेय 'द्रविडियन मेथड्स फॉर जंटलमन्स गेम' ला सुद्धा जातं.

पंत शंभरी च्या जवळ आल्यावर दमला होता आणी एका चीकी सिंगल नंतर त्यानं जडेजा ला 'क्रँप्स येताहेत' अशी तक्रार केलेली स्टंप मायक्रोफोन मधून ऐकू आली. पण जडेजा ने त्याला मस्त संभाळलं आणी दीड शतकापार जायला मदत केली. कदाचित ह्या फटीग मुळे पंत च्या हातून ख्वाजा चा कॅच सुटला असावा.

भारताच्या ह्या इनिंग मधे सगळ्यात महत्वाचं जर काही असेल, तर ते मोठ्या पार्टनरशिप्स. टेस्ट क्रिकेट मधे पार्टनरशिप्स चं महत्व वादातीत आहे. क्रिकेट हा टीम स्पोर्ट आहे हे टेस्ट मधे जितकं जाणवतं, तितकं इतर कुठल्याच फॉर्मॅट मधे नाही. राहूल-मयंक (१०) आणी पुजारा-रहाणे (४८) वगळता, सगळ्या पार्टनरशिप्स ह्या ५०+ च्या होत्या. दुसरं महत्वाचं म्हणजे, नुसत्या रन्स नाही, तर 'बॅट फॉर टाईम'. पुजारा आऊट झाल्यावर दिवसाचे ४ तास खेळ शिल्लक होता. त्यावेळी जर पंत, जडेजा जोडी फुटली असती, तर ऑस्ट्रेलिया ला बॅटींग साठी वेळ मिळाला असता. पण पंत-जडेजा जोडीनं ती शक्यता हिरावून घेतली. आणी दुसर्या दिवशीचा शेवटचा एक तास, फिजीकली आणी मेंटली दमलेल्या ऑस्ट्रेलिया ला बॅटींग साठी यावं लागलं. आता ही मॅच वाचवण्यासाठी ऑस्ट्रेलिया ला झगडायचंय. लगान मधल्या ए. के. हंगल मोड मधे म्हणायचं तर, 'उम्मीद नही थी, यह दिन भी देख पाऊंगा'.

कदाचित ह्या फटीग मुळे पंत च्या हातून ख्वाजा चा कॅच सुटला असावा. >> कदाचित ची गरज नाहीये. पंतच्या किपिंग मध बर्‍याच सुधारणा हव्या आहेत हे खरे असले तरी दिवसभर रणरणत्या उन्हात बॅटींग करून मग लगेच किपिंग करणे सोपे नाही. lack of concentration is not surprising. पंतचा attitude मला व्यक्तिशः आवडतो. नेहमी हसत असतो नि next ball वर focus असतो.

जडेजा काल बॅटींग ला येणे नि वॉर्न नि कॉमेण्ट्री करायला येणे हा योगायोग गम्मतीशीर होता. जाडेजा ने सुरूवातीचा कमिन्सचा शॉर्ट पिच चा मारा मस्त सांभाळला. एकंदर शॉर्ट पिच चा अतिरेक करताना गेम प्लॅन सटकला असे वाटले.

विकेट ग्रांऊंद्समन हे म्हटल्याप्रमाणे अजूनही बॅटींग ला धार्जिणी आहे. शॉर्ट लेंग्थ वरून थोडा variable bounce आहे एव्हढेच. उद्या किती disintegrate होते त्यावर draw होणार कि नाही हे ठरेल. हॉक आय व्ह्यू ने पिच नि त्याच्यावरचे फूट मार्क बघायला मजा येते. ह्या समर मधे ड्रोन वापरून लोकल क्रिकेट मॅच बघायचा प्रयत्न करायला हवा.

फेफजी, सहमत . विशेषत: पार्टनरशिपस बाबत .
आणखी एक गोष्ट मला जाणवली. मयांक , पंत व विहारी या तीनही नवोदितांवर ऑस्ट्रेलियात आपण ऑसीज विरूद्ध खेळत आहोत, याचा यत्किंचितही दबाव असल्याच॔ दिसत नव्हतं. याचं श्रेय कदाचित आयपीएल मधील सर्व देशांतील खेळाडूंबरोबर खेळण्याच्या अनुभवाला असेल किंवा कोहलीच्या प्रतिस्पर्धी संघाला भिडण्याच्या आक्रमक पद्धतीला. या नवोदितांची ही मनोवृत्ती मला खूप भावली.

Pages