Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48
Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33
क्रिकेटवरील पहिले चार धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्या मते कसेही कंपोझिशन
माझ्या मते कसेही कंपोझिशन निवडले तरी सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत. तेंव्हा शास्त्री नि कोहली त्यांना कंफरटेबल वाटेल असे कंपोझिशन घेतील तर २-१ अथवा ३-१ असा निकाल लागेल
आपण जिंकलेले दोन्ही सामने ६ बॅटस्मन + पंत + एक थोडीफार बॅटींग करू शकणारा बॉलर ह्या काँबो वर जिंकलेले आहेत. रोहितच्या जाण्यामूळे झालेली जागा विहारीला त्याच्या नेहमीच्या क्रमांकावर खाली आणून भरता येईल. ओपनर म्हणून विजयला परत आणून फक्त बॉल खाण्याचे काम देता येईल जे विहारीने चोख बजावले होते. त्याचा अर्थ पुजारा नि कोहली ला बल्क स्कोरिंग करावे लागेल नि मयांक नि राहाणे ला थोडा पूरक स्कोअर करावा लागेल हे ओघानेच आले. ह्यातले काही नाही झाले तर पर्थ कसोटीची पुनराव्रुत्ती होईल.
तीन फास्ट बॉलर + एक स्पिनर हा आपला चालणारा फॉर्मुला आहे. जर विकेट स्पिन धार्जिणी असेल तर दुसरा स्पिनर आणून खरच फरक पडेल का ह प्रश्न विचारून कंपोझिशन ठरवायला हवे. अश्विन पुरेसा फिट नसेल तर दुसर्या डावात त्याचा बॉलर म्हणून किती इफेक्टिव उपयोग होईल का (इंग्लंड सिरीज आठवा) हा मुद्दा कळीचा ठरेल.
विहारीच्या जागी अश्विन आणि
विहारीच्या जागी अश्विन आणि रोहितच्या जागी पंड्या..... ओपनिंगला अगरवाल बरोबर रहाणे.
ओपनर म्हणून विजयला परत आणून फक्त बॉल खाण्याचे काम देता येईल जे विहारीने चोख बजावले होते. >> काय ही धरसोड स्ट्रॅटेजी तुमची?
काम देणे..काम करायला जमणे..काम करणे..आणि काम पूर्ण होणे... एवढे टप्पे असतात भाऊ....
त्यापेक्षा वीस ओवर जुना बॉल घ्या आणि ओपनर्स चार रन काढून बाद झाले असे डिक्लेर करून थेट पुजारा आणि कोहलीलाच खेळायला पाठवा.
रोहित नाही हे ब्लेसिंग इन
रोहित नाही हे ब्लेसिंग इन डिसगाईज आहे. विजय / राहूल ला परत आणून, विहारी ला खाली खेळवणं लॉजिकल वाटतय. बॉलिंग काँबिनेशन विकेट पाहून ठरवावं.
ओ-कीफच्या समालोचनावरून होत
ओ-कीफच्या समालोचनावरून होत असलेल्या वादाबद्दल काय म्हणणे आहे? मला तरी त्याच्या टिप्पण्या या माफक विनोद करण्यासाठी केलेल्या हलक्या फुलक्या वाटल्या. त्यावरून इतका गहजब करण्याची आवश्यकता नाही. इतके छोट्या छोट्या गोष्टींनी आपण ऑफेन्ड होऊ लागलो तर अवघड आहे
नववर्षाच्या शुभेच्छा -
नववर्षाच्या शुभेच्छा - इथल्या व सिडनीतल्या क्रिकेट प्रेमींसाठी व खेळाडूंसाठीं !
ओ-कीफ च्या कॉमेंट्स ऐकल्या
ओ-कीफ च्या कॉमेंट्स ऐकल्या नाहीत. पण ते स्टंप माईक मधून विकेटकीपर चं बोलणं ऐकवणं जरा अती होतय. तो खेळाडूंच्या प्रायव्हसी मधे इन्व्हेड करण्याचा प्रकार वाटतो. खेळाच्या आवेशात होणार्या बोलाचालींवर सुद्धा जगाचं लक्ष असण्याचं कारण नाही.
ओ-कीफच्या समालोचनावरून होत
ओ-कीफच्या समालोचनावरून होत असलेल्या वादाबद्दल काय म्हणणे आहे? >> फडतूस कमेंट होती. त्यात विनोद असेल किंवा स्लेज असेल तर सगळेच साफ गंडलेले होते.
पण ते स्टंप माईक मधून विकेटकीपर चं बोलणं ऐकवणं जरा अती होतय. >> स्मार्ट स्लेज सुरु आहे तोवर ठीक आठी, उद्या बाउंड्री ठरवायची वेळ आली कि काय करतील देव जाणे.
आपला फास्ट अटॅक आतां कितीही
आपला फास्ट अटॅक आतां कितीही चांगला असला (आहेच ), तरीही पीचवर स्थिरावलेल्या ऑसी फलंदाजांना , अगदीं तळाच्याही , तो धास्ती घेण्याइतपत फार भेदक वाटत नसावा . अधून मधून कल्पकतेने नियमित व पार्ट-टाईम फिरकी गोलंदाज वापरणं हेंच महत्वाचं . हें पुन्हा सांगावसं वाटतं कारण आपण फिरकीवर अधिकाधीक अविश्वास दाखवून आपलंच नुकसान तर करून घेत नाही ना , ही भिती वाटते. केवळ चागले फास्ट गोलंदाज ऊपलब्ध आहेत म्हणून त्यानाच खेळवणं व आपली गोलंदाजी खरोखरीच ऑसीजसाठी ( किंवा कोणत्याही संघाविरुध्द) भेदक करणं , यावर विचार होणं गरजेचं.
असा आहे संघ – विराट कोहली,
असा आहे संघ – विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ंपंत, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, आर. अश्निन, शामी, बुमराह आणि उमेश यादव
चौथ्या कसोटीत दोन स्पिनर घेऊन खेळणार वाटतं?
राहुल पुनःश्च आघाडी खेळणार
राहुल पुनःश्च आघाडी खेळणार एकंदरीत असे दिसतेय!
अनुष्काचा भाऊ आहे का नात्याने तो?
ती म्हण आहे ना 'बायकोचा भाऊ आणि लोण्याहून मऊ'! म्हणून आपले सहज विचारले!
चला म्हणजे भारत दहा खेळाडू
चला म्हणजे भारत दहा खेळाडू घेऊन खेळणार तर....
(No subject)
आश्विन फिट नाही म्हणून
आश्विन फिट नाही म्हणून सांगितलं आणि घूमजाव करून त्याला संघात घेतलं.
इशांतला का बाहेर बसवलं म्हणे?
इशांतला का बाहेर बसवलं म्हणे?
इशांतला का बाहेर बसवलं म्हणे?>>>
इशांतला भारतात येण्यापुर्वी विश्रांती.
अश्विन फिटनेस नापास झाला पण संघ आधी जाहिर केला होता.
*अनुष्काचा भाऊ आहे का
*अनुष्काचा भाऊ आहे का नात्याने तो?* - असलाच तर केवळ तो रुसूं नये म्हणून गोंजारणयापुरतं त्याच नांव टाकलं असावं ! आणखी एक संधी द्यायचोच , तर मुरली विजय हा पर्याय निश्चितच सरस !!
राहुलचे ओव्हलवरचे दुसर्या
राहुलचे ओव्हलवरचे दुसर्या डावातले शतक (१४९) चार सामन्यांपूर्वीच झाले आहे, ह्याची आठवण कोहली व कं. ला झाली असेल.
* ह्याची आठवण कोहली व कं. ला
* ह्याची आठवण कोहली व कं. ला झाली असेल.* - ह्याना नेमक्या ह्यानाच हव्या त्याच आठवणी नेमक्या वेळी कशा काय येतात !
टीम पेनच्या पत्नीने कौतुकाने पंतला तो एक चांगला ' बेबीसीटर ' असल्याचा दाखला दिलाय -
It was a sitter for that babysitter !
सचिनचे गुरू रमाकांत आचरेकर
सचिनचे गुरू रमाकांत आचरेकर यांचे दुःखद निधन!!
भावपूर्ण श्रद्धांजली!! ___/\___
अगदीं हल्लीच सचिन व कांबळी
अगदीं हल्लीच सचिन व कांबळी त्याना घरीं भेटायला गेल्याचं टिव्हीवर पाहिलं. श्रद्धांजली!
आचरेकरांना श्रद्धांजली!
आचरेकरांना श्रद्धांजली!
सिडने टेस्ट चा संघ विस्मयकारक आहे. राहूल च्या निवडीमुळे विजय चा परतीचा मार्ग बंद झाल्यासारखा वाटतो. इशांत चं बाहेर जाणं आणी फिट नसताना सुद्धा अश्विन चं संघात येणं, दोन्ही ची संगती लागत नाहीये. अश्विन फिट नसेल, आणी सिडने ला बॉल वळेल असा अंदाज असेल, तर कुलदीप ला संधी मिळू शकते का? अनफिट अश्विन आणी अन-रिलायबल उमेश पेक्षा कुलदीप हा बराच प्रभावी ठरू शकतो.
इशांतच्या डावीकडच्या
इशांतच्या डावीकडच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे.
आचरेकर सरांना श्रद्धांजली.
आचरेकर सरांना श्रद्धांजली.
* कुलदीपला संधी मिळू शकते का?
* कुलदीपला संधी मिळू शकते का? * द्यावी , एवढंच मी म्हणेन .
अनफिट अश्विन आणी अन-रिलायबल
अनफिट अश्विन आणी अन-रिलायबल उमेश पेक्षा कुलदीप हा बराच प्रभावी ठरू शकतो. >> +१.
राहुलची मजा आहे ह्यापलीकडे काय बोलणार राव ! कदाचित शेवटचा सामना नि त्याने इंग्लंडमधे शेवटच्या सामन्यामधे खेळणे ह्या योगायोगाची आठवण आली असेल.
भुवनेश ऐवजी यादवला सतत झुकते
भुवनेश ऐवजी यादवला सतत झुकते माप देण्याचे काय कारण आहे?
सिडनी टेस्टमध्ये टॉस जिंकून
सिडनी टेस्टमध्ये टॉस जिंकून भारताची बॅटींग.
रोहित आणि इशांत या दोन शर्मांच्या ऐवजी राहुल आणि कुलदीप यादव.
ऑस्ट्रेलियाने फिंच आणि मिचेल मार्शच्या ऐवजी लबुशेन आणि चिटर हॅन्ड्सकॉम्बला परत आणले आहे.
राहुल इमानदारीत स्लिपमध्ये
राहुल इमानदारीत स्लिपमध्ये कॅच देवून आऊट झालेला आहे.
भारत १० / १.
ह्या ग्राऊंडवर राहुल्ने
ह्या ग्राऊंडवर राहुल्ने मागच्या सिरीज मधे शतक केले होते. हेच ग्राऊंड त्याची शेवटची टेस्ट ठरणार का ? पहिल्या बॉलपासून बाद कधीही होईल असे वाटलेले, पठ्ठ्या लौकिकास जागला.
*हेच ग्राऊंड त्याची शेवटची
*हेच ग्राऊंड त्याची शेवटची टेस्ट ठरणार का ? * - ठरूं नये. पण ह्या कसोटीसाठीं तरी त्याची निवड मात्र त्याच्या व संघाच्या हिताची नव्हती असं वाटतं .
मयांक अपेक्षा पूर्ण करणाराच खेळाडू!
राहुल कर्तृत्वास जागला
राहुल कर्तृत्वास जागला बिच्चारा आणि कोहोलीचा अपेक्षा भंग देखिल नाही केला त्याने...
Pages