Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48
Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33
क्रिकेटवरील पहिले चार धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पंतोबा तोंडही सैल सोडतात !
पंतोबा तोंडही सैल सोडतात ! Wink>>
पंचांनी पंताला कानपिचक्या दिल्या मघा..
क्राईस्टचर्च टेस्टमध्ये
क्राईस्टचर्च टेस्टमध्ये श्रीलंकेच्या गोट्या कपाळात.
२१७ / ६.
बॉक्सिंग डेच्या तीन टेस्टपैकी आशियाई देशांपैकी एक भारतच मॅच जिंकणार असे दिसत आहे.
ऑस्ट्रेलिया जिंकणार असं
ऑस्ट्रेलिया जिंकणार असं दिसतंय. माझी तर तशीच इच्छा आहे. देवा जिंकव ऑस्ट्रेलियाला.
क्राईस्टचर्च टेस्टमध्ये
क्राईस्टचर्च टेस्टमध्ये चौथ्या दिवसाअखेरीस श्रीलंका २३१ / ६.
पाचव्या दिवशी न्यूझीलंड मॅच जिंकणार हे नक्की.
बोकलत,
बोकलत,
तुम्ही अमानवीय धाग्याची वाट लावलीत तेवढी पुरे आहे. इथे विनाकारण घाण करु नका.
१७६ / ७.
१७६ / ७.
पेनच्या वेदना संपल्या.
*देवा जिंकव ऑस्ट्रेलियाला.*
*देवा जिंकव ऑस्ट्रेलियाला.* - त्यापेक्षा " देवा, पाऊस पाड आंणि वांचव ऑस्ट्रेलियाला " , म्हटलं तर देवालाही सोपं जाईल तें !
गेली 7वी !
पंताने सोपे सोडले तरी पेनचा
पंताने सोपे सोडले तरी पेनचा पक्का पकडला झेल.
पेनच्या बायकोचं नाव पेन्सिल
पेनच्या बायकोचं नाव पेन्सिल आहे काय?
२०० झाल्या केवळ १९९ हव्या
२०० झाल्या केवळ १९९ हव्या
कमिन्स मॅन ऑफ द मॅच होणार
कुणी जिंको कमिन्स मॅन ऑफ द मॅच होणार
२१५ / ८ स्टार्कची दांडी गुल.
२१५ / ८
स्टार्कची दांडी गुल.
शेपूट वळवळतेय .... मी विचार
शेपूट वळवळतेय .... मी विचार करतोय ऑस्ट्रेलियाच्या जागी भारत असता तर कोहलीनंतर सगळ्यांनी ' आता काय होणार आहे ?' असे म्हनत रांग लावली असती तंबूकडे ....
ऑस्ट्रेलियाच्या जागी भारत
ऑस्ट्रेलियाच्या जागी भारत असता तर कोहलीनंतर सगळ्यांनी ' आता काय होणार आहे >>
ते मागच्याच सामन्यात दाखवून दिले आपल्या खेळाडूंनी!
मुळात ५-६ बाद नांतर आपण उगाच गोलंदाजाना फलंदाजी करायला लावून नये.
व्वा काय खेळताहेत ऑस्ट्रेलियन
व्वा काय खेळताहेत ऑस्ट्रेलियन, जिंकण्याचे चान्सेस आहेत, म्हणूनच तो माझा आवडता संघ आहे.
Ww
पाऊस न येण्यासाठी यज्ञ केला तर...
काल Cumminsind वधारला आज
काल Cumminsind वधारला आज Cumminsaus वधारतोय.
किती वेळ शिल्लक आहे अजून?
किती वेळ शिल्लक आहे अजून?
वेळ वाढवून दिला पंचानी तरी
वेळ वाढवून दिला पंचानी तरी बाद करता आले नाही कमीन्स लायनला..
आपले गोलंदाज स्वतःची परंपरा कायम ठेवतात तळाच्या फलंदाजां प्रमाणेच!
आज शेवटचा दिवस होता का?
उद्याचा दिवस आहे ना?
*उद्याचा दिवस आहे ना?* -
*उद्याचा दिवस आहे ना?* - जोरदार पावसाचं भाकित आहे
उद्यासाठीं !
उपखंडाबाहेर तळाच्या फलंदाजांसाठी फिरकीच भेदक ठरते, असं वाटतं.
पाऊस आधी येणार कीं गळाला मासा आधी लागणार !
कमिन्स सामना जिंकवेल उद्या,
कमिन्स सामना जिंकवेल उद्या, भारतीय संघ देवाचा धावा करत असेल पाऊस येऊ दे म्हणून.
विराट ड्रेसिंग रूम मध्ये गाणं बोलतोय,
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय
ग्राउंड भोवती तळे साचून सामना ड्रॉ होईल काय
हे झाल्यावर रात्री विराट मधोमध बसलाय त्याच्या बाजूला सगळे भारतीय खेळाडू देवाचा धावा करताहेत आणि अनुष्का शर्मा देवळात बसून लगान मधलं ओ पालनहारे निर्गुण और न्यारे गाणं बोलते. असं कायतरी दाखवायला पाहिजे, हे काय नुसतं पन्नास बॉल टुकूटुकू खेळून एक धाव काढताहेत.
बुमराह, शामी, शर्मा या भारतीय
बुमराह, शामी, शर्मा या भारतीय जलदगती गोलंदाजत्रयींनी वर्षभरात घेतलेल्या बळींचा वेस्टईंडीजच्या मार्शल, होल्डिंग, गार्नर या जलदगती गोलंदाज त्रयींचा विक्रम मोडला!!
वर्षभरात आता पर्यन्त १३१ बळी!!
अहो तेव्हा सामने किती खेळायला
अहो तेव्हा सामने किती खेळायला मिळायचे. ? वर्षातून एखादी टूर म्हणजे डोक्यावरून पाणी . आणि फार तर एखादी डोमेस्टिक सीरीज. आता दर महिन्याला आण्तर रास्ट्रीय म्याच असतेच....
असे काही बघायचे नसते,
असे काही बघायचे नसते, आजकालच्या जगात भारताने स्वतःची टिमकी वाजवली नाही तर जगात भारताची फक्त घाण, बलात्कार नि लाचलुचपत एव्हढीच प्रसिद्धी होईल. नाहीतर भारतीय म्हणजे चीप लेबर एव्हढीच प्रसिद्धी राहील.
भारताचे क्रिकेट हे एक अभिमानाचे स्थान आहे, त्याचा जेव्हढा उदो उदो करता येईल तेव्हढा करा. अमेरिकेत इंग्लडचा फूटबॉल सॉकर म्हणून आला , भारताचा बेसबॉल म्हणून जरी क्रिकेट आले अमेरिकेत तरी तेव्हढेच.
काल कमिन्स चा दिवस होता असं
काल कमिन्स चा दिवस होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याने आणी लायन ने भारतीय बॉलिंग ला थोपवलं आणी वेळप्रसंगी प्रति-आक्रमण सुद्धा छान केलं. अर्थात, त्यात वाईट वाटायचं कारण नाही. टेस्ट क्रिकेट चा भाग आहे तो. ती भागीदारी वगळता, बुमराह, जडेजा आणी शामी ने मस्त बॉलिंग केली. आज जिंकू आपण.
टेंशन नका घेऊ भाऊ. पाऊस सकाळी
टेंशन नका घेऊ भाऊ. पाऊस सकाळी आहे मुख्यत्वे http://www.bom.gov.au/vic/forecasts/melbourne.shtml
धन्यवाद, असामीजी.
धन्यवाद, असामीजी.
माझ्यासारख्यांबरोबरच, ऑसीजची जिंकणयाची संधी पावसामुळे हुकते कीं काय असं वाटणारयांचं टेंशनही गेलं असावं!
सुप्रभात.
सुप्रभात.
भाकितानुसार पावसाने हजेरी तर लावलीय !
झाली सुरू..
झाली सुरू..
आता कोहली पावसाची प्रार्थना करेल ये म्हणून ज्या पद्धतीने कमिन्स खेळतोय..
Pages