Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32
झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
परवाच्या एपिसोडमध्ये मी
परवाच्या एपिसोडमध्ये मी 'सुभाच्या जीवाला धोका आहे' अस चुकीच ऐकल होत. तो झेन्डे त्याला इशाकडे जाण्यापासून रोखत होता. मग तो फोनवर कुणाशीतरी अस का म्हणत होता की, " मला प्रत्येक क्षणाची खबर मिळायलाच हवी."
झेन्डे इशाच्या विरोधात गेला. काल मायरा 'इशा प्रेझेन्टेशन देऊ शकणार नाही' म्हणाली त्यावर तो खुनशी स्माईल देत होता.
काल आलेल्या मुलीला प्रेझेन्टेशन द्यायला सान्गणे >>>>> तोच तर डाव होता ना मायराचा. तिला इशाला तोन्डावर पाडायच होत.
पोरगी IT इंजिनीअर आहे आणि खूप अॅक्टिव्ह आहे पर्सनल लाइफमधे. अॅडव्हेंचर टूर्स गाइड करायची पुण्यात. >>>>>> मग हिलाच का नाही घेतल मायराच्या रोलसाठी?
त्यात भाग्यश्री शंखपाळ पण
त्यात भाग्यश्री शंखपाळ पण होती उबंटू मधे, >>>>> कलर्स मराठीच्या 'चाहूल' मध्ये भुत झालेली ती हिच का?
कालचा भाग म्हणजे अगदीच अरारा.
कालचा भाग म्हणजे अगदीच अरारा....
काय ते प्रेझेन्टेशन... काल आलेल्या मुलीला प्रेझेन्टेशन द्यायला सान्गणे. अन ती ही सुरवातीला नोटबुकवर काहीतरी खरडत असते. नन्तर तोन्ड इवलुसे करुन मिटीन्ग मधे काही न बोलता उभी रहाते>> तेच कि , कितीही छळायचे ठरवले तरी ज्याला एखाद्या विषयाचा अ सुद्धा माहित नाही त्याला डायरेक्ट असं काम दिल्याबद्दल आधी काम देणार्याला चांगलं धारेवर धरलं पाहिजे .. काहीही म्हणजे काहीही होता तो सीन
त्यात काय इनोव्हेटिव्ह आहे. सगळेच शिवतात की जुन्या साडयान्चे ड्रेस. साडया बनवणार्या कम्पन्या तर ही आयडिया वापरतातच>> नाहीतर काय ! जाऊद्या , ते केड्या ला दाखवायचे होते कि आमची इशा कशी स्मार्ट आहे
त्याला दुसरे काही सुचले नाही .. केड्या ची धाव तितपतच
त्या काकू म्हणजे सुभाची आई होत्या>> भारीच कि !
पोरगी IT इंजिनीअर आहे आणि खूप अॅक्टिव्ह आहे पर्सनल लाइफमधे. अॅडव्हेंचर टूर्स गाइड करायची पुण्यात.>> म इथे तिचा रोल तसा मुळूमुळू आणि हळूबाई चा दिलाय तो चांगला निभावतेय म्हणायला हवं
सुभाचं लग्न झालंय का?>> त्याचं लव्ह मॅरेज आहे .. ८वी /१०वी पासूनच
गायत्री गोड आणि छान दिसली आ
गायत्री गोड आणि छान दिसली आ.सा. खवय्ये मधे. साधी पण जरा मळूमुळूच आहे पण एकंदरीत. आवाजात काहीतरी प्राॅब्लेम वाटतो. असं वाटतं की तिला बोलताना खूप त्रास होत असेल. तिची आई पण छान आहे.
तर मुळात ही सिरीअलच एक मोठा
तर मुळात ही सिरीअलच एक मोठा पोळीचा लाडू आहे व बर्याच शिळ्या सिरीअल्स कुस्करून बनवला आहे हेही किती चतुराईनं सांगितलंय बघा. >>>
हे कहर आहे. टोटल पटले
प्लेझेंटेशन आलं बरंका कालपासून. प्रेझेंटेशन म्हणजे समोर बसलेल्यांसमोर काहीही फालतू बोलणे व नंतर भारावल्यासारखे सगळ्यांनी एकमेकांकडे पहाणे असा असेल असं वाटतंय. >>> लोल
सीमा - ते मीटिंग्ज चे वर्णन परफेक्ट आहे.
कलर्स मराठीच्या 'चाहूल' मध्ये
कलर्स मराठीच्या 'चाहूल' मध्ये भुत झालेली ती हिच का? >>> नाही ती वेगळी. ही बी पी मध्ये चिऊ झालेली बहुतेक. हिने अजून सिरीयल केली नाहीये, ललित प्रभाकर बरोबर आनंदीबाई जोशी यांच्यावर पिक्चर येणार आहे त्यात ती आहे . मध्ये तिची आत्या भेटलेली तेव्हा सांगत होती.
झेन्डे इशाच्या विरोधात गेला.>
झेन्डे इशाच्या विरोधात गेला.>> तो आधीपासूनच तिच्या विरोधात आहे. कधीचा म्हणतोय कि या मुलीबद्दल मला चांगले फिलींग येत नाही. ती काही मला बरोबर वाटत नाही. गावाकडे पीरबाबाला लावलेला कौल पण तिच्या विरोधात मिळाला. तिच्या वाटेला जाऊ नका. पण विजामे ऐकेल तर शपथ!! तो म्हणतो त्यालाच कळत नाही कि त्याला काय झाले आहे ते

त्या इबाळाच्या आईने शिळ्या पदार्थात काहीतरी घालून त्याला भुलविले आहे वाटते
नाही ती वेगळी. ही बी पी मध्ये
नाही ती वेगळी. ही बी पी मध्ये चिऊ झालेली बहुतेक. हिने अजून सिरीयल केली नाहीये, ललित प्रभाकर बरोबर आनंदीबाई जोशी यांच्यावर पिक्चर येणार आहे त्यात ती आहे . मध्ये तिची आत्या भेटलेली तेव्हा सांगत होती. >>>>> ओके. धन्स अन्जू.
तो आधीपासूनच तिच्या विरोधात आहे. कधीचा म्हणतोय कि या मुलीबद्दल मला चांगले फिलींग येत नाही. ती काही मला बरोबर वाटत नाही. गावाकडे पीरबाबाला लावलेला कौल पण तिच्या विरोधात मिळाला. तिच्या वाटेला जाऊ नका. पण विजामे ऐकेल तर शपथ!! तो म्हणतो त्यालाच कळत नाही कि त्याला काय झाले आहे ते Uhoh

त्या इबाळाच्या आईने शिळ्या पदार्थात काहीतरी घालून त्याला भुलविले आहे वाटते >>>>>>> मग सिरियलमध्ये नक्की गुढ पात्र नक्की कोण आहे? सुभा? इशा? इशाची आई?
अमा तुमची आयड्या ढापली
अमा तुमची आयड्या ढापली लेखकानं....विकुला शुगर आहे. उद्याच्या भागात दाखवलं. तरीच सारखा दमलेला दिसतो आणि सकाळी पळायला जातो. कालच्या भागात तर डोळ्याखाली काळं व आजारी वाटत होता.
मायरा मस्त करतीये काम. विकु, मायरा व झेंडे ओढून नेतायत् सिरीअल.
कहर प्रसंग होता कालचा मिटींग
कहर प्रसंग होता कालचा मिटींग आणि प्रेझेंटेशन.... तुफान हसले
सिरीअसली झी वाले कोणालाही धरून आणतात आणि डायलॉग म्हणायला लावतात ते कालचे ४ पुतळे तसेच होते
बाकी ते दुधाच्या बॉक्स पासून टेबल खुर्च्या ते प्रेझेंटेशन कधी होणारे म्हणे आता 
ते कालचे ४ पुतळे >>> टोटली!
ते कालचे ४ पुतळे >>>
टोटली! ते महान प्रेझेण्टेशन आज पाहिले. पुतळे एकदम भारी होते. ईशाला बोलायला सांगितल्यावर अर्ध्या सेकंदात लगेच "ओ मॅडम बोला की काहीतरी", ते तिने नुसती ती आयडिया सांगितल्यावर "तुम्ही स्त्रियांच्या इमोशनला टच केले वगैरे". आणि सर्वात कळस म्हणजे, "फार लहान दिसतात"!!!
बाय द वे ईशाचा प्लॅन हा भारतात आत्तापर्यंत सुचवल्या गेलेल्या बिझिनेस प्लॅन्स पैकी सर्वात भारी असेल. साड्या पूर्वीइतक्या विकल्या जात नाहीत म्हणून डीलर्स तक्रार करत आहेत, तर याकरता सर्वोत्तम उत्तर काय आहे, तर साड्या रिवर्क करून ड्रेस म्हणून विकू! इन्वेण्टरी, पुन्हा गुंतवणूक, मार्जिन वगैरे प्रकार निकालात काढले एकाच फटक्यात. त्यात लोकांकडे ऑलरेडी पडून असलेल्या जुन्या साड्यांमधून ड्रेस बनवता येतात हे समजल्यावर नव्या साड्यांची विक्री झपाट्याने वाढेल ना?
सरंजामे झेंडेला गोष्ट सांगायला सुरूवात करतो तेव्हा "तू स्वत:ला ईशा आणि मला जयदीप समजतोस काय" असे भाव झेंडेच्या चेहर्यावर क्लिअर दिसले मला.
मिहीरच्या मैत्रिणीचे लग्न ठरल्यावर मग मोडले. हे नवीनच ऐकले. मला वाटले लग्ने ठरण्याआधीच मोडतात. पुलंच्या त्या कथेतील काका हे वारण्यापूर्वी लंडनला गेले होते, इतकीच ही आश्चर्यकारक माहिती आहे.
मायरा मॅम चा नक्की रोल काय आहे हापिसात? कधी ती सीनियर व्हीपी असते. कधी स्किड्युलिंग करते, कधी सरंजामेंचे पान तिच्यावाचून हलत नाही, तर कधी तिला सरंजांमेशिवाय ऑफिस सांभाळता येत नाही - इतके की तिच्यापेक्षा जयदीप चांगले सांभाळतो. हजारो कोटी चा व्यवहार करणार्या कंपनीच्या बॉस ची उजवा हात असलेली व्यक्ती एका किरकोळ नवीन एम्प्लॉयी शी वैयक्तिक दुश्मनी ऑब्सेस होण्याइतकी करत बसते. ते स्वप्नील जोशीचे "कधी तूssss" गाणे रीवर्क करून वापरले पाहिजे या सिरीज मधे मायरामॅम ला उद्देशून. ईशा ला सांगू पुढच्या प्रेझ मधे नवीन आयडिया म्हणून सांगायला.
बाकी १३ कंपन्यांपैकी एका लाइन ऑफ बिझिनेस मधले स्पेसिफिक मार्केटिंग प्रॉब्लेम त्या डीलर्स ना कॉर्पोरेट ऑफिस मधे बोलावून रॅण्डम प्रेझेण्टेशन वगैरे डीपर बिझिनेस ब्लूपर्स तर सोडून द्या.
निदान डीलर्स म्हणून चार नवीन लोक होते. एफएमलाच बसवले नाही हे नशीब. तरी त्यातला एकजण मला कालच्या हॉटेलवाल्यासारखाच दिसला.
(No subject)
फारेंड, मस्त. हहपुवा.
फारेंड, मस्त. हहपुवा.
सुभानं सांगीतलेली गोष्ट आताच कधीतरी व्हाटसप साहीत्य म्हणून पदरी पडली होती. इशाचा गुण लागला बहुतेक.
तरी मी मायराकडे आशेनं पहात होते की किमान ही तरी म्हणेल की कीती टुकार आयड्या आहे इशाची, आणि मुळात ही आयड्याच नाही वगैरे...पण कसचं काय...लेखकूनं तिलाही निष्प्रभ करून टाकलं.
ते स्वप्नील जोशीचे "कधी
ते स्वप्नील जोशीचे "कधी तूssss" गाणे रीवर्क करून वापरले पाहिजे या सिरीज मधे मायरामॅम ला उद्देशून. ईशा ला सांगू पुढच्या प्रेझ मधे नवीन आयडिया म्हणून सांगायला >>>
वारण्यापूर्वी लंडनला गेलेल्या काकांना तर लई हसले
सुबोध फ्यमिलि
सुबोध फ्यमिलि

गोड आहे सुबोध ची फॅमिली.....
गोड आहे सुबोध ची फॅमिली.....
सुभा मात्र गोड दिसतो.
सुभा मात्र गोड दिसतो. त्याच्यासाठी बघाविशी वाटते मालिका.>>>>>>> खरोखर... त्याच्यासाठी च >> +११११
फारएण्ड साॅलिड
गोड आहे सुबोध ची फॅमिली..++++
गोड आहे सुबोध ची फॅमिली..++++++ ११११११११
कीती टुकार आयड्या आहे इशाची, >>>>>> एवढी काही वाईट आयडिया नाहिये इशाची, साडयान्चे ड्रेस करायची.
ती इशा किती चॅप्टर निघाली. मायराकडून बुके दयायला लावला.
हि मालिका खरं तर कार्टून
हि मालिका खरं तर कार्टून नेटवर्क किंवा पोगो वर दाखवायला हवी इतकी बालिश आहे
आजचा आख्खा एपिसोड सुभाचा होता
आजचा आख्खा एपिसोड वि. सरंजामेचा होता. कसला गोड दिसत होता. ह्या सिरीअलीत एरवी पण तो सुंदर दिसतोच पण आज रागावल्यावर आणीकच छान दिसला. हिरविन फार म्हणजे फारच मंद दिसते. समोरच्याचे वाक्य संपले की पाचेक मिनीटांनी चेहर्यावर प्रतिक्रीया उमटते तिच्या.
सुभा, शुभ लग्नच्या तरुण लुकमधे एवढा भारी नाही दिसत मात्र.
इशाला टिल्लूच्या पिल्लाबरोबर पाहून इतकं काय रागवायचं? एकदम क-क-किरन एवढा रागावला.
सुलू - आयडिया वाईट नाहीये. पण
सुलू - आयडिया वाईट नाहीये. पण घरी साड्या पडून असलेले लोक त्याच साड्या रिवर्क करायला घेउन येतील ना? अशाने त्या डीलर्स चा सेल कसा वाढणार
त्या मायराने केले ते एखाद्या
त्या मायराने केले ते एखाद्या खर्या कंपनीत एखाद्या सिनीयर माणसाने केले - नवीन एम्प्लॉयीला तिला कसलीच पार्श्वभूमी दिलेली नसताना डीलर्स समोर प्रेझेण्टेशन करायला सांगणे - आणि कंपनीची इमेज खराब करणे - तर तिला ताबडतोब हाकलून देतील.
त्या मायराने केले ते एखाद्या
त्या मायराने केले ते एखाद्या खर्या कंपनीत एखाद्या सिनीयर माणसाने केले - नवीन एम्प्लॉयीला तिला कसलीच पार्श्वभूमी दिलेली नसताना डीलर्स समोर प्रेझेण्टेशन करायला सांगणे - आणि कंपनीची इमेज खराब करणे - तर तिला ताबडतोब हाकलून देतील.>>>>+11111
मुळात असल्या पांचट कंपन्या फक्त शिरेलीत असतात, प्रेझेंटेशन म्हणजे काय हे माहीत तरी आहे का यांना , नुसते सगळीकडे प्रेझेंटेशन करीत सुटतात ते
त्या मायराने केले ते एखाद्या
त्या मायराने केले ते एखाद्या खर्या कंपनीत एखाद्या सिनीयर माणसाने केले - नवीन एम्प्लॉयीला तिला कसलीच पार्श्वभूमी दिलेली नसताना डीलर्स समोर प्रेझेण्टेशन करायला सांगणे - आणि कंपनीची इमेज खराब करणे - तर तिला ताबडतोब हाकलून देतील.>>+१
कस्ली चॅप्टर आहे इबाळ!! कालच रुपालीच्या आईने झाडले होते आणि हि लगेच बिपीनच्या मागे बसून ऑफिसला भुर्र. तेव्हाच वाटले कि आता हिला विस बघणार.
इशा खरंच चॅप्टर आहे. मला
इशा खरंच चॅप्टर आहे. मला वाटलं की ती म्हणतेय... ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला की मी हे प्रेझेंटेशन करीन अशा मायरालाच हा बुके द्या.
पण कसलं काय? सुभावरच सारखी आवाज चढवून बोलते :रागः
कलर्स वर "मन हे बावरे" नावाची
कलर्स वर "मन हे बावरे" नावाची मालिका सुरु झालिये, त्यात "तुपारे" मधलच ऑफिस आहे.
इशाबाळ खरेच वाटते तितकी साधी
इशाबाळ खरेच वाटते तितकी साधी नाहीये... मायराकडुन बुके द्यायला लावते.
एका दगडात दोन पक्षी मारले बाईने. इकडे सुभालाही वाटले की बया रागवलीय आपल्यावर म्हण्जे आता रुसवा काढा.
खरंय...कालचा पूर्ण एपिसोड
खरंय...कालचा पूर्ण एपिसोड सुबोध भावे ने खाल्लाय.... कसला चिडला होता तो.... झेंडे बरोबर म्हणाला चिडचिड मे दर्द.... नंतर त्या ई बाळकाला लागल्यावर काय झरझर इक्सप्रेसन बदलले त्याचे....फक्त डोळे आणि चेहऱ्यातून अभिनय करू शकतो हा माणूस....या पूर्वी तो मला एवढा कधीच आवडला न्हवता.. आणि आता तर ...
असो...त्या हिरविणीचे अभिनय दारिद्र्य अजूनच उठून दिसत होतं पण या मुळे....
<<खरंय...कालचा पूर्ण एपिसोड
<<खरंय...कालचा पूर्ण एपिसोड सुबोध भावे ने खाल्लाय.... कसला चिडला होता तो.... झेंडे बरोबर म्हणाला चिडचिड मे दर्द.<<
अगदी अगदी ! चिडल्यावरही गोड दिसत होता तो. मलाही पुर्वी आवडत नव्हता. पण या मालिकेत आवडतोय.
हिरविणीचे अभिनय दारिद्र्य
हिरविणीचे अभिनय दारिद्र्य अजूनच उठून दिसत होतं पण या मुळे....>>>>>
Pages