तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

अगदिच भयन्कर चालुये.. बघवेना झालय.
उद्या पासून बघणे बंद..
मालिकेची जी काय हवा झाली... बरा TRP वगैरे थोडे तरी टिकवायचे असेल आणि थोडी तरी चालवायची असेल तर इशा ताबडतोब रिप्लेस केली पाहिजे .. अजिबात जमत नाहीये .. काय तो घाणेरडा आवाज... काय तो अभिनय ..किती वाईट असावा ह्याचाच डेमो ..

सॉरी, पण सुबोधचे इतके कौतुक करताय सगळे .. पण मला तर अत्यंत पाट्याटाकू अभिनय वाटायला लागलाय त्याचा.. समोर इशा आहे कि भिंत .. काही फरकच पडत नाही असा .. अत्यंत निरस, पारोसा, कंटाळवाणा अभिनय आणि लूक .पण .

मलाच अस वाटतय का की कालचा गाडीतला प्रसंग फारच बाळबोध होता. मला प्रियकर प्रेयसी नाही तर बाबा आणि मुलगी असल्यासारखे वाटले दोघे. Romatic सिरियल आहे तर थोडा romance बनता है बॉस

मायरा आणि झेंडे फारच चिकटून उभे रहातात. खरं तर तेच जास्त वाईट दिसतं.
मायरा झेंडे, वाडकर परांजपे, मिहीर आणि त्याची मैत्रीण, अजून एक चम्या अन चमी दिसतायत हल्ली.

अजून एक चम्या अन चमी दिसतायत हल्ली. >>> हो मलाही जाणवले. त्यांना अजून काही रोल दिसत नाही.

आजकाल हापिसात कोणी वैतागले, चिडले की आपोआप माझ्या तोंडून "वैताग नॉट गुड मायराजी" निघून जाईल की काय असे वाटते.

Happy
पण खरंच...झेंडे व पताका का इतके चिकटून उभे असतात नेहमी...कॅमेर्‍याच्या एका शॉट मधे येत नाहीत काय?
ती साऊथ इंडियन सपना का कोण...... मिहीरची मैत्रिण ए का?

<<मि पहात नाही हि सिरियल पण इथ्ल्या कमेन्त्स किती भारेयेत Happy
मज्जा आली व्चून

दक्षिणा, तुझ्या मराठी लिखाणाला काय झालं Proud

तिला शिरेलचा कन्टाळा आला की ती शिरेलवर लिहिण्यासाठी शिफ्ट की दाबायचे सुद्धा कष्ट घेत नाही., हो की नै दक्षु! Wink Lol

तर्काय मग
शिरेल पहोन व्हयची ती कर्मनूक इक्दे होते मग बस्की

हे मात्र खर आहे की सुभाचा अभिनय आ ता क्रुत्रिम वाटतो.काल इथे वाचल की बेबीला स्वप्न पडल म्हणून आज भाग पाहिला आठवड्याने,अगदीच नीरस.काल तर बेबीला अभिनयाला केवढा वाव होता.स्वप्न पडल्यावर दचकून जाग होण,ह्रुदयाची वाढलेली धडधड दासवण,घसा कोरडा पडला आहे अस दाखवून पाणी शोधण आणि डिरेक्टर साहेबांनी घाम दाखवलाच नाही,बर किती आरामात उठून गेली,अग घाबरली आहेस ना,मग माणूस घाबरल्यावर कसा जाईल ते दाखव ना,विआईनी शाल देण्याच्या आधी थंडीने शहारल्याचा अभिनय करायला ही विसरली की इथेही डिरेक्टरने माती खाल्ली.
अगदी रोमँटिक मूडमधला सुभा बेबी गेल्यावर हसताना,झेंडेशी बोलून.झाल्यावर खिशात हात घालताना अगदीच क्रुत्रिम वाटला.
बाकी बेबीच्या बाबतीत अभिनयात सगळा अंधार असल्यामुळे शितुलाही वाव कमी देउन मालिका लवकर गुंडाळतील अस वाटत आहे.

आज विस म्हणाला की ह्या रुमवर नॉक करायच नाही,हा विस त्या रुम मध्ये काय अँटॉमबॉंम्ब वगैरे तयार करतो की काय?कुठल्या दहशतवादी संघटनेशी कनेक्टेड आहे की काय
आज बेबीबद्दल खूप वाईट वाटल.सगळेच अस चक्रमसारख काय वागत आहेत?विसचा काही अंदाजच लागत नाही आहे.
जोपर्यंत बेबी त्याच ऐकत आहे तोपर्यंत प्रेम आणि जर बेबीने ऐकण बंद केल तर अग्निसाक्षीतला नाना पाटेकर.

Pages