तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

मेकअप बटबटीत वाटतोय. >>>>>> अग निधी, ते फोटो झी मराठी awards नॉमिनेशन्स पार्टीचे फोटो आहेत ना? त्या पार्टीची थीम 'निऑन' अशी होती. सो, झीमचे सगळे कलाकार आणि टेक्निकल डिपार्टमेन्ट निऑन रन्गाचे कपडे घालून आले होते.

पार्टीआधी झीमचे काही कलाकार निऑन कपडयान्च्या खरेदीसाठी मॉलमध्ये आले होते म्हणे.

हे पाहा:

image_1.png

साम प्रिमीअर वर दाखवली होती ही पार्टी. Happy

कोणीतरी जमलं तर मला सांगा ना काल काय झालं ? म्हणजे शनिवारी काय झालं ? मला जमलं नाहीये बघायला Sad
जयदीप चा वाढदिवस होता का ? आणि सुभा यायला लागला का आता हापिसात ?लगेच ? इकडे लग्न मोडलं आणि हा लगेच हापिसात दाखल का ?
पण त्यामुळे आज मला २-२ भाग बघायला मिळणार >>>>> काही विशेष नाही घडल. इशाच लग्न मोडल. आता आपल काय काम उरल नाही चाळीत म्हणून सुभा पुन्हा ऑफिसात दाखल झाला. इशा पुन्हा सुभाला प्रपोझ करणार आहे. ती त्याला पत्र पाठवणार आहे.

आपल्या आई वडीलांच्या पीढितल्या बर्‍याच जोडप्यांमध्ये १५/१६ वर्षाचा फरक असलेलं पाहिलं आहे. त्यामुळ असं नाही आहे कि हे काही नवं आहे. प्रोग्रॅम फाल्तु आहे/असेल नावं ठेवण ठिक आहे.
नवरा बायकोमधील अंतर ( १५/१६ ) जास्त असल्यामुळे मुलांमध्ये प्रॉब्लेम व्हायचे , स्त्रिया तरुण वयात विधवा व्हायच्या, त्यांची स्थिती ना घर कि ना घाटकि व्हायची , लग्न लवकर झाल्याने मुलींचे शिक्षण अर्धवट राहायचे. इतर अनेक समस्या वैगरे वैगरे तुन समाजाला थोर समाजसुधारकांनी म्हणूनच बाहेर काढले ना म्याडम. बाकी सिरीयल मध्ये काहीही चालू दे.

थँक्स !
इशा पुन्हा सुभाला प्रपोझ करणार आहे. ती त्याला पत्र पाठवणार आहे.>> हरे राम म्हणजे आता ते पत्र हरवणार /कुठेतरी विसरणार /कुणाला तरी ते सापडणार किंवा सेम सेम रंगाचे २ लिफाफे असणार पैकी एक अगदी म्हणजे अगदी महत्वाचा लिफाफा त्यांची चुकून अदलाबदल होणार .. .. आणि मग काय.. घाल पाणी चालू होणार Wink

१९७० सालच्या पद्धती वापरून २०१८ सालची कथा/संवाद लिहीले आहेत.

पण अशा डम्ब पटकथेत अगदी flash of brilliance नाही, तरी किमान flash of common sense परवा दिसला. निदान समोर चाललेली घटना आपल्याला समजते तशी त्यातील पात्रांना समजत आहे असा एखादा तरी पुरावा दिसला Happy जेव्हा तो टिल्लू ते १० वे कलम काढल्यावर पुन्हा लग्नाला तयार होतो, तेव्हा त्याचा अर्थ ईशाच्या आईला समजतो, ती स्वतःच नकार देते - तो सीन. आणि नंतर घरात परतल्यावर आपण मुलीचे लग्न मोडले हे रिअलाइज होणे, हे ही रिअल वाटले.

बाय द वे अशा स्थितीत एकदम कलमच काढून टाकायची गरज नसते. एखाद्या केस मधे कंपनीतील थोर लोक अपवाद करू शकतात. इथे तर थोरेस्ट थोर माणूस तयार आहे Happy

मला आपण अमेरिकन असल्यान भारतातल कल्चर काय कळणार अ>> हे उगीचच आहे.>>
LOL . सर्कॅस्टीक कमेंट आहे ती. वॉट्सप विद्यालयाला उद्देशून.

मला एक कळत नाही. पार्टी दुपारीच कशाला द्यायला हवी किंवा घ्यायला हवी? इतके दिवस दांड्या मारल्यानंतरसुद्धा त्या इशाला काही ऑफिस जॉईन करण्याची घाई नाही. तिची रजा आहे म्हणून असेल पण विक्रांत तर सांगू शकतो ना की बुवा इतके दिवस तुमच्या अडचणी सोडवल्या आता जरा माझ्या कंपनीकडे बघतो. संध्याकाळी भेटू पार्टीला.
अर्थात सामान्य माणसांसारखे अडचणीतून मार्ग काढायचे ठरवले तर यांची सीरिअल कशी चालणार.

तो त्या निमकरांमधे बसला असताना खूप मिसफिट वाटत राहतो... म्हणजे मला नेमकं नाही सांगता येत. पण त्याला असं काहीतरी करताना बघून दयाच येतेय.
इशाची आई मला वाटलं म्हणेल घरी मी छान स्वयंपाक करते. तुम्ही जेवायला या. कारण इतके दिवस काय भेळ, पोळीचा लाडु अशावरच भागवले होते. तर हॉटेलात पार्टी म्हणे.. आळशी कुठली

आता तर खात्री पटत चालली आहे. आधी कोणीतरी म्हणाल्याप्रमाणे सलमान खान, प्रीती झिंटा आणि भूमिका चावला वाल्या पिक्चरची स्टोरी असणार आहे. डोळे आणि हृदय दान केले असणार नक्की.

आता तर खात्री पटत चालली आहे. आधी कोणीतरी म्हणाल्याप्रमाणे सलमान खान, प्रीती झिंटा आणि भूमिका चावला वाल्या पिक्चरची स्टोरी असणार आहे. डोळे आणि हृदय दान केले असणार नक्की.
नवीन Submitted by पीनी on 8 October, 2018 - 21:03
>>>
चला असे असेल तर ते सुप्रसिध्द मंगळसूत्र तेव्हाही ऑपरेशन साठी गहाण पडले असणार.

ओह लग्न मोडलं की नाही म्हणजे ? मी काल पाहिल तेव्हा ते हॉटेल मधे पाचकळपणा चालू होता निमकरांचा. दुसर्‍या दिवशी लग्न असताना कोण पार्टी देईल ? आणि लग्न मोडल असेल तरी का देईल ? शनि-सोम भाग मिस केले आहेत त्यामुळे कळल नाही काय चाललय.

किती अनरिअलिस्टिक आहे कथा. अत्यन्त ओर्डनरी दिसणारी, काहींच्या काही बावळट आणि कोणत्याही कारणासाठी अपील न होणारी हिरोईन आणि हा स्टिंकिंग रिच बिझिनेसमन....... हा का तिच्या प्रेमात पडला आहे हेच पटलं नाही तर ती लव्ह स्टोरी अपील कशी होणार.

वर कोणी तरी लिहिलं आहे की इशा ऊर्मिला मातोंडकर सारखी दिसते, हा बिचाऱ्या उर्मिलाचा उच्च अपमान आहे. हिचा चेहरा किती म्हाताऱ्या बाईसारखा आहे, बॉडी पोश्चर तर आहेच वाकलेल आणि चालणं अगदी अनाकर्षक. ती कोण्या सिरीयल मधली जान्हवी पण गरीब घरातली होती, पण शशांक केतकर तिच्या प्रेमात पडणं जस्टीफाय होईल इतकी आकर्षक नक्कीच होती. ही मुलगी सर्वार्थाने या रोलसाठी अनफिट आहे.
सुबोध भावेसाठी पाहायला सुरुवात केलेली सिरीयल अगदीच टुकार निघाल्यामुळे काही आठवड्यांमागे पाहणं बंद. आता पुढे फक्त इथे वाचते.
बाकी झी सिरियल्सचे ग्रॅज्युएट सुद्धा नसलेले आणि ऑफिसही न पाहिलेले मंद लेखक कथा लिहितात, त्यामुळे त्या फ्रंटवर सुद्धा उजेडाच. सिरियलची कथा सुंदर असती तर हिरोईनकडे आणि छोट्या मोठ्या फ्लॉजकडे दुर्लक्ष करता आलं असतं.

<<<<मला एक कळत नाही. पार्टी दुपारीच कशाला द्यायला हवी किंवा घ्यायला हवी? इतके दिवस दांड्या मारल्यानंतरसुद्धा त्या इशाला काही ऑफिस जॉईन करण्याची घाई नाही. तिची रजा आहे म्हणून असेल पण विक्रांत तर सांगू शकतो ना की बुवा इतके दिवस तुमच्या अडचणी सोडवल्या आता जरा माझ्या कंपनीकडे बघतो. संध्याकाळी भेटू पार्टीला.<<<

हेच म्हणणार होते, कि अशी अख्खा दिवस पार्टी चालते काय.
होती इतकी महत्वाची मिटीन्ग सुभाची तर तेवढे जाउ द्यायचे ना त्याला. ऑफीसचे अपडेट्स तर मिळतच होते ना विक्रान्तला झेन्डेकडुन ! त्याने सान्गु नाही, कि बाबा महत्वाची मिटीन्ग आहे! सन्ध्याकाळी ठेवा पार्टी. इतकी काय कुठे सगळ्यान्ना आमन्त्रणे गेली होती कि पार्टी कॅन्सल नाही करु शकत. इन मिन चौघे जण.
निमकर कुटुम्बियानी पण समजुन घ्याय्ला नको, कि इतका मोठा इन्डस्ट्रीयालिस्ट आप्ल्या इथे राबतोय... गेले ८ दिवस. त्याची पण काही महत्वाची कामे असु शकतात.

मनिमाऊ....>+++++
प्राजक्ता , अगं लग्न मोडलं म्हणूनच पार्टी!..... की त्या टिल्लूंच्या घरात पोरगी नाही दिली..तेही सरांमुळेच.!!
म्हणून त्यांना ग्रँड (कुठ्ल्याश्या "बॉलीवुड" नामक) हॉटेलात पार्टी! घरीच करायची की छानशी पार्टी! केड्याला नेहमी हॉटेलात हादडायला हवे! आणि काही तरी शाही थाळीवर त्यांची ऑफर होती म्हणे. सरांची तर महत्वाची मिटींग होती! ते एक फोनही नाही करु शकले..की बुवा माझे काही जमत नाहीये...आपण संध्याकाळी जाऊ!!!!.
मनी मऊ ने म्हटल्याप्रमाणे...अत्यन्त ऑर्डिनरी दिसणारी, काहींच्या काही बावळट आणि कोणत्याही कारणासाठी अपील न होणारी हिरोईन ......
Happy खरेच जान्हवी किती स्मार्ट, तरतरीत होती.....!

जान्हवी पण गरीब घरातली होती, पण शशांक केतकर तिच्या प्रेमात पडणं जस्टीफाय होईल इतकी आकर्षक नक्कीच होती> अगदी अगदी +१०००

इशापेक्षा तिची मैत्रिण रूपाली ( नाव चुकलं का?) कित्तीतरी पटीने चांगली आहे. दिसण्यात उजवी, डायलाॅग्ज किती छान बोलते, चेहर्यावर एक्स्प्रेशन्स छान देते. आणि मुळात वयाचा फरक दाखवायचाच होता तरी अगदी शाळकरी वयाची दिसणारीच हिरोईन गरजेची नव्हती.

जान्हवी पण गरीब घरातली होती, पण शशांक केतकर तिच्या प्रेमात पडणं जस्टीफाय होईल इतकी आकर्षक नक्कीच होती >>> + १०००००

अत्यन्त ऑर्डिनरी दिसणारी, काहींच्या काही बावळट आणि कोणत्याही कारणासाठी अपील न होणारी हिरोईन ...... >>> अगदी अगदी... परवा तर त्याला बाय पण इतका हात बोट फताडे करुन करत होती ना... चीड्चीड आहे ती मुलगी

Happy हो ना...सुबोधने अगदी स्टाईलने दोन बोटांनी बा य.... केलं.............................
हिचा आवाज किती चिरका.. "रुपाली, तुला खरंच असं वाटतं?.. सर हो म्हणतील? काय म्हणतील गं ते?.... " म्हणताना कितीदा चिरकतो.......
आणि तो एकच ड्रेस..? हिरवा...चौकडीच्या डीझाईनचा............... त्या विसरंजामेंच्या पार्टीतही तोच होता.... मग बहुतेक ..त्या आकाश कंदिल लावलेल्या बागेतही तोच................

मला वाटतं ही भूमिका रेशम प्रशांतने छान केली असती. zee ने तिचा विचार करायला हवा होता. लहानखुरी वाटते आणि अभिनय उत्तम, ग्रेसफुल आहे तशी.

मला वाटतं ही भूमिका रेशम प्रशांतने छान केली असती >>> म्हणजे उर्मी का? मला उर्मीच डोक्यात आली हीच्या जागी .
ती साधी दिसते आणि हुशार , चुणचुणीत पण .

उर्मी मला आव डत असे. पण ती इंटेलिजंट लुक वाली आहे. इथे बाव ळ ट अपेक्षित आहे. आत्ता तो छान जास्त पैसे ह्याव अन त्याव पण पाच वर्शात गुढगे धरतील, बीपी अन मधुमेह होईल. दहा वर्शात ही तिशीची अन तो साठीचा. अश्या लोकांची सर्व वेल्थ अडकलेली असते. सॉन्या सारखीच परिस्थिती. अन एकदा हिच्यावर भापून झाले की असले साहेब नव्या सावजाच्या शोधात.

इशाची लोद्याई गेट्स ऑन माय नर्व्हज. किती तो फुकट खाउ पणा. हॉटेल एपिसोड पूर्ण नाही बघितला. चह येद्या मध्ये स्किट चांगले केले आहे. सुभा गोड दिसत होता.

पण ती इंटेलिजंट लुक वाली आहे. इथे बाव ळ ट अपेक्षित आहे. >>> कथा सशक्त झाली असती मग . तिच्या हुशारीवर विसं भाळला आणि त्याच्या रूबाबावर ती. एक मॅच्युअर लव्ह स्टोरी हवी होती.
पण ते या लोकांना कुठे सुचायला . Angry

हो उर्मी होतं नाव बहुतेक तिचे त्या गिरीश ओक असलेल्या सिरीयलमध्ये आणि अंजली मध्ये अनुराधा होती.

ती असती तर मी बघितली असती ही सिरीयल कदाचित.

वर कोणी तरी लिहिलं आहे की इशा ऊर्मिला मातोंडकर सारखी दिसते, हा बिचाऱ्या उर्मिलाचा उच्च अपमान आहे. >>>>> अहो मनिमाऊ इशाला मी पहिल्यान्दा सिरियलमध्ये बघितल तेव्हा ती बारीक होती, तेव्हा तिचा गेटअप 'नरसिम्हा' च्या उर्मिला मातोंडकरकर सारखा होता. म्हणून मी म्हटल हि रन्गिला च्या आधीच्या उर्मिलासारखी दिसते. आता ही इशा एवढी जाड कशी झाली काय माहित. Uhoh

इशापेक्षा तिची मैत्रिण रूपाली ( नाव चुकलं का?) कित्तीतरी पटीने चांगली आहे. दिसण्यात उजवी, डायलाॅग्ज किती छान बोलते, चेहर्यावर एक्स्प्रेशन्स छान देते. आणि मुळात वयाचा फरक दाखवायचाच होता तरी अगदी शाळकरी वयाची दिसणारीच हिरोईन गरजेची नव्हती. >>>>>>> ++++++१११११

अत्यन्त ओर्डनरी दिसणारी >>>>>> एवढीही काही वाईट नाहीये ती. मेकप शिवायही तिचा चेहरा छान दिसतो. हसताना तिच्या गालाला खळया पडतात. हो, पण सुभापुढे ती लहानच वाटते.

.सुबोधने अगदी स्टाईलने दोन बोटांनी बा य.... केलं >>> क्यूट दिसत होता तो तेव्हा. Wink हे दोन बोटांनी बा य राजेश खन्नाने केलेल बघितल होत 'जवानी हो दिवानी' गाण्यात.

पत्र कॅन्सल. आता सुभा कधी स्वत:हून आपल्याला प्रपोझ करतो त्याची वाट बघतेय इशाबाळ. वाट बघ म्हणाव!

बादवे, काल तो झेन्डे सुभाला ' तुझ्या जीवाला पुन्हा धोका आहे. तु कुठे बाहेर जाऊ नकोस" अस काहीतरी म्हणत होता. तो फोनवर कुणा खबर्याला कुणावर तरी लक्ष ठेवायला सान्गत होता. मेबी याआधी सुद्दा सुभावर हल्ला झाला असावा आणि त्यात शितु चा जीव गेला असावा. कोणीतरी बिझनेस Rival असेल सुभाचा.

काल मायराचा अभिनय छान झाला. Happy

कालच्या भागात ईशा जेव्हा फोन करत असते सुभा ला तिचा मिस कॉल येऊन गेल्यावर फोन मधे १७:२६ वाजलेले दाखवलेत. मग निमकर काय लंच टाईम ते ५.३० पर्यंत थांबले का?

ईशाच्या आईचा बावळटपणा चालूच होता हॉटेलात.
बादवे, काल हवा येऊ द्या मधे या सिरीअलचा स्पूफ होता. सुभा नेहेमीप्रमाणे कातील दिसत होता. Wink मला ईशाला बघायचंय म्हणे कोण आहे.. इथेही तिच्याच मागे Uhoh (खर्या जीवनात सुभाचं लग्न झालंय का? कोणाला ही अवांतर माहिती आहे का?)
मायरा (श्रेया बुगडे) झेंडेला (भारत गणेशपुरे) ला म्हणते झेंडे जास्त फडकू नका Lol

सुभाचं लग्न झालंय. बायकोचं नाव मंजिरी आणि त्यांना दोन मुलगे आहेत बहुतेक.
बायको खूप गोड आहे. सुभाचं तिच्यावर खूप खूप प्रेम आहे. Happy

Pages