तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

मी या मालिकेचा एकही भाग पाहिलेला नाही पण इथले प्रतिसाद आवर्जून वाचते Lol
फारएंड आणि तुम्ही सगळे मस्त करमणूक करून घेता ही मालिका बघून ( आणि इथे चिरफाड करून इतरांची करमणूक करता Happy )
कायअप्पावर आलेले काही विनोद Happy

नवरा असावा तर सुबोध भावे सारखा .....
बायकोने मला अलगद तरंगत उडावसं वाटतं बोलल्या बरोबर हेलीकोप्टर समोर उभं केले

नाही तर आमचे राजे ...आज बाहेर जाऊया का जेवायला ?? खूप कंटाळा आला आहे....तर बोलतो कसा राणी तु आज खिचडी बनव ...मस्त बनवतेस

तुला पाहते(च) रे
...........................................

नवरा : हे काय ? आज परत जेवणात शिळ्या पोळीचा लाडूच ?

बायको : केवढे हे चोचले ?
तो एवढा मोठा उद्योगपती विक्रांत सरंजामे किती आनंदाने पोळीचा लाडू खातो बघा नाहीतर तुम्ही ?
गिळा मुकाट्याने

तुला पहाते(च )रे
..........................................

चितळ्यांच्या दुकानात पोळीचा लाडू घेण्यासाठी उडाली झुंबड

सुबोध भावे ऊर्फ विक्रान्त सरंजामे ह्यांच्यामुळे पोळिच्या लाडू ला मिळाले पंचपक्वानात स्थान

फारएंड.. Happy

त्या रस्त्यावरच्या सस्पिशीअस माणसाचा काय रेफरंस म्हणे? पुढे तो नाही दाखविला.......त्याची जागा रिकामी दाखवली चारदा कॅमेरा तिकडे नेऊन.
की फक्त विसरंजामे किती कनवाळू आहे ते दाखवायचे होते?

मला आता केड्याच्या मनाचा अंदाज हळूहळू येऊ लागलाय...तो फक्त ईशाबेबीचं लग्न मोडेल विसरंजामे क्लॉज मुळे....पण पुढे बर्रेच दिवस ही मेन प्रेम कहाणी काहीच पुढे सरकविणार नाही......
आई साहेब, मायरा, टिल्लू ...... असे अडथळे येतील.....!!
मग परत ईशा कुठली तरी सुपर बिझीनेस आयडीया सुचवेल......
मग कुठे जाऊन..., " ये शादी तो होनीही थी बाबू....~!!" Happy
असं लोक एकमेकांना म्हणतील !!!!

इथला ८-१० दिवसांचा बॅकलॉग आज भरून काढला.
नव्या-जुन्याचं मिश्रण, कंपन्यांची लाईव्ह्ज >>> बेक्कार हसले Rofl

मी आजवर पाहिलेल्या ३ एपिसोड्समध्ये बिपिन आणि जयदिप मला दिसलेले नव्हते. म्हणून काल रिपीट टेलि.चा एक एपिसोड पाहिला- गोड भेळ वगैरे. त्यात बिपिन दिसला.

"चला, काहीतरीच तुमचं, सर!" - हा डायलॉग ऐकून माझा पोकर-फेस झाला. लेखकरूपी सरड्याची धाव कुंपणापर्यंतही नाहीये... साठच्या दशकातले रोमँटिक संवाद कसले लिहितात... :भोकाड पसरलेली बाहुली:

वरच्या पोष्टी वाचून खरेच चहा तोंडातून बाहेर आला Rofl
ईशाबाळ ला ३५००० पगार आहे>> तो असुद्या .. पण खरंच कोणत्या कंपनी त असे सुटीचे अँप्लिकेशन एका लिफाफ्यात आणि A४ साईझ पेपर वर लिहून देतात ?आणि एम्प्लॉयी मॅन्युअल पोष्टाने पण आलेच असते कि १ दिवसात .. आणि आधी आपण काय लिहिलंय त्यात ते समजून घ्यायचं कि आधी लोकांच्या घरी जाऊन वाचायचं? Uhoh
आता त्या f m ला पण कळलं कि सर या इशा च्या घरी आहेत आता तो सांगणार ऑफिस मध्ये गेल्यावर .. पण सुभा ला त्याचे काही वाटले नाही असे दिसले तरी नाही चेहऱ्यावरून.
कसली ती इशा?! गच्चीवर जाऊन सर तुम्ही इथे आहेत होय काय म्हणते Uhoh
तिने तिच्या आवाजाचे खरंच काहीतरी करायला हवंय .. जरा जरी वरच्या पट्टीत संवाद असतील तरी तिचा आवाज चिरकतोय Sad
आणि कसला भेळचा तो सीन रे रामाsss अगदीच कसंसंच झालं ..
आणि कडधान्याची भेळ आपण सगळेच करतो कि घरी सारखं सारखं काय आम्हा गरिबांच पौष्टिक खाणं आणि आम्ही काही टाकून देत नाही .. अरे होय कि कळलं आम्हाला
तो बिचारा बिपीन खरंच १० चेना (चेन्स Wink ) आणतो गं ... सुभा आणि इशा ला पण तेव्हा तोंडात मारल्यासारखं झालं ..

कायअप्पावर आलेले काही विनोद भारीच एकदम Lol

समहाउ मला मायराच काम आवडायला लागलय. जरब, धाक, सन्ताप, खुनशीपणा... इशाला धडा शिकवल्याची खुशी सगळेच डोळ्यातुन मस्त दाखवते ती!
२९ सप्टेम्बरचा एपिसोड सगळा मायरा खाउन गेलिय.
नन्तर ही ती झेन्डेकडुन सत्य काढुन घेते की विक्रान्त सर नक्की कुठे आहे तो ही अख्खा सीन खाउन टाकलाय मॅडमने.

Happy अश्क्य प्रतिसाद Happy conflict of interest वर काही तरी कलम असेल त्या hr policy मध्ये.. शिर्षकगीत मस्त आहे मात्र.

HR Policy ऊर्फ Employee Manual (!!?) मराठीत आहे चक्क..

बिपीन ने एकदम १० चेन्स का आणल्या पण? त्याही एक सारख्या??
आणि इन ऑल सिनारिओज, जरी इशाचं लग्न बिपीन शी झालं तरी टिल्लूंना असा किती धंदा मिळणार होता तिच्या करवी..? एका मोस्ट ज्युनिअर मुलीची काय वट असणार कंपनीत...की हे दाम दुप्पट खर्च भरुन काढतील...?
काहीही केड्याचं डोकं.....!!! काहीतरी दुसरं रिझन शोधायचं ना.....टिल्लूंचं मोटिव्हेशन म्हणून!!!

त्या सो काॅल्ड 'रेड रुम' चं गुपित फुटेल तेव्हा खरं आपल्या मेंदूला झिणझिण्या येतील... कारण ते केड्या-स्टाईलचं असणारे...डोंगर पोखरून मुंगी निघेल... उंदीर काढणे पण केड्याला जमायचे नाही.

बिपीन ने एकदम १० चेन्स का आणल्या पण?>> ते अगोदर जेव्हा त्याला घेतलेली चेन दाखवत होते तेव्हा टिल्लू आणि त्यांची बहीण म्हणाले कि एवढी हलकी का आणली घसघशीत आणायची .. असं काहीतरी तर सुभा मधेच नाक खुपसून बिपीन ला हरभऱ्याच्या झाडावर चढवत म्हणाला," अहो आपला बिपीन काही कमी नाही तो यासारख्या अजून १० चेना आणू शकेल " ...
म झालं बिपिनराव हुरळले आणि विचारले इशा ला ,"खरंच आवडेल तुम्हाला मी असं केलं तर ?मग खुश व्हाल का तुम्ही ?!"
आणि आपण कसं कोपऱ्यावरच्या दुकानातून चने (चणे) आणतो तसं त्याने चेन आणल्या एका मात्रेचा फरक ..
अरे हाय काय न नाय काय ! Wink Wink

विक्रांत सर व ईशा नंतर मंगळसूत्र आणायला गेले आणि काय आश्चर्य! त्या आधीच्या वडापाव सीन मधे बॅकग्राउण्डला चालणारी एक बाई आणि एक माणूस या नंतरच्या सीनमधेही त्या ठिकाणी एक्झॅक्टली तसेच्या तसे चालत गेले बॅकग्राउण्डला! >>> Lol

ते production टीममधल्यानाच करायला लावत असतील पण मग माणसे तरी वेगळी घ्यायची ना.

आणि आम्ही काही टाकून देत नाही .. अरे होय कि कळलं आम्हाला >> ते तरी कुठं टाकतात? आज आवडली नाही म्हणून खाल्ली नाही, तर दुसर्या दिवशी तीच खीर खायला घातलीच होती की आईसाहेबांनी बाळाला.

तर दुसर्या दिवशी तीच खीर खायला घातलीच होती की आईसाहेबांनी बाळाला.>>हो Lol

एका मोस्ट ज्युनिअर मुलीची काय वट असणार कंपनीत...की हे दाम दुप्पट खर्च भरुन काढतील...?>>खुद्द मालक घरी तेल भरतोय मग अजून काय पाहिजे? Happy

बिचारा बिपीन!! चांगला आहे तो. पण इशाचा डोळा सरंजामेवर.

बिचारा बिपीन!! चांगला आहे तो. पण इशाचा डोळा सरंजामेवर. >>>>> अगदी अगदी. एवढा काही वाईट नाहीये तो. फक्त त्याने व़डिलान्च्या तालावर नाचण बन्द केल पाहिजे.

"चला, काहीतरीच तुमचं, सर!" साठच्या दशकातले रोमँटिक संवाद कसले लिहितात. >>>>> एवढे काय वाईट रोमँटिक संवाद नव्हते ते. आवडले मला. मी फक्त त्यावेळी सुभाच्या रोमँटिक डोळयान्कडे बघत होते. Blush इशाकडे लक्ष गेल नाही.

ते शिळया पोळयाचे लाडू सुभाने Sownya ला दयायला हवे होते खायला, चॉकलेटचे लाडू आहेत असे सान्गून. Proud

दुधाच्या पाकिटाच्या खुर्च्या आणि टेबले? हे मी पहिल्यान्दाच ऐकले. Uhoh

ईशाबाळ ला ३५००० पगार आहे>> >>>>>> मी सुद्दा ऐकून घेरी येऊन पडले.

विकीच्या पहिल्या बायकोचा उल्लेख करताना सगळे का घाबरतात? Uhoh जस काय विकीने तिचा खून केला होता.

त्या रस्त्यावरच्या सस्पिशीअस माणसाचा काय रेफरंस म्हणे? पुढे तो नाही दाखविला.......त्याची जागा रिकामी दाखवली चारदा कॅमेरा तिकडे नेऊन.
की फक्त विसरंजामे किती कनवाळू आहे ते दाखवायचे होते? >>>>> नाही आगो. मला एक वेगळाच डाउट येतोय. त्या माणसाचा विकीच्या भूतकाळाशी (त्याच्या पहिल्या बायकोच्या सन्दर्भात) काहीतरी कने़क्ट असावा. तो माणूस विकीला घाबरत होता. नन्तर तो गायब झाला त्याच्या आधी सुभा कुणाला तरी फोनवर सान्गत होता की, " हे काम लवकरात लवकर व्ह्यायला हवच. काम झाल्यानन्तर मला सान्गा." सो, तो माणूस गायब होण्यामागे सुभाचा हात असावा. दाल मै कुछ काला है!

सुभा फ्रेममधे असताना इशाकडे लक्ष जात नाहीच. पण ती बोलायला लागली की कितीही आटापीटा केला तरी त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.

समहाउ मला मायराच काम आवडायला लागलय. जरब, धाक, सन्ताप, खुनशीपणा... इशाला धडा शिकवल्याची खुशी सगळेच डोळ्यातुन मस्त दाखवते ती!
२९ सप्टेम्बरचा एपिसोड सगळा मायरा खाउन गेलिय.
नन्तर ही ती झेन्डेकडुन सत्य काढुन घेते की विक्रान्त सर नक्की कुठे आहे तो ही अख्खा सीन खाउन टाकलाय मॅडमने. >>>>>> +++++++१११११११

सुभा फ्रेममधे असताना इशाकडे लक्ष जात नाहीच. पण ती बोलायला लागली की कितीही आटापीटा केला तरी त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. >>>> हम्म. लहान मुलीसारखी बोलत असते ती.

तो माणूस गायब होण्यामागे सुभाचा हात असावा. दाल मै कुछ काला है!>> मला पण अशी शंका आलीच .. एकतर खरंच सुभा ने त्याला आपल्या कंपनी त कामाला ठेवलं असेल किंवा त्याला गायब केलं असेल
कारण तो असं काहीतरी म्हणाला ना ? कि " मी आता एकटाच राहिलोय .. "??आणि सुभा त्याच्याकडे खरतर ओळखीचं बघत होता असं वाटलं एक क्षण ..

कारण तो असं काहीतरी म्हणाला ना ? कि " मी आता एकटाच राहिलोय .. "??आणि सुभा त्याच्याकडे खरतर ओळखीचं बघत होता असं वाटलं एक क्षण .. >>>>> येस्स.

Pages