तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

इशा फक्त रुसल्याचा अभिनय चांगला करते बाकी कठीण आहे. तिचं "हो बाबा", "हो आई", हं , "हो" सुद्धा इतकं लो बॅट, मेंगळट अन् पिचकवणी आहे ना की नंतर संसार कसा करेल असं वाटतं. आमच्याकडे हो चं वजन बदलून, नुसतं तुटक हो, होओओओओ, होय्य, हो गं बाई, हुंह्, ह्होओओ इतक्या प्रकारे नुसतं हो मधूनसुद्धा अनेक कामं आणि अनेक संवाद चालतात. तिनं तिच्या आईकडून काहीतरी शिकावं. "अहो निमकर" आणि "ब्बोल्लल्ले" चं टायमिंग जबरा असतं तिचं.

लोल

त्या डीलर्स बरोबर ईशाच्या ऐवजी ईशाची आई जाते असे एक फॅन फिक्शन काढायला हवे Happy

मी पाहिला पावभाजी एपिसोड. सुभा अगदीच बोजड व जाड दिसतो आहे. हम दिल दे चुके सनम मोमेंट एकदम फसला आहे. त्यात तो मधुमेही असल्याने असले खाणे कसे काय चालते? इशा चा आवाज पीळ. आईबाबा एकदम डेट वर!

सगळ्या पोस्टी Lol

त्या सर्व्हेच्या सीन्समध्ये दरवेळी तो माणूस ईशाला `हं, घे लिहून' सांगत असतो आणि ती `शरद कमळ बघ'च्या थाटात लिहून घेत असते. ते जाम कॉमेडी होतं Lol एका ठिकाणी तो माणूस काही सांगत नाही, तर ही `सर, हे लिहून घेऊ?' म्हणून विचारते. ती तर हाईट Biggrin
आणि इशाच्या बाबांच्या चेहर्‍यावर `आपली मुलगी कित्ती काम करतेय..' असे भाव. हे सीन्स लिहिणार्‍यांच्या चेहर्‍यांवरही `आपण कित्ती काम करतोय ना...' असेच भाव असणार; त्याशिवाय अशी कामं घडणारी नाहीत... Uhoh

सु.भा. मनातली तळमळ, तडफड किती छान दाखवतो Blush
तो इशाच्या डेस्कवर जाऊन बसतो तेव्हा इतर कॉम्प्सचे स्क्रीन्स सुरू असतात, हिचा तेवढा कव्हर घालून बंद ठेवलेला असतो. Lol का? कारण ती कामानिमित्त बाहेर गेली आहे.
याच लॉजिकने ती ऑफिसमध्ये असते तेव्हा काम करताना दाखवायला हवी... Wink

एकन्दरीत काय , इशा बाळ एकदम लक्की दाखवायचे आहे कम्पनीसाठी... सरन्जामे साठी.
दो रुपयेची जादु चालली, आता जुन्या साड्यान्ची जादु चालली. तो एक कोण फकिर कि भिकारी ही म्हटला ना सुभाला, ये लडकी तुम्हारी जिन्दगी मे तुफान लायेगी.

ज्या ज्या वेळी तिच्यावर मायरा आणि कम्पनी,/ कोणीही बालन्ट आणण्याचा प्रयत्न करते त्या त्या वेळी ती लकीली वाचते.
Biggrin

ढॅण्ट्ढॅण SSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSSS

रविवारी महाएपिसोड आहे ज्यात विस ला ई बाळावरच्या प्रेमाची जाणीव होणार तो कबुली लगेच देईल असं नाही, पण एकूण आता तो मायरा आणि झेंडेंना तिला कंपनीतून काढायला सांगणारे ती काहीतरी बोलली ह्या कारणावरून. जिथे ती १ दिवस नव्हती तर तो कासावीस झाला तिथे ती कायमची गेलेली कशी सहन होणार अशी उपरती होऊन मालिका योग्य वळणावर लागणार.

काल जेव्हा पावभाजी खाऊन ते निघाले आणि इशा समजावत होती कि मनात काय चाललंय ते आधी स्वतःला सांगा .. मग मला सांगा ब्ला ब्ला तेव्हा लावलेल गाणं सिटुएशन ला एकदम चपखल बसणारं होतं.. हाल ए दिल तुमसे कैसे कहू .. (Bbuddah Hoga Terra Baap) मधल अमिताभ ने गायलंय ..परफ़ेक्ट सिलेक्शन !
बाकी काल ठीक ठाक च होता भाग .. इतरवेळी काही परवडत नाही म्हणून हौस करत नाही म्हणायचं आणि काल ८ रुपायावाले ४ गजरे घेतले इशा च्या आईने .. !!! धन्य
जेव्हा इशा चे आई बाबा आणि हे दोघे समोरासमोर येतात तेव्हा सुभा गडबडतो ..अरे याना आता काय वाटेल आपण दोघेच फिरतोय ! पण इशा चा विचार मला पटला .. कि असं आपण काय केलंय जेणे करून त्यांना काही वेगळं वाटेल .. तुमच्या मनात काय आहे Wink

..अरे याना आता काय वाटेल आपण दोघेच फिरतोय !
आणि आत्ताच का वाटेल? आधी पण गेलेत की अनेकदा. आणि 46 ला 76 सारखं का वागवतायत? चांगलं दणकून तिखट खातात की 46 वाले पण.

आणि आत्ताच का वाटेल? आधी पण गेलेत की अनेकदा>> पण तेव्हा राजरोस घरी माहित होते ना .. आज अचानक गाठ पडली .. आणि आता इशा त्याला भाव देत नाहीये तर सुभा च्या डोक्यात ती भिनत चाललीये जास्त जास्त .. सो त्याच्याच मनात चांदणं असणार Wink म्हणून असं वाटलं असेल
आणि 46 ला 76 सारखं का वागवतायत>>तेच ना ! आणि कितीवेळा अंकल म्हणाला तो .. जरा कमी मार च खाणार आता सुभा कडून असं वाटलं मला ..
मे बी इंडिरेक्ट्ली तो आठवण करून देत होता का ? कि तुमच्या वयात अंतर आहे सो फेरविचार करा .. Wink

कालचा पावभाजीचा सिन अगदी कै च्या कैच होता, असे कोणी वय बघुन कमी तिखट घालत नाहीत की वारंवार चिडविल्यासारखे अंकल बोलत नाही. पण सुभा काल खरेच खुप विचीत्र वाटत होता, सुजल्यासारखा. अन त्यामुळे तो ४६ न वाटता किमान ५५ वाटतो, म्हणजे मलातरी (सु भा फॅन मारु नका ह मला)

आणि 46 ला 76 सारखं का वागवतायत? चांगलं दणकून तिखट खातात की 46 वाले पण. >>> हो न ४६ किंवा ७६ कशाला माझी आजी अगदी ९० पर्यंत अगदी झणझणीत खायची , कधी कसला त्रास नाही झाला

हे मोठ्या घरातले लोक खात नाहीत तिखट.. अस असेल :).... आणी सुभा ला आता जास्त वय दाखवल.. नतर ईशा बाळ करेल चेजेस Happy

हे मोठ्या घरातले लोक खात नाहीत तिखट.. अस असेल :).... आणी सुभा ला आता जास्त वय दाखवल.. नतर ईशा बाळ करेल चेजेस >>>>>> ++++१११११११ त्यात त्याला डायबिटिस दाखवलाय.

सुभा स्वतःला 'हम दिल दे चुके सनम' चा सलमान किव्वा ऐश्वर्या राय समजतो काय? आला राग, खा ति़खट!

काल जेव्हा पावभाजी खाऊन ते निघाले आणि इशा समजावत होती कि मनात काय चाललंय ते आधी स्वतःला सांगा .. मग मला सांगा ब्ला ब्ला तेव्हा लावलेल गाणं सिटुएशन ला एकदम चपखल बसणारं होतं.. हाल ए दिल तुमसे कैसे कहू .. (Bbuddah Hoga Terra Baap) मधल अमिताभ ने गायलंय ..परफ़ेक्ट सिलेक्शन ! >>>>>>>> +++++११११११ मस्त गाण होत ते. आधी कधी ऐकल नव्हत. अभिताभने गायलय हे? Uhoh

जेव्हा इशा चे आई बाबा आणि हे दोघे समोरासमोर येतात तेव्हा सुभा गडबडतो ..अरे याना आता काय वाटेल आपण दोघेच फिरतोय ! पण इशा चा विचार मला पटला .. कि असं आपण काय केलंय जेणे करून त्यांना काही वेगळं वाटेल .. तुमच्या मनात काय आहे >>>>>>> अगदी अगदी. तिने स्वार्थीपणाची, स्वतःचा विचार करण्याची व्याख्या सुद्दा छान केली होती. काल इशाने छान अभिनय केला होता. पण हया सिच्युएशनला रेशम प्रशान्त परफेक्ट वाटली असती.

तिचा पिसी बंद असतो म्हणून झाकलाय. पुढल्या खेपेस उशी पण असू शकते तिथे. >>>>>> Rofl

ती रुपालीची आई इशाच्या आईला 'कुणाचा वाढदिवस आहे म्हणून बाहेर जाताय का?' विचारत होती. ईशाच्या आईने पटकन म्हणायला हव होत, " आम्ही कुठल्याही वेळी हॉटेलिन्गला जाऊ शकतो. आम्ही आमच्या मर्जीचे मालक. तुला का नसत्या चौकश्या? आम्ही तुमचे गुलाम लागून गेलो आहोत का नसती दादागिरी करायला. बै, बै, लग्न मोडल तरी केवढा हो माज हयान्चा."

त्या मोठया टिल्लूने सुभा आणि इशाचे फोटो काढले. सुभाची लक्षणे ठिक नाहीयेत अस म्हणत होता तो.

आणि ईशा सरांवर चिडते तेव्हा जरा अ‍ॅक्टिंग बिक्टिंगही करते. >>>>>>> +++++++ १११११११११

स्कुटर उधारी घेतली त्यांनी >>>>>>> माझ्याशी बोलत राहा निमकर. नाहीतर तुम्ही कधी रस्त्यावर पडलात ते कळायच नाही मला. Rofl

इशाची आई लग्नाआधी स्कूटर चालवायची वाटत.

इशाचे डोळे फार छान आहेत. निरागस आहेत अगदी.
इशाच्या आईबाबांचं नातं पण गोड वाटतं बघायला. इतके गरीब आहेत पण किती छान बंध आहेत तिघांत. इशा सासरी गेली तरी दोघेजण छान रहातील एकमेकांबरोबर.

किती ती नाटके..... आतापर्यंत गाडीच्या ड्रायव्हर(त्याच्यासमोर(म्हणजे तो मागे गाडीत असतो तेव्हा) बर्‍याचवेळा यांचे बोलणे झाले आहे)पासून कंपनीतल्या सगळ्या नोकरवर्गापर्यंत बातमी पोचली असेल कि साहेब आणि ईबाळात काहीतरी सुरु आहे.

इशाचे डोळे फार छान आहेत. निरागस आहेत अगदी.
इशाच्या आईबाबांचं नातं पण गोड वाटतं बघायला. इतके गरीब आहेत पण किती छान बंध आहेत तिघांत. इशा सासरी गेली तरी दोघेजण छान रहातील एकमेकांबरोबर. >>>>>>>> +++++++१११११११११

इतके गरीब आहेत पण किती छान बंध आहेत तिघांत>> येस्स .. मला पण आवडतं असं बघायला . घरातले सगळे गुण्यागोविंदाने राहतायत ..
नाहीतर मेलं एक कोणीतरी पाताळयंत्री ,एक चुगलखोर , एक स्वार्थी आणि अप्पलपोटी , एक खाष्ट , आणि एक अतीssss सोशिक असे भरलेले असतातच

काल त्याला अंकल म्हंटलं तर तो आता बारीक होईल का मुद्दामून Wink तसा प्लॅन असेल तर बरंच होईल .. मग इथे बदामांची रास पडेल सुभा साठी Wink

आधी कधी ऐकल नव्हत. अभिताभने गायलय हे? >>> यस. तरूणपणी मेरे अंगने मे वगैरे करून झाल्यावर बच्चनसाहेबांना सत्तरीत गायकी जमली Happy हे "हाल-ए-दिल", कहानी मधले बॅकग्राउण्डला असलेल बंगाली "एकला चलो रे", आणि बहुधा बागबान का कशातले अजून एक - अशी २-३ चांगली गाणी म्हंटली आहेत त्याने रिसेण्टली.

आणि बहुधा नुकतीच आलेली ती सिद्धिविनायकाची आरती सुद्धा
https://www.youtube.com/watch?v=H9tWRGxuKTw

ईशाच्या फॅमिलीचा बाँड खरंच मस्त आहे. अगदी मला माझे आईबाबा आणि मी आठवतात. आमच्याकडे सेम अशी परिस्थिती होती लग्नाआधी. बाबांची साधी नोकरी, मी पण लवकर जॉब करायला लागले. आई मेस चालवणे, पाळणाघर अशी कामं करायची. तेव्हा आम्ही असं तिघं
एंजॉय करायचो. पैसे फार नसायचे पण आहे त्यात मजा यायची. मस्त होते ते दिवस. बाबा आईला ज्या गोष्टी आवडतात अगदी साध्याच असल्या तरी आवर्जून आणायचे.
सॉरी अवांतराबद्दल पण राहवले नाही.

सर्व डिलर्स आजपण परवाच्याच क्रमाने खुर्चा पकडून बसले होते.
नगरकरांना आज अॅक्टींग करावी लागणार ह्याचा आधीच अंदाज आल्याने आधीपासूनच जरा धडधडत होते पण त्या मानाने बरी केली अॅक्टीग. Wink
इशाबाबू उडतायत आता.
सुबोध रोजच्या रोज कृतकृत्य झाल्यासारखा दिसतो हल्ली.

एपिसोडदरम्यानच्या एका प्रोमोत सु.भा. एफएम रेडिओवरचा सेम सिच्युएशनबद्दलचा संवाद ऐकतो, (२० वर्षांचं अंतर, वगैरे) मग ऑफिसच्या काचेतल्या प्रतिबिंबाकडे बघत दाढीवरून हात फिरवतो, त्यावरून आता 'सबसे पहले सुनो मियां, कर के वर्दिश बनो जवां' ऊर्फ मेक-ओव्हर मोड ऑन होणारे त्याचा.

तिखट खातानाचा त्याचा अभिनय मला आवडला.

बाकी, नुकतंच 'शुभलग्न सावधान' सिनेमाच्या प्रिमियरला सु.भा.ला प्रत्यक्ष पाहिलं. Blush एकदम साध्या, कॅज्युअल वेअरमध्ये आला होता; पण कसला दिसत होता! या मालिकेत मेक-अप करून त्याचं वय आणखी वाढवलंय असं वाटलं.

काय तो बालीशपणा चाललाय.. केड्याचा.! एक जण इशाच्या विरुद्ध तक्रार करतोय पण अरे बाकी तिघे आहेत ना साक्षिला कि त्याने मायरा - सुभा च्या सम्बन्धाबद्द्ल बोलल्याने इशा त्याला बोललीये. आणि मग ते कॉनफरन्स रुममधे अगदी मायराने इशाला झापल्यावर मग ते दुसरे डिलर खरे खोटे करणार.

इकडे इबाळ किती आसुसलेली आहे, सुभाच्या तोन्डुन वदवुन घेण्यासाठी. कि तो ही मनातुन तिच्यावर प्रेम करतोय पण बोलुन दाखवता येत नाहीय.
प्रोमो मधे त्याला इशारा देताना मॅच्युअर्ड बोलते इशा .... अगदी प्रेमाच्या खेळात मुरलेल्यासारखी!
कि सर ठिक आहे, आपण चुकुन एकमेकासमोर आलो तर माझ्या मनात जे तुमच्याविषयी वाटतय तेच तुम्हालाही माझ्याविषयी वाटतय हे कबुल करुन टाका.

नुकतंच 'शुभलग्न सावधान' सिनेमाच्या प्रिमियरला सु.भा.ला प्रत्यक्ष पाहिलं.>>> किती भाग्यवान आहात तुम्ही

Pages