Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32
झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ई ने मायरा चे पैसे खाल्ले तरी
ई ने मायरा चे पैसे खाल्ले तरी ती काहीही बोलत नाहीये हे कस्काय!! >> उरलेले पैसे दिलेत परत अणि जे खर्च झालेत ते पगारातुन कापून घ्या म्हणालीय ईशा.
तीही एक गंमतच आहे. या कंपनीत
तीही एक गंमतच आहे. या कंपनीत फायनान्स अकाउण्टिंग च्या प्रोसेस काही आस्तित्त्वात नसाव्यात, इतर अनेक प्रोसेसेस प्रमाणे. मायराने तिला वैयक्तिक चेक दिला - कंपनी अॅडव्हान्स नव्हे. त्यावेळेस ती स्पेसिफिकली ते म्हंटली सुद्धा.
आता परत करताना ईशाने दिले ठोकून पगारातून कापून घ्या. म्हणजे दर महिन्याला एचआर ईशाचा पगार मायराला कॅश मधे एका पाकिटात देणार, आणि मायरा त्यातले काही ठेवून घेउन उरलेले पाकीट ईशाला नेउन देणार. असा काहीतरी समज दिसतो मोठ्या कंपनीत पगार कसे होतात, दिलेले अॅडव्हान्स पगारातून कसे वळते करतात वगैरे बद्दल.
१३ कंपन्यांचे कॉर्पोरेट ऑफिस. काही हजार कोटींचा टर्नओव्हर. यात एका व्यक्तीचा पगार एका व्हीपीने कापून घ्यायचा. कसा? मी payroll मधे असतो तर म्हंटलो असतो तुम्ही तुमचे बघून घ्या. हा काही कंपनी अॅडव्हान्स नाही
पुन्हा किती कापून घ्या वगैरे स्पेसिफिक्स काहीच नाही. एकूणच या सिरीज ला स्पेसिफिक्स चे वावडे आहे
सुबोध जेव्हा चवताळून आणि
सुबोध जेव्हा चवताळून आणि तावातावानं तिच्याशी भांडला तेव्हा तो लोकमान्यांसारखा वाटला ..हातवारे वगैरे
आणि तिच्या हाताला काच लागल्यावर ममतेनं व कनवाळूपणानं पाहीलं तेव्हा थेट बालगंधर्व जाणवले. 
एकंदरीतच ह्यांच्या कंपनीत फक्त मायरा, झेंडे आणि एफेम काम करताना दिसतात. परांजपे मख्ख असल्याचा साॅलिड अभिनय करतात. इशा तर कायद्यात झोपा काढत असते. शास्त्र म्हणूनसुद्धा समोर एखादी फाईल घेऊन काम करतेय असं दाखवत नाही.
मेधावि आता कट्यार मधला सुबोध
मेधावि
आता कट्यार मधला सुबोध दिसेल का एखाद्या सीन मधे?
इशा तर कायद्यात झोपा काढत
इशा तर कायद्यात झोपा काढत असते. शास्त्र म्हणूनसुद्धा समोर एखादी फाईल घेऊन काम करतोय असं दाखवत नाही. >>>
कट्यार मधला सुबोध दिसेल का
कट्यार मधला सुबोध दिसेल का एखाद्या सीन मधे?>> दिसेल दिसेल...प्रेमात धडपडताना कधीतरी तोही दिसेल थोडासा... एकदा का लाईन क्लिअर झाली की घाणेकर दिसायची वाट पहातेय
फारएण्ड, मेधावि
फारएण्ड, मेधावि
सुबोधचा अभिनय मस्तच काल
सुबोधचा अभिनय मस्तच काल त्याची तग्मग, अस्वस्थतता पोहोचत होती अगदि , इशाला मात्र अगदिच जमत नाही ते, अर्थात सुभाला किती वर्श झालेत काम करुन त्यामुले तो अनुभव दिसतो इथे, इशा नविन आहे तशी थोडी अडखळणार आहेच होपफुली सुधारेल तिचा अभिनय, अर्थात केड्ञाची सुमार कथा सहन कराविच लागेल ती काय सुधरत नाही.
या धाग्याचे नाव बदला आता,
या धाग्याचे नाव बदला आता,
आणि
.
.
.
.
सुबोध भावे (पक्षी काशिनाथ घाणेकर )
आगामी काळात धागा अपेक्षित.
धाग्याचे नाव बदलायचेच असेल तर
धाग्याचे नाव बदलायचेच असेल तर "तुपारे" एवढंच ठेवा. ऊगा चांगलं रोमॅन्टिक नाव बघून नवीन लोक सिरियल बघणे सुरू करतील. आणि आमच्यासारखे खोल निराशेत वगैरे बुडतील.
खरय.
खरय.
पण खाई(पाही)न तर "तुपा(रे)शी नाही तर उपाशी. असे सुभा प्रेमी भगीनी मंडळ आहे इथे. त्यामुळे नो पंगा.
अर्र्र, "भगिनी" म्हंटल्यावर
अर्र्र, "भगिनी" म्हंटल्यावर मला वाटले ताबडतोब ४-५ "खामोश!!!" येतील इथे
"भगिनी सुभा च्या नक्कीच नाहीत" वगैरे कॉमेण्ट्सही 
इथले मंडळ काहीसे लाजाळूच्या
इथले मंडळ काहीसे लाजाळूच्या पाना सारखे आहे, जरा कौतुक केले की लगेच गोशात.
i think su bha is cast only
i think su bha is cast only for girls of a certain age. universal opinion of the ladies is she is not fit for him. she is just place holder. also getting involved with boss and vp paying off from personal cash to get rid of her are potential violations of s. harrassment policy . dont they get that?
btw su type kelyawar autocorrect said bha.
सुभा , ई आणि पिल्लू ला बघतो
सुभा , ई आणि पिल्लू ला बघतो तेव्हा त्याचा चेहरा .... ब्बा...बो ... ठार मेले मी।..
फारएण्ड, मेधावि
फारएण्ड, मेधावि
जयदीपचं खरं नाव आशुतोष गोखले
जयदीपचं खरं नाव आशुतोष गोखले आहे व तो विजय गोखले यांचा मुलगा आहे. त्याची आई आणि बहिण डेंटिस्ट आहेत. आत्ताच वाचलं लोकमतमध्ये.
जयदीपचं खरं नाव आशुतोष गोखले
जयदीपचं खरं नाव आशुतोष गोखले आहे व तो विजय गोखले यांचा मुलगा आहे. त्याची आई आणि बहिण डेंटिस्ट आहेत. आत्ताच वाचलं लोकमतमध्ये. >>> अरे वा म्हणजे तो अद्वैत दादरकरचा म्हणजे मानबा मधल्या सौमित्रचा मामेभाऊ आहे.
हा बघा जयदीप मला youtubeवर
हा बघा जयदीप मला youtubeवर सापडलेला.
https://www.youtube.com/watch?v=FS1mlXzqBsY
हल्ली मी भारी youtube बघतेय, दोन दोन मिनिटांच्या clips असतात पण तुपारे, मानबा नाही बघत तिथे कारण इथे वाचायला मजा येते. जास्त करून उडान, बेपनाह मध्ये काय चाललंय बघते. आख्खा एपिसोड बघण्यापेक्षा बरं पडते. हे youtube बघण्याची सवय जास्त मराठी bb संपल्यावर लागलीय
आज तर अजून एक भन्नाट आयडीया
आज तर अजून एक भन्नाट आयडीया सुचली इबाळाला..... ती एकदम पाट्या टाकणारी, वेळ मारुन नेणारी पण मक्ख मुलगी वाटते.
जी साडी आधीच खपत नाही ती विकत देताना एक कूपन द्द्यायचे आणि नंतर त्यासाडीचा फुकट ड्रेस शिवून द्यायचा
साडीच्या इतिहासाबद्दल ती जेव्हा ऑफिसमधल्या सिनियर, वरच्या पोस्टवर असून इकडे तिकडे फिरणार्या आणि इबाळाला अधून मधून फुस (फुकटचे सल्ले) लावणार्या माणसाला(नाव विसरले मी) विचारत असते तेव्हा वाटले कि ते आता डायरेक्ट विसच्या आईकडे पाठवतात कि काय?
विस चिडल्यावर अगदी बरोबर विचार करतो. इकडून तिकडून हिला त्याच्याच ऑफिसमधे यायचे असते.
मायरा जेव्हा इबाळ ४ दिवस नसल्याने ऑफिस कामाचे काहीही नुकसान होणार नाही म्हणते तेव्ह मनातल्या मनात 'तसेही ही करते काय इथे? डबे आणते आणि झोपते' असे म्हणत असणार.
मायरा जेव्हा इबाळ ४ दिवस
मायरा जेव्हा इबाळ ४ दिवस नसल्याने ऑफिस कामाचे काहीही नुकसान होणार नाही म्हणते तेव्ह मनातल्या मनात 'तसेही ही करते काय इथे? डबे आणते आणि झोपते' असे म्हणत असणार. >>>
जी साडी आधीच खपत नाही ती विकत
जी साडी आधीच खपत नाही ती विकत देताना एक कूपन द्द्यायचे आणि नंतर त्यासाडीचा फुकट ड्रेस शिवून द्यायचा >>
'तसेही ही करते काय इथे? डबे आणते आणि झोपते' असे म्हणत असणार. >>>
१०,००० कोटी टर्नओव्हर ची
१०,००० कोटी टर्नओव्हर ची कंपनी साड्या खपवायला अशा युक्त्या करते?
अशी आयड्या १ कोटी वाल्या कंपनीत दिली तरी लाथ मारून घरी बसवतील.
बादवे, सुभा सिंगल आहे की नाही
बादवे, सुभा सिंगल आहे की नाही ह्याचा उलगडा झालाय का इशाला? की पहिली बायको असेल तरी चालणार आहे तिला?
लोल हो त्याचा उलगडा झाल्याचे
लोल हो त्याचा उलगडा झाल्याचे मला लक्षात नाही. पण एखादा एपिसोड हुकला असेल म्हणून मी सोडून दिले.
प्रेझ नंतरचा कौतुकसोहळा पाहिला आज. आणि ते पत्र! मायराचा बेसलेस मत्सर पाहून कौटुंबिक हेवेदावे कॉर्पोरेट वर्ल्ड मधे प्लाण्ट केले आहेत हे सारखे जाणवते.
मात्र हे प्रेझ, सरंजामे आणि ते ऑफिस हे एका युनिव्हर्स मधे असावे आणि ईशा दुसर्या. कारण सुभा "राजनंदिनी साड्यांच्या डीलर्स बरोबर आत्ता आपली मीटिंग झाली/प्रेझेण्टेशन झाले .." वगैरे म्हणत स्टाफ कडे येतो. तेथे सगळा सेट अप नुकतेच प्रेझ झाल्यासारखा आहे. बाकीच्यांचे कपडेही तेच आहेत. मात्र इकडे ईशा "अजून कामावर आली नाही" म्हणून तिची सहकारी सांगते. कारण मधल्या काळात ईशाच्या युनिव्हर्स मधे रात्र होउन पुन्हा दुसरा दिवस आलेला असतो. स्क्रीनवर सूर्य उगवूनही झाला.
त्या रूपालीच्या मामाच्या प्लॅनचा सगळा डोलारा सरंजामेंकडून काम मिळण्यावर होता. ते जवळजवळ रद्द झाल्यानंतर त्यांना या कुटुंबात आणि सरंजामेंमधे काय इण्टरेस्ट आहे? जगात ती एकच कंपनी आहे का यांना काम द्यायला?
कॉर्पोरेट मॅनरिजम्स मजेदार आहेत यातले. फायनान्स ची हेड वाटेल अशी बाई - जी "जनरल बॉडी मीटिंग" मधे कंपनीच्या सीईओ ला "यावेळचे फायनान्स टार्गेट्स मीट झाले" हे स्टेटस रिपोर्ट करते, ती तो सीईओ आणि डीलर बोलत असताना रमतगमत तेथे येउन उभी राहते. त्यात तिचा प्रेझेन्स इतका इग्नोर करण्यासारखा असतो की "अरे हो, या आमच्या फायनान्स हेड" छाप इन्ट्रो वगैरे काही दिली जात नाही. कोणी तिची दखलही घेत नाही.
"नगरकर साहेब ईशाचे कौतुक करत होते" म्हंटल्यावर बाकीच्यांच्या प्रतिक्रिया अगम्य होत्या. या स्क्रिप्ट मधे आपण ईशाचा मत्सर करतोय की सपोर्ट, हे माहीत नसल्यासारख्या.
मायरा तोंडघाशी पडली वगैरे संवाद ऐकताना वाटत होते की हिला कोणीतरी विचारेल की बाई, कंपनीच्या फायनान्स, ऑपरेशन्स, सेल्स, मार्केटिंग वगैरे पैकी तुझी नक्की जबाबदारी कोणती आहे, आणि तुला ते उद्योग सोडून ईशाचा मत्सर करायला कंपनी ऑटोपायलट वर चालली आहे का?
आणि ते पत्र! त्या प्रेझेण्टेशन रूम मधे एक जनरल लॅपटॉप पडलेला असतो. तो कोणीही उघडून त्यात टाइप करू शकतो. ते डीलर्स तेथे असताना तो लॅपटॉप तेथेच पडलेला असावा, जरी ते प्रेझेण्टेशन त्यावर झालेले नसले तरी.
आता ईशा लेटर त्यात टाइप करते. नंतर तो बंद करून पुन्हा सरंजामे कडे तो सरकावते. म्हणजे तो त्याचा लॅपटॉप होता काय? मग फाइल कोठे सेव्ह केली वगैरे पत्ताच नाही. अर्थात ईशा ते प्रिन्ट करणार आहे आणि स्वतःच्याच पत्त्यावर पाठवायचे असले, तरी "कुरियर" करणार आहे. म्हणजे सरंजामे तिला ते इमेल करणार का सर्व फोल्डर्स मधे सर्च करून? काय सांगता येत नाही. मधल्या काळात त्या कंपनीने टेक्नॉलॉजिकल जंप मारली असेल आणि एखाद्या शेअर्ड फोल्डर मधे कोणत्याही मशीन वरून कोणीही फाइल्स सेव्ह किंवा प्रिन्ट करू शकतो अशी सोय केली असेल, काय माहीत. ज्या कंपनीत सरांचे स्किड्युलिंग एक व्हीपी करते, जेथे रजेचे अॅप्लिकेशन द्यायला इन-पर्सन यावे लागते, जेथे सीईओ च्या "स्किड्यूल" मधे गोंधळ झाला तर तो सोडवायची काहीही व्यवस्था नसते, तेथे इतकी उच्च टेक्नॉलॉजी असणे सहज शक्य आहे.
फारच विचार करता बुवा तुम्ही..
फारच विचार करता बुवा तुम्ही.. ती काॅमन शेअर्ड फोल्डरला सेव्ह करून मग प्रिंट घेऊन त्यावर सायबाची सही घेऊन मग ते घरी नेते. लॅपटाॅप पण काॅमन शेअर्ड आहे तो.
काल मिटींग झाल्यावर....वाह् मस्त झालं बरं का जेवण म्हणाव त्या चालीत ..वाह् मस्त झाली मिटींग ऐकलं का?
आणि असं चार धटींगणांबरोबर निमकरांच्या मुलीला सोडू कसा शकतो विसं? तिची सुरक्षितता वगैरे नसते का काही? त्यातला एक तर "काय मग मॅडम, चार दिवस येणार ना आमच्याबरोबर "? असं विचारत होता.
प्नेझेंटेशन ह्या शब्दाचा अर्थ नीटसर समजून घ्यावा म्हणते झी कडून. दोन किंवा जास्त माणसं काॅन्फरन्स रुमात एकमेकांशी बोलली की त्याला प्रेझेंटेशन म्हणतात बहुतेक.
वि. सं. सध्या फारच वितंडवाद घालतोय.
जी साडी आधीच खपत नाही ती विकत
जी साडी आधीच खपत नाही ती विकत देताना एक कूपन द्द्यायचे आणि नंतर त्यासाडीचा फुकट ड्रेस शिवून द्यायचा >> पोळीचा लाडू आणि हे सेमच आहे. आधी एक सिरीअल बनवायची. टिआरपीनं मार नाही खाल्ला तर दोन वर्ष चालवायची नाहीतर मग त्याच कथानकावरचे लहान लहान एपिसोडीक कुर्ते बनवायचे.
त्यातला एक तर "काय मग मॅडम,
त्यातला एक तर "काय मग मॅडम, चार दिवस येणार ना आमच्याबरोबर "? असं विचारत होता.> >>>>>>>>
काहीही प्रतिसाद आहेत :लोलः
आणि वर लिहिल्याप्रमाणे इशाला खरंच विस चं लग्न झालंय की नाही वैगेरे क्लियर आहे का नाही?
का असली एखादी बायको तर असुदे असं काही आहे इशाचं?
लोल फारएन्ड.
लोल फारएन्ड.
मी काही गोष्टी गा. जा. भ. करते.
मात्र इकडे ईशा "अजून कामावर आली नाही" म्हणून तिची सहकारी सांगते >>
यात ईशा ही कंपनीच्या मालकावर लाईन मारणारी आणि काही विशेष काम न करता कौतुक होणारी असल्यामुळे तिला खास सूट असावी. ती त्या अवघड प्रेसेंटशन नंतर खूप थकल्याने आणि ऑफिसमधले लोक ऑफिसच्या वेळात काम करून आणि कामाबद्दल चर्चा करून तिला नीट झोप घेऊ देत नसल्याने प्रेसेंटशन झाल्यानंतर एक डुलकी मारायला ती घरी गेली असावी. आणि मग छान फ्रेश होऊन कपडे बदलून ऑफिसला गेली असावी.
आणि ते पत्र! >> यात एक शंका. कंपनीच्या लॅपटॉपवर मराठी फॉन्ट असतो का? लॅपटॉपवरसुद्धा काम जर मराठीत चालत असेल तर याचा अर्थ अमराठी लोकांना कंपनीचे दरवाजे बंद?
इशा तर कायद्यात झोपा काढत असते. शास्त्र म्हणूनसुद्धा समोर एखादी फाईल घेऊन काम करतेय असं दाखवत नाही. >>
एपिसोडीक कुर्ते >>>
एपिसोडीक कुर्ते >>>
फारएण्ड, जबाबदारी सध्या वाटून घेण्यात आलेली आहे.
कालचा वि.स.चा चिडचिड रिपीट एपिसोड पाहिला. सात्विक संताप, चडफड सु.भा.नं डोळ्यांतून आणि आवाजातून कसली दाखवली.
काही काही घरांमध्ये 'सगळी कामं मलाच करावी लागतात' या मेंटॅलिटीनं वावरणारी मंडळी असतात; तसा या मालिकेत सु.भा. आहे; चांगला अभिनय करण्याचं काम मलाच करावं लागेल, नाहीतर मालिकेचं काही खरं नाही, असं म्हणून तो राब-राब-राबतोय
इशा त्याला जळवायला जाणूनबुजून बिपिनच्या मागे बसून ऑफिसला आली असं काही मला वाटलं नाही. पण मी रोज पाहत नाही, त्यामुळे `आपण आपलं मनातल्या मनात...'
Pages