Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32
झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुभा अॅक्टिंग चांगल्रे करतोय
सुभा अॅक्टिंग चांगल्रे करतोय म्हणून किती अत्याचार सहन करायचे? तेलकट चेहरा बघवत नाही.न्हाव्याकडून दाढी कर म्हणावं.कुथल्या अँगलमफ्धून हा इंडस्ट्रियालिस्ट वाटतो?
जनरल बॉडी मीटिंग? केड्या
जनरल बॉडी मीटिंग? केड्या डोक्यावर पडलाय का? हाऊसिंग सोसायटीची असते ना जनरल बॉडी मीटिंग. कंपनीची बोर्ड मीटिंग असेल ना, काहीही सर मिसळ करत आहे. वर सांगायला मोकळा, प्रेक्षकांना धीर नाही, सगळे लगेच हवे.
नोटा छापायचं मशीन..असं सहजपणे
नोटा छापायचं मशीन..असं सहजपणे ओफीस मधे आणुन नोटा छापायलाहीी सुरुवात..!!?? कोणाला त्यात काहीही चुकीचं वाटत नाही..वि.सं. ला पण?
आणि मशीन दुरुस्त करता येत नाही म्हणुन स्टाफवर ओरडायला जयदीपला स्वतःला तरी येतय का?
कंपनीच्या annual general
कंपनीच्या annual general meeting ला बहुतेक बोलीभाषेत general body meeting म्हणत असावेत.
मला वाटतं बहुतेक , सुभा नी पहिल्या बायकोचा खून केला असेल आणि आता ईशा त्याच्या जाळ्यात स्वतः हून सापडते आहे. पहिल्या बायकोचा आत्मा किंवा तिची relative मायरा सुभा च्या पाळतीवर असणार त्याला पकडून देण्यासाठी. पहिल्या बायकोने मायराला सुभा truth सांगितलं असणार. म्हणून ते तुला पाहते रे असणार. मायरा एवढी eligible असून सुभा च्या जाळ्यात सापडली नाही. मायराला सुभा ला पकडायला ईशा ला bait तर करायचंय पण तिचा जीव जाऊ द्यायचा नसणार. म्हणून ती एकतर ईशाला सुभा पासून लांब ठेवायला किंवा पटकन जवळ आणोन काम तमाम करायला बघते. मायराला म्हणून सतत सुभा च्या ठावठिकाणा च एवढे पडलंय. किरण करमरकर नी रुद्रम मध्ये dangerously क्युट किलर इतका फेमस केल्यानंतर सुभा ला पण स्वतः ची acting दाखवायला किलर ची भूमिका साकार करायची खुमखुमी आली असेल. सो he is doing this serial and thriller music.
continuing to राजसी....
continuing to राजसी....
सुभा चा रानभुल चित्रपट कोणी पाहीला आहे का इथे?
सुभा ने विकृत खुन्या ची भुमिका केली आहे. सोबत तेजस्विनी पंडित आहे.
Submitted by राजसी on 6
Submitted by राजसी on 6 October, 2018 - 21:21>>
"द भैताड केड्या"च्या डोक्यातून जर असल्या भन्नाट कल्पना या शिरेलीत उतरल्या आणि त्या त्याने यशस्वीपणे दाखवल्या तर मी त्याला भैताड म्हणणे कायमस्वरूपी सोडून देईन.
पण तो दिवस कधीही उगवणार नाही, याची मला पुरेपूर खात्री आहे.
नवीन Submitted by Nidhii on 6
नवीन Submitted by Nidhii on 6 October, 2018 - 22:24
>>>>
नाहीतर इशा बाळ लग्न करून जाईल सरंजामे कडे आणी
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मंगळसूत्र काढून गाणे चालू करेल "किती जन्म चालावा लपाछुपीचा चाळा"
(No subject)
रूद्रमसारखं काहीतरी करायला
रूद्रमसारखं काहीतरी करायला मिळेल अशी अपेक्षा असेल सुभाला पण प्रत्यक्षात काहीतरी फडतूस मिळालंय. रच्याकने, काशिनाथ घाणेकरचा ट्रेलर बघितला का कुणी, कडकवाला. त्यात कमेंट्समध्ये ब-याच जणांनी लिहीलंय की ह्याने ही फाल्तू मालिका करायची बंद केली तरच आम्ही हा चित्रपट बघू ईत्यादी.
"द भैताड केड्या"च्या
"द भैताड केड्या"च्या डोक्यातून जर असल्या भन्नाट कल्पना या शिरेलीत उतरल्या आणि त्या त्याने यशस्वीपणे दाखवल्या तर मी त्याला भैताड म्हणणे कायमस्वरूपी सोडून देईन >>> इथे वाचायला येत असेल केड्या तर आयडीया मिळेल त्याला आणि दाखवेलही
.
KD is not the writer of the
KD is not the writer of the story. He writes screenplay based on the story by Shekhar Dhavalikar!
https://marathistars.com/tv-serial/tula-pahate-re-zee-marathi-serial/
फक्त सिरियलमधेच बावळट्ट
फक्त सिरियलमधेच बावळट्ट दिसायचं.


कित्ती पांढरी केलीये तिला.
कित्ती पांढरी केलीये तिला. खारा दाणा दिसतेय. आजकाल पार्लरवाल्या सुद्धा असा पांढरा मेकअप करत नाहीत ना. हिची तर खास भारीतली ब्युटीशिअन असली पाहिजे ना.
खारा दाणा>>
खारा दाणा>>
बघ की, विचित्र दिसतेय.
खारा दाणा >>>
खारा दाणा >>>

बिचार्या सुभाला या सिरियलच्या नादात केस पण कलर करता येत नाहीयेत.
जयदीपला गोष्ट ऐकल्यावर ती
जयदीपला गोष्ट ऐकल्यावर ती कुणाकडून तरी पुर्वी कुणाकडून तरी ऐकलीये असं वाटणं. ( ती आईनं सांगीतली नव्हतं हे ही आठवणं.) नंतर त्यानं दु:खी होऊन सूचकपणे गप्प बसणं. ऑफीसातला तो एक जेष्ठ पण, आधी एक जण होती पण तिच्यानंतर जयदीपला समजाऊन सांगणारी तू पहिलीच...असं इशाला म्हणून नंतर गप्प झाला होता. आता प्रवास सुभाच्या भूतकाळाकडे सरकेल. सुभापण मनाविरुद्ध इशाकडे खेचला जातोय....आता येणार्या अतर्क्य घटनांसाठी सावरुन बसावं लागेल.
वा, राजसी मस्त! अशी जर कथा
वा, राजसी मस्त! अशी जर कथा असेल तर सिरियल Interesting होईल हे नक्की!
पण जर नेहमीप्रमाणे किचन पॉलिटिक्स, सासू-सून ड्रामा असेल तर मात्र माझा या सिरियलला पास! सुभाच पात्र कॉम्प्लेक्स, ग्रे किव्वा व्हिलन केल पाहिजे. हि सिरियल हॉरर, सुपरनॅचरल किव्वा सस्पेन्स-थ्रीलर असायला हवी. पण अश्या थीमच्या सिरियल्स तर झीम साडेदहा वाजता लावते ना. शेखर धाविलकरान्नी राजसीच्या आयडियाचा विचार करावा.
सुभा ला पण स्वतः ची acting दाखवायला किलर ची भूमिका साकार करायची खुमखुमी आली असेल >>>>> सुभा सारख्या अनुभवी अभिनेत्याला acting दाखवायची गरज नाही. त्याने याआधी विविध प्रकारच्या भुमिका उत्कृष्ट केल्या आहेत. 'कुलवधू' मधील विक्रमादित्य
राजवाडेची भुमिका माझी फेवरिट ( सुभाची सुद्दा फेवरिट ). डिफरन्ट शेडस होत्या त्या भुमिकेला.
सुभा चा रानभुल चित्रपट कोणी पाहीला आहे का इथे? सुभा ने विकृत खुन्या ची भुमिका केली आहे. >>>>> रानभूल बद्दल फक्त वाचल होत. बघितला नाहीये. पण ' या गोजिरवाण्या घरात' मालिकेत त्याची तश्या प्रकारची भुमिका पाहिली होती. मस्त काम केल होत त्यात त्याने.
काशिनाथ घाणेकरचा ट्रेलर बघितला का कुणी, कडकवाला. त्यात कमेंट्समध्ये ब-याच जणांनी लिहीलंय की ह्याने ही फाल्तू मालिका करायची बंद केली तरच आम्ही हा चित्रपट बघू ईत्यादी. >>>>> अगदी अगदी. माझा अगडबम मध्ये तर आधी ओळखूच येत नव्हता तो मला.
चिन्मयी, छान आहेत फोटो!
फोटो छान आहेत. सुभा थोडा
फोटो छान आहेत. सुभा थोडा पारोसा दिसतोय पण मला नेहेमीच आवडतो. ईशाबाळ मालिकेत दिसते तशी येडी आणि जाडी वाटत नाहीये. त्याचा कुलवधूमधला रोल मला फार आवडला होता आणि शिर्षकगीतसुद्धा.
सुभा चा रानभुल चित्रपट कोणी
सुभा चा रानभुल चित्रपट कोणी पाहीला आहे का इथे? सुभा ने विकृत खुन्या ची भुमिका केली आहे. >>>>> रानभूल बद्दल फक्त वाचल होत. बघितला नाहीये. पण ' या गोजिरवाण्या घरात' मालिकेत त्याची तश्या प्रकारची भुमिका पाहिली होती. मस्त काम केल होत त्यात त्याने. Happy
नवीन Submitted by सूलू_८२ on 7 October, 2018 - 17:54
>>>
बघवत नाही तो रानभुल मधे.
या फोटोंं मध्ये ईशा छान
या फोटोंं मध्ये ईशा छान दिसतेय की !
मेकअप बटबटीत वाटतोय. {माझं मत
मेकअप बटबटीत वाटतोय. {माझं मत आहे हे. तशीच फॅशन असेल तर कल्पना नाही. मला मेकअप मधलं फार काही कळतं असं नाही.
}
पण तिने केसांचं काहीतरी केलं पाहिजे या फोटोत पण विचित्र वाटतायत.
आजकाल ४० त असे पांढरे केस
आजकाल ४० त असे पांढरे केस ठेवून वावरताना मी पाहिल नाही कुणाला. का अस दाखवल असेल ?
ऑफिसात / आजुबाजुला ३० -४० मधल्या मुलांना अतिशय छान रहाताना , (किंबहूना २० पेक्षा . कारण पैसे,पोझिशन आलेली असते) पाहिलय.
इथल्या थेरड्या /म्हातार्या वगैरे कमेंट वाचून काय बोलायच कळत नाही आहे. तसचं वरती इशा छानच दिसली आहे.
असो . मला आपण अमेरिकन असल्यान भारतातल कल्चर काय कळणार अस म्हणुन सोडून देते.
आजकाल ४० त असे पांढरे केस
आजकाल ४० त असे पांढरे केस ठेवून वावरताना मी पाहिल नाही कुणाला. का अस दाखवल असेल ?>> +१ सुभाला उगाच पोक्त का दाखवतायत? तो आहे त्यापेक्षा ५-७ वर्शानी म्हाताराच दिसतो.कदाचित लग्नानतर त्याला इशा बदलुन रिफोर्म करते असा प्लॉट असेल पुढे... इशाचा मेकप मात्र नाही आवडला.
इथे आहेत बरीच मंडळी salt
इथे आहेत बरीच मंडळी salt-pepper हेअर वाली आणि डाय न करणारी.
भारतात (माझ्या आजूबाजूला तरी) सध्या अशी परिस्थिती आहे की पैसे आले, किती ते महत्त्वाचे नाही की मजा करा. त्यामुळे कोणाला आपण कसे दिसतो किंवा कसे छान दिसू मध्ये interest असेल तर मग पैसे घालतात.
appearance transformation plot असेल हे बरोबर वाटतंय.
ते तर आहेच प्राजक्ता. पण वरती
ते तर आहेच प्राजक्ता. पण वरती काही कमेंटी चाळीशी तला पुरुष म्हातारा/थेरडा आणि तो २० वर्षाच्या मुलीशी डेटींग करण कस चुकीच आहे हे लिहित आहेत. त्याच जरा आस्चर्य वाटल. आपल्या आई वडीलांच्या पीढितल्या बर्याच जोडप्यांमध्ये १५/१६ वर्षाचा फरक असलेलं पाहिलं आहे. त्यामुळ असं नाही आहे कि हे काही नवं आहे. प्रोग्रॅम फाल्तु आहे/असेल नावं ठेवण ठिक आहे. पण हे असले चीप/सवंग कमेंट वाचून एकदम आश्चर्य वाटल.
राजसी नाही नाही. मला त्यांन डाय करावा कि नाही ह्याबद्दल काही म्हणायचं नाही आहे. गेट अप असा ओढून ताणुन का दिला असेल अस वाटल. हिरोला आहे तस ठेवल असत तरी ते शोभून दिसल असत.
प्रियांका चोप्राच्या एंगेजमेंट वरचे व्हॉट्स अप मेसेज वाचून पण असाच वैताग आलेला. त्यात सर्वात वाईट गोष्ट म्हणजे बाया मोठ्या हिरारीनी जोक्स पुढे पाठवत होत्या. मोठ्या बाईने लहान मुलाशी लग्न केल्यावर ह्यांची लग्गेच संस्कृती बुडली. उलट केलं तर चालत ह्यांना.
भारतातल्या शाळेतल्या मैत्रिणींचे ग्रुप किंवा नातेवाईक बाया पण "चाळीशीची स्त्री आता कुरकुरणार्या गुडघ्यांना सहज अॅडजस्ट करते" असले फॉरवार्ड पाठवितात. फॉर गॉड सेक. चाळीशी आहे , पंचाहत्तरी नाही गुडघे कुरकुरायला. वैताग नुस्ता. मुळात हे व्हॉट्स अप बॅन केले पाहिजे. काम नाही धाम नाही फुकट आपल मत रेटत बसतात.
भाला उगाच पोक्त का दाखवतायत?
भाला उगाच पोक्त का दाखवतायत? तो आहे त्यापेक्षा ५-७ वर्शानी म्हाताराच दिसतो.कदाचित लग्नानतर त्याला इशा बदलुन रिफोर्म करते असा प्लॉट >> त्याचे काय आहे रिलेशन शिप मध्ये नसलेले एक्टे कामाच्या ओझ्याखाली दबलेले लोक्स असे च स्वतःच्या अपीअरन्स ची काळजी घेणे कमी करत करत बंदच करतात. कपडे धुतलेलेत ना. केस विंचरलेत ना चला. टाइप. त्यातला तो असेल. कोणी लक्ष देणारेच नाही तर कश्याला प्रयत्न करा असे असेल. एरवी छान कपडे घालतो तो. पांढरा फुल शर्ट व काळी कडक इस्त्रीची पँट शोभते अगदी. इथे चाळीत यायचे व ऑफ्सचे टेन्शन नाही म्हणून साध्याकपड्यात आहे काही दिवस. तिथे श्रीमंत माणासा सारखा आला असता तर नवरदेवाला अजूनच कांप्लेक्स ना.
मला आपण अमेरिकन असल्यान भारतातल कल्चर काय कळणार अ>> हे उगीचच आहे.
अमा... करेक्ट!
अमा...
करेक्ट!
आणि त्यातही तो जयदीप च्या वाढदिवसाला चेंज करुन आला तेव्हा फ्रेश पांढर्या सुट मधे कसला हँड्सम दिसत होता..... अगदी गोड!
ईशाचे क्लोज अप्स दाखविणे कमी करायला हवेय.
मला आपण अमेरिकन असल्यान भारतातल कल्चर काय कळणार अ>> हे उगीचच आहे....... >> हो ना.....
आणि त्यातही तो जयदीप च्या
आणि त्यातही तो जयदीप च्या वाढदिवसाला चेंज करुन आला तेव्हा फ्रेश पांढर्या सुट मधे कसला हँड्सम दिसत होता..... अगदी गोड!>>>> खरच .... गोड दिसत होता.....:)
आणि त्यातही तो जयदीप च्या
आणि त्यातही तो जयदीप च्या वाढदिवसाला चेंज करुन आला तेव्हा फ्रेश पांढर्या सुट मधे कसला हँड्सम दिसत होता..... अगदी गोड! >>>>>>> +++++++ १११११११११
मला आपण अमेरिकन असल्यान भारतातल कल्चर काय कळणार अ>> हे उगीचच आहे. >>>>> अगदी अगदी
सीमा च्या पुर्ण पोस्टीला अनुमोदन.
कोणीतरी जमलं तर मला सांगा ना
कोणीतरी जमलं तर मला सांगा ना काल काय झालं ? म्हणजे शनिवारी काय झालं ? मला जमलं नाहीये बघायला

जयदीप चा वाढदिवस होता का ? आणि सुभा यायला लागला का आता हापिसात ?लगेच ? इकडे लग्न मोडलं आणि हा लगेच हापिसात दाखल का ?
पण त्यामुळे आज मला २-२ भाग बघायला मिळणार
Pages