Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32
झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
त्या मायराने केले ते एखाद्या
त्या मायराने केले ते एखाद्या खर्या कंपनीत एखाद्या सिनीयर माणसाने केले - नवीन एम्प्लॉयीला तिला कसलीच पार्श्वभूमी दिलेली नसताना डीलर्स समोर प्रेझेण्टेशन करायला सांगणे - आणि कंपनीची इमेज खराब करणे - तर तिला ताबडतोब हाकलून देतील. +१
इशा खरंच चॅप्टर आहे. +१
ही इशा नक्की कोणाची असिस्टंट आहे? मायरा की विक्रांतची. आणि असिस्टंटचं काम नेमकं काय असतं? चहा देणं? शुगरच्या गोळ्या देणं?
थोडक्यात ईशा ऑल इन वन आहे. सगळ्यात ज्युनिअर असून भरपूर पगार, कुठलीही कामं न करता/ स्थान न बनवता सगळ्या फॅसिलिटीज, कुठलीही माहिती नसताना फालतू प्रेसेंटशन देऊन डीलर्सवर इम्प्रेशन, आणि चहा, गोळ्या देणं.
आता फक्त झेंडे करतो तशी बॉडिगार्ड सारखी काम केली की झालं.
ऑफिसमधून बाकी सगळ्यांना काढून टाका म्हणावं. फक्त हीच पुरेशी आहे की.
काल खूपच गोड दिसत होता सुबोध.
तिला लागल्यावर तर खूपच उच्च अभिनय केला फक्त डोळ्यांतून.
ती किती स्लो sssss आहे !
आणि किती थंड अभिनय.............. छे...!! सुबोध सोबत अॅट लिस्ट श्रुती मराठे तरी हवी होती...छान दिसतेय प्रोमोज मधून.
आता फक्त झेंडेची बॉडिगार्ड
आता फक्त झेंडेची बॉडिगार्ड सारखी काम केली की झालं. >>>
ईशा अन झेंडेची बॉडिगार्ड, विचारच सहन होत नाहीये
चहात साखर घालणे व तो ढवळणे
चहात साखर घालणे व तो ढवळणे ह्या साद्ध्या गोष्टीही किती मेंगळटासारखी करत होती ती ईशा.
आजचा आख्खा एपिसोड वि.
आजचा आख्खा एपिसोड वि. सरंजामेचा होता.
आंबटगोड श्रुती मराठे थोराड
आंबटगोड श्रुती मराठे थोराड दिसते . त्यांना लहान वय असलेली हवी होती ना कोणीतरी!
हो अनिश्का.... पण आता हिच्या
हो अनिश्का....
पण आता हिच्या पेक्षा कुणीही बरी असं वाटू लागलंय...

व्ही बी...झेंडेंची बॉडी गार्ड नाही...झेंडे जसे विक्रांत चे बॉडी गार्ड आहेत तशी...असे म्हणायचेय..
खरंय...कालचा पूर्ण एपिसोड
खरंय...कालचा पूर्ण एपिसोड सुबोध भावे ने खाल्लाय.... कसला चिडला होता तो.... झेंडे बरोबर म्हणाला चिडचिड मे दर्द.>>
अगदी अगदी !आत्तापर्यंत कालचा भाग सगळ्यात बेश्ट वाटला मला .. कारण ५ एक मिनिट्स सोडले तर संपूर्ण वेळ सुभा चं कसलेलं ऍक्टिंग दिसत होतं
इशा ला स्कुटर वर बघून झालेली चिडचिड, खदखद आणि थोडंसं पझेसिव्हनेस एकदम छान दाखवला त्याने ..
इशा मला वाटतं मुद्दामून अशी शांत दाखवली काल .. ज्यामुळे सुभा ची अजून चिडचिड होत होती .. ती त्याला जळवत असावी ..
पण नंतर चॅप्टरपणा केलाच हाताला काच लागल्यावर हळूच खुश झाली त्यानं हातात हात घेतल्यावर ..
तेव्हा पण सुभा ने काय ऍक्टिंग केलेय शप्पथ .. चिडचिडेपणा सोडून एकदम काळजी आणि उगाच चिडलो याचं वाईट वाटल्यासारखं .. बेस्ट एक्दम
त्या इशा ने ३ क्युब्स घातलेले
त्या इशा ने ३ क्युब्स घातलेले बघून मलाच कसंतरी झालं .. म्हंटलं आता हि सुभा थांब म्हणेपर्यंत सगळे घालतेय कि काय !?
पण काळ एवढं सगळं होऊन इशा अजीबात रडली नाही ..म्हणून मला असं वाटलं कि तिला हा का चिडलाय ते कळलं असावं .. आणि मुद्दामून ती त्याला जळवत असावी
इशाचा आवाज राणी मुखर्जी सारखा
इशाचा आवाज राणी मुखर्जी सारखा आहे, कुछ कुछ होता ... मध्ये वेगळाच वाटलेला मग सवय झाली.
हो...ई चा आवाज घोगरा आहे...
हो...ई चा आवाज घोगरा आहे... आणि चिरका पण...
व्ही बी...झेंडेंची बॉडी गार्ड
व्ही बी...झेंडेंची बॉडी गार्ड नाही...झेंडे जसे विक्रांत चे बॉडी गार्ड आहेत तशी...असे म्हणायचेय.. >>> ओह्ह
त्यांची आधीची वाक्यरचना वेगळी होती त्यामुळे तसे वाटले असेल. पण त्यामुळे हसुन वाट लागली माझी, अगदी द्रुष्य उभे राहीले डोळ्यासमोर माझ्या, त्या ईतक्या मोठ्या झेंड्याची ईवलीशी बॉडिगार्ड
हो...ई चा आवाज घोगरा आहे...
हो...ई चा आवाज घोगरा आहे... आणि चिरका पण... >> घोगरा एकवेळ ठिके, पण तो चिरका आवाज डोक्यात जातो
काय पाहिले सुभाने हिच्यात काय माहीत, कितीतरी क्युट अन चांगली अॅक्टींग येणार्या मुली संधी मिळविण्यासाठी प्रयत्न करतात, द्यायची होती न त्यांच्यातील एकिला संधी
कोणी ऑब्जर्व्ह केले का?
कोणी ऑब्जर्व्ह केले का? माफीपत्रात तो मायना सांगतो, प्रिय ईशाचे आईबाबा आणि ईशा....नंतर ती आईबाबांना वाचून दाखवते तेव्हा प्रिय आईबाबा आणि इशा असं असतं किंवा ती तसं वाचते.
त्या ई बाळाचे जयदीप सोबत
त्या ई बाळाचे जयदीप सोबत लावून द्या म्हणावं लग्न.... तो कोणीतरी हापिसातला म्हणतो ना जयदीप कोणाचाच ऐकत नाही पण हीच मात्र (??)... मग आपलं चालू चिरकं ई बाळ स्टोर्या सांगून त्याला ताब्यात ठेवू शकेल.... आणि चालू चिरक्या ई बाळाला पण श्रीमंत घरात येता येईल.. म्हणजे ती खुश... तिकडे तिच्या डोळे मोठे करणाऱ्या आईची आणि लाचारपणे माना डोलावणार्या बाबांची पण इच्छा पूर्ण.. इकडे मायरा मॅम आणि झेंडे खुश ही ई रडी ब्याद टळली आणि वर जयदीप ला शांत करणारं कोणीतरी मिळालं म्हणून... मग सु भा च्या महान नाटकी आई साहेब पण खूष हळूबाई ना बघून.... आणि चालू चिरकं ई बाळ परत तिथे ही आपल्या लाडक्या सु भा वर लाइन मारेल ....
पण जाऊ दे ना....एका दगडात बरेच पक्षी मरजायेंगे ना बाबू...
त्या ई बाळाचे जयदीप सोबत
त्या ई बाळाचे जयदीप सोबत लावून द्या म्हणावं लग्न.... >> ओ नटुकाकी मग साॅनियाचं काय?? की इथेही माझ्या नवऱ्याची बायको करायचंय.
मेधावी..हो मी ऑब्झर्व्ह केलं
मेधावी..हो मी ऑब्झर्व्ह केलं ते!

पण पत्र तिचे बाबा वाचत होते बहुतेक.
आणि सुबोध तिच्या घराच्या खाली आलेला का काल? मला ते समजलं नाही नीट..... पेट्रोल सांडतं सुभाच्या गाडीतून....लीकेजे?
काहीही दाखवितात.........................!
ती मायराची अजून एक कलीग छान आहे. साडीवाली नाही, दुसरी.
आणि बिपीन मस्त.
सुभा ला बघुन मला काल एकदम
सुभा ला बघुन मला काल एकदम "नंदा प्रधान" आठवला.
पण ईशा काही "इंदु वेलणकर" वाटली नाही
सुबोध तिच्या घराच्या खाली
सुबोध तिच्या घराच्या खाली आलेला का काल? >> खेचला जातोय. मनाविरुद्ध. जिकडे तिकडे ईशा दिसतिये. प्रेमात पडलाय पण व्यक्त करता येत नाहीये व तगमग होतीये. छान दाखवलं त्यानं.
का? माफीपत्रात तो मायना
का? माफीपत्रात तो मायना सांगतो, प्रिय ईशाचे आईबाबा आणि ईशा....नंतर ती आईबाबांना वाचून दाखवते तेव्हा प्रिय आईबाबा आणि इशा असं असतं किंवा ती तसं वाचते. --- ho ho
इथले प्रतिसाद वाचून कालच्या
इथले प्रतिसाद वाचून कालच्या एपिसोडचा ६:०० वाजताचा रिपीट बघायचा ठरवला आहे, फक्त सु.भा.साठी !!
या पूर्वी तो मला एवढा कधीच
या पूर्वी तो मला एवढा कधीच आवडला न्हवता.. आणि आता तर ... Blush असो...त्या हिरविणीचे अभिनय दारिद्र्य अजूनच उठून दिसत होतं पण या मुळे....>>>+१
पहिले एपिसोड्स पाहिले तर
पहिले एपिसोड्स पाहिले तर त्यात सुभाचे वय कमी वाटते. पन्नासाव्या एपिसोडापर्यंत त्याचं वय आणि पांढरा कलप वाढवलाय.
कालचा पूर्ण एपिसोड सुबोध भावे
कालचा पूर्ण एपिसोड सुबोध भावे ने खाल्लाय.... >>>>>>>>>> अगदी अगदी
झेंडे बरोबर म्हणाला चिडचिड मे दर्द. >>>>> मायराला ते दिसल नव्हत. हिने कधी कुणावर प्रेम केल नसेल.
ती त्याला जळवत असावी .. >>>>> हि महाचॅप्टर इशा रोज एक नवीन प्रेमाचा फन्डा शिकवतेय. पहिला दिवस- तुमच्या भावी पार्टनरकडे - मुद्दामहून दुर्लक्ष करा . दुसरा दिवस- त्याला जळवा. शेवटच्या दिवशी तो तुम्हाला प्रपोज करायला येईलच. इशाकडे तरुण मुला-मुलीन्नी प्रेमाचे क्लासेस लावायला हरकत नाही.
इशा मला वाटतं मुद्दामून अशी शांत दाखवली काल .. ज्यामुळे सुभा ची अजून चिडचिड होत होती .. ती त्याला जळवत असावी . >>>> हो, पण चेहर्यावर तसे एक्स्प्रेशन तरी असावेत ना. पुर्ण एपिसोडमध्ये हिचा एक्स्प्रेशनलेस चेहरा.
सुभाला रागात बघताना सुद्दा तिला मनातून वाटायला हव ना की, कस फसवल आपण बच्चमजीन्ना ( सुभाला). तर तेही नाही. बिपिनला बघतेवेळी तिला जळवण्याची आयडिया सुचते तेव्हाही तिचा चेहरा थन्डच!
बादवे, तो बिपिन खरच चान्गला मुलगा आहे. स्वतःहून मैत्री करायला आला हिच्याशी. हिच विकीवर प्रेम आहे ते त्याला कळलय. पण त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. हिने बिपिनशीच लग्न करायला हव होत. बिच्चारा!
>>बिपिनला बघतेवेळी तिला
>>बिपिनला बघतेवेळी तिला जळवण्याची आयडिया सुचते तेव्हाही तिचा चेहरा थन्डच!>>> हे असं होतं होय...मला तिच्या मख्ख चेहऱ्याकडे बघून काहीच टोटल लागली नाही.... आणि हो ना...भोळा भाबडा बिपीन...पण जाऊ दे...सुटला बिचारा हिच्या तावडीतून... टिल्लूंंना माहीत नाही ई बाळकाची स्वप्न किती मोठ्ठी आहेत ते...
इशापेक्षा तिच्या आईलाच सुभा
इशापेक्षा तिच्या आईलाच सुभा आवडला वाटत. 'मला विक्रान्त सरान्चा विचार सारखा मनात येतोय' अस काहीतरी बडबडत असते.
ति ईशा सुद्दा आईला 'तुझे विक्रान्त सर' अस म्हणत असते. 
सुबोध तिच्या घराच्या खाली आलेला का काल? >> खेचला जातोय. मनाविरुद्ध. जिकडे तिकडे ईशा दिसतिये. प्रेमात पडलाय पण व्यक्त करता येत नाहीये व तगमग होतीये. छान दाखवलं त्यानं. >>>> काल त्याच्या गाडीत गाण लावलेल, 'तेरा मुझसे है पहले का नाता ( शितु) कोई'
तो चहाचा कप किती अस्वच्छ् होता.
सुलू - आयडिया वाईट नाहीये. पण
सुलू - आयडिया वाईट नाहीये. पण घरी साड्या पडून असलेले लोक त्याच साड्या रिवर्क करायला घेउन येतील ना? अशाने त्या डीलर्स चा सेल कसा वाढणार >>>> अरे हो, ते तर आहेच.
हे असं होतं होय...मला तिच्या मख्ख चेहऱ्याकडे बघून काहीच टोटल लागली नाही.... आणि हो ना...भोळा भाबडा बिपीन...पण जाऊ दे...सुटला बिचारा हिच्या तावडीतून... टिल्लूंंना माहीत नाही ई बाळकाची स्वप्न किती मोठ्ठी आहेत ते... >>>>>>> ++++++१११११११
कलर्स वर "मन हे बावरे" नावाची
कलर्स वर "मन हे बावरे" नावाची मालिका सुरु झालिये, त्यात "तुपारे" मधलच ऑफिस आहे. >>> !!!
हे सही आहे
त्या हिरविणीचे अभिनय दारिद्र्य अजूनच उठून दिसत होतं पण या मुळे >>>
आता फक्त झेंडे करतो तशी बॉडिगार्ड सारखी काम केली की झालं. >>>
चहात साखर घालणे व तो ढवळणे ह्या साद्ध्या गोष्टीही किती मेंगळटासारखी करत होती ती ईशा. >>>
म्हंटलं आता हि सुभा थांब म्हणेपर्यंत सगळे घालतेय कि काय !? >>>
की इथेही माझ्या नवऱ्याची बायको करायचंय >>>
पण ईशा काही "इंदु वेलणकर" वाटली नाही >>>>
'मला विक्रान्त सरान्चा विचार सारखा मनात येतोय' अस काहीतरी बडबडत असते >>>
धमाल उडवलीत तुम्ही आज
इथले प्रतिसाद वाचून कालच्या एपिसोडचा ६:०० वाजताचा रिपीट बघायचा ठरवला आहे, >>> हो. सर्वांनी जबाबदारी उचलायलाच हवी
"मन हे बावरे" नावाची मालिका
"मन हे बावरे" नावाची मालिका सुरु झालिये,>>> मृणाल किती (नेहमीसारखी) गुळमुळीत दाखविली आहे! या मालिकेत तर फक्त रडायच्या ऐवजी हसताना दिसते एव्हढाच काय तो बदल. कितीही बोलले तरी ती हसतच असते...ते बघून तर कोणालाही जास्तच राग येईल. ऑलरेडी एक सासू तिला छळते आहे, त्यात नव्या सासूची (वं गुप्तेची) भर पडेल...नेहमीचीच रडारड-सासूरवास असणार आहे.
प्रेझेन्टेशन म्हणजे काय असतं
प्रेझेन्टेशन म्हणजे काय असतं ओ! एखादी mpsc exam असावंसं वाटतंय। ते एकदा दाखवलं कि झालं। पुढे ऑर्डर पूर्ण केली नाही तरी चालतंय वाटतं!!त्या ई म्याडम ना पाठवा म्हणे तो येडा डीलर!! अरे काय चाललंय काय। ती ई कशी उद्धट बोलते सुभा ला घरचा नोकर असल्या सारखी। ई ने मायरा चे पैसे खाल्ले तरी ती काहीही बोलत नाहीये हे कस्काय!! मायरा ला कारखानीस आडनाव शोभत नाही। कहर म्हणजे इ बाळाला घेऊन जाऊ का हे अगदी तुमच्या बाळाला फिरवून आणू का असं वाटलं
असल्या भंपंक शिरेल पण लोक आवडीने बघतात तेव्हा खरंच चीड येते।
Pages