तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

इशा त्याला जळवायला जाणूनबुजून बिपिनच्या मागे बसून ऑफिसला आली असं काही मला वाटलं नाही.》 तोच तर USP आहे तिचा. मख्ख निरागस चेहरा ठेवून जमवते सगळं. आमच्या बिच्चार्या सुभाला मात्र अॅक्टींग बिक्टींग करून डोळ्यातून वगैरे पण बोलावं लागतं.

ती मायरा सारखी ईशाच्या टेबलपाशी जाऊन का झापत असते तिला?
ए.व्ही.पी. आहे ना ती? तिनं ईशाला `केबिनमध्ये ये' अशी ऑर्डर सोडली पाहिजे ना? आणि मग झापायला हवं ना? की ज्युनिअर एम्प्लॉयीजना झापायचं असेल तेव्हा असं चार-चौघांसमोरच जाऊन झापतात? मग तुम्ही ए.व्ही.पी. असा किंवा कुणीही असा... Proud

आणि तो सीन फुल्ल `उद्या कुठला पेपर आहे? ...... इतिहास..... अभ्यास झाला का? ...... व्हर्सॉयच्या तहाची कलमं सांग ..... प्लासीची लढाई कुठे झाली? ......... टिपू सुलतान कोण होता?' या लायनीवरचा होता. Biggrin

परांजपे बाहेर येईपर्यंत ईशा नुसती 'आता काय करावं?... काय करावं?' अशा पोजेस देत बसली होती. काही नाही तर किमान गूगल तरी करायचं, राजनंदिनी साड्यांबद्दल माहिती मिळाली असती की Uhoh

आणि तिच्या मागे बसलेला तो आणखी एक एम्प्लॉयी.... त्याच्यासमोर विंडोज-१०च्या स्टार्ट बटनावर क्लिक केल्यावर जो स्क्रीन येतो तो होता; आणि तो कीबोर्डावर काहीतरी टाईप करण्याचा, मग स्क्रीनकडे बघण्याचा आणि कागदावर काहीतरी लिहून घेण्याचा काम-अभिनय करत होता Biggrin किमान एखादं एक्सेल शीट तरी ओपन असलेलं दाखवायचं.... बहुदा राजनंदिनी साड्यांच्या नेक्स्ट लॉटमध्ये साड्यांवर त्या स्क्रीनचं प्रिंट घ्यावं का विचार करत असेल.

राजनंदिनी साडीच्या माहीतीसाठी विसं ला भेटणे म्हणजे नॅनोची माहीती घ्यायला रतन टाटांना भेटण्यासारखं आहे.

विसंशी फारच उर्मटासारखी वागते बरं का तुमची ती इशा...एरवी तिला कुत्र्यालादेखील हाड म्हणण्याची ताकद नसते.

Lol
तिने हाड म्हटले तरी ते कुत्रं पण जागचं हलणार नाही. मग बयो रडत रडत आपणहूनच बाजूला होईल.

काही हजार कोटींचा टर्नओवर असणा-या कंपनिची वेबसाईट असेल ना. तो परांजपेही काय वेड्यासारखा म्हणे विसंकडे जा. मुलाखतीला जायच्या आधी वेबसाईट नीट बघून जातात, मुलाखत नाही झाली तर निदान नोकरी मिळाल्यावर बघेल की आपल्याला कुठे नोकरी लागली आहे, तिथे काय काम चालतं. सरळ सांगते माहित नाही आणि मायरा सगळ्यांसमोर तिचा अपमान करू शकत नाही. पण ईबाळाला माहित आहे की विसं तिच्या खिशात आहे मग ये मायरा क्या चीज हे बाबू! सूतसमेत सगळा अपमान वसूल करेल ईबाळ.
ललिता किती बारकाईने बघता _/\_

मिहीरला विसं रिपोर्ट मागतो...जो "ऑलमोस्ट" रेडी आहे समजल्यावर विसं सणकतो....तेव्हा मायरा मधे पडते व "रिपोर्ट" च्या जागी चुकून सवयीने प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन म्हणायला लागते...मग मिहीर आणि विसं पण बहुतेक विसरून जातात की रिपोर्ट हवा होता आणि तेही प्रेझेंटेशन ह्या शब्दावर माना डोलवायला लागतात. Happy

परांजपे बाहेर येईपर्यंत ईशा नुसती 'आता काय करावं?... काय करावं?' अशा पोजेस देत बसली होती. काही नाही तर किमान गूगल तरी करायचं, राजनंदिनी साड्यांबद्दल माहिती मिळाली असती की >>>>>>>> अगदी अगदी...
त्या अगोदर ती मायरा आली तेव्हाही ती काही न करत नुसती बोटाकडे कौतुकाने बघत बसली होती.तिचा डेस्कही किती टिपटाप होता. मायरा खवळली त्यात काही चुकीचे वाटले नाही. जरा म्हणून smartness नाही या मुलीत. आणि या कामाचे 35k मिळतात ?????? मग आपलं रडगाणं राहूदे ,मायराचा पगार किती असेल ???
विसं असा कसा तिला direct त्या लोकांबरोबर पाठवू शकतो ??? आणि ही लोक असे फटाफट निर्णय घेऊन मोकळे होतात. आमच्या कडे एक मुद्दा मांडला improvement साठी तर PMO , 4 meetings schedule करतो discuss करायला.

इशाने शेवटच्या सिनमध्ये चॅप्टरगिरी दाखवलीच. हिने चक्क खुनशी स्माईल दिली सुभाला आणि म्हणते कशी, " थॅन्कस, हि Opportunity मला दिल्याबद्दल."

एरवी ऑफिसमध्ये निरागसतेचा आव आणते. हेच खुनशी स्माईल मायराला दे म्हणाव.

इबाळ आपल्याच आईवर जिलियस झालीय सुभावरुन. 'सरान्ना डबा दे' म्हटल तर चक्क नाही म्हणाली पोट्टी!

आता ४ दिवस इबाळ दिसणार नाही म्हणून चेहरा पडला विसचा.....खरेच छान अभिनय करतो सुभा.
पण तुपारेचा गाडा किती दिवस एकटा ओढणार? इबाळाने अभिनयावर मेहनत घ्यायला हवी...सतत 'मी काय केलं?' करत रडका चेहरा आणि आपण काहीतरी भारी सांगतोय या भावात हाताचा चंबू करुन तो इथे तिथे ठेवत बोलणे बंद करावे.

जेव्हा ईबाळ ला काच लागला तेवा सुभा चा अभिनय खुपचं छान होता..अगदी डोळ्यात अभिनय असतो सुभाच्या..परत त्यांच्या जीवाची होणारी तगमग प्रेमात केलेला त्याग सगळ खूप चांगल्याप्रकारे दाखवलाय सुभाने त्याच्या अभिनयातून..त्या तुलनेत ईबाळाचा अभिनय फारच कमजोर

पण तुपारेचा गाडा किती दिवस एकटा ओढणार? >>> Lol
तेलाचे डबे हातात अन खांद्यावर आणले आता तुपाचा डबा डोक्यावर घेऊन सायकलवर बसून आणणार Lol

इशा जेव्हा विकी वर रागावते तेव्हा सेन्सिबल वागते आणि नीट काम करते. जशी शनिवारी वागली तशी.

ती इशाची आई का सारखी सारखी सुभा आणि इशाच्या मागे लागलीय? Uhoh Angry

आज घरी जाताना आईबाबा स्कुटरवरून आणि काका कारीतून गेले. ईशा एकटीच चालत गेली का काय? Happy
आजचे संवाद पण अगाध होते. गोल गोल घुमवून कायतरी जार्गन टाकत होते.

घेतली असेल, किंवा मुळात असे स्पष्टीकरण कोणत्याच भागात मिळत नाही. टॉम अ‍ॅण्ड जेरी मधे जशी त्यांना पाहिजे तेव्हा मिळेल ती आयुधे, घरगुती/किचन मधल्या गोष्टी बाजूलाच पडलेल्या असतात, तसे असावे Happy

टॉम अ‍ॅण्ड जेरी मधे जशी त्यांना पाहिजे तेव्हा मिळेल ती आयुधे, घरगुती/किचन मधल्या गोष्टी बाजूलाच पडलेल्या असतात, तसे असावे >> Lol

स्कुटर उधारी घेतली त्यांनी

आजचे सुभाचे संवाद मला काही कळलेच नाही, त्यात तो तिखट पावभाजी खाताना खूप विचित्र दिसत होता

स्कुटर चाळीतल्या मुलाकडुन संध्याकाळपुरती घेतल्याचं दाखवलं की.
ईशा आईला चाळीत फक्त रुपालीच्या आईचच घर आहे का निरोप ठेवायला.ते ईतका अपमान करतात, ईशाशी लग्नाचं खरं कारण कळलं तरी त्यांच्याशीच बोलायला जायचं? दुसर्याा घरी निरोप ठेवायचा नाही.

ईशा आईला चाळीत फक्त रुपालीच्या आईचच घर आहे का निरोप ठेवायला >> तसेच दिसते Happy

आणि तेथे किती अंतरावरून एकमेकांना ऐकू जाते याचे निकष दर एपिसोडला बदलतात. कधी बाजूला उभे राहून बोललेले ऐकू जात नाही, तर कधी बाहेर कॉरिडॉर मधे बोललेलेही ऐकू जाते.

बाकी पेरिफेरल व्हिजन वापरायची नाही हा नियम झी च्या सर्व सिरीज पाळतात. मानबामधेही पाहिले आहे.

ईशा तर ऑफिसमधे पण नेहमी उशीराच येताना दिसते. बाकीचे सगळे तिच्याआधी हजर अस्तात नेहमी.

भातुकलीमधले ऑफिस आणि प्रेझेंटेशन्स, मिटींगा वाटतात यांच्या Proud

वा वा प्रेझेण्टेशन च्या उपसंहारानंतर पुढच्या एपिसोड मधे आता डीलर्स बरोबर मीटिंग ठरली आहे आणि "ईशा मॅडम असतील तरच" ती कन्फर्म आहे. अब आयेगा मजा खेलका.

बोअर होती मीटिंग. अ‍ॅक्शन प्लॅन मीटिंग मधे फक्त ब्रेनस्टॉर्मिंग झाले. एक कूपन द्यायचे आणि कधीही ते ऑनर करायचे. बास्स! बाकी काही विचारायची गरजच नाही.

पण किमान मागच्या वेळसारखी ही टोटली बिनडोक आयडिया नव्हती.

आणि ईशा सरांवर चिडते तेव्हा जरा अ‍ॅक्टिंग बिक्टिंगही करते.

Pages