Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32
झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
निमकर काय लंच टाईम ते ५.३०
निमकर काय लंच टाईम ते ५.३० पर्यंत थांबले का?
>> हो. इशा निघताना तिच्या आईला म्हणते ना की आपण ४ तास थांबलो, आता ते नाही येणार.
खरंतर आपल्यासारख्या लोकांची जेवणाची वेळ जास्तीत जास्त २.३०/३ पर्यंत असते. निमकर कुटुंब खास असल्यामुळे ते संध्याकाळी ५ पर्यंत वाट बघत बसतात आणि वर जेवण न करता त्या रेस्टॉरंटमधून बाहेर पडतात.
हवा येऊ द्या मधे या सिरीअलचा
हवा येऊ द्या मधे या सिरीअलचा स्पूफ होता >>> तुला पाहतेच रे.....
सुभाचं लग्न झालंय का? >>>> हो झालय....मंज़िरी भावे या पुष्पक विमान च्या प्रोडूसर होत्या......(एका सीन मध्ये पण होत्या)
तो जयदीपच्या वादिचा बिनडोक
तो जयदीपच्या वादिचा बिनडोक एपिसोड का बघितला आणि २०-२५ मिनीटे वाया का घालवली? सिरीज्/चित्रपट एकतर "it's good" कॅटेगरीत असावेत, नाहीतर "it's so bad, it's good" कॅटेगरीत तरी. हा दोन्हीत नसलेला सर्वांचा वेळ वाया घालवणारा भाग होता. टोटल बिनडोक. आणि त्यावर कडी म्हणजे शेवटचा तो ईशा आणि रूपालीचा संवाद. त्यातील बिनडोकपणाची तुलना "I L U" म्हणजे आय लव्ह यू हे न कळणार्या मनीषा कोईरालाशीच होउ शकते. काय ते माझा तुमच्यावर विश्वास आहे, तुमचा माझ्यावर विश्वास आहे. मग ते काय उत्तर देतील? मला माहीत आहे ते काय उत्तर देतील. ते नक्कीच हो म्हणतील. खरंच ते हो म्हणतील का? - आणि काय काय. अरे किती पाणी घालाल? पाणी घालायला मुळात ग्रेव्ही असायला हवी तीही नाही इथे.
टोटल
बाय द वे, वरच्या चर्चेवरून १.
बाय द वे, वरच्या चर्चेवरून १. एक फॅमिली लंच आणि २. कंपनी मीटिंग. यातील गोंधळ हा दोन एपिसोड चालणार. वाट पाहणार्या प्रत्येकाचा चेहरा स्वतंत्रपणे स्क्रीन वर दाखवणार. दोन गोष्टी एकाच वेळेस आल्या तर यातील एका पार्टीला सांगून वेळेत बदल करता येणे वगैरे बेसिक सुविधांचा अभाव. फोन, मेल, मेसेजेस सारख्या नवीन, व कॉमन सेन्स सारख्या जुन्या गोष्टींचा अभाव, यातून अडखळत ही सिरीज पुढे जाणार असे दिसते
बाय द वे, कंपनीच्या सिनीयर लोकांकडून मी कधी "जनरल बॉडी मीटिंग" ऐकले नाही. वरती कोणीतरी लिहीलेलेच आहे. जनरल बॉडी ही सहसा सोसायटी ई. ची असते. इथे या मीटिंग बद्दल बेडेकर सदन मधल्या नागरिकांकरता सुलभ जोडाक्षरविरहीत वर्णन करायचे असते त्या मीटिंग चे तर ठीक होते
मायरा आणि झेंडे मधल्या चर्चेत ते चुकीचे आहे.
झेंडेही म्हणतो सर येतील. तुम्ही मीटिंग "लावा"!!! पण तरी म्हंटले जाउदे "त्यांच्या गावाकडं" तसं म्हणत असतील.
या सर्व चर्चेत नक्की कोणता इव्हेण्ट किती वाजता आहे आणि कोणी कोठे असायला हवे आहे याची कोठेही चर्चा नाही. हे ही "मुहूर्त पुढच्या आठवड्यात" लॉजिकच दिसते. "स्किड्युलिंग" कोण करत आहे माहीत नाही
पण वरचा संवाद पाहता अजून मीटिंग "लागलेलीच" नाही. तिकडे जेवणाचे प्रॉमिस गेले आहे. पण ते "तत्त्वत:" मान्य झाले होते. कोणत्या वेळी, कोठे वगैरे काहीतरी मेसेजेस होतीलच ना मधल्या काळात? तेव्हा सांगता नाही का येउ शकत? का "उद्या जेवायला" म्हणजे निमकर लोक सकाळी ११ पासून तेथून हाकलेपर्यंत तेथेच बसणार?
बायकोचं नाव मंजिरी आणि
बायकोचं नाव मंजिरी आणि त्यांना दोन मुलगे आहेत बहुतेक.>>>>>
बहुतेक नाही खरंच दोन मुलगे
बहुतेक नाही खरंच दोन मुलगे आहेत, कान्हा आणि मल्हार. मल्हार ऊबंटू पिक्चरमध्ये होता पुष्कर श्रोत्रीबरोबर.
त्यांची लव्हस्टोरी क्युट आहे,
त्यांची लव्हस्टोरी क्युट आहे, तिची फॅमिली कॅनडात शिफ्ट झाली पुण्याहून, तरी प्रेम टिकून राहिले पत्ररूपाने मग लग्न . तिच्या माहेरचे कॅनडातच आहेत, एका मुलाखतीत ही स्टोरी सांगितली दोघांनी, ती बघितली किंवा वाचलं कुठेतरी. आठवत नाही आता नक्की.
कॉमन सेन्स सारख्या जुन्या
कॉमन सेन्स सारख्या जुन्या गोष्टींचा अभाव >>
"मुहूर्त पुढच्या आठवड्यात" लॉजिक >>
इतक्या वर्षांनी नियमित (टुकार) सिरीअल बघत आहे. त्यात फारएण्डचे मस्तं कमेंट्स. सार्थकी लागतोय वेळ.

आज वि.सं. ने गोष्ट सांगितली
आज वि.सं. ने गोष्ट सांगितली झेंडेला.. ईशाबेबी ईफेक्ट...
१०००.....
१०००.....
चला हवा येऊ द्या मधले स्पूफ
चला हवा येऊ द्या मधले स्पूफ ओरिजनल पेक्षा लै भारी!! =))
त्यांची लव्हस्टोरी क्युट आहे,
त्यांची लव्हस्टोरी क्युट आहे, तिची फॅमिली कॅनडात शिफ्ट झाली पुण्याहून, तरी प्रेम टिकून राहिले पत्ररूपाने मग लग्न . तिच्या माहेरचे कॅनडातच आहेत>>हो. मी पण ऐकले आहे सुभाच्या शाळेतल्या मित्राकडून
चला हवा येऊ द्या मधले स्पूफ
चला हवा येऊ द्या मधले स्पूफ ओरिजनल पेक्षा लै भारी!! =))>>+१११
निमकर लोक खरेच हाकलून
निमकर लोक खरेच हाकलून देइपर्यंत बसले होते. त्यांनी तेथे न खाता वाट पाहणे बरोबर होते, कारण सरंजामेचा फोन किंवा मेसेज येत नव्हता. पण इतके तेथे शरमिंदा व्हायचे काय कारण आहे. त्यांनी काही तेथे फुकटात खाल्लेले नव्हते. आणि तो हॉटेल वाला बळंच काय ओरडतो.
ती जनरल बॉडी मीटिंग काय वर्णावी? त्या रूमवजा ऑफिसातच नेहमी टंगळमंगळ करत असलेलेच लोक त्य मीटिंग मधे बसलेले होते. मला वाटले कंपनीच्या बोर्ड वर असलेले कोणी येणार आहेत
या लोकांना अरे जरा दोन तास नंतर भेटू सांगणे इतके का जड असावे हे आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना समजणार नाही, तसेच जर त्या मीटिंग मधेच बसायचे आहे, तर निमकरांना सॉरी आज जमणार नाही सांगून मोकळे का करता येणार नाही, हे ही.
बाकी मीटिंग मधे फायनान्स, सेल्स आणि मार्केटिंग हे कीवर्ड उच्चारून झाले. त्यानंतर आता काय "म्याटर" बोलावे हे कोणालाच सुचले नसावे. त्यामुळे पूर्वीच्या मराठी बातम्यांतील क्लिप्स प्रमाणे आवाजविरहित क्लिप्स होत्या पुढे
ते हॉटेल असो, की कंपनीची मीटिंग. त्यात सामील होणारे आयुष्यात पहिल्यांदाच या प्रसंगाला तोंड देत आहेत अशा तर्हेने वागत होते सगळे.
भले भले सिनेमे शांत डोक्याने
भले भले सिनेमे शांत डोक्याने आणि लक्षपूर्वक पाहून नंतर माबोकरांना त्या सिनेमाच्या स्पेशल रिव्ह्यूची मेजवानी देऊ करणार्या फारएण्डचीही अखेर या मालिकेमुळे चिडचिड झालीच...

सिरीयसली एकतर सिरीज चांगली
सिरीयसली
एकतर सिरीज चांगली तरी असावी, नाहीतर रॅण्डम वेळी आणि रॅण्डम ठिकाणी कंदील लावून मसाला निर्माण करावा. हे २-३ एपिसोड्स काहीच करत नाहीत 
फारेंड लोल. अरे सगळ्याच
फारेंड लोल. अरे सगळ्याच झीच्या मराठी कार्यक्रमात मीटींगा तशाच असतात अस नोटीस केलयं मी. समोर बिसलरीच्या बाटल्या. चीप सुट्स, चेहर्यावर गोंधळलेले (पहिल्यांदा सुट घातलेला असावा असे ) भाव . आणि कंपनी डायरेक्टरची ढॅण ढॅण म्युझिक वाजवीत एंट्री. बाकी लोक नुस्त मग माना हलवितात किंवा एकमेकांकडे वेगवेगळ्या अँगल ने बघतात. आणि हातात अजुनही ते रिकामे फाईल फोल्डर्स. कुणाकडेही लॅपटॉप किंवा नोट पॅड (अगदी कागदाचे सुद्धा) नसावे ?
मला वेड लागायची पाळी आलेये हे कार्यक्रम बघून. :ROFL: पण जबरी मज्जा आहे.
2 रु चा डायलाॅग जसा त्यांचा
2 रु चा डायलाॅग जसा त्यांचा त्यांनाच फार आवडलाय तशीच कालची ती इशाची जुन्या ड्रेसचा नवा ड्रेस करुयावाली आयड्या आहे. ती कल्पनाही तिला पोळीच्या लाडवावरून सुचली असं दाखवलंय. तर मुळात ही सिरीअलच एक मोठा पोळीचा लाडू आहे व बर्याच शिळ्या सिरीअल्स कुस्करून बनवला आहे हेही किती चतुराईनं सांगितलंय बघा.
प्लेझेंटेशन आलं बरंका कालपासून. प्रेझेंटेशन म्हणजे समोर बसलेल्यांसमोर काहीही फालतू बोलणे व नंतर भारावल्यासारखे सगळ्यांनी एकमेकांकडे पहाणे असा असेल असं वाटतंय.
सुभा तर काल कृतकृत्य झाल्यागत पहात होता इशाकडे.
इशा आणि मिटींगला उपस्थित लोकांमधे काल अभिनयाची जबरी चुरस होती. तू भारी का मी भारी असं एकेका वाक्यागणीक होत होतं.
सुभा मात्र गोड दिसतो. त्याच्यासाठी बघाविशी वाटते मालिका.
सुभा मात्र गोड दिसतो.
सुभा मात्र गोड दिसतो. त्याच्यासाठी बघाविशी वाटते मालिका.>>>>>>> खरोखर... त्याच्यासाठी च
बर्याच शिळ्या सिरीअल्स
बर्याच शिळ्या सिरीअल्स कुस्करून बनवला आहे हेही किती चतुराईनं सांगितलंय बघा. >>
केड्याकडुन अजुन काय अपेक्षा असणार आहेत, मानबामधे तर भयाण फिलर प्रसन्ग असतात.
इशाला काहीही काम न करता प्रेझेन्टेशन??मलाच दया आली आणी वाटल आता इशा रडणारच काय परत... पण साड्याचे ड्रेस करायची कूणाणाल्लाच न सुचलेली एक्दम अभिनव कल्पना देवुन इशाने सगळ्याला गारदच करुन टाकले की आता विजामे तिला डायरेक्ट राजनदिनी साडि कपनिचा डायरेक्टरच करेल मग इशाचा पगार ३५ हजारावरुन ३५ लाखावर वैगरे..मज्जाच मज्जा!
काही वर्षांपूर्वी मी व मुलगी
काही वर्षांपूर्वी मी व मुलगी रेल्वेनी मुंबईला जात होतो. सेकंड क्लासमधून. शेजारच्या काकूंशी ओळख व खूप गप्पा झाल्या. प्रवास कधी संपला तेही समजले नाही. त्या काकू म्हणजे सुभाची आई होत्या.
कालचा भाग म्हणजे अगदीच अरारा.
कालचा भाग म्हणजे अगदीच अरारा....
आणी त्यावर ते इतर लोक नविन "अगदी इन्नोव्हेटीव्ह कल्पना" असल्यासारखे आनन्दाने माना डोलवत आहेत. अगाया...
काय ते प्रेझेन्टेशन... काल आलेल्या मुलीला प्रेझेन्टेशन द्यायला सान्गणे. अन ती ही सुरवातीला नोटबुकवर काहीतरी खरडत असते. नन्तर तोन्ड इवलुसे करुन मिटीन्ग मधे काही न बोलता उभी रहाते. आणि सुभा आल्याबरोबर (आपला तारणहार आला हे ओळ्खुन) चुरुचुरु बोलायला लागते. आणि काय बोलते तर आईच्या जुन्या साड्यान्चे मी ड्रेस शिवले, त्यावरुन मला आयडीया सुचली, कि जुन्या राजनन्दिनी साड्यान्चे ड्रेस शिवुन बाजारात आणले तर सेल वाढेल.
काय एक एक भारी कमेंट आहेत ईथे
काय एक एक भारी कमेंट आहेत ईथे...
..(खुकखु मद्धे पण एक ईशाबाळ होतच
तिच्या नशीबी 
ईथल्या कमेंट चे संदर्भ लागावेत म्हणून आजकाल मी ही सिरीअल अधुन मधुन बघते/ऐकते :-)..
बाकी काल एक गोष्ट लक्षात आली..अभिज्ञा भावे ला प्रत्येक सिरीअल मद्धे ईशाबाळा शी डील करावंच लागतं बहुतेक
>>>>>>>..(खुकखु मद्धे पण एक
>>>>>>>..(खुकखु मद्धे पण एक ईशाबाळ होतच Wink तिच्या नशीबी) >>>>>>>
आणि विक्रांत पण!! तिचा तो टीपिकल "विक्र्यांत" असा उच्चार कधी ऐकायला मिळतो म्हणून वाट बघते आहे. अजून एक शिळ्या पोळीचा लाडू. =))
आर्या... "अगाया'....
आर्या... "अगाया'....
प्रेझेंटेशन तर केड्याचा खास आवडता प्रांत आहे...... हिरोईन्स ना मॅच पॉईंट देण्याचा....
अणि प्रेझेंटेशन कुड बी एनिथिंग... लिटरली.....!!
शिळ्या पोळीचा लाडू - हे भारी
शिळ्या पोळीचा लाडू - हे भारी आहे
प्रेझेंटेशन आलं का इथे पण फायनली?
बाकी, भविष्यात झी-मराठीचं म्युझियम उभं राहिलं तर त्यात ‘प्रेझेंटेशन’ नावाचं स्वतंत्र दालन असेल...
इशा आज 'आम्ही सारे खवय्ये'
इशा आज 'आम्ही सारे खवय्ये' मधे आली आहे. तिच्या आईसोबत. मस्त दिसतेय Pinkish-orange साडीमधे. मेकअप-हेअरस्टाईल पण छान आहे. आणि मुळात बोलायचा स्पीड बराच बरा आहे.
पोरगी IT इंजिनीअर आहे आणि खूप अॅक्टिव्ह आहे पर्सनल लाइफमधे. अॅडव्हेंचर टूर्स गाइड करायची पुण्यात.
उंबटू मध्ये मल्हार नव्हे
उबंटू मध्ये मल्हार नव्हे कान्हा भावे होता.
त्याने चुकून मारलेला एक दगड महागड्या कॅमेर्याच्या लेन्स ला लागता लागता राहिला होता शुट च्या वेळी.
उंबटू मध्ये मल्हार नव्हे
उंबटू मध्ये मल्हार नव्हे कान्हा भावे होता. >>> कान्हा होता काय, मला वाटलं मल्हार.
त्याने चुकून मारलेला एक दगड महागड्या कॅमेर्याच्या लेन्स ला लागता लागता राहिला होता शुट च्या वेळी. >>> ओहह. त्यात भाग्यश्री शंखपाळ पण होती उबंटू मधे, येते आमच्या सोसायटीत. आत्या रहाते तिची. ती बालक पालक मधे पण होती.
भले भले सिनेमे शांत डोक्याने
भले भले सिनेमे शांत डोक्याने आणि लक्षपूर्वक पाहून नंतर माबोकरांना त्या सिनेमाच्या स्पेशल रिव्ह्यूची मेजवानी देऊ करणार्या फारएण्डचीही अखेर या मालिकेमुळे चिडचिड झालीच. >>>>
सुभा मात्र गोड दिसतो. त्याच्यासाठी बघाविशी वाटते मालिका >>>>>>> +++++++१११११११
आईच्या जुन्या साड्यान्चे मी ड्रेस शिवले, त्यावरुन मला आयडीया सुचली, कि जुन्या राजनन्दिनी साड्यान्चे ड्रेस शिवुन बाजारात आणले तर सेल वाढेल. Uhoh आणी त्यावर ते इतर लोक नविन "अगदी इन्नोव्हेटीव्ह कल्पना" असल्यासारखे आनन्दाने माना डोलवत आहेत. अगाया. >>>>>> त्यात काय इनोव्हेटिव्ह आहे. सगळेच शिवतात की जुन्या साडयान्चे ड्रेस. साडया बनवणार्या कम्पन्या तर ही आयडिया वापरतातच.
नाहीतर रॅण्डम वेळी आणि रॅण्डम ठिकाणी कंदील लावून मसाला निर्माण करावा. >>>>>> अहो फारएण्ड, लावले होते की कन्दील सिरियलमध्ये.
Pages