तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

अरे ही स्टोर्या काय ऐकवते ओफीसमधे..bossला..आणि तो ही लगेच पाघळतो..
हिरकणीची गोष्ट काय जयदीप ने पहिल्यांदा ऐकली..!!
केड्या फारच डोक्यावर पडलाय..

काल हापिसातून येताच नवर्‍याची बायको मधे "राधिका बाईंची शुश्रुषा" पुराण पाहिले.. डोके भणभणू लागले..
त्यावर उतारा म्हणून मग तुला (का) पाहते रे? मधे "माझं होणारं मंसू हरवलं, ते मला सापडलं" पुराण पाहिलं... डोकं अजूनच भणभणू लागलं !
हे वरचं सगळं टेलिशॉपीच्या 'पहले में बहुत मोटा हुआ करता था.. " वगैरे जाहिरातीच्या चालीत वाचावं !

मला असं वाटतंय कि सुभा लहान सहान गोष्टीतून इशा च्या आई ला टिल्लू कसे इशा साठी चांगलं स्थळ नाहीयेत ते लोक तिचा कसा छळ करतील हे दाखवून द्यायचा प्रयत्न करतोय .. कारण काल जॉगिंग करून आल्यावर चहा पिताना पण तो काहीतरी एक सूचक वाक्य बोलला .. "नाही पटलं तर आई लग्नाला नकार देतील .. नाही का आई ?! "
त्यामुळे असले पाणचट प्रसंग पुढच्या अनेक भागात बघायला मिळण्याची तयारी ठेवायला हवीये .
गाडगीळांच्या एवढ्या मोठया दुकानात cctv कॅमेरा नाही का ? मंगळसूत्र शेवटी कोणी कुठे कसं ठेवलं ते बघायला ?
तो बिपीन खरं चांगलं काम करतोय थोडासा स्क्रू ढिला असल्याचं Wink आणि जयदीप सुद्धा खरंतर .. मला वाटतंय त्याचे वडील त्याला शांत करत असावेत गोष्टी बिष्टी सांगून लहानपणी कारण आता तेच फक्त नाहीयेत .. बघूया आता कळेल हळूहळू

जयदीपची वहिनी (सुभाची असलेली किंवा लग्न ठरलंय पण होऊ न शकलेली बायको) जराश्या हुकलेल्या लहानग्या दिराला सांभाळून घेऊन काऊचिऊच्या गोष्टी सांगत असेल. त्याचं खूप प्रेम असेल तिच्यावर. ती नंतर दुर्धर आजार होऊन अष्टमीच्या दिवशी गेली असेल. तिच्याचमळेच कदाचित लहानग्या इशाचे प्राण वाचले असतील.

फॅमिली जाॅगिंगसाठी आईसाहेबांना पण नेत जा म्हणाव. Happy

टिल्लूचं पिल्लू काम खरंच छान करतंय.

मला असं वाटतंय कि सुभा लहान सहान गोष्टीतून इशा च्या आई ला टिल्लू कसे इशा साठी चांगलं स्थळ नाहीयेत ते लोक तिचा कसा छळ करतील हे दाखवून द्यायचा प्रयत्न करतोय . >>>> अगदी अगदी. नतर ऐन लग्नाच्यावेळी टिल्लू निमकरान्ना न झेपेल अशी मागणी करतील, मण्डपामधून उठून जाण्याची धमकी देतील. हे सगळ पाहून इशा किव्वा विक्रान्त लग्न मोडेल.

कारण काल जॉगिंग करून आल्यावर चहा पिताना पण तो काहीतरी एक सूचक वाक्य बोलला .. "नाही पटलं तर आई लग्नाला नकार देतील .. नाही का आई ?! " >>>>> मला वाटल ती इशा पटकन म्हणेल, "काही गरज नाही लग्न कॅन्सल करायची. बिपिन फिट नसला म्हणून काय झाल? मी त्याच्याशी करेन लग्न." एवढ चान्गल विक्रान्तला जळवायची सन्धी मिळाली होती तिला, हातची घालवली. उलट स्वतःच उडया मारत आईला विचारत होती, " हो ना ग आई, खरच कॅन्सल करशील लग्न?" तिला कसला स्वाभिमानच नाही. Uhoh

टिल्लूचं पिल्लू काम खरंच छान करतंय. >>>>>++++१११११ ते मंगळसूत्र शोधायच्या वेळी कसला साष्टान्ग नमस्कार घातला होता त्याने दुकानात! Lol

मंसू घालतेवेळी सुभाचे एक्स्प्रेशन्स तर कमाल! Happy

तो दुकानाच्याबाहेर जो भिकारी भेटतो तो विक्रान्तला ओळखत असावा. मला तो भिकारी कमी, गुन्डच जास्त वाटत होता.

कधी कधी असतं टा. सॉ. पण आम्ही अर्थातच लग्गेच ते फाफ़ॉ करायचं सत्कर्म करतो >>>> अन्जली, अहो ते टा. सॉ.फाफ़ॉ करण्याच दुष्कर्म का करताय? चान्गल आहे की ते. बघायला आणि ऐकायला सुद्दा. Happy

इतका वेळ ताटकळत ठेवले उशिरा येउन परत रडका सूर , नंतर 3लाखाच मंसू निवडलं आणि मग ते इथेतिथे ठेवलं ,शोधताना परत गळे काढणं सुरुच , टिल्लू चिडणार नाय तर काय >>>>>> स्वस्ति, तुम्ही टिल्लूच्या बाजूने आहात का? Uhoh

मला तो भिकारी कमी, गुन्डच जास्त वाटत होता.>>त्याचा अंगरक्षक असेल. .>>>> अंगरक्षक आणि इतक्या फाटक्या कपडयात? सरन्जामेची आथिर्क परिस्थिती खालावली की काय? Uhoh Lol

गाडगीळांच्या एवढ्या मोठया दुकानात cctv कॅमेरा नाही का ? मंगळसूत्र शेवटी कोणी कुठे कसं ठेवलं ते बघायला ? >>>>> मम

अन्जली, अहो ते टा. सॉ.फाफ़ॉ करण्याच दुष्कर्म का करताय? चान्गल आहे की ते. बघायला आणि ऐकायला सुद्दा>> मी एकटी असते तर लाख बघितले असते हो !... "ज्याच्या हाती ससा तो पारधी" या चालीवर "ज्याच्या हाती लॅपटॉप, तो करी फॉरवर्ड फास्ट" Wink आता हा "तो" कोण ते कळलंच असेल Wink Wink

भिकारी-कम-गुंड नवीन मंगळसुत्र पळवतो की काय आता>> मला पण अगदी हेच वाटलं ! ज्या पद्धतीने इशा ची आई फलकारे मारत हातात पिशवी घेऊन निवांत चालत होती त्यावरून गुंडालाच काय मला पण ती पिशवी आरामात लुटता आली असती Uhoh

मी एकटी असते तर लाख बघितले असते हो !... "ज्याच्या हाती ससा तो पारधी" या चालीवर "ज्याच्या हाती लॅपटॉप, तो करी फॉरवर्ड फास्ट" Wink आता हा "तो" कोण ते कळलंच असेल >>>>>> Biggrin

स्वस्ति, तुम्ही टिल्लूच्या बाजूने आहात का? Uhoh >>>> नाही ओ ! पण त्या टिल्लू चा त्या वेळेचा त्रागा अगदीच चुकीचा नाही वाटला. आणि क्षणाक्षणाला रडका सूर लावणारी इशा खरचं डोक्यात जाते.
ती सुभा बरोबर पहिल्यंदा factory visit ला जाते तो सीन परत पाहिला. विसरंजामे कसा काय या मुलीच्या प्रेमात वेडा होऊ शकतो या विचाराने माझं पित्त खवळतयं इतकचं

अंगरक्षक आणि इतक्या फाटक्या कपडयात? सरन्जामेची आथिर्क परिस्थिती खालावली की काय? Uhoh Lol>>>आर्थिक नाही मानसिक परिस्थिती खालावली आहे. असाच फिरतोय इकडे-तिकडे!! झेंडेंनी सांगितले आहे अंर ना कि साहेबांना कळता कामा नये, आपण त्यांची रक्षा करतोय ते Uhoh

काल तो अंगरक्षक (का कोण) नव्हता तिथे. ...!! Uhoh
विक्रांत इतका का कमी बोलतो?

ईशा कडे तो एकच रंगीत बांधणीचा ड्रेस आहे का?

फारेंड.. Happy
ज्यांच्या घरी ते चिमटे असतात त्यांनी अनेकदा फावल्या वेळात हे चिमटे बोटात अडकवून बघितलेले आहेत. ... हे अगदी खरं!!
त्या शिवाय ते चिमटे 'व्हॅलिडेटच' होत नाहीत!

Mala vatata Shilpa tulaskar vikrant sarnjame chi first wife or gf asavi.. and tichya babtit kahitari vait ghadla asava and ticha heart or eyes Isha la donate kela asave... Karan sarkha ha dialogue yeto " Isha kahich Dene thevnar nahi" so eyes or heart Dene ch All na

सुभा तिला चमच्यानी घास भरवतो तेव्हा किती वात्सल्य जाणवते....मुलीप्रमाणेच पहातो आहे असं वाटलं आणि मग लगेचच पुढे "भेळ गोड झालीये फार" म्हणाला तेव्हा जरा दचकायलाच झालं. दिगदर्शकासाठी आणि सुबोधसाठी पुढे जाऊन खरंच आव्हानात्मक असणार आहे. आणि इशा अवखळ, निरागस दिसते पण चालू वाटते. तिचा अभिनय पटकन सुधारला तर बरे होईल...

वि.सं..चा साड्यांचा बिझनेस आहे ना?मग चाळीतल्या लोकांना तो चाळ विकत घ्यायला आलाय असं का वाटतं?तो बिल्डर थोडीच आहे.

वि.सं..चा साड्यांचा बिझनेस आहे ना?मग चाळीतल्या लोकांना तो चाळ विकत घ्यायला आलाय असं का वाटतं?तो बिल्डर थोडीच आहे.》》एकूणात काय तर तो अंबानी आहे. साडी पासून गाडी पर्यत सगळ्या बिझनेसांत असतोय तो....

एकूणात काय तर तो अंबानी आहे. साडी पासून गाडी पर्यत सगळ्या बिझनेसांत असतोय तो....>> तेरा कंपन्या कै एकाच प्रोडक्टच्या नाहीयेत त्याच्या. त्यातली एक साड्यांची आहे. राजनंदिनी साडी. बाकीच्या कंपन्या कसल्या आहेत ते हळूहळू कथेच्या गरजेनुसार कळेल. Wink

हो ना, ईशा निरागस न वाटता चालू वाटते. इतक्या सगळ्या भानगडी न करता विसं लग्न करु शकतो की तिच्याशी, तिचे आई बाबा तसेही फिदा आहेत त्याच्यावर. वयाच काय बिपिन पण मोठाच आहे ना तिच्यापेक्षा.

बाकीच्या कंपन्या कसल्या आहेत ते हळूहळू कथेच्या गरजेनुसार कळेल. >>> Lol

इलेक्ट्रॉनिक गेम्स मधे जसे "लाइव्ह्ज" मिळतात, किंवा वापारायची शस्त्रे मिळतात तसे लेखकाला इथे १३ कंपन्या दिलेल्या आहेत. कथेत लागतील त्या ठिकाणी वापरायला. म्हणजे उद्या ईशाला फर्निचर लागले की कंपनी नं २ फर्निचरची ठरून ते फर्निचर सरंजामेंकडून येणार.

आई ग्ग फारेंड सर्व पोस्टी जबरदस्त आहेत. काल मी घरातले इंटरनेट विफी!!! स्वतःच जोड्णी केली व लग्गेच सर्व हुकलेले एपिसोड बघून घेतले.
रिकाम्या घरात खरेच सुभाचा आश्वासक आवाज ऐकायला फार ग्रेट वाट्ते. एक तरी घास घे. हे सुभाचे वाक्य तर मला रेकॉर्ड करून घेउन फोन चा रिंगटोन म्हणून लावावे असेच वाटले. पण हे सर्व गोड प्रेम वगैरे इतक्या बालिकेवर हे काही झेपत नाही एशिआ आर्जेंटो सिनारिओ वाट्तो.

तो तिच्या प्रेमात आहे हे अजून कोणाला कळायचे बाकी आहे?! ते निमकर फॅमिली पोळीचा लाडू, भेळ वगैरे करतात ते ठी क आहे पण त्यात दर वेळी
गरीबाघरचे. मध्यम वर्गीय पंचपक्वान्ने असले पालुपद कश्याला. आम्हाला दिसतेय की परिस्थितीतला फरक. इशा खरेच चॅप्टर आहे. लिटरली थ्रोइन्ग हरसेल्फ अ‍ॅट हिम.
मासा गट व णार. मग जयदीपला रोज एक गो ष्ट व विक्रांतला रोज एक भेळ. कुटुंब कल्याण मोहीम.

इशा खरेच चॅप्टर आहे. लिटरली थ्रोइन्ग हरसेल्फ अ‍ॅट हिम.>>>> Lol अगदी.
'काय हे सर','काहीतरीच काय हो सर', ' मी काय केलं हो सर'....हे आणि असे अनेक गुळचट डायलाॅग्ज ऐकून अगदी कसंकसंच होतं. आणि ती इशा कधी जरा जास्त स्पीडने बोलणार?? कित्ती हळूऊऊऊऊऊऊऊ बोलते ग बाई... Uhoh

Pages