तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

आणि आता रडेल का मग असं वाटायला लागतं. >>>> अगदी, अगदी, तेलवाल्या भागात, डोळे लाल होते ( आले होते का ?)
सुभासाठी काय काय सहन करयला लागते. Sad

सुभा असा का भैताडगिरी करतोय, आवडते तर आवडते म्हणायला घाबरतो, आणि आता त्यांच्याकडे जवळपास रहायलाच का गेलाय, ह्यावर केडीचं लाॅजिक आकळलं. म्हणजे आपल्या आईसाहेब म्हणतात किनी, की त्याग पण ग्रेसफुली करावा, म्हणून सुभाला कवि ग्रेस आठवले. म्हणून तो बाकिच्यांना आणि स्वतःलाही गूढ वाटेल अश्या प्रकारे त्यागच करतोय. म्हणूनच चेहर्यावर सदानकदा अष्टसात्विक भाव पांघरून वावरतोय.

कसलं पकवताहेत. सकाळेच उठुन ह्या भयताडांना जॉगिंगला घेउन काय गेलाय सुभा.
फक्य इशुल न्यायची ना. फारतर त्या टिल्लुला. तो असा वेंधळा का आहे?

नीट प्रेम दाखवलं नाही पण तसं बरोबरच वाटतंय वयात खूप अंतर आहे आणि आधी लग्न झालेले असेल तर तो पण एक पॉइंट. त्यामुळे तिचं प्रेम कमी आणि infatuation जास्त वाटतंय. तो प्रेमात असला तरी त्याला माहित आहे its wrong. लेखकाने राडा केला नाही तर विवाहोत्तर प्रेमाची (made for each other kinda) चांगली कथा होईल.

आमच्या शाळेत एक शिक्षक एका विद्यार्थीनीच्या प्रेमात पडून लग्न केले होते. अशीच age-gap होती. त्या सरांची मुलगी माझ्या एवढी असेल. मी दहावीला होते तेव्हा ते सर retire झाले. नंतर माझं शिक्षण संपवून नोकरीला लागले तेव्हा त्यांची बायको माझ्या लोकल फ्रेंड्स ग्रुप्स मध्ये होती. तेव्हा बायकोला retire व्हायला 10-12 वर्षे तरी असतील.

खरंच खूप लहान दिसत होती ती सु भा च्या मिठीत.... Happy
दोघांचाही गेट अप बदलायला हवाय......
तिचे केसही नीट स्टाईल करायला हवेत....काय तो सरळ भांग, तेलकट केस व घरगुती पोनी.....
शीतली बी चांगली दिसायली हल्ली हिच्या पेक्षा....

सुभा पहिल्यापासुन बाळसेदार कॅटेगरीच आहे पण निदान भुमिकेपुरत तरी त्याने वजन कमी करुन जरा यन्ग दिसायला हव होत पण अभिनयाला मात्र तोड नाही त्याच्या, केड्याचे भिक्कार स्क्रिप्ट सुद्धा एक लेव्हल वर नेतो .
इशा बाळाला अभिनय अजिबात येत नाही यापेक्षा गौराक्का (कादिपच्या )बर्‍या होत्या...
तिला ज्या निम्नमध्यमवर्गिय स्तरातले दाखव्ले आहे त्या हिशोबी तिचा हेअर्,मेकप ठिक आहे.

आज शेवटी न राहवून सुबोध भावेला व्यक्तिगत लिहून आले फेसबूकवर ! बघु काही उत्तर येत का. Happy
आपला सगळ्यान्चा वैताग पोच केलाय.
Submitted by अश्विनी डोंगरे on 28 September, 2018 - 11:11
>>>
@ अश्र्विनी उत्तर आले तर इथे आम्हालाही सांगा

नक्की ! Happy

तो जॉगिन्ग वाला एपिसोड पाहिला .
विकीराव एक्दम सरळ सरळ लाईन देतात - "तु आताही छान दिसतेय्स" म्हणे.
ते दोघ फेर्या मारत असताना , ईशी त्याच्याकडे काय भारावून बघते .. तसंही तिच्या जागी मी असते तर मी ही तेच केलं असतं म्हणा .
म्हातारा पण असा फीट दिसणारा सुभा बाजूला असं जॉगिन्ग करत असताना ...

अरे यार
मंगळसुत्र ट्राय केले यांनी
ते पण त्या म्हातारड्याने घातले तिच्या गळ्यात
वर लाईन पण मारतो

यालाच म्हातारचाळे म्हणत असावेत बहुतेक

प्लीजच...सुबोध ला म्हातारडा वगैरे म्हणू नका........................ माईंड युअर लँग्वेज!
तसाही तो एक रिस्पेक्टेबल अ‍ॅक्टर आहे....व आमचा अत्यंत आवडता आहे! आणि या भूमिकेत अगदी शोभूनही दिसतो आहे...तुम्हाला आवडत नसेल तर रिमोट चे बटन तुमच्या हातात आहेच..म्हातारडा वगैरे म्हणायचं काम नाय!

Angry

आंबट गोड Rofl

अहो म्हतारा दिसतोय तो त्या भुमीकेत तर म्हातारडा नाही म्हणनार तर काय?

आणी अर्ध्यापेक्षा कमी वयाच्या मुलीबरोबर रोमान्स करणार तर त्याला म्हातारचाळेच बोलणार ना

तुम्हाला वाईट वाटले तर मी काय करु Uhoh

आणी हो, मी काय बघायचे किंवा काय बोलायचे हे तुम्ही मला शिकवायची गरज नाही हे आधी निट समजुन घ्या.
you better mind your own business

आंबट गोड +1
म्हातारडा वगैरे प्लिजच म्हणू नका. कसला हँडसम आहे तो. आणि फक्त डोळ्यांतून काय भाव व्यक्त करतो.
फिदा एकदम.
बदाम बदाम बदाम.

भर मांडवातच "ये शादी नही हो सकती" वाला सीन होणार बहुतेक. त्याआधी मेंदीमधे विक्रांतच नाव "चुकून" लिहिलं जाईल. इशाला विक्रांतच्या हातून "चुकून" हळद लागेल. तोच तिला छान तयार करुन मांडवात घेऊन जाईल आणि मग अचानक प्रेम उफाळून येईल आणि मग वरील डायलाॅग.
किती सस्पेन्स(?) ठेवला तरी आम्हाला आधीच माहितेये लग्न कुणाचं होणारे ते... Wink Wink Wink

ईशी त्याच्या so called प्रेमात पडली तर समजू शकतो . पण हा का ईतका आकंठ बुडाला आहे ????
त्या ईशाच character च नीट develop च होउ दिलं नाही आहे .
ना नीट स्मार्ट आहे ना हुशार . ना तिने एखादी चमकदार कामगिरी केलियं . पहिल्यापासून नुसती रडतेयं
हा केवळ तिच्या निरागसतेवर भाळलाय का??

गजनीमध्ये तो संजय कल्पनाच्या प्रेमात पडतो त्याला काही कारणं ही होती ..
निदान ईशी , विक्रांतच्या प्रेमात का पडलीय, त्याची ४-५ कारणं देउ शकू
ईथे उलट्या प्रेमाच एक कारणं सापडेना

स्वस्ति... Happy
मे बी.... ती त्याच्या आधीच्या बायको सारखी दिसते..अथवा वागते.
आणि त्याला असं खरं प्रेम कधी आयुष्यात मिळालेलंच नाही! आई साहेबही सावत्र असाव्यात अशी मला शंका आहे! Happy
खरी आई इतकी नाटकी पणाने कशाला वागेल?

म्हातारडा वगैरे प्लिजच म्हणू नका. कसला हँडसम आहे तो. आणि फक्त डोळ्यांतून काय भाव व्यक्त करतो.
फिदा एकदम.
बदाम बदाम बदाम. >>>> मी बोलणार
तो तुम्हाला हँडसम वाटतो मला नाही

तो तसाही आंटी लोकांच्या कॅटेगरीतला वाटतो एकदम

खरी आई इतकी नाटकी पणाने कशाला वागेल>> तेच कि आणि सुभा म्हणतोय तो चाळीत वाढला .. मग चाळीतून बंगल्यात गेल्यावर आई च आईसाहेब झालं का लगेच Uhoh

ईशा सुभा च लग्न झाल्यावर मायरा च काय होइल?>> आत्ता जेवढं नाक फुगवत आणि शिरा ताणून बोलते त्यापेक्षा अजून फुगवून आणि ताणून बोलेल आणि डोळे फिरवेल आणि मी आता कसा बदला घेते ते बघच असं पुढचे अनेक एपिसोड म्हणत राहील Wink
तरी आम्हाला आधीच माहितेये लग्न कुणाचं होणारे ते>> +१११ Wink Wink

आई साहेबही सावत्र असाव्यात अशी मला शंका आहे! Happy>>
माझ्या साबांनी काही दिवसांपूर्वी मला या सिरियलशी संबंधित एक भन्नाट स्टोरी सांगितलीय. मी ही सिरियल बघत नाही... त्यामुळे हे सिरियलमध्ये दाखवलं का?? किंवा साबांच्या मनाची स्टोरी त्यांनी डेव्हलप करुन मला सांगितली की इतर कुठल्या सिरियलींची मिसळ करुन सांगितलं याची खात्री नाही.
विक्रांत हा आईसाहेबांचा मुलगा नाही. सख्खा/सावत्र कुणीच नाही. जयदीप हा त्यांचा एकुलता एक मुलगा.
विक्रांत लहान असताना एका चाळीत राहत असतो. अर्थात गरीब पण हुशार मुलगा. नंतर तो अनाथ होतो. स्वबळावर शिक्षण घेत नोकरी करत असतो. मग जयदीपच्या वडिलांच्या कंपनीत कामाला लागतो. तेव्हा ती कंपनी छोटी असते. मग हा बरेच कष्ट वगैरे करुन भरभराट करतो. मालकाची मर्जी बसते. मग जयदीपचे बाबा वारतात. आईसाहेबांना विक्रांतबद्दल माया असतेच. त्या त्याला आपल्या घरी आणतात. आणि विक्रांत कंपनीचा मालक बनून सर्व व्यवहार चोख सांभाळतो.
कामाचा पसारा /प्रगती वाढवत एकाच्या तेरा कंपन्या करतो.
आणि हे सगळं करत असताना स्वतःच्या लग्नाचा विचार करायला त्याच्याकडे वेळच नसतो. आता आईसाहेबांनी पूजा घातल्यामुळे त्याच्या मनात लग्नाचे विचार यायला लागलेयत आणि ईशा त्याला आवडतेय.
Happy

हे असं कधी दाखवलं का सिरियलमध्ये??? Uhoh

तो तसाही आंटी लोकांच्या कॅटेगरीतला वाटतो एकदम>> आ गयी आंटी आजी भी. ग्रेटच दिसतो.

अरे ह्या वयाच्या बाप्यांना एक कॉम्प्लेक्क्ष असतो. अगदीत तरूण वयाची अनभिज्ञ मुलगी बायको म्हणून करून घ्ययाची. ती कायम ह्याच्या ऑ मध्ये असते. त्याचे ज्ञान अनुभव ह्याच्या जोरावर हा अनंत काळ भापू शकतो. तिच्या समोर. त्याच वया ची स्त्री म्हणजे एकदम पीएच डी सीनीअर असेल तिला ह्याचे काय फार कौतू क नसेल. बरे पैसा असतो. त्यामुळे तिला कायम गिफ्टा साड्या घेउन खु ष ठेवता येते. इतरही मजा.
पहिली बायको तो परेंत घटस्फोट दिला नसेल तर वयस्कर झालेली असते. आजारी असू शकते. नाहीतर इक्राट सारखी गेलेली. मुले मोठी असतात. ह्यांना ती मुलगीच इतके अटेन्शन देते.

शुगर डॅडी/ ट्रॉफी वाइफ गूगलून बघा.

Nidhii
कसली भारी स्टोरी. असं काही दाखवल्याचं मला माहीत नाही. पण या सिच्युएशनला एकदम परफेक्ट आहे.

मी सुरुवातीचे काही एपिसोड बघितले नाही. पण आत्ता तरी म्हणजे ऑफिसमध्ये काम करताना इशा खरंच स्मार्ट, हुशार वाटतं नाही. सुरुवातीला काही तिची हुशारी किंवा असं काही दाखवलं आहे का ज्याने विक्रांत तिच्या प्रेमात पडतो?

Pages