तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

इशा त्या सुभा मधे इतकी गुरफटली आहे कि तिच्या मनात जे सुभा सोबत चे मनाचे/प्रेमाचे खेळ चाललेत .. कि आता मला हा असं करेल तसं करेल ते तिला खऱ्या आयुष्यात न घडता हि घडतायत कि काय असं वाटतंय... किंवा असं काहीतरी होईल कि जेणेकरून सुभा ला हि मी आवडतेय हे तो कश्याना कशातून दाखवून देईल असा हि ती विचार करत असावी ..
... म्हणून ते चिमट्याचं प्रकरण दाखवलं जे फारच बोर वाटलं मला तरी ..

हा सुभा इतका मोठा इंडस्ट्रियालिस्ट कि कोण आहे .. त्याला त्या टिल्लू ची आधीच चौकशी करता नाही आली ? आता सांगतोय शेंडे ला फोनवर माहिती काढा म्हणे ...

ती मायरा सध्या झबल्यासारखे कपडे का घालते>>> नाहीतर काय Uhoh

सगळे प्रतिसाद कायच्या काय लोळ आहेत Rofl
गुप्त रुमच डायरेक्ट ५० शेड्स शी कनेक्शन Lol
आखिकी गुस्ताखिया>>>>> मस्तच फारेन्ड. पण फक्त सुभाचीच आंखे बोलतात त्याचं काय?
मला इशुबाळाच्या दिसण्याबद्दल काही इतका इश्यु वाटत नाहीये.
पण तिची सण्वादफेक कायतरी वेगळीच आहे.
शाळेत वक्तृत्व स्पर्धेत जसं बोलतात तशा टाईपचं बोलते ती. तेही शाळकरी मुलीच्या अवाजात.

मला इशुबाळाच्या दिसण्याबद्दल काही इतका इश्यु वाटत नाहीये. >>> दिसण्याचा प्रॉब्लेम नाहीचे. तिच बालीश वागण आणि बोलण, हापिसात आणि सुभाच्या गाडीत झोपणं, वेळीअवेळी भोकाड पसरण, मी कोणाचीही देणी ठेवणार नाही म्हणत काहीच काम न करण / त्यासाठी काही प्लॅन न करण, प्रयत्न न करण हे सगळ इश्यू वाटणार आहे.

आता सांगतोय शेंडे ला फोनवर माहिती काढा म्हणे ...>> भेंडे झालं आता शेंडे का?? Wink झेंडे आहे तो झेंडे. Happy

बाकी सगळे प्रतिसाद Lol

<<प्लॅस्टीकचा चिमटा आणि मानवी स्पर्श ह्यात नायिकेची गफलत होईल असं वाटूच कसं शकतं.<< अगदी अगदी.

दुकानातला इशाच्या आईचा जोर भारीच.(पण ते प्रत्येक वेळी तिच डोळे गरागरा फिरवणे काहीतरीच वाटते)
आणी ते "या फेक्ट्रीचे मालक आम्च्या घरी बसलेत आणि लावा, तुम्हीच लावा त्यान्ना फोन' हे काय पटले नाही. अगदी होलसेलर जरी असला तरी त्याच्याकडे काय डायरेक्ट इन्डस्ट्री मालकाचा फोन नम्बर असतो?
इथे तर पत्ते वाटावे तसे सुभाचे फोन नम्बर सगळ्यान्कडे आहेत.

आमच्या बॉसचा नम्बर त्यान्च्या परवानगीशिवाय आम्ही देत नाही कोणाला डायरेक्ट! एस एम एस / व्हॉ.अ‍ॅ. मेसेज टाकुन विचारावे लागते.

आणि सु भा काय साड्या मॅन्युफॅक्चर करतो? Uhoh
मला हे काल नवीनच कळले की "राजनंदिनी" साडी म्हणे त्याचीच!

कसला डल हिरवा कलर घेतलाय! आणि लग्नाची एकच साडी म्हणजे फारच अती झालं हं.......! अगदी गरीबाच्या मुलीही ३-४ साड्या तर घेतच असतील......!!

झेंडे आहे तो झेंडे.>>>> हे एकदम मायरा बोलते अस वाटले.
ती मायरा सध्या झबल्यासारखे कपडे का घालते >>>> exactlly, किती विचित्र दिस्ते ते.

कसला डल हिरवा कलर घेतलाय! आणि लग्नाची एकच साडी म्हणजे फारच अती झालं हं.......! अगदी गरीबाच्या मुलीही ३-४ साड्या तर घेतच असतील......!! >>> ती एकच साडी काहीतरी २५-३० हजाराची आहे म्हणे

कसला डल हिरवा कलर घेतलाय! आणि लग्नाची एकच साडी म्हणजे फारच अती झालं हं.......! अगदी गरीबाच्या मुलीही ३-४ साड्या तर घेतच असतील......!! >>> ती एकच साडी काहीतरी २५-३० हजाराची आहे म्हणे
>>>>
साडीसाठी पुन्हा मंगळसूत्र गहाण टाकणार का?

इशा त्या सुभा मधे इतकी गुरफटली आहे कि तिच्या मनात जे सुभा सोबत चे मनाचे/प्रेमाचे खेळ चाललेत .. कि आता मला हा असं करेल तसं करेल ते तिला खऱ्या आयुष्यात न घडता हि घडतायत कि काय असं वाटतंय... किंवा असं काहीतरी होईल कि जेणेकरून सुभा ला हि मी आवडतेय हे तो कश्याना कशातून दाखवून देईल असा हि ती विचार करत असावी ..
... म्हणून ते चिमट्याचं प्रकरण दाखवलं >>>>>> +++++११११११११ त्या आणि झाडूच्या सिनमध्ये सुभाचे एक्सप्रेशन्स तर कमाल!!! Wink

त्या चिमटयाच्या प्रकरणात इशाचा झालेला गैरसमज बघून तो जे काही हसला ते तर किलर होत. Blush

पण तिची सण्वादफेक कायतरी वेगळीच आहे. >>>>> हो. करण अर्जून मध्ये राखी जस जोर लावून 'मेरे करन अर्जून आयेन्गे' म्हणते तशी इशा प्रत्येक शब्द जोर लावून म्हणते. इमोशनल सिन्स मध्ये तिचा आवाज चिरकतो.

मला हे काल नवीनच कळले की "राजनंदिनी" साडी म्हणे त्याचीच! >>>>> मला सुद्दा. विकी साडयान्च्या कम्पनीचा मालक! वॉव!!! आता लग्नानन्तर इशाकडे साडयाच साडया असतील. इशाची आई खुष! Proud

ती मायरा सध्या झबल्यासारखे कपडे का घालते>>> तिला शनायाशी ( आधीच्या) कॉम्पिटिशन करायची असेल.

हा सुभा इतका मोठा इंडस्ट्रियालिस्ट कि कोण आहे .. त्याला त्या टिल्लू ची आधीच चौकशी करता नाही आली ? आता सांगतोय शेंडे ला फोनवर माहिती काढा म्हणे . >>>>>> +++++१११११११११

शेंडे Rofl

तिने ते क्वेश्चनायर विचारलं तर ह्याने शेवटचा प्रश्नच टाळला केड्याला नीटपणे सलग डायलॉग्ज लिहीता येत नाहीत......>>>>>> कारण सुभाला आपल प्रेम व्यक्त करायच नव्हत तिच्यासमोर.

बादवे, इशाची सन्गत लागून सुभा सुद्दा व्हॉटसअ‍ॅपी बोलू लागलाय की काय! Uhoh Proud

ती इशा सुभाला ऐकू जाव म्हणून त्याच्यासमोरच मोठ्याने देवाची प्रार्थना करत होती.

काल इशाच्या आइने त्या दुकानदारावर चांगला आवाज चढवला. मजा आली. >>> भारी होता तो सीन. इशाची आई रॉक्स >>>>> अगदी अगदी. पण ती त्या टिल्लूसमोर नमतेपणा घेते. त्यान्ना नको इतके महत्व देते. Uhoh

ती सुभाच्या ऑफिसमधली मुलगी बरोबर म्हणाली, " इथे इन्टरव्ह्यु शिवाय jobs दिले जातात, तर नोटिस दिल्याशिवाय सुट्टी का नाही घेऊ शकत? Lol

बाकी इशा काल टिपिकल बायकोसारखी वागली. किती तणतणत होती सुभावर! Biggrin

नाही. मायराने दिलेल्या पैश्यातून ही चंगळ चालू आहे. मंसू आधि सोडविले आता साडीही घेतली.
तिचे पैसे परत करायला पुन्हा गहाण टाकणार.

झेंडे आहे तो झेंडे.>>> Lol

कालचा प्रश्नोत्तरांचा सीन बघून मला वाटलं केड्या हेडफोन वर हे गाणं ऐकत ऐकत संवाद लिहीत होता कि काय ..
इशा बाईंचे प्रश्ण वेगळे होते पण मामला तोच

अच्छा तो यह बात है, तुम भी सुन लो
जो जो सवाल मैं पुछू उनका सच सच जवाब देना,
>> मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन त्याची खरी खरी उत्तर द्यायची हो किंवा नाही ... वर्ड टू वर्ड सेम भाषांतर Wink

अच्छा, तो बागो मे बाहर है, क्या
मैंने पूछा बागो मे बाहर है, हा है
कलियो पे निखार है, हा है
तो, तो तुमको मुझसे प्यार है
ना ना ना ना ना ना...

धावता धावता इशा धडपडली तेव्हा सुभाने तिला पकडलं... बाबांनी लेकीला पकडल्यासारखं वाटलं. Lol
कित्ती लहान दिसली ती त्याच्यापेक्षा...कसंतरीच वाट्टंय ते. टायटल साॅन्गमधे इतकी लहान नाही वाटत.

प्रेम कधी झाल?
>>>>
ही कदाचित "लम्हे " ची स्टोरी असेल. फक्त फरक एवढाच की सुभा ऐवजी निमकरांनी इशाला रस्त्यावरून\ अनाथालयातून इत्यादी दत्तक \ भाकरीच्या तुकड्यावर घेतले असेल. आणी त्या ५० शेड्सवाल्या गुप्त खोलीत इशाचे फोटो असतील. अन समोर पाहिल्यावर दोघांना खोया हूवा प्यार मिल गया
अथवा
खुदा गवाह ची कथा
तसेही सुभा गनमास्टर दाखवलाय. तो रहात असलेल्या जुन्या चाळमालकाची मुलगी म्हणजे इशाची आई. चाळमालकाने अट टाकली असेन कोणा श्रीमंत माणसाला टपकवायची अन दिले असेल दोघांचे लग्न लाऊन. कामगीरीवर गेलेला सुभा काही ९ महीने परत आला नाही" अपना मुह कहा छुपानेका?" असे करत दर दर ठोकरे खात इशाच्या आईने निमकरांच्या पायरीत प्राण सोडले असतील अन टाकले असेल इशाला त्यांच्या ओटीत. अब सवाल है, क्या अपने माॅ का बदला लेगी क्या इशा?
अरे हो तुम्हाला वाटले असेल इशाला कसे कळेल आपले पिताजी म्हणजे सुभा?
स्पाॅईलर अलर्ट :
ते सुप्रसिध्द सतत गहाण पडणारे मंगळसूत्र. जो उसके मा की आखरी निशानी है. (दोन्ही वाट्यांमागे दोनो प्रेमीयोके फोटो है)

हम्म सुरू करा आता माझ्यावर फेकणे अंडे अन टोमॅटो. Rofl

पण ह्यन्च्यात प्रेम फुलले केव्हा ? 》 फॅक्टरीतल्या एका माणसाला सुभ्यानं घास भरवल्यापासून ती भाळलेली दाखवलिये त्याच्यावर.
त्याचे तर पहिल्या दिवसापासूनच ती नुसती दिसली की डोळे भरुन येतायत, आवाज सद्गदित होतो, हुंदका दाटून येतो आणि आता रडेल का मग असं वाटायला लागतं. क्या यहीं प्यार है ?

Pages