Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32
झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
झी च्या सगळ्या शिरेली म्हणजे
झी च्या सगळ्या शिरेली म्हणजे मोठ्या माणसांच्या भातुकल्या आहेत, वास्तवाच्या आसपासही फिरकत नाहीत
आम्ही दोघं मिळून सगळी जळमटं
आम्ही दोघं मिळून सगळी जळमटं दूर करतो आणि सुभा ने तेव्हा जो काही लूक दिलाय आणि डोळ्यातून बोललांय .. मस्स्त !!
आणि इशा च्या मैत्रिणीची भूमिका आणि अभिनय पण आवडतोय ...>>> खरय.... कसला लुक दिलाय.... कातील..... Blusकातील कातील कातील कातील कातील
करून करून काय करणार तर जळमटं
करून करून काय करणार तर जळमटं साफ!!! अरे कधीतरी रोम्यांटिक वागा रे!!!
अरे काय हे, तो सरंजामे कसला
अरे काय हे, तो सरंजामे कसला सुजलाय
तो कसा काय कुणाला आवडू शकतो
ई ई ई
हा जळमटे सीन मला का नाही
हा जळमटे सीन मला का नाही दिसला! आधी सुभा चा भूतकाळ आणि मग मैत्रीण दोनच मोठे सीन होते ना काल. मायरा आणि झेंडे सीन पण.
हो ! कधी कधी फारच सुजवट
हो ! कधी कधी फारच सुजवट चेहऱ्याचा दिसतो बाबा
पण तरी काम चांगलं करतोय खरं ..
दारू पितो का अज्जिबात झोपत नाही काय माहित ..
कि इशा सोबत काम करायचंय म्हणून झोप च उडालीय त्याची ..
हा जळमटे सीन मला का नाही
हा जळमटे सीन मला का नाही दिसला>> हा शेवटी २-५ मिनिटं होता .. टी व्ही बंद केला का मधेच ?
कुठे बघताय ? ऑन लाईन तरी दिसला .. मैत्रिणीशी बोलून झाल्यावर इशा घरी येते आणि आई बाबाना साडी आणायला कटवते
मी पण airtel tv app var पाहते
मी पण airtel tv app var पाहते, घरी सध्या टाटा स्काय नाही. आता आठवतंय मधेच hang झालं मग मी विसरून गेले बहुतेक.
Mere sawal ka kuchh karo...
Mere sawal ka kuchh karo...
Par pyar hua kab?
प्राची, फिफ्टी शेडस ऑफ ग्रे
प्राची, फिफ्टी शेडस ऑफ ग्रे
सु.भा ची घरात एक गुप्त खोली असणे >>>>>> ते गुप्त खोली प्रकरण तर बर्याच हिन्दी, मराठी सिरियल्स मध्ये असत. सध्या ललित २०५ मध्ये सुद्दा गुप्त खोली दाखवतायत.
फारएण्ड
सरंजामे पूर्वी चाळीत राहात होते, इतरांसारखेच वाढले ऐकल्यावर मी पहिले विचारले असते "वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही आईला आईसाहेब म्हणायला, व त्यांनी तुम्हाला अहोजाहो करायला सुरूवात केली?" >>>>> सुभा फेकतोय हे स्पष्टच कळत होत.
"मला माझा भूतकाळ आठवला" यावर ईशाला इतके आश्चर्य वाटते, की तिला भूतकाळ न आठवता वर्तमानकाळ किंवा भविष्यकाळ आठवतो की काय अशी शंका येते. >>>>> मला तिला तिचा शिल्पा तुळसकरचा पुनर्जन्म आठवतोय की काय अस झाल होत.
पण सुबोध चे कातील लुक्स.......... अगदी अहा........ किती गोड दिसतो , वागतो, बोलतो! +++++++++११११११११
आम्ही दोघं मिळून सगळी जळमटं दूर करतो आणि सुभा ने तेव्हा जो काही लूक दिलाय आणि डोळ्यातून बोललांय .. मस्स्त !!
आणि इशा च्या मैत्रिणीची भूमिका आणि अभिनय पण आवडतोय .. >>>>>>>>>> मम
नुपूर.... >>>>>> मानसी साळवी. अजूनही ती तरुण दिसते.
सरंजामे पूर्वी चाळीत राहात
सरंजामे पूर्वी चाळीत राहात होते, इतरांसारखेच वाढले ऐकल्यावर मी पहिले विचारले असते "वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही आईला आईसाहेब म्हणायला, व त्यांनी तुम्हाला अहोजाहो करायला सुरूवात केली?" >> हा हा ..सही पकडे है!
करून करून काय करणार तर जळमटं
करून करून काय करणार तर जळमटं साफ!!! अरे कधीतरी रोम्यांटिक वागा रे!!! >>>>>> अहो, सुभा 'आम्ही मनातील जळमटं दूर करु' अश्या अर्थाच बोलला ते.
' पण रिअल लाईफ म्हणजे फिल्म नसते' फार उशिरा कळल हे इशाबाळाला!
लग्न ठरल्यानन्तर इशा दोन दिवस सेन्सिबल , मॅच्युअर्ड वागत होती. आज मैत्रिणीने चढवल्यावर पुन्हा आली पुर्वपदावर.
लग्नाचा निर्णय घेतलाय त्यावरच फर्म राहाव ना तिने.
तो इशाच्या शेजारी राहणारा माणूस कसला अतरन्गी आहे.
इशा-रुपालीच बोलण अगदी कान देऊन ऐकत होता. ह्या दोघीसुद्दा नेमक त्याच्यासमोरच मोठया आवाजात बोलत उभ्या राहिल्या सुभा बद्दल. 
आधी कुठल्यातरी सिरीअलमधे पण
आधी कुठल्यातरी सिरीअलमधे पण तो स्पेशल माणूस होता. बहुतेक तो त्या वाडयातलाच जुना चिवट भाडेकरु असावा आणि वाडा शुटींगसाठी दिला की त्याच्यासकटच देत असावेत
मेधावि
मेधावि
मलापण सुभाची सिक्रेट रुम
मलापण सुभाची सिक्रेट रुम बघितल्यावर आधी 'रेड रुम' च आठवली.
सुभ्याला दहाची नोट कशी दिसते,
सुभ्याला दहाची नोट कशी दिसते, रिक्षात कसं बसतात ते माहीत नव्हतं बरं का? चाळीत असताना हेलिकाॅप्टरचा पास काढत असेल बहुतेक.
बघितली जळमटे सुभा नी जरा
बघितली जळमटे
सुभा नी जरा kiddo भाव बदलायला पाहिजेत चेहऱ्यावर आणि डोळ्यातले नाहीतर लव्ह interest ना वाटता बापलेक वाटायचे!
ईशाची वाटचाल काका सर नवरोजी,
ईशाची वाटचाल काका सर नवरोजी, गुड. अर्थात सिरीयलची स्टोरी तीच आहे.
मी बघितलं तेव्हा काका होता सु भा.
आज इशा तणतणत रूम झाडत असताना
आज इशा तणतणत रूम झाडत असताना झाडू कपाटाखाली अडकतो तेव्हा एक क्षण मला वाटलं सुभा आता कपाट उचलतो की काय!
आणि तो चिमटा इशाच्या बोटात अडकतो तेव्हा इशा सुभाने तिचं बोट धरलं अस समजून लाजते काय, हसते काय... बोट सोडा ना म्हणते काय!" .. अरारा!
प्लॅस्टीकचा चिमटा आणि मानवी
प्लॅस्टीकचा चिमटा आणि मानवी स्पर्श ह्यात नायिकेची गफलत होईल असं वाटूच कसं शकतं.
किती हास्यास्पद होते दोन्ही
किती हास्यास्पद होते दोन्ही प्रसंग
आणि तो चिमटा इशाच्या बोटात
आणि तो चिमटा इशाच्या बोटात अडकतो तेव्हा इशा सुभाने तिचं बोट धरलं अस समजून लाजते काय, हसते काय... बोट सोडा ना म्हणते काय!" .. अरारा!>>>बापर्र!! इथवर मजल गेली!!!
Disgusting!!!
Disgusting!!!
आवाज सहन नाही होत तिचा
आवाज सहन नाही होत तिचा
सरंजामे पूर्वी चाळीत राहात
सरंजामे पूर्वी चाळीत राहात होते, इतरांसारखेच वाढले ऐकल्यावर मी पहिले विचारले असते "वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही आईला आईसाहेब म्हणायला, व त्यांनी तुम्हाला अहोजाहो करायला सुरूवात केली?" >>>>> सुभा फेकतोय हे स्पष्टच कळत होत.>>> अगदी!!
दुकान गेलं तेव्हा मंसू गहाण
दुकान गेलं तेव्हा मंसू गहाण टाकले. ईशाला बोनस मिळाला तेव्हा ते सोडविले. गॅस संपला तेव्हा परत गहाण टाकले. आता लग्नासाठी कर्ज घेतले तेव्हा परत सोडविले.
लग्न मोडेल तेव्हा झालेल्या खर्चावरुन टिल्लू बोंबलतील तेव्हा ते परत गहाण टाकले जाईल. मग विकी जावई होईल तेव्हा तो सोडवून आणेल. पण जावयाकडून कशाला घ्यायचे म्हणून ते परत गहाण टाकले जाईल. असेच काहीतरी होत राहील आणि मंसूची आवक-जावक शेवटपर्यंत चालू राहील असे वाटते
काल इशाच्या आइने त्या
काल इशाच्या आइने त्या दुकानदारावर चांगला आवाज चढवला. मजा आली. त्यांना विचारले कस्टमरला काहि चहा कोफी देत नाहीत का ??? हा हा हा.
प्लॅस्टीकचा चिमटा आणि मानवी
प्लॅस्टीकचा चिमटा आणि मानवी स्पर्श ह्यात नायिकेची गफलत होईल असं वाटूच कसं शकतं. >>> खरय. कसला फालतूपणा होता
काल इशाच्या आइने त्या दुकानदारावर चांगला आवाज चढवला. मजा आली. >>> भारी होता तो सीन. इशाची आई रॉक्स. ते निमकर सारखे सगळीकडे मिंध्यासारखे हात जोडत असतात.
ती मायरा सध्या झबल्यासारखे कपडे का घालते
आज शेवटी न राहवून सुबोध
आज शेवटी न राहवून सुबोध भावेला व्यक्तिगत लिहून आले फेसबूकवर ! बघु काही उत्तर येत का.
आपला सगळ्यान्चा वैताग पोच केलाय.
काल सुबोध काहीतरी तिला सांगत
काल सुबोध काहीतरी तिला सांगत होता....तेव्हा मला ऑल्मोस्ट असं ऐकू आलं की.. ," बेटा....."...
म्हणजे तो खरंच अगदी वडिलकीच्या नात्यानं आणि मॅच्युअर्डली तिला समजावत होताच.....
आणि तिने ते क्वेश्चनायर विचारलं तर ह्याने शेवटचा प्रश्नच टाळला.....केड्याला नीटपणे सलग डायलॉग्ज लिहीता येत नाहीत......
इतकी का डाफरत्येय पण ती आपल्या सुबोध वर? नीट वागशील- बोलशील तर ठीक आहे म्हणा...नाहीतर छप्पन पडल्यात तुझ्या सारख्या...त्याला!!
Pages