Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32
झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वि.सं..चा साड्यांचा बिझनेस
वि.सं..चा साड्यांचा बिझनेस आहे ना?मग चाळीतल्या लोकांना तो चाळ विकत घ्यायला आलाय असं का वाटतं?तो बिल्डर थोडीच आहे.
Submitted by Chaitrali on 3 October, 2018 - 22:57 >>> सु भा म्हणतात ना , माझ्याकडे पैसा आहे मी काहीही करू शकतो (असेच काहीसे).
actually मी सुद्धा कालपासून कांन देऊन बघू लागले (कालचा पहिला एपिसोड माझ्यासाठी एरवी बघावीशी नाही वाटत, असो) तेव्हा नेमका याच सीन पासून चालू होते नंतर ते सु भा गच्चीवर जातात तेव्हा चेंज करून "निमकी मुखिया " बघू लागले (आवडते सिरीयल, सध्या चांगला ट्रॅक चालू आहे)
इशा खरेच चॅप्टर आहे. लिटरली
इशा खरेच चॅप्टर आहे. लिटरली थ्रोइन्ग हरसेल्फ अॅट हिम. +१
ती अजिबात गरीब, बिचारी, परिस्थितीत अडकलेली वाटत नाही. उलट स्वतः:चा स्वार्थ व्यवस्थित बघणारी मुलगी आहे. त्या मायराकडून पैसे घेताना ती जे म्हणेल त्याला हो हो म्हणाली. आणि वेळ पडल्यावर सोयीस्करदृष्ट्या स्वतःच्या फायद्याचं बघायचं एवढी अक्कल बरोबर आहे.
इंटरव्ह्यू न देता जॉब, ऑफिसमध्ये न कळवता चार चार दिवस रजा, स्वतः ची पेयींग कपॅसिटी नसताना मायराकडून खोटे प्रॉमिस करून 5 लाख घेणे, जयदीपला काहीतरी गोष्ट सांगून गुंडाळणे वगैरे एक एक स्टेप्स हुशारीने पार पाडत आहे.
फारएण्डचे 'हसून माना
फारएण्डचे 'हसून माना डोलावण्याबद्दलचे' ऑब्जरवेशन अगदी पर्फेक्ट. मी आता मोजणार आहे कोण किती वेळा माना डोलावंत ते.
ईशा अगदीच मॅनरलेस आहे..
ईशा अगदीच मॅनरलेस आहे.. समोरचा माणूस फोनवर बोलताना दिसतोय तरी पण ' इथे आहेत होय तुम्ही सर' असं तिच्या चिरक्या आवाजात मोठ्याने बोलते..
ऑफिसला पण न कळवता दांडी मारते..
या साध्या सोप्या गोष्टी कळायला श्रीमंत असावं लागत नाही..
रच्याकने.. कुठल्या कॉर्पोरेट ऑफिसात रजेचा अर्ज असा पाकिटातून देतात???
फारएन्ड मस्त निरीक्षण।
फारएन्ड मस्त निरीक्षण।

सिरीयल सुरु झाल्यावर काही दिवस फक्त सुबोध सुबोध !! तेव्हा वाट बघत होते कधी सुरु होणार सिरीयल ते- आता बंद केलं बघणं, फक्त इथले मस्त मस्त प्रतिसाद वाचून हसते
ती मूलमुळीत चॅपटर इशा , तिचे हातवारे माष्टर बाबा असह्य बडबडणारी आई डोक्यात जातात। सुभाचाही राग येतोय आता त्या इशाच्या मागे फिरतो म्हणून
खरंय... ते मुळमुळीत इशाबाळ
खरंय... ते मुळमुळीत इशाबाळ कधी भरभर बोलणार... बरं फास्ट नसेल तर atlest नॉर्मल स्पीड ने तरी बोल म्हणावं...कसली भयंकर स्लो मोशन आहे ती...
सुभाचाही राग येतोय आता त्या
सुभाचाही राग येतोय आता त्या इशाच्या मागे फिरतो म्हणून>>> +१
आम्हालाही राग येतो ईशा त्या
म्हातारड्याशी प्रेमाचे चाळे करते म्हणुन ईशाचाही राग येतो ..!!
बाकीच्या कंपन्या कसल्या आहेत
बाकीच्या कंपन्या कसल्या आहेत ते हळूहळू कथेच्या गरजेनुसार कळेल. >>
त्यांचे रोमँटीक सीन तर अजिबात बघवत नाहीत.
इलेक्ट्रॉनिक गेम्स मधे जसे
इलेक्ट्रॉनिक गेम्स मधे जसे "लाइव्ह्ज" मिळतात, किंवा वापारायची शस्त्रे मिळतात तसे लेखकाला इथे १३ कंपन्या दिलेल्या आहेत. कथेत लागतील त्या ठिकाणी वापरायला. >>
अगदी बरोबर. हेच म्हणायचे होते. पण आम्हाला असलं कै सुचत नाही. 
इशाच्या बाललीला सुबोधबरोबर
इशाच्या बाललीला सुबोधबरोबर सुरु झाल्या - त्याला रोमान्स म्हणवत नाही माझ्याच्याने - की सुजित सोमसुंदर किंवा विक्रम राठोड या दोघांपैकी एकजण सचिन - द्रविडला बॅटींग शिकव म्हणून त्यांच्यामागे भुणभुण करत आहेत असच वाटत राहतं.
तो चाळीतला एक माणूस बोबडा आहे
तो चाळीतला एक माणूस बोबडा आहे का की गुज्जु म्हणून असं मराठी बोलतो?
त्या ईशाचा चिरकणारा आवाज ऐकवत नाही खरंच..
ईशाबाळ ला ३५००० पगार आहे
ईशाबाळ ला ३५००० पगार आहे काही काम न करता, न सांगता सुट्ट्या घेतल्याचा.
१० होता ना ते ही विदाऊट ईंटरव्युय घेतलेल्या नोकरीत.
आणि असं घरी कोण कागदपत्र आणुन देते आजकाल.ईमेल्स वगैरे नाहीत यांच्याकडे?
रच्याकने... मायराने इशू
रच्याकने... मायराने इशू बेबीला पाच लाख दिले होते त्याचे काय झाले... संपले की पैसे आहेत लग्न खर्चासाठी, हेच विसरून गेलेत... का मीच काही पहायला विसरून गेले... खूप गोंधळ आहे kathanakat
आणि असं घरी कोण कागदपत्र आणुन
आणि असं घरी कोण कागदपत्र आणुन देते आजकाल.>>विसं नेच तसे करायला सांगितले असेल. सारखे वाच वाच म्हणत होता, मोठ्या टिल्लुला वाचायला द्यायचा प्लॅन असेल. मग त्यातला कोणतातरी मुद्दा मोठ्या टिल्लूला आवडणार नाही जेणेकरुन ठरलेले लग्न मोडेल. किंवा मायराने विसं तिथे आहे का बघायला माणूस पाठवला असेल.
का मीच काही पहायला विसरून गेले... खूप गोंधळ आहे kathanakat>>> मनाला वाटेल तसे आणि तेव्हढेच दाखवतात. बाकी प्रेक्षकांनी त्याभोवती आपल्या मनाला पटेल त्या तर्काने गोष्टी जोडून कथा पूर्ण करायची आहे.
सरंजामे कंपनी , तिच्या
सरंजामे कंपनी , तिच्या कुठल्याही employee च्या नातलगाशी कुठल्याही प्रकारे व्यवहार करू शकत नाही , असा काहीतरी clause आहे , आता टिल्लू भडकणार
ईशाबाळ ला ३५००० पगार आहे
. ईशुटलीच qualification काय आहे. आमच्या कडे BE , interns म्हणून घेतले तरी त्यांना वर्ष भर 15-18k stipend मिळतो 
ईशाबाळ ला ३५००० पगार आहे काही
ईशाबाळ ला ३५००० पगार आहे काही काम न करता, न सांगता सुट्ट्या घेतल्याचा. Uhoh
१० होता ना ते ही विदाऊट ईंटरव्युय घेतलेल्या नोकरीत.
आणि असं घरी कोण कागदपत्र आणुन देते आजकाल.ईमेल्स वगैरे नाहीत यांच्याकडे? >>>
लोल सीनच्या गरजेप्रमाणे ते कोणत्या दशकात आहेत हे ठरते बहुधा. लग्नाकरता रजा मागायला अॅप्लिकेशन द्यायचे असेल तर कोणीही ते जाउन देउ शकते. इमेल आहे, फोन आहे. पण यातले ते काहीही करत नाहीत.
ईशाला बहुधा डेस्कवर डुलक्या मारून इतरांचा वेळ वाचवण्याचा व त्यामुळे त्यांना प्रॉडक्टिव्ह करण्याचा, आणि बॉस च्या भावाला गोष्टी सांगण्याचा अलाउन्स मिळतो.
इशा ते मॅन्युअलच पॅकेट
इशा ते मॅन्युअलच पॅकेट उघडायला अशी घाबरत होती की जस काय आत बॉम्बच ठेवलाय...
काहीही म्हणा इशाबाई फारच लकी आहे बॉ! इन्टरव्ह्युशिवाय नोकरी, काम न करता पगारवाढ, एक महिन्याच्या आत लग्नासाठी सुट्टि अन वर ५ लाख
ह्या सगळ्याच्या वरताण लाइन मारायला खुद्द कपनिचा मालक..
प्राजक्ता आणि लग्नाच्या
प्राजक्ता
आणि लग्नाच्या तयारीत काम करायलाही
कोठून मी हिच्याकडे माझे शेड्युलिंग दिले असे विक्रम सरंजामेला वाटत असेल. आठवडाभर स्वतःच्या लग्नाची कामे तिने लावली त्याच्या शेड्युलिंग मधे. लग्नाच्या बैठकीत येउन बसणे, तेल आणणे वगैरे.
प्राजक्ता आणि फारएंड
प्राजक्ता आणि फारएंड
स्कीड्युलिंग
स्कीड्युलिंग हो स्किड्युलिंग
रस्त्यावरच्या भुकेल्या
रस्त्यावरच्या भुकेल्या व्यक्तीला वडापाव देण्याचा प्रसंग किती नाट्यमय करता येतो ते आपण पाहिले. काहीही नाट्यमय नसलेला प्रसंग स्लो मोशन मधे खेचला आणि ट्याव ट्याव म्युझिक बॅकग्राउण्ड ला मारले की प्रसंग आपोआप नाट्यमय होतो. या लॉजिक ने ईशाची आई पोळी कुस्करतानाचा सीन सुद्धा पाच मिनीटे खेचून नाट्यमय होईल.
मुंबईत चाळीत वाढलेल्या माणसाला पोळीचा लाडू माहीत नसतो, हे ही पाहिले.
सरंजामे बहुधा कंपनी नं १४ काढणार लौकरच. दुधाच्या पाकिटांपासून टेबल आणि खुर्च्या बनवायचा कुटिरोद्योग.
विक्रांत सर व ईशा नंतर मंगळसूत्र आणायला गेले आणि काय आश्चर्य! त्या आधीच्या वडापाव सीन मधे बॅकग्राउण्डला चालणारी एक बाई आणि एक माणूस या नंतरच्या सीनमधेही त्या ठिकाणी एक्झॅक्टली तसेच्या तसे चालत गेले बॅकग्राउण्डला!
शेवटच्या सीन मधे विक्रांत आणि ईशा तेथे बोलणार्या कोणाच्या तरी समोर उभे आहेत ना? ते चाळीतले लोक विचारायला येतात त्यांच्या मागे असतात - शेवटी जेव्हा ते लोक उलटे वळतात तेव्हा त्यांना ते समोर दिसतात, तर ईशाच्या आई वडिलांना ते संवाद सुरू असताना कसे दिसत नाहीत? की स्क्रीन मधे आपल्याला दिसत नाहीत म्हणजे त्यांनाही त्या प्रसंगात ते दिसत नाहीत?
स्कीड्युलिंग >>> हो त्या
स्कीड्युलिंग >>>
हो त्या एपिसोड्स मधला तो उच्चार मला नीट आठवत नव्हता.
तुला पाहते रे तुला पाहते
तुला पाहते रे तुला पाहते
जरी आंधळी मी तुला पाहते ☺️
आंधळं कोण आहे असं वाटतंय?
आंधळं कोण आहे असं वाटतंय?
मालक तेल आणतोय.
मालक तेल आणतोय.
CM officeतेल लावत गेलंय
मायरा उडत गेलीये
झेंडे अर्ध्यावर खाली आलाय
जयदीपला काऊचिऊच्या गोष्टीत लपेटलाय....
इशाच बच्चन आहे कथेतली.
सगळेच प्रतिसाद
सगळेच प्रतिसाद

मेधावि, झेंडे अर्ध्यावर खाली
मेधावि, झेंडे अर्ध्यावर खाली आलाय>>> इथे चहा तोंडतुन फिस्कन बाहेर आला असता माझा
मेधावि कहर आहे सारांश
मेधावि
कहर आहे सारांश 
आणि आंधळे आम्हीच सगळे बहुतेक.
आणि आंधळे आम्हीच सगळे बहुतेक...
Pages