Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32
झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
<<,बहुधा तिचे सीन्स आधी
<<,बहुधा तिचे सीन्स आधी टीपिकल सासू-सून मालिकेकरता घरातील फालतू मान अपमानाचे सीन्स म्हणून लिहीले आहेत पण अचान्क ते कॉर्पोरेट वर्ल्ड मधे हलवले आहेत.<<,
हे भारी..
फारेंड मस्त जमले आहे. ते
फारेंड मस्त जमले आहे. ते इशा एका बागेत जाते व फुले घेउन काय संवाद म्हणते स्वतःशीच? व चार दिवे वर टांगले आहेत. दिग्दर्शक स्वतःला अनुराग कश्यपच समजतो जणू. इशाचा अॅक्सेंट टिपिकल ठाण्याचा आहे.
फारएण्ड यांची अ नि अ मालिका
फारएण्ड यांची अ नि अ मालिका रसग्रहणात दमदार एन्ट्री...
:टाळ्या: :शिट्ट्या:
धन्यवाद
सस्मित - एकूणच आविर्भावावरून वाटले तसे. आवाज नाही स्पेसिफिकली.
चार दिवे वर टांगले आहेत. >> हो अमा, तो "कंदील का बदला कंदील से" सीन आहे. सुभा म्हणतोय लेको तुम्ही मला जेवायला बोलावून वेळीअवेळी कंदील लावता काय? मी पण तुला बागेत भर दुपारी बोलावून तेथे कंदील टांगतो.
हे असले अगम्य डेकोरेशन तेलुगू चित्रपटांत श्रीमंती दाखवताना पाहिले आहे. मराठीतही लागण झालेली दिसते.
फारएण्ड
फारएण्ड
इशाने माबो वाचल वाटत. तिने चक्क विक्रान्तची कार नाकारली.
सुबोध किती सहज अभिनय करतो, आईसमोर जेव्हा ती लग्नाचा विषय काढते तेव्हा त्याचा चेहरा उदास दुःखी होतो , हातातून निसटल्याची भावना जी आहे ती किती सहजपणे दाखवलीय त्याने। त्याचं इशावर प्रेम आहे पण ती त्याला मिळू शकणार नाही हेही त्याला माहित आहे पण हे सगळं आईला सांगता येत नाही। ही मनातली खळबळ चेहऱ्यावर दाखवणे तेही 5 मि.च्या शॉटमधे! जबरदस्त काम केलंय त्याने। >>>> +++++११११११
ते इशा एका बागेत जाते व फुले
ते इशा एका बागेत जाते व फुले घेउन काय संवाद म्हणते स्वतःशीच? >>>> नैतर काय? एवढच म्हणायच ना की, "अच्छा, म्हणजे स्वारीने हया साठी बोलावलय तर. फायनली तुम्हाला माझ्या मनातल कळलच." ते गुलाबाच फुल, प्रेम हयावर भाषण करायची गरज नव्हती.
'मी इथेच आहे, इशा' म्हणत सुभाची जी एन्ट्री झाली ती कातिल होती.
चार दिवे वर टांगले आहेत. हे असले अगम्य डेकोरेशन तेलुगू चित्रपटांत श्रीमंती दाखवताना पाहिले आहे. मराठीतही लागण झालेली दिसते. >>>> मला आवडले ते कंदील. पण ते दुपारी लावले आहेत.
बादवे, आई जेव्हा विक्रान्तला इशा विषयी लग्नाच्या सन्दर्भात विचारते, आणि ते त्यालाही माहितीये. मग तो तिला हे का नाही सान्गत की, "हे बघ, हे शक्य नाही. आम्हा दोघान्मध्ये वयाच खुप अन्तर आहे. २० वर्षान्नी लहान आहे ती. "
तिच्या बाबांचे बोलणे ऐकताना
तिच्या बाबांचे बोलणे ऐकताना मला नेहमी नवाजुद्दिन सिद्दिकी चा भास होतो >>>> मला तर जानूबाईच्या बाबांचा भास होतो.
सुभा ला सुवर्णयुग आणायचे आहे, तुम्ही त्याला पितळयुगाकडे वाटचाल अस्ल्याची जाणिव करून देत आहात ? ! >>>>>
आपल्याला वाटतय की सुभाची काही तरी मजबुरी असेल म्हणून त्याने हि सिरीयल स्वीकारली असेल. पण महाशय स्वतःच निलेश मयेकरकडे गेले होते, 'सतत चित्रपट करुन बोर झालोय, एखादी सिरियल असेल तर मला सान्गा.' असे म्हणाले म्हणे.
सिरीयलमुळे प्रसिद्धी आणि पैसा
सिरीयलमुळे प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही जास्त मिळतो आणि प्रेक्षकांना चांगला अभिनय बघायला मिळतो. सु भा आवडत असला तरी मी बघत नाही ही गोष्ट वेगळी.
फारेंड यांचा आई, सु भा संवाद लाजवाब
फारएण्ड
फारएण्ड

डायरेक्टर आणि लेखक दोघांना
डायरेक्टर आणि लेखक दोघांना 'तुला पाहते रे' चे एपिसोड दिवसातून दोनदा बघायला लावले पाहिजे..आपोआप जरा बरे कामं करतील..
सुबोध भावे चांगलं काम करत असला तरी दुर्बोध ईशा किती काळ सहन होणार?
त्या इशामुळे तर मी बघू शकत
त्या इशामुळे तर मी बघू शकत नाहीये, मला नायक नायिका दोघे अपील व्हायला लागतात
, एकासाठी बाकी नाही सहन करू शकत, तिचे बाबाही अशक्य डोक्यात गेले माझ्या. लाचार, ह्याला त्याला हात जोडणारे. मी नाही बघू शकत. अनेक वर्ष बालपणाची कनिष्ठ मध्यमवर्गात दीड खोलीत राहूनही अशी लाचार वृत्ती बघितलेली आठवत नाही, सगळीच माणसे स्वस्वाभिमान जपत राहणारी बघितली आहेत त्यामुळे ते जास्तच डोक्यात गेलं.
मुळात सुभाला ती आवडलीच कशी?
मुळात सुभाला ती आवडलीच कशी? वडील मुली इतकं अंतर असताना.
मुळात ईशाला ते म्हातारडं का
मुळात ईशाला ते म्हातारडं का आवडलं हेच कळत नाही.. असो.. त्यांना एकमेकांना आवडले म्हणुन इतर कलाकार, लेखक, निर्माता, दिग्दर्शक, स्पॉटबॉईज ई..ई.. जणांचे संसार चालतायत..
अर्रे म्हातारडं काय? प्लीजच.
अर्रे म्हातारडं काय? प्लीजच. सुबोध भावे किती हँडसम आहे. अगदी ४५ वय दाखवलं तरी हल्ली ४०-४५ म्हणजे म्हातारा गणला जात नाही, आधीसारखं. बादवे, इथे इशाचे बाबा कोणाला कोणासारखे तरी वाटतात. मला विजय चव्हाण ने चष्मा लावल्यावर कसे दिसतील तसे वाटले.
अवांतरः आजच न्यूज वाचली की अनुप जलोटा डेटींग करतोय जी मुलगी त्याच्यापेक्षा ३७ वर्षांनी लहान आहे.
>>अर्रे म्हातारडं काय? प्लीजच
>>अर्रे म्हातारडं काय? प्लीजच. सुबोध भावे किती हँडसम आहे. अगदी ४५ वय दाखवलं तरी हल्ली ४०-४५ म्हणजे म्हातारा गणला<< अहो पण ईशा किती कोवळी पोर आहे...
आता हा तिचा दोष तिला
आता हा तिचा दोष तिला वयापेक्षा डबल माणूस आवडला. तिच्या वयाचे लोकं काय पेंड खायला गेले का?
ती इशा अजून मोठी झाली की
ती इशा अजून मोठी झाली की तिच्या आईसारखीच "हुकलेली" होण्याचं पोटेन्शिअल बाळगून आहे.. तेव्हा वेळीच सांभाळ हो पोरा
बादवे, असं झालंच तर जयदीप जास्त शोभेल तिला.
कोवळी पोर ! हाहा अहो 22ची तरी
कोवळी पोर ! हाहा अहो 22ची तरी असेलच कि। आणि सुबोध चा मेकप जास्त वयाचा केलाय। त्याची कायतरी हिस्टरी असणार जी अजून दाखवली नाहीये। btw जर विक्रांत एवढा हँडसम आणि mature माणूस मिळणार असेल तर इशा ला तिच्या वयाचा मुलगा कशाला पायजे असेल!
विरोधाभासासाठी तिला
विरोधाभासासाठी तिला अट्टहासाने जास्त बालीशपणा करायला लावतायत्. त्यानं ती बालीश न वाटता मंद वाटतिये.
तो "कंदील का बदला कंदील से" >
तो "कंदील का बदला कंदील से" >>>

सुभा आणी आई सवान्द>>
कंदिल का बदला कंदिल से'..
कंदिल का बदला कंदिल से'..
खरंच हुकलेली आहे ती इशा...
खरंच हुकलेली आहे ती इशा....कोणीतरी इथे शब्द वापरला होता ना "अभिनय दारिद्र्यता".... हाच शब्द आहे बरोब्बर आहे तिच्यासाठी.... आणि ती एकटी असताना बागेत जे काही बरळत होती त्यावरून तिला अजून कॅमेरा कसा फेस करायचा ते कळत नाही का काय असं वाटतं... आणि तो निघून गेल्यावर ती जे काय रडून भेकून बोलली तेव्हा तर मला कान आणि डोळे बंद करावेसे वाटले....अरे दुसरी घ्या रे कोणीतरी .... किंवा सुबोध भावेने स्वतः मालिका सोडली तर मग प्रश्नच मिटला...ही बालमालिका स्कीप....
सुभाला माहित आहेे ना डेली सोप
सुभाला माहित आहेे ना डेली सोप किती दिवस नाही नाही वर्ष चालते ते. त्याने रूद्रमसारखी एखादी तीन महिन्यात संपणारी मिनी मालिका करायला हवी होती. ईशा फारच चालू वाटते, सरळ प्रेम वगैरे. तिच्या वयाच्या आजकालच्या मुली करिअरचा विचार करतात, नोकरी करून वडिलांचं दुकान सोडवेल का काय, काही नाही, सरळ मोठा मासा गळाला लावायचा. सुभा फारच साधा दाखवला आहे, एवढा अनुभव असलेली माणसं पोचलेली असतात, ते असल्या पोरींकडे टाईमपास म्हणून बघतात.
तो निघून गेल्यावर ती जे काय
तो निघून गेल्यावर ती जे काय रडून भेकून बोलली तेव्हा तर मला कान आणि डोळे बंद करावेसे वाटले..>>अगदी. ईशाबाळने भोकाड पसरले!
विकीतरी खडे टाकत बोलल्यासारखे का बोलत होता. .........वचन दे...... तुला विचारायचे आहे....लग्नाचे. मग शेवटी आईने सांगितलेल्या मुलाशी
इशा एवढी प्रेमात पडलीपण
इशा एवढी प्रेमात पडलीपण त्याच्या. दुसरा भाग बघितला तेव्हा काका, काका करत होती.
>>विकीतरी खडे टाकत
>>विकीतरी खडे टाकत बोलल्यासारखे का बोलत होता. >>>

हा हा... अहो त्या खादाड केड्याचे प्रताप..दुसरं काय... पण विकी ऍटलीस्ट अभिनय तरी चांगला करतो....दिसतो तर चांगलाच.. ही स्लो मोशन बया तर दिसायला पण यथा तथा आणि अभिनय तर काय खुलता कळी खुलेनाच्या मानसी च्या तोंडात मारेल असा... गालावर खळ्या फक्त याच अटींवर दोघींना घेतलं होतं की काय देव जाणे..
त्याने रूद्रमसारखी एखादी तीन
त्याने रूद्रमसारखी एखादी तीन महिन्यात संपणारी मिनी मालिका करायला हवी होती. >>> खरं आहे.
कंदिल का बदला कंदिल से >>>
कंदिल का बदला कंदिल से >>>
त्याने रूद्रमसारखी एखादी तीन महिन्यात संपणारी मिनी मालिका करायला हवी होती >>> मी लग्गेच किरण करमरकरच्या जागी सु.भा.ला ठेवून पाहिलं... सु.भा.नेही ती भूमिका तितकीच छान केली असती.
पण कि. क. तो कि.क. च
पण कि. क. तो कि.क. च
ते बेअरिंग वेगळे आहे
तिथे सुभा मला नसता पटला.
मी माझे मत सुभा च्या "रानभुल" चित्रपटावरून बनवले आहे.
फारएण्ड साॅलिड हां !!
फारएण्ड साॅलिड हां !!
Pages