तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

ईशाबाळाने भोकाड पसरले!... Biggrin
मलाही अगदी हेच वाटलेले.........
खूपच अननुभवी नटी घेतली आहे ही ! सुबोध म्हणजे अगदी टॅलंटेड, उत्कृष्ट कलाकार आणि बाकी सगळे..........गरीबी हटाव......!!!

मला दोघांची कामं आणि आई-वडिलांचं काम आवडतंय. मी रोज बघत नाही. जमेल तसं बघते. इथे नावं ठेवतात असं काही मला सिरीयल मध्ये सापडत नाहीये. सगळ्या मुलींनी करियरिस्ट पाहिजे असा अट्टहास का? तिची बसमधली स्वप्न छोटीच आहेत दहा हजाराची नोकरी करायची आणि आई- बाबांना आनंदी ठेवायचं. आता तिला तो आवडतोय मग तिने कसं वागायला हवं! आईबाबची एकुलती एक आहे; तिच्या इच्छा, हट्ट रडून पूर्ण होत असतील! म्हणून तिला रडायचं माहीत तो तिचं म्हणणं ऐकायला थाम्बत नाही तर! मी आजूबाजूच्या कथा, संवाद पळवते.

सुबोधला मालिकाच करायची होती तरी हरकत नव्हती पण मग ती जरा त्याला साजेशा दर्जाची तरी करायची अशी बाळबोध मालिका का केली कुणास ठाऊक? त्याच्या अभिनय क्षमतेला वाव देणारी हवी होती जशी मुक्ताने रुद्रम केली . काही कलाकारांना त्यांचा योग्यतेपेकश्या हलक्या भूमिकेत अगदी पाहवत नाही असो.
बाकी झी वाल्याना चांगल्या नायिका (अभिनयाच्या दृष्टीने)मिळत नाही बहुदा, आधी गौरी मानसी मग मीरा न आता इशाबाळ.

सगळ्या मुलींनी करियरिस्ट पाहिजे असा अट्टहास का? तिची बसमधली स्वप्न छोटीच आहेत दहा हजाराची नोकरी करायची आणि आई- बाबांना आनंदी ठेवायचं. >> आईबाबांच्या डोक्यावरचं सगळं कर्ज फेडायचं, बाबांनी विकलेलं साड्यांच दुकान परत विकत घेऊन बाबांना द्यायचं, आईच्या हौशीमौजी पुरवायच्या हे सगळं मुंबईत महिना ₹ 10,000 च्या नोकरीत कसं काय जमवणार ईशाबाळ. Uhoh
त्यासाठी तिने करियरिस्टचं असायला पाहिजे.

मला इतक्यात लग्नच करायचं नाही, तुमची सगळी स्वप्न पूर्ण करायचीत हेही बोलली होती की मागे ती.

सुबोध म्हणजे अगदी टॅलंटेड, उत्कृष्ट कलाकार आणि बाकी सगळे..........गरीबी हटाव......!!!>> +१. चिंचे. Biggrin

कंदिल का बदला कंदिल से >> Lol

आईबाबांच्या डोक्यावरचं सगळं कर्ज फेडायचं, बाबांनी विकलेलं साड्यांच दुकान परत विकत घेऊन बाबांना द्यायचं, आईच्या हौशीमौजी पुरवायच्या हे सगळं>>>>> करोडोंची उलाढाल असलेल्या कम्पनीच्या मालकाशी लग्न करुन पुर्ण करणार इशाबाळ Happy

सस्मित नैतर काय, वयाने एवढ्या मोठ्या माणसाच्या मोजून तीन दिवसांत प्रेमात पडायला हे एकमेव कारण असू शकतं. Happy

सगळच खुपच फास्ट दाखवताहेत.
जरा एकमेकांबद्दल काही वाटतंय की काहीच नाही ह्या संभ्रमातले गोगोड सीन चालले असते आम्हाला.
आम्ही पण सुभाला, त्याच्या लाजण्या मुरडण्याच्या, प्रेमात पडण्याचा अभिनय बघुन खुश झाले असतो जरा. Happy
हे म्हणजे झटक्यात प्रेम झटक्यात लग्न पण होणारे.
ते पण ही गळेपडु पणा करतेय असंच वाटतंय.

मला इतक्यात लग्नच करायचं नाही, तुमची सगळी स्वप्न पूर्ण करायचीत हेही बोलली होती की मागे ती.>>> जौदे ग निधी विसरली असेल. Wink

जौदे ग निधी विसरली असेल. >>> Lol

याच नाही पण काही सिरियल रेग्यूलर पाहिल्या की असली 180 च्या अंशात फिरलेली कॅरेक्टर लगेच लक्षात येतात.

केड्याच्या शिरेलीतच अशी कॅरेक्टर/प्रसंग फार जाणवण्याएवढी / ढे लक्षात येतात. कारण अगदी दोन-चार भागांच्या अंतराने त्याची कॅरेक्टर अगदी विरुद्ध स्टँड घेताना दिसतात. मग पटकन वाटतं, 'अर्रे, परवाच्याच भागात हा माणूस जे बोलला ते इतक्यात विसरला पण? आता अगदीच विरुद्ध बोलतोय. ' मग ते कॅरेक्टर आणि केड्या दोघंही माझ्या डोक्यात जातात.
(मी सतत त्याच्या मागे लागल्यासारख्या चुका काढतेय असं तुम्हा लोकांना वाटेल पण कोणतंच कॅरेक्टर अगदी ठाम उभं नाही करता येत त्याला. काहीही दाखवत असतो अगदी.)

दहा हजार पगार असणाऱ्या लोकांनी गतवैभव परत मिळवण्याची आणि आईवडिलांना सुखात ठेवायची स्वप्न बघू नाहीत असं थोडीच. कासव शर्यत जिंकला हे विसरायला नको. इशाच शिक्षण काय ते कळाले नाही पण highly इन demand, well paid क्षेत्रात शिक्षण घेत असावी असं काही वाटलं नाही, भाषण भाग पाहिला होता.
मला त्यांची भेट आणि तिचं एक दिवस कॉलेजमध्ये आणि लगेच दुसऱ्या दिवशी नोकरी हे वगळता बाकी काही प्रॉब्लेम वाटत नाही, स्टोरी लाईन मध्ये.

आत्ता नव्हतंच करायचं लग्न पण आता आवडला तो, काय करणार म्हणून करते लग्नाचा विचार Happy शिवाय तिला लग्न करायचं नसलं तरी आई लावून देणारच आहे मग निदान आवडलेल्या माणसाशी !

तुम्हाला तुमच्या ऑफिस मधल्या ज्युनियर एम्प्लॉयीला घरच्यांचे ऐकून लग्नाचा सल्ला द्यायचा आहे. तर योग्य वेळ व जागा कोणती?
- ऑफिसात रेग्युलर दिवशी १:१ चर्चेस बोलावून बाकी लाइफ मधे काय चालले आहे वगैरे विचारून विषय काढणे, घरच्यांनी केलेली विनंती व स्वतःचा सल्ला सांगणे
- तिच्या घरी जाउन तिच्या घरच्यांच्याबरोबरच हे सांगणे
- रविवारी सुट्टीच्या दिवशी एका बागेत बोलावून सो-कॉल्ड रोमॅण्टिक सेट अप करून, वरती नेहमीचे कंदील, डेकोरेशन चे लॅण्टर्न्स, सर्व प्रकारची फुले वगैरे लावून तिला तेथे इम्प्रेस करणे. मग बरेच आढेवेढे घेत तिला हा वडीलकीच्या नात्यातून सल्ला देतोय की स्वतःच प्रपोज करतोय याबद्दल शेवटपर्यंत सस्पेन्स मधे ठेवणे

विक्रांत साहेब यातला कोणता मार्ग निवडतात ते आपण पाहिलेच.

आई वडील आल्यामुळ सध्या ही सिरिअल बघितली जातीये. मला तरी ते वयातला फरक वगैरे च इतक काही वाटल नाही. मुळात स्टोरी लाईन ती आहे त्यामुळ ठिक आहे. ते दोघ एकमेकांच्या प्रेमात कसे पडत जातात , त्यांच्या वयातल्या फरकामुळ होणार्‍या गंमती जमती (उदा गाण्याची चॉईस, फेव्हरेट मुव्ही वगैरेतला फरक ) वगैरे दाखविता आल असतं. मजा आली असती बघायला. पण ती अपेक्षा बहुदा जास्त आहे माझी. असो.

पण सगळेजण अस नाटकात बोलल्यासारख का बोलतात ? आणि कर्पोरेट वल्ड मधला माणुस इतका असा कुणालाही लग्न करण्याचा सल्ला कसा काय देतो? आमच्या व्हिपी बरोबर अर्ध्या तासाच्या मीटिंग ठेवायची म्हटल तर आम्हाला टाईम ब्लॉक करू पर्यंत नाकी नऊ येतात कारण इतक कॅलेंडर डबल ट्रिपल बुक्ड असत! तिथे त्या हिरॉईनची आई कंपनीच्या हेडला बास्केट घेवून भेटायला वगैरे कशी येवू शकते ?
आली तरी तो इतका अघळ पघळ गप्पा मारू शकतो ?

दहा हजार पगार असणाऱ्या लोकांनी गतवैभव परत मिळवण्याची आणि आईवडिलांना सुखात ठेवायची स्वप्न बघू नाहीत असं थोडीच. कासव शर्यत जिंकला हे विसरायला नको. >> ओ मी स्वप्न बघू नयेत असं नाही म्हटलेलं. ती महिना ₹10,000 मध्ये पूर्ण होऊ शकत नाहीत असं म्हणाले मी.

ऑफिसात रेग्युलर दिवशी १:१ चर्चेस बोलावून बाकी लाइफ मधे काय चालले आहे वगैरे विचारून विषय काढणे, घरच्यांनी केलेली विनंती व स्वतःचा सल्ला सांगणे>>
फारेंड , लोल.

इशाची आई प्रत्येक वाक्याची सुरुवात "अगंबाई" नं करते ते ऐकू येताना हगंबाई येतंय असं कोणी सांगेल का तिला?

अरे कळेल तिला की दहा हजारात काही होत नाही ते ! ती विद्यार्थिनी आहे / होती ना तेव्हा. मी मधले बरेच भाग स्कीप केलेत सो ते दोघे काल बागेत कसे पोचले पाहिलं नाहीये. बाकी मला रिअल लाईफ आणि त्याचे प्रॉब्लेम बघायची काय गरज! ते तर आपण सगळेच जगतो. मला परीकथा आवडतात / चालतात Happy वेळ / पैसे घालवून मी काही same old reality लहान- मोठ्या कोणत्याच पडद्यावर बघणार नाही.

बाकी, कोणे एकेकाळी बॅंकेतील प्यून बरेच महिने कामावर न आल्याने त्याला काढायची पुर्ण hr प्रोसेस झाल्यावर, मुलाची नोकरी जाऊ नये म्हणून त्या प्युनची आई बँकेच्या MD ला विनंती (अक्षरशः पाय धरुन) करायला आलेली आणि बँकेच्या MD नि appointment इत्यादी काही विचार न करता त्या निरक्षर आईला लगेच भेट मान्य केल्याचे पाहिले आहे. त्या बाईच्या *आईच्या* विनंती ला मान देऊन अजून कालावधी पण दिला. बँकेत दूरच्या शाखेत काम करणाऱ्या क्लार्कच्या लग्नाचे बोलावणे करायला आई-वडील यायचे तेव्हा पण MD भेट घ्यायचे, शक्य तितके न ताटकळवता. बाकी इथे तरी प्रेग्नन्सी treatment/ miscarriage/ divorce अश्या व्यक्तिगत गोष्टी reporting बॉस शी नोकरीमुळे (part अँड parcel) discuss होतात, इन hr presence whereever required. इशाच reporting बॉस कोण ते बघीतलं नाही.

सिनेमा, नाटकात तसं पण प्रत्येक गोष्ट नेहमीच loud दाखवतात ना!

एक -दोन शंका - आईसाहेब चांगल्या का वाईट?
आज एक रूम बंद करताना दाखवलं ते काये?

निकी अनेजा आणि वरूण बडोलाची याविषयावर मालिका पूर्वी आली होती. अस्तित्व नाव होतं बहुतेक. निकी डाॅक्टर असते आणि वरूणपेक्षा मोठी असते वयाने. हर्ष छाया (डोळ्यात बदाम) पण होता आणि भैरवी रायचुरा त्याची बायको असते. रेशम टिपणीस कामवाली असते (चुभूद्याघ्या). मालिका फार सुंदर होती.

आज पुभामध्ये तो शिपाई बोलवायला येतो तेव्हा ईशा चक्क झोपलेली असते टेबलावर डोकं ठेवून Uhoh

रेशम टिपणीस कामवाली असते (चुभूद्याघ्या). >> हर्षदा खानविलकर होती. सगुणा होते तिचे नाव . अस्तित्व एक प्रेमकथा सिरीयलचे नाव. सिरीयल छान होती.
तुपारे मधल्या आठवड्यात बघितली नाही पण इथले अपडेट्स नियमितपणे वाचते. फारेंड, जय-मौसी संवाद मस्त होता.

हर्ष छाया (डोळ्यात बदाम) पण होता आणि भैरवी रायचुरा त्याची बायको असते.>> हर्ष छायाचा घटस्पोट होण्याआधी त्यांची बायको शेफाली छाया ( आताची शेफाली शाह) होती.

आज पुभामध्ये तो शिपाई बोलवायला येतो तेव्हा ईशा चक्क झोपलेली असते टेबलावर डोकं ठेवून >>> इशा एकतर झोपलेली असते किंवा भोकाड पसरुन रडत असते.

Pages