तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

इशा बहुतेक कादंबर्या चाऊन खाते सकाळी नाश्त्याला. पुस्तकी वाक्य फेकल्याशिवाय ( तीही अति slow आणि ढगात बघून) गप्पच बसत नाही पोरगी.

( तीही अति slow आणि ढगात बघून) >>> Lol महान. टीव्हीला जर एखादे हॅण्डल असते सीन्स जोरात पळवण्याचे तर ते फिरवून फिरवून हात दुखले असते.

मी पाहिलेल्या ४-५ भागांत इशाला अजून कसलेही काम करताना पाहिले नाही. अर्थात मायरालाही आपण एखाद्या घरातील नाट्यात सासू-सून-गिरी करत नसून एका मोठ्या इण्डस्ट्री ग्रूप च्या हेड ऑफिस मधे काम करत आहोत हे लक्षात आलेले दिसत नाही. एकता कपूर सिरीज मधे एखादी मत्सरी स्त्री जशी वागते तशीच तिचा आविर्भाव दिसतो. ती ज्या लेव्हलचा अ‍ॅक्सेस असलेली आहे वगैरे वल्गना करते ते जर खरे असेल तर तिच्यापुढे इशा अगदी अजिबात दखल न घेण्यासारखी व्यक्ती असायला हवी.

झेंडेचे पात्र जर व्यवस्थित लिहीले तर मस्त होउ शकते. तो अभिनेता कामही छान करतो. "आमच्या गावात..." वाले वन लायनर लोकप्रिय होउ शकतात नीट वापरले तर. कॉर्पोरेट कल्चर मधे मुखवटे घालून फिरणार्‍यांमधे बॉस शी थेट कनेक्शन असलेला पण कॉमन सेन्स वापरून असे वन लायनर टाकत मार्मिक बोलणारा आणि बॉस ला जमिनीवर ठेवणारा मित्र-सहकारी हा खरेतर परफेक्ट मसाला आहे अशा कथेत. पण इथे तो खूप इफेक्टिव्ह वापरलेला नाही.

सोनिया नाही sawnya!! रिच चॉकलेट लाडू, 30000ची साडी, sawnya चा गेटप्, विक्रांतची हेलिकॉप्टरमधून एन्ट्री सगळं फिल्मी पण सॉल्लिड गंडलेलं आहे.
मला त्याचं घर, देवीची पूजा आणि विक्रांत एवढे आवडले बस्। इशा विक्रांतचं लग्न झाल्यावर इशाची आई काय गोंधळ घालेल विक्रांतचं घर बघून ह्या कल्पनेनेच मला कसंसं झालं . विक्रांतचं लग्न व्हावं म्हणून एवढी पूजा केली म्हंजे तो सिंगल आहे पण मग त्या खोलीत काय आहे सस्पेन्स??

मला तर बघवणार नाही इशाबाळाची आणि विक्रांत ची जोडी!! तिच्या जागी एखादं स्ट्रॉंग character असतं आणि गुडीगुडी न वागता ठाम राहणारी मुलगी असती तर बघवलं असतं. सुबोध काय रुबाबदार दिसतो आणि पोट पण मुद्दाम वाढवलंय वाटतंय रोल साठी परफेक्त कॅच केलाय त्याने रोल.

४००
आता बाहूबली विसरून क्रश सुभा कडे वळलेला दिसतोय एकंदरीत भगिनीवर्गाचा.
प्रभास एपिसोड नंतर माबोवर एवढे फोटो येणारा सुभाच.

"सवत माझी लाडकी" सिनेमानंतर आकर्षक मध्यमवयीन स्त्रीयांना (पक्षी काकवांना) "मलई बर्फीचा टुकडा " अशी उपमा दिली जात असे.

आता याला काय म्हणावे? "खव्याचा लाडू"?

धन्स वेडोबा. तुम्ही टाकलेले सुभा बायकोला शेअर करून पाॅझिटीव्ह क्रेडिट पाॅईंट्स मिळवून ठेवतोय. देतुभक (इती देव तुमचे भले करो.)

आई गं ... कसले एक से एक कातील फोटो आहेत सुभाचे ... आज स्वप्नात नक्की येणार सुभा ☺

मला वाटतं मायरालापण आवडतो विक्रांत..
काल नाही का झेंडे म्हणाले , एकदा इशा बिपीनसोबत लग्न करून गेली की तुझा रस्ता क्लियर.... कसली खुश झाली ती तेव्हा !!!

झेंडेचे पात्र जर व्यवस्थित लिहीले तर मस्त होउ शकते. >>> अगदी !!

इन फॅक्ट, ही मालिका सुरू होण्याच्या आदल्या दिवशी लोकसत्ता आणि म.टा. दोन्हींच्या पहिल्या पानांवर मोठ्या जाहिराती आल्या होत्या. त्यात `मी विक्रम सरंजामे...' अशी सुरूवात करून एक मोठा मोनोलॉग होता. चाळीशीनंतर प्रेमात पडणे, दोघांच्या वयात खूप अंतर असणे, त्याला किती महत्त्व द्यायचं, अशा सगळ्या मुद्द्यांवरचे त्यातले विचार प्रत्यक्ष मालिकेच्या तुलनेत बरेच वरच्या लेवलचे आणि मॅच्युअर्ड होते. ते वाचून वाटलं, अरे, बर्‍यापैकी विचार केलाय की विषयाचा; म्हणून खरंतर मी मालिका बघायला सुरूवात केली होती.

आता असं वाटतंय, की तो जाहिरात मजकूर लिहिणारी व्यक्ती वेगळीच असणार. त्या व्यक्तीला `चाळीशी पार केलेला श्रीमंत नायक', `विशीतली नायिका', `प्रेमकथा' इतकेच लीड्स दिले गेले असणार. `झी ची मराठी मालिका' हे त्याच्यापासून लपवून ठेवलं गेलं असणार! Proud

मी फक्त ह्या सिरियलचा पहिला भाग बघितला,नन्तर थेट ती इशाची आई विक्रान्तला जेवणासाठी बोलावते तिथून परत बघायला सुरुवात केली. सो, तो विकिच्या सायको भावाला बघितल नव्हत आजपर्यन्त. तो पुजेला बसलेला मुलगा, तोच आहे का सायको जयदीप? मला तरी तो नॉर्मला वाटला बघताना, फक्त तो मान हलवतो तो भाग सोडून.

विक्रांतची हेलिकॉप्टरमधून एन्ट्री >>>> मला वाटल, आता त्याच 'कभी खुशी कभी गम' स्टाईल स्वागत होईल की काय त्याच्या आईकडून. Lol

त्या खोलीत काय आहे सस्पेन्स?? >>> त्या खोलीत त्याच्या पहिल्या बायकोच्या आठवणी असतील

तिच्या जागी एखादं स्ट्रॉंग character असतं आणि गुडीगुडी न वागता ठाम राहणारी मुलगी असती तर बघवलं असतं. >>> अगदी अगदी. खर तर अस दाखवायला हव होत. सुरुवातीला नायिकेची ग्रे शेडेड व्यक्तीरेखा असते. म्हणजे ती विक्रान्तला गटवण्यासाठी सतत प्रयत्न करत असते. ती त्याच्यासमोर निरागसपणाच नाटक करते. त्याच्या पहिल्या बायकोबद्दलची सगळी माहिती तिला असते, आणि तिच्यासारख वागून त्याला इम्प्रेस करते. पण लग्नान्नतर त्याचा स्वभाव, त्याच तिच्यावरच प्रेम पाहून ती बदलते, त्याच्या प्रेमात पडते. मात्र sawnya आणि मायराला ति तिच्या पद्दतीने व्यवस्थित टशन देते. अस दाखवल तर सिरियल पाहणेबल झाली असती.

तिच्या जागी एखादं स्ट्रॉंग character असतं आणि गुडीगुडी न वागता ठाम राहणारी मुलगी असती तर बघवलं असतं. >>> अगदी अगदी. खर तर अस दाखवायला हव होत. सुरुवातीला नायिकेची ग्रे शेडेड व्यक्तीरेखा असते. म्हणजे ती विक्रान्तला गटवण्यासाठी सतत प्रयत्न करत असते. ती त्याच्यासमोर निरागसपणाच नाटक करते. त्याच्या पहिल्या बायकोबद्दलची सगळी माहिती तिला असते, आणि तिच्यासारख वागून त्याला इम्प्रेस करते. पण लग्नान्नतर त्याचा स्वभाव, त्याच तिच्यावरच प्रेम पाहून ती बदलते, त्याच्या प्रेमात पडते. मात्र sawnya आणि मायराला ति तिच्या पद्दतीने व्यवस्थित टशन देते. अस दाखवल तर सिरियल पाहणेबल झाली असती.>>>>
द्या द्या त्या केड्याला प्रेक्षकांना छळायच्या आणखीन आयडिया द्या.

झेंडे थोडीच नायक आहे? तो पाठीराखा आहे विक्रांत चा -इति आईसाहेब। जयदीप पुन्हा खड्ड्यात घालणार विक्रांत ला। गोमूत्रापासून सोनं बनवणारा माणूस तोच आहे गेटवे ऑफ इंडिया वाला Happy

बडे अच्छे लगते है + तुझ्यात जीव रंगला + इतर काही मालिका = तुला पाहते रे
नवीन Submitted by कच्चा लिम्बू on 13 September, 2018 - 21:22
>>>>>>>>>
थोडक्यात भेळ आहे. Happy

'बडे अच्छे...' बरीच चांगली होती हो...आणि मुळात हिरो-हिरोईन लगेच एकमेकांवर लट्टू नव्हते झाले. नंतर झालेला कचरा वगळता ती सिरियल छान होती. इथे सुरुवातच कचर्याने करतायत. Uhoh
(का कुणास ठाऊक पण या सिरियलसाठी कायम हीच स्माईली सूट होते Uhoh )

Pages