तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

सुबोधचे sad looks केवळ अप्रतिम!!! >>>> अगदी अगदी. डोळ्यांत पाणी अन् so many emotions....त्याच्यासाठी माझ्या डोळ्यात बदाम... आणि इशेसाठी डोळ्यावर झापडं...

सकाळची एक पोळी तिघांत खाण्याएवढी काय मजबूरी आलीय ईशा फॅमिलीवर??>> गॅस संपला होता...आणि सिलेंडरसाठी पुर्ण पैसे नव्हते. म्हणून सकाळी केलेली एक पोळीच रात्री खाल्ली... निदान एक-एक वडापाव तरी आणून खायचा.

सकाळची एक पोळी तिघांत खाण्याएवढी काय मजबूरी आलीय ईशा फॅमिलीवर?? --- एकच पोळी भाजल्यावर गॅस गेला ना ! Wink

धन्स सोनाली.

अरे ईशाला जाॅईनिंग बोनस दिलेला त्यातले सर्व पैसे खर्च झाले इतक्यातच?? सगळं देणं, आईचं मंसू सोडवून पण दोन हजाराच्या नोटा शिल्लक होत्या की तिच्याकडे. ते काय झाले???
केड्या विसरला वाटतं.

सकाळची एक पोळी तिघांत>> काय शेजार पाजार नाहीये का ह्यांना? चाळीत रहाताहेत ना?
बरं ते ही नाही तर एखादं रेस्टॉरंट, पोळी भाजी केंद्र पण माहित नाही काय?
ही सिरीयल अत्यंत बिन्डोक आहे. चांगल्या प्लॉट ची माती करण्यात झीचा हातखंडा आहेच.
पण वाईट फक्ट सुभा साठी वाटतंय Happy

हो ना.... सुभा साठी अगदी वाईट वाटतं......
त्याने फक्त सांगावं...... त्या इशा हून दसपट सरस अशा दहाजणी लाईनीत लावीन मी ......!! आणि त्याच्यावर प्रेम करणार्‍या देखिल!

बहुतेक...ईशावरच प्रेम करावं लागतंय म्हणूनही दु:खी भाव असतील डोळ्यांत! Wink

काल जेव्हा मीटिंग मध्ये सुभा तंद्रीत (ईशाच्या विचारात ) मायरा ऐवजी चुकून इशा असं म्हणतो त्यावेळचे त्याचे एक्सप्रेशन्स एकदम भारी .. मस्त अभिनय केला सुभा ने .. आणि तो भेंडे "अरे माती खाल्लीयेस तू विक्रांत" मोड मध्ये ... Lol

तो प्यून झालाय तो दिसायला किती गोड आहे...त्याला प्युन का केलं बरं? तो पण काल झोपला होता डेस्कवर. एकदा इशा एकदा प्युन....चांगली कं. दिसते. Happy

ईशावरच प्रेम करावं लागतंय म्हणूनही दु:खी भाव असतील डोळ्यांत! Wink>> Rofl

चिंचे, या धाग्यावर आल्याचं सार्थक केलंस गं. Happy

झी चे सगळे बायस अगदी पक्के आहेत. आई अळू वडी, पुपो आम्बट वरण करणार. मॉड वहिनी पिझा पास्ता व गार्लिक ब्रेड सर्व एकदमच बनवणार. ते रिजेक्ट झाले. परवा सुभा व्हाइट पठाणी सूट मध्ये मस्तच दिसत होता. तो वॉश घेउन फ्रेश होउन आला तो साबणाचा वास पोचला अगदी. ते पिझा गार्लिक ब्रेड डॉमिनो मधल दिसत होते. कर्जत मध्ये कुठे डिलिव्हरी? आणि त्याबरोबर पास्ता इन व्हाइट सॉस कोण खाते?

मी पण सकाळी बनवलेल्या अडीच पोळ्या व बटाटा काच र्‍या भाजी खात खात बघते आहे.

पुपो आणी आंबट वरण हे काय काँबिनेशन आहे? Proud कटाची आमटी तरी पाहिजे होती. सुभा काटा चमच्याने अळूवडी खात होता Uhoh

मायरा रोज ते एकच पर्पल आयलाईनर लावते का? आता तो कलर भरमसाठ विकला जाणार बाजारात. इशाच्या आईचा अंबाडा किती आर्टिफिशिअल आहे. या सिरिअल मधे फक्त एकच चांगली गोष्ट आहे. Happy

अरे एकदम सरंजामे साहेब गनमास्टर जी-९ झाले!>> ते बघून मला उगाचच रुद्रम मधला मुक्ताचा सीन आठवला. Happy

शेफाली छाया हि हसरते मध्ये सावि ची भूमिका (सगळ्यात शेवटची सावि ) करत होती . जी हर्ष छाया ची खरी पहिली बायको आहे . आणि अस्तित्व एक प्रेम कहाणी मध्ये भैरवी रायचुरा च हर्ष छाया ( डॉक्टर मानस ) च्या बायकोच काम करत होती Happy

गनमास्टर काय प्रकार आहे. सुभाकडे गन आहे का. पास्ता ईन व्हाईट साॅस आणि पिझा एकत्र खात नाहीत का. कर्जतमध्ये पिझाची होम डिलीवरी होत नाही का.
सुभा सध्या फक्त ही मालिका करतोय असं तोच म्हणतोय लोकसत्तेत. तो सतत सरंजामे या पात्राचाच विचार करतोय. त्याच्यासाठी त्याचंच काम महत्वाचं आहे, आजूबाजूला कोण आणि कसं काम करतंय हे त्याच्यासाठी गौण असणार. त्याला कुणावरही प्रेम करायला सांगितलं तरी तो ईमानेईतबारेे मारे डोळ्यात पाणी आणून करणार. त्याचा पर डे खूप जास्त असणार, म्हणूनच ईशासारखी नविन मुलगी घेतली असणार.

Pages