तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

लेडी सखाराम गटणे मोड Lol (म्हणजे ती आता विक्रांत सरांच्या ‘अनुज्ञेनुसार’ लग्नाला तयार होणार आणि घरात साने गुरूजींच्या फोटोशेजारी विक्रांत सरांचा फोटो लावणार.)

अस्तित्व मालिका मी बघायचे. ती मध्येच बंद पडली होती. अर्थात तोपर्यंत डिरेलही झाली होती. त्यामुळे फारसं वाईट वाटलं नाही.

कुणाला मोहनिष बहेल ची कूछ तो लोग कहेंगे आठवत नाहीये का. अशीच स्टोरी होती.सुरवात छानच होती..शेवटी शेवटी भरकटली आणि मी बंद केलं बघणं..ती ऍक्टरेस नवीन होती पण ईशा पेक्षा खूपच चांगला अभिनय होता तिचा. त्यांची प्रेमात पडेपर्यंतची स्टोरी तर खूपच क्यूट होती

>>त्या हिरोइणीचे कुर्ते मस्त असायचे.<< वाचलं आणि खु.क.खु. मधल्या डॉ. मानसी चे कुर्ते आठवले.. काय भयानक कुर्ते वापरले तिने मालिका संपेपर्यंत.. Uhoh

अस्तित्व मालिका मी बघायचे. >>>>> ह्या मालिकेवरुन 'राधा हि बावरी' हि सिरियल काढली होती.

ती हिरवीण डिट्टो माधुरी दिसायची >>>>>>>+++++++१११११ ती सिरियल्स मध्ये येण्याआधी, अनिल कपूरच्या मि. आझाद मध्ये त्याची नायिका झाली होती. पोलिसाच काम केल होत तिने त्यात. माधुरी दिक्षितने नकार दिला तेव्हा हिला घेतल. चित्रपटात, गाण्यात, कपडयात, नाचण्यात, अभिनयात ती माधुरीचीच कॉपी करत होती. Happy

आता विक्रांत सरांच्या ‘अनुज्ञेनुसार’ लग्नाला तयार होणार >>>>> झाली ना ती तयार लग्नाला.

म्हणजे ती आता विक्रांत सरांच्या ‘अनुज्ञेनुसार’ लग्नाला तयार होणार आणि घरात साने गुरूजींच्या फोटोशेजारी विक्रांत सरांचा फोटो लावणार. >>> Lol टोटली.

हर्ष छाया मलाही आवडतो.

मोहनीश बहलची आधी बघितलेली, पाकीस्तानी मालिका धुप किनारे वरुन घेतलेली. मुळ मालिका बघितली नाहीये. मोहनीश च्या जागी शरद केळकर आला, तोही आवडतो आणि मोहनीशही क्रित्तीका कामरा पण आवडायची. पण नेहेमीप्रमाणे नंतर मालिका भरकटवली आणि माझे पेशन्स संपले.

मेन अ‍ॅक्ट्रेस नवीन नव्हती, तिची दुसरी का तिसरी मालिका होती. पहीली एकता कपुरची केलेली तिने.

मोहनीश बहलची आधी बघितलेली >>>> ती सिरियल आपल्या मन्दार देवस्थळीने लिहीली का डिरेक्ट केली होती, अस कुठेतरी वाचल होत.

तो सरंजामे तीला काय खायला आणून देतो त्या अ‍ॅड मध्ये? कापसाचा रंगवलेला गोळा पिझ्झाबॉक्समध्ये जास्त चांगला दिसेल त्यापेक्षा Uhoh
आणि ती सून ३००००/- साडी एकदा नेसून फेकून द्यायची!!! हाईट्ट Biggrin

सुबोध आवडतोय पण ईशा काही आवडत नाहीये...कालचा ईशाला समजावून आईसोबत बोलतानाचा सुबोध चा अभिनय नॅचरल वाटला अगदी.

सुबोधचा चेहरा फारच सुजकट वाटला काल. मेकप जरा जास्त झाला बहुतेक.
इशाचा आवाज खूपच ऑनेस्ट वाटतो त्यामुळे ती आवडते पण ती फारच बालिशपणा करते. ते दोन भोवरे प्रकरण पाहून तर हसावं की रडावं कळेना झालंय. म्हणजे ही बया त्याची पहिली बायको असतानाही त्याच्याशी लग्नाचा विचार करतिये ह्याला केडी टच म्हणायचं का?

तो सरंजामे तीला काय खायला आणून देतो त्या अ‍ॅड मध्ये? --> पिझ्झा...
कापसाचा रंगवलेला गोळा पिझ्झाबॉक्समध्ये जास्त चांगला दिसेल त्यापेक्षा Uhoh --->हो ना..
एक चांगला पिझ्झा नाही वापरू शकता का शूटिंग साठी हे लोक..

एक चांगला पिझ्झा नाही वापरू शकता का शूटिंग साठी हे लोक.. >>> लोल.

हम आपके है कौन च्या रिव्यू मधे खालिद मोहम्मद ने ते रेणुका शहाणेचे बाळ "played by a bunch of towels" लिहीले होते ते आठवले Happy

अस्तित्व मधेच बंद झाली होती का,आठवत नाही पण हर्षच्या बायकोला एक माणूस फसवतो. तिला हर्ष आणि निकीचं काहीतरी आहे असं नेहेमी वाटत असतं आणि म्हणूनच ती त्याच्या नादी लागते. शेवटी तो तिला वेश्या बनवतो आणि ती त्याचा खून करते, मग जेलमध्ये जाते. हर्षवर संशय घेतल्याचा पश्चाताप होतो तीला. वाईट होता शेवट.

चंपा, पुढे सिमरनच्या मुलीला लंडनमध्ये कोणी पळवून नेते. मग ती वरूण बडोलाची मुलगी दत्तक घेते असे दाखवले होते. वरुणची दुसरी बायको त्या मुलीला जन्म देऊन मरते,म्हणून सिमरन दत्तक घेऊन तिचे नाव आस्था ठेवते. मग मुली मोठ्या झालेल्या दाखवल्या होत्या. पुढे सिमरनची तिच्या बायोलॉजीकल मुलीशी भेट होते.

अरे बापरे अशी होती अस्तित्व. मला निकी अनेजा, हर्ष आवडायचे पण केबल नव्हती माझ्याकडे तेव्हा, आईकडे गेले की बघायचे. त्यामुळे त्यावेळी बऱ्याच हिंदी मराठी सिरियल्स हुकल्या. आभाळमाया, प्रपंच पण फार कमी बघितल्या.

आॅर्किड- सिमरन कोण. वरूण दुसरं लग्न का करतो. त्याचं लग्न निकीशी झालेलं असतं ना.
तुपारे- बायका एकतर माॅडर्न असतात किंवा काकूबाई असं झीला का वाटतं. हिरवीणी नेहमी काकूबाईच असतात आणि त्या सुगरणच असतात आणि घरी बनवलेलंच खातात ईतकच नाही तर दहा माणसांचा स्वयंपाक त्या एकट्याच करतात. याऊलट माॅडर्न बायकांना पीझाच आवडतो, त्या कधीच घरी केलेलं खात नाहीत आणि तरीही त्या बारीक स्लीम ट्रीम असतात (हे महत्वाचं). झीने हे सीक्रेट डाएट शेअर केलं तर किती बरं होईल.

चंपा, निकी अनेजाचे सिरीयलमधले नाव सिमरन होते. वरुण एका किरण नावाच्या मॉडेलच्या प्रेमात पडतो, म्हणून सिमरन आणि तो वेगळे होतात. मग किरणशीही ब्रेक अप होऊन नेहा नावाच्या मुलीशी लग्न करतो.

धन्स आॅर्किड. एवढी लांबली होती मालिका याची कल्पना नव्हती.
सुबोध कुटंबासह पुण्यातील गणपतींचे दर्शन घ्यायला गेला होता बाईकवर, तोंडाला रूमाल बांधलेला आणि गाॅगल घातलेला. अजून एक व्हिडीओ बघीतला त्याचा, आत्येभावाच्या घरी गेला होता. एटीम मशिन बनवलेलंं आत्येभावाने, गणपतीचं डेकोरेशन म्हणून.

चंपा, पुढे मुली मोठ्या होऊन त्यांचाही लव्ह ट्रँगल दाखवला होता. शेवटी वरुण नेहाची मुलगी मरते बहुतेक. किडनँप प्रकरणानंतर मी प्रोमो पाहून कथेचा ट्रँक ठेवला होता.

सुबोधचे sad looks केवळ अप्रतिम!!! खरंच असं वाटतं एवढं काय बघितलं त्याने इशा मधे एवढ रडकुंडीला यायला Sad

Pages