तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

आज नवीन प्रोमो पाहिला. नवीन एन्ट्री आहे. विकीच्या आईसाहेबान्ची. प्रोमोमध्ये एका बन्द खोलीचा सस्पेन्स दाखवलाय. "आजपर्यन्त मी माझ्या मनात जे गुपित दडवलय ते हया बन्द खोलीत आहे" अस काहीतरी म्हणत होता विकी.

इशाची आई प्रचन्ड इरीटेतिन्ग आहे ती तिअक्डे कट्टि-बट्टी मधे बरि आहे इथ जाम पिळ आहे , सुभा ४२ चा आहे?वाटत नाही ५० चा वाटतो .उगा काय थोराड दिसायच? त्याला जरा वजन कमी करुन अजुन थोड फिट दाखवायला हव होत अर्थात सुभा मुळात बा़ळसेदारच आहे.

निधी वेडोबा माझं लाडाचं नाव आहे म्हणून ते घेतलंय। काय खल्लास दिसतोय आज सुबोध। पाहताय का सगळे आजचा एपिसोड? मायरापण मस्त दिसतेय।

झेंडे आज कसा लाजत होता बघितलं का?मजा आली.
इशा आवडेनाशी झालीये आता, तिच्यापेक्षा मायरा फटकळ असली तरी स्ट्रॉंग आहे, कॉन्फिडन्ट आहे। विक्रांत मायरा जोडी ब्येष्ट।

निधी वेडोबा माझं लाडाचं नाव आहे म्हणून ते घेतलंय>> अगं छान आहे नाव. पण प्रथमदर्शनी मेल आयडीचं नाव वाटलं म्हणून कन्फ्यूजन झालं. Happy

आत्ता तो उंदीर आणि चीज वाला भाग पाहिला. दोघेही कॅप्टन ऑब्व्हियस चा रोल करत होते. "या उंदराला चीज पर्यंत न्यायचे आहे, ते कसे करणार?" "सर, म्हणजे त्या उंदरापासून त्या चीज पर्यंत पोहोचण्याचा किमान एक मार्ग आहे. तो आपल्याला शोधायचाय". वा! ("असे सीद्धे जा शाळेपर्यंत. मग काय लागंल? शाळा" आठवले). मला वाटले इथे थांबेल हा संवाद. पण नाही. "पण तो तुलाच शोधायचाय. यात मी तुझी काही मदत करू शकत नाही" असे सुमारे पाच मिनीटे चालते. तेथे खरा उंदीर असता तर तोपर्यंत चीज घेउन पसारही झाला असता.

ते "दो रूपये..." वाले कात्रण हरवण्याची आणि त्या हापिसातील माणसाने उचलून ठेवण्याची भानगड समजली नाही. ती नसताना एकदोनदा सुभा तिच्या डेस्कपाशी थबकतो तेव्हा तेथेच असते की ते चिकटवलेले.

बाय द वे हे संवाद हिंदीत इमॅजिन करून मराठीत लिहीले आहेत का?
- मी तुझी मदत करू शकत नाही.
- बिपिनला असे करायला नको होते
- माझ्याबरोबर असे का होते नेहमी?

बाय द वे हे संवाद हिंदीत इमॅजिन करून मराठीत लिहीले आहेत का?
- मी तुझी मदत करू शकत नाही.
- बिपिनला असे करायला नको होते
- माझ्याबरोबर असे का होते नेहमी?>>
हल्ली मराठी सिरियलमध्ये असलंच मराठी ऐकू येतं.
अजून एक
- त्याने असं वागायला/करायला नको हवं होतं. Sad

निधी.. Biggrin
एकदम 'हवं नको' झाल्याचं फील आलं................................................!!

मुलीच्या वडिलांनी राजनंदीनी साडी (बाईसाहेबांसाठी म्हणून), सायबांना कशी काय दिली? (मुळात मुद्दलाचाच पत्ता नसताना) हिराॅईनच्या भुवया तिथं का बरं उंचावल्या नाहीत?

एकन्दरीतच निर्बुद्धपणाचा कहर होतोय. ती इशाची आई, मधे मधे डायरेक्ट फोन करुन सुभाला किती त्रास देते!
बरे, कोणता करोडपती इन्डस्ट्रीयालीस्ट ऑफीसमधे ज्युनियर स्टाफला लग्न कर म्हणुन कन्व्हिन्स करण्यासाठी प्रयत्न करेल
आणि ऑफीसमधे त्याची मॉक रिहर्सल घेइल.. ते ही "झेन्डे ही मॅनेजमेन्ट एक्टीव्ह्टी समजा हवे तर"असे म्हणुन. झेन्डे मग इशा बनुन लाजत लाजत येतात आणि प्रश्नोत्तरान्चा तास सुरु होतो.
या दोन -तिन मॅनेजमेन्ट अ‍ॅक्टीव्हिटी/ टास्कच्या नावाखाली जे काय दाखवले ते म्हण्जे खरोखर कै च्या कै होते.
(छ्या.... एकट्या त्या सुभा आणि त्यातल्या त्यात सहनीय झेन्डे- मायरासाठी काय काय सहन करावे लागतय प्रेक्षकान्ना! ! )

खरोखर सुभाची काय मजबुरी आहे हे काही कळत नाहीये.
कलाकारान्ना एखाद्या सिनबद्द्ल दिग्दर्शकाला सुचवता पण येत नाही का?
अर्थात झेन्डेन्ची एक्टीन्ग भारी... मस्त करतात ते. Happy " आणि माझ्याच वयाचा पाहिजे मुलगा' अस म्हणत भारी कटाक्ष टाकतात ते. .. सुभानेही तेव्हा चपापल्याचा चान्गला अभिनय केला.

काल मायरा मॅडम छान दिसत होती साडीत. सुभा तिला कॉम्प्लीमेन्ट पण देतो.

<<सुभाचे डोळे साध्या साध्या प्रसंगांतही पाणावलेले असतात.<< हो, अग्दी हे लिहिणारच होते.
इशाबद्दल विचार करताना फार भावुक होतो तो.
गम्मत म्हण्जे, इतर वेळी, झेन्डे, मायरासोबत छान बोलतो सुभा. आणि
इशासोबत असताना मुद्दाम खर्जात बोलतो की काय असे वाटते. Happy

खरंय.... डोळे पाणावलेले दिसतात.. आणि स्लॅम बुक भरताना पण किती मनापासून खरं खरं लिहीत होता.. उगीच काहीतरी फालतू tp म्हणून नाही भरली त्याने...

त्याला नैसर्गिक ओढ दाखवतायत इशाबाळासाठी. त्यांचं आणि शिल्पाचं लहान बाळ हरवलं नसेल ना कर्जतच्या जत्रेत ?

अजून कॅच अप सुरूच आहे. तो इशा त्याच्याकडे बघत स्वगत बोलत बसते ते फार बोअर झाले. मला असे का वाटत आहे? पण जे वाटत आहे ते खूप छान वाटत आहे. जे वाटत आहे ते छान वाटताना खूप छान वाटत आहे..... सारखी लूप वाली वाक्ये.

आणि इशाने त्या जयदीप समोर खुलासा देताना गणपतीच्या कथेची उपमा वापरणे परफेक्ट होते - असे जरा वाटेपर्यंत तो सीन इतका खेचून बोअर करून टाकला आहे. एकही शब्द न बोलता ओव्हरअ‍ॅक्टिंग कशी करायची ते त्या जयदीप कडून शिकावे. काय माना हलवतो उगाच.

बरे, कोणता करोडपती इन्डस्ट्रीयालीस्ट ऑफीसमधे ज्युनियर स्टाफला लग्न कर म्हणुन कन्व्हिन्स करण्यासाठी प्रयत्न करेल >>>> +++१११११ अगदी अगदी. मायरासुद्दा विचारत होती झेन्डेला, " इशाने लग्न कराव म्हणून विक्रमने का तिला कन्विन्स कराव?" म्हणून

ती ऑफिसमधली बाई आणि मायरा बरोबर बोलली इशाबद्दल, "इथे काही लोक काम करण्यासाठी नाही, तर टाईमपास करण्यासाठी येतात." मायराने चान्गल झापल तिला. पण तिला हे लक्षात येत नाहीये की सर्वात मोठा टाईमपास तर विकी करतोय.

आणि मायराने जरास ओरडल्यावर ही रडते काय लहान बाळासारखी? Uhoh सरळ ओके म्हणून चेहर्यावर बेफिकिरी दाखवत, नाक फुगवत बसाव ना हिने.

होसुमियाघ होणार आहे पुढच्या भागात. तेच ते, सरन्जामे मॅरीड असल्याचा गैरसमज.

मायराच आजच डिनरसुद्दा बोम्बलल. Lol

ती ऑफिसमधली मुलगी म्हणत होती, "कम्पनीच्या माणसान्ची प्रोफाईल्स आहेत पण ती इन्ग्रजी मध्ये आहेत." इशाला इन्ग्रजी येत नाही? Uhoh

एकन्दरीतच निर्बुद्धपणाचा कहर होतोय. ती इशाची आई, मधे मधे डायरेक्ट फोन करुन सुभाला किती त्रास देते!
काल मायरा मॅडम छान दिसत होती साडीत. सुभा तिला कॉम्प्लीमेन्ट पण देतो. >>>> +++++११११११

वेडोबा, कातिल फोटो!!!! Wink

खरं सांगायचं तर ती इशा मला भोळी-भाबडी वाटण्यापेक्षा बावळट जास्त वाटते. वडिलांच्या डोक्यावर इतकं कर्ज आहे, घरची परिस्थिती बिकट, शिक्षण पूर्ण झालेलं नाही, असं सगळं असताना एका मोठ्या कंपनीत चांगली नोकरी मिळाली तर त्या संधीचं सोनं करण्याऐवजी ती डायरेक्ट त्या कंपनीच्या मालकाच्याच प्रेमात पडते? तेही इतक्या पटकन आणि त्याच्याबद्दल पुरेशी माहिती नसतनाही ? तिच्यापेक्षा मला तिची ती मैत्रिणट जास्त प्रॅक्टिकल आणि समजूतदार वाटते. आणि आजच्या युगात कोणती मुलगी अभ्यास, करीअर वगैरे सोडून डायरेक्ट प्रेमाचा विचार करते? खरंच सुबोधची अशी काय मजबुरी आहे की तो झीच्या एकाहून एक बथ्थड मालिकांमध्ये काम करतो? आधी ती पकाऊ दुरावा सीरियल आणि आता ही मालिका.. कहर आहेत कहर.. त्यात ती नायिकेची आई आणि बाबा म्हणजे अ आणिअ आहेत अगदी.. ती आई डायरेक्ट ऑफीसमध्ये आमंत्रण काय घेऊन येते, वेळीअवेळी सुबोधला फोन काय करते? झीवाल्यांना कॉमनसेन्स नावाचा थोडाही प्रकार माहितीच नाहीये का?

Pages