तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

बडे अच्छे...' बरीच चांगली होती हो...आणि मुळात हिरो-हिरोईन लगेच एकमेकांवर लट्टू नव्हते झाले. नंतर झालेला कचरा वगळता ती सिरियल छान होती. >> बडे अच्छे छानच होती.. पण मला आजचा एपिसोड बघताना वाटलं की कदाचित विक्रांत आईसाहेबांचा सावत्र मुलगा आहे...
इथे मला बडे अच्छे शी साम्य वाटलं..
बाकी तुझ्यात जीव रंगला ची शहरी आवृत्ती आहे ही मालिका.. (वय वगळता).. धाकटी सून घरात आली आहे. तिचे पप्पा श्रीमंत आहेत..त्याचा तिला माज आहेआणि आता मोठी सून येणार.. मग थोरलेपणाचा मान कोणाला यावरून धुसफूस..इत्यादी इत्यादी

ही sawnya गेल्या चार-पाच भागांत आली आहे का? मी ५ का ६ सप्टें च्या भागापर्यंतच पोहोचलो आहे अजून. जयदीपने माना हलवत खुलासा स्वीकारला तो भाग.

ह्या मालिकांचा प्रेक्षकवर्ग आपल्यासारखे पांढरपेशे लोकं नाही, ही आणि कोणतीही मालिका आपल्याला डोळ्यासमोर ठेवून लिहिली जात नाही. त्यामुळे आहे ते बघणे सोडून फार काही आपल्या हातात नाही. मी इशाच्या आई-वडीलांसारखे लोकं बघितलेत, सेम स्टोरी स्वतः च्या दुकानात नोकर म्हणून कामाला आणि आईच्या कोणत्याच हौसमौज कधीच पूर्ण झालेल्या नाहीत आणि त्यामुळे हे लोकं माझ्या डोक्यात जात नाहीत. ज्याअर्थी त्यांनी ही दोन पात्र इतकी तंतोतंत घेतलीत त्याअर्थी इतर प्रकारचे लोकं पण असणार.

ते इशाचे आईवडील सर्वसामान्य लोक आहेत, कोठेही सहज सापडतील असे. त्यांची पात्रे उभी करणे सहज शक्य आहे. पण कॉर्पोरेट प्रोसेस काय असते वगैरे बिलकुल अभ्यास न करता, माहिती न काढता कल्पनेतून प्रसंग व संवाद निर्माण केल्यासारखे आहेत. त्यामुळे ते सगळे अत्यंत बेगडी वाटते. त्यामानाने इशाचे आईवडील आवडोत-न आवडोत, पण त्यांचे प्रसंग व बोलणे कृत्रिम वाटत नाही, इव्हन अभिनयही.

अरे आता झेंडे ला पाहिलं अभिषेक बच्चन च्या दम मारो दम मध्ये... एकदम छोट्या रोल मध्ये..ड्रग डीलर चा एक आदमी म्हणून....त्या मार्केट मध्ये अभिषेक बच्चन त्याला शेवटी गोळी मारतो तो...

घरी २ दिवस केबल बन्द होती म्हणुन आता नेटवर एपिसोड पाहिले. ( त्या झी च्या वेबसाईटवर दर दोन मिन्टान्नी त्रिवागोच्या जाहिराती वैताग आणतात. बर दर वेळी काय ते बेड/ सोफा/ खुर्च्या पडायचा सीन)
असो,
एकन्दरीत इशाच कठीणच दिसतय........ सरन्जामेन्ची सुन म्हणुन आली तरी.
सॉन्याबाई ३०,००० ची साडी पुन्हा कपाटात दिसली नाय पाहिजे म्हणतात. फेकुन दे म्हणे. केकही फेकुन दे.
हे फेक, ते फेक.. ती साडी ३०,००० ची काय वाटली नाही बॉ.
(यावरुन अगदी राणादाची भावजय आठवली. "आम्च पप्पा म्हण्जे तुम्हाला सान्गतो.... " :D)

ते पुजा चालु असताना सासुबाईना ,"ते काही नाही, आज तुम्ही सॉ न्या म्हटलच पाहिजे' हा सीन गमतिदारच!
अरे प्रसन्ग काय.. तुम्ही करताय काय!

विकी का म्हणताय? कसंतरीच वाटतं.
छिछोर मुलाला बोलल्यासारखं.
इथे कुणी विकी असल्यास क्षमस्व. Happy
विक्रमच बोलु आपण.
तर मालिकेत विक्रम सोडुन बाकी सगळे चक्रम आहेत Lol

सविता प्रभुणे, निरुमाता, शुभांगी गोखले, गवरिची बेंगलोरवाली होणारी सासु एवढ्याजणी झी च्या हक्काच्या आया सद्ध्या रिकाम्या असताना भलतिच नवीन आई का घेतली या विक्रम सरंजामे साठी..?? मला तर ही नवी आई अगदी सुमन कल्याणपुर ची डुप्लिकेट वाटते..!!

विकीची आई प्रिया बापटच्या 'शुभं करोति'मध्ये तिची मोठी काकू होती.>> दुसऱ्या कोणत्यातरी सिरियलमध्येही होती. कारण मी शुभंकरोती चा एकही भाग पाहिलेला नाही. पण मला ती चांगलीच आठवतेय.

अगं मी मोबाईलवरुन टाईपते. त्यामुळे विक्रांत टायपायला लय वेळ लागतो म्हणून मी विकी केला त्याचा. ते बरं सोप्प आहे टायपायला. Happy

एकन्दरीत इशाच कठीणच दिसतय........ सरन्जामेन्ची सुन म्हणुन आली तरी. >>>> अगदी अगदी . मायरा जर सरन्जामेन्ची सून असती तर सुतासारख सरळ केल असत sawnya ला.

सॉन्याबाई ३०,००० ची साडी पुन्हा कपाटात दिसली नाय पाहिजे म्हणतात. फेकुन दे म्हणे. केकही फेकुन दे.
हे फेक, ते फेक. >>>> नैतर काय. ती राहिलेला केक बाथरुम मध्ये ठेव असही काहीतरी म्हणाली होती. Sad

नक्की प्रॉब्लेम काय आहे हया sawnya चा. एवढया छान बन्गल्यात राहतेय तरी हिची आपली कटकट सुरुच!

जयदीप सायको नाहीये पण बावळट नक्कीच आहे. कायम एझी मनी कमावण्याच्या नादात असतो. कष्टान्ची आवड नसावी हयाला. म्हणूनच विक्रान्तला तो सुधाराव अस वाटतय.

तर मालिकेत विक्रम सोडुन बाकी सगळे चक्रम आहेत +++१११११ फक्त ते झेन्डे एक सेन्सिबल आहेत आणि मायरा सुद्दा थोडी थोडी.

Pages