तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

ती साँन्न्या कोण आहे ? ओळखीची वाटतेय >>> ती 'गर्ल्स होस्टेल' नावाच्या मालिकेत होती

पण छान आहे आई. आधी पण कशात तरी होती वाटतं. >>> 'तू तिथे मी' मधे मृणाल दुसानिसची आई होती ती

निम्मे कलाकार एकदम चंगले आणि निम्मे अतिशय बत्थड का निवडलेत कोण जाणे..!! कधी कधी वाटतं 'तु.मा.ब्रे.' घाइत संपवल्यामुळे तु.पा.रे. ला कलाकार निवडीसाठी वेळच मिळाला नसेल..

सोन्याची साडि ३००००ची नव्हतिच वाटत पण दी सरजामे काकुही कसली धुवट साडि नेसल्या होत्या , मायराची साडि मस्त होती...

गार्गी फुले एक चांगली कलाकार आहे, कमी काम करते. फार पुर्वी तिने दुरदर्शनची एक तेरा भागाची सिरीयल केलेली, त्यात ती मेन नायिका होती आणि प्रसाद ओक व्हिलन. फार छान होती ती सिरीयल. गौरी तेव्हापासून माझ्या लक्षात आहे.

मला इथे तिचं कॅरॅक्टर आवडलं नाही पण कट्टीबट्टीमधे फार सुंदर काम केलंय तिने. त्या सिरीयलची वेषभुषापण तिनेच केलीय.

या सिरियल चे २-३ भाग पाहिल्यानंतर पुढचे पाहू शकले नाही. पण इथे कधी मधी डोकावते.
गार्गी फुले म्हणजे निळू फुलेंची मुलगी! आमच्या शाळेत होती ती! अजिबात ओळखले नसते मी इथे नाव कळले नसते तर.

इशाला अष्टमीच्या रात्री वाईट स्वप्न पडत हे बघून हि सिरियल 'सुपरनॅचरल' वळणावर जाणार आहे की काय, अशी भीती वाटतेय. Uhoh

टायटल सॉन्ग आणि फकीर, देवी घेऊन येणारी बाई, इशाच विक्रान्तच्या पहिल्या बायकोसारख वागणे अश्या 'सुपरनॅचरल' हिण्टस मिळतायत .

बाकी ते इशाच्या आईवडिलान्च घाबरलेल्या इशाला 'आम्ही आहोत तुझ्याबरोबर" सान्गण छान वाटल. Happy

काल तो सीनियर व्हीपी बरोबरची मीटिंग आहे की कॅण्डललाइट डिनर की संगीत मानापमान अशी शंका येणारा भाग पाहिला. ते इशाचे कॅरेक्टर जाम डोक्यात जाउ लागले आहे. काहीतरी अगम्य व्हॉटसॅपी बोलत नसते. तिच्यापेक्षा ती रूपालीच जास्त इण्टरेस्टिंग आहे.

स्मार्टफोन/मेसेजेस च्या जमान्यात - ऑफिस ची एक डिनर मीटिंग ठरल्यावर जर काही कारणाने बदलावी लागली तर इतका एकताकपूरिजम होतो हे माहीत नव्हते. त्यात ती मायरा इतके दिवस मी त्याची असिस्टंट समजत होतो. ती एकदम सीनीयर व्हीपी निघाली. इतकी रिकामटेकडी सिनीयर व्हीपी मी अजून पाहिलेली नाही. बहुधा तिचे सीन्स आधी टीपिकल सासू-सून मालिकेकरता घरातील फालतू मान अपमानाचे सीन्स म्हणून लिहीले आहेत पण अचान्क ते कॉर्पोरेट वर्ल्ड मधे हलवले आहेत. त्यामुळे घरातील टीपिकल राजकारण/कलह कंपनीच्या वातावरणात प्ले आउट करत आहेत हे लोक. ते ही काही हजार कोटी टर्न ओव्हर असलेल्या कंपनीच्या हेड ऑफिस मधले टॉप मॅनेजमेण्ट मधले वाटणारे लोक.

मराठी सिरीयर/सिनेमांचा प्रॉब्लेम हा आहे की "मी कंपनीत काम करते, अधिकारपदी आहे, माझ्याकडे ताकद आहे" हे सतत प्रत्येक क्षणाला दाखवायची/मिरवायची गरज नसते हे रिअलायझेशन झालेले कॅरेक्टर अजून मराठीत जन्माला यायचे आहे. ती स्टेज आली की मग या व्यक्तिरेखा काही काम करताना दिसायची शक्यता आहे Happy

त्या झेंडे च्या रोलला कसले पोटेन्शियल आहे खरे म्हणजे! अनेकदा असे वाटते की इथे या सीन मधे जर हा त्याच्या रोल मधे राहिला तर आख्खा एपिसोड खाउन जाईल. पण लगेच तो ही इतर फालतू संवादात भाग घेउन लांबवतो.

अवांतर : तो झेंडे झालेला माझ्या शेजारच्याचा वर्गमित्र आहे, तुळजापुरचा आहे, बॅटींग भारी करायचा कॉलेजमध्ये असताना.

मराठी सिरीयर/सिनेमांचा प्रॉब्लेम हा आहे की "मी कंपनीत काम करते, अधिकारपदी आहे, माझ्याकडे ताकद आहे" हे सतत प्रत्येक क्षणाला दाखवायची/मिरवायची गरज नसते हे रिअलायझेशन झालेले कॅरेक्टर अजून मराठीत जन्माला यायचे आ>>> अगदी अगदी.
कालचा भाग बघायचा आहे.

ती राधिका पण तसलीच ओनर्स कधीच असल्या बारक्या भान गडीत मान पान करत नाहीत.

कालच्या एपिसोडात इशाचं अभिनयदारिद्र्य आणि दिग्ददर्शकीय कौशल्याचा अभाव अगदी ठळकपणे जाणवला. फार फार लाउड वाटलं तिचं वागणं.

एक म्हणजे ते कर्जतची हवेली आहे ते सर्व डिजिटली बनवली आहे. फक्त फर्निचर व क्लोज अप शूट करून मग मागे रेंडर केलेले आहे.
इशा काय रिवर्स स्नॉबरी कार आलेली असताना बसने जाणे वगैरे. गरीबोंकी इज्जत वगैरे

ती मायरा इतके दिवस मी त्याची असिस्टंट समजत होतो. ती एकदम सीनीयर व्हीपी निघाली. इतकी रिकामटेकडी सिनीयर व्हीपी मी अजून पाहिलेली नाही. >> Proud

बहुधा तिचे सीन्स आधी टीपिकल सासू-सून मालिकेकरता घरातील फालतू मान अपमानाचे सीन्स म्हणून लिहीले आहेत पण अचान्क ते कॉर्पोरेट वर्ल्ड मधे हलवले आहेत. >> Rofl

लेखक :- द भैताड केड्या... Angry

या आठवड्यात टीव्हीवर बघता आलं नाही म्हणून आज नेटवर सगळे एपि. बघितले. 'काय चाल्लंय काय' एवढंच डोक्यात घोळत राहिलं. काय ती इशा बावळटासारखी बडबडत बसते एकटीच...हसते काय...लाजते काय...सिरियल सुरु व्हायच्या आधीच्या प्रोमोज मधे इतकी बावळट वाटली नव्हती. म्हणूनच आम्ही बघायला गेलो म्हणा (घोर फसवणूक).
इशाने हे प्रेम-बिम करण्यापेक्षा सरळ पाठीवर दप्तर आणि गळ्यात वाॅटरबाॅटल अडकवून नर्सरीची वाट धरावी.

सुबोध किती सहज अभिनय करतो, आईसमोर जेव्हा ती लग्नाचा विषय काढते तेव्हा त्याचा चेहरा उदास दुःखी होतो , हातातून निसटल्याची भावना जी आहे ती किती सहजपणे दाखवलीय त्याने। त्याचं इशावर प्रेम आहे पण ती त्याला मिळू शकणार नाही हेही त्याला माहित आहे पण हे सगळं आईला सांगता येत नाही। ही मनातली खळबळ चेहऱ्यावर दाखवणे तेही 5 मि.च्या शॉटमधे! जबरदस्त काम केलंय त्याने।

या सिरीज चे ओरिजिनल टायटल आत्ता पाहिले. झी मराठी आम्हाला फक्त तो शेवटचा बेन्च वरचा सीन दाखवत होते. पूर्ण सीन्स पाहिले तर त्यात इशा टोटली उर्मिला मातोंडकर सारखी दिसते.

तिच्या बाबांचे बोलणे ऐकताना मला नेहमी नवाजुद्दिन सिद्दिकी चा भास होतो

इशा टोटली उर्मिला मातोंडकर सारखी दिसते>>> हे बरोबर असं मनात वाटत असतानाच पुढची ओळ वाचली Uhoh
बाबांचे बोलणे ऐकताना मला नेहमी नवाजुद्दिन सिद्दिकी चा भास होतो>>>>>>>>> Uhoh कसं काय? म्हणजे आवाज की संवादफेक?

इशा चांगली मुलगी आहे पासून सुरू होणारा सुभा व आईसाहेब संवाद पाहतोय. त्यांनी "ऑफिसमधे कसे काम करते?" विचारल्यावर ठसका लागला. कारण इतक्या भागांमधे तिला काम करताना पाहिलेच नाही. मात्र सुभाने "नवीन आहे. शिकतेय हळुहळू" उत्तर दिल्यावर इथून पुढचा "आईसाहेब-सुभा" संवाद हा शोलेमधल्या "लीलामौसी- जय" संवादाच्या वळणावर जातोय की काय अशी शंका आली

आ: " मुलगी चांगली वाटते बेटा. पण इतके तर विचारायलाच हवे - ऑफिसमधे कशी काम करते?"
सु: "कामाचे असे आहे आईसाहेब, ती नवीन आहे. शिकतेय हळुहळू"
आ: "म्हणजे आत्ता काहीच काम करत नाही?"
सु: "अरे असे मी कधी म्हंटलो. करते ना. पण मी तिला सकाळी सांगितलेच नाही कोणते काम कर तर ती कशी करणार?"
आ: "हँय? असे इतक्या मोठ्या कंपनीच्या हेड ऑफिस मधे रोज सकाळी आज काय काम करू विचारून काम ठरवतात?"
सु: "हो. आमच्या कंपनीत कोणीच फारसे काम करत नाही. यात तिचा बिचारीचा काय दोष?"
आ: "हे बरे आहे. ती काम करत नाही, तिला काही येत नाही. पण तिचा काय दोष?"
सु: "हो. ती रोज डब्यातून माझ्यासाठी काहीतरी घेउन येते. आणि मग मी दिवसभरात कधीतरी तिच्याबरोबर खातो"
आ: "ओह ती स्वतःच्या ऑफिसमधल्या बॉस करता घरून डबा घेउन येते? फारच तयार दिसते"
सु: "ती आणि तयार? नो नो. ती तर इनोसंटली माझ्या खांद्यावर डोके ठेवून झोपली होती त्या दिवशी"
आ: "हाय हाय, ऑफिसच्या कामाकरता जाताना बॉस च्या खांद्यावर डोके ठेवून झोपते?"
सु: "अरे नाही नाही. तुम्ही असे समजू नका. ती तशी मुलगी नाही. एकदा त्या शेजारच्या चंपक मुलाशी तिचे लग्न लावून दिले की बघा - तिचे ते व्हॉट्सअ‍ॅपी बोलणे कमी होईल, मग आपोआप ऑफिस मधे काम करेल"
आ: "ऑ? हेच एक राहिले होते? म्हणजे सतत व्हॉट्सॅपी बोलत असते?"
सु: "मग त्यात काय झाले? व्हॉट्सअ‍ॅपी बोलणे तर आपल्या नात्यातील ग्रूप्स मधले थोर लोकही करत असतात!"
आ: "ठीक आहे बेटा. मग इतके तरी सांग की या गुणवान मुलीचे कामाचे नक्की कौशल्य काय आहे ?"
सु: "बस ते मुळात आम्हाला समजले तर आम्ही तुम्हाला नक्की सांगूच"
<इथे एक पॉज>
सु: "मग मी हे लग्न ठरवून टाकू?"

Lol फा, तुम्ही तर हवाच काढून टाकली
सुभा ला सुवर्णयुग आणायचे आहे, तुम्ही त्याला पितळयुगाकडे वाटचाल अस्ल्याची जाणिव करून देत आहात ? !

Pages