तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

हसरतेच्या आधी त्या पुस्तकावर मराठी मालिका आली होती. कुणाला आठवतेय का. हमाल दे धमालमधली वर्षा ऊसगावकरची बहिण (वैशाली दांडेकर बहुतेक) आणि रमेश भाटकर होते. बाकी कलाकार आठवत नाहीत. त्यात सावी फार हळवी दाखवली होती जी सतत अपराधी भावनेने जगते. हसरतेमधली सावी मला आवडली नव्हती, फार माजोरडी वाटायची.

हो वैशाली दांडेकर होती मराठी सिरीयलमधे. हिरो कोणीतरी आठले आडनावाचा होता. रमेश भाटकर होते.

अगदी तेरा भागांची सुटसुटीत होती. एंड बदलला होता मूळ कादंबरीतला, सुखद केला होता. नवरा आणि मुलगा स्वीकार करतो तिचा. मी जयवंत दळवी यांची मूळ कादंबरी वाचली आहे, ती फार प्रभावी होती. हिंदी सिरीयल नाही बघितली पण ती अति लांबली.

मी जयवंत दळवी यांची मूळ कादंबरी वाचली आहे - अधांतरी >>> हो बरोबर. नाव आठवत नव्हतं बराच वेळ, thank u. मराठी सिरीयलचं नाव हेच होतं की अधांतर होतं.

अधांतरीच होतं.
मराठीतली सावू हिंदीत सावी झाली होती. हसरतेंमधली आधीची सावी वेगळी होती. नंतर शेफाली छाया आली. केटीचं काम हर्ष छायाने केलं होतं, जे मराठीत रमेश भाटकरांनी केलं होतं. पुढे पुढे कथा बरीच बदलली होती मूळ कादंबरीपासून. शेवटपर्यंत नाही बघितली त्यामुळे माहिती नाही शेवट काय केला ते. नेहा पेंडसे तेव्हा सावीच्या मुलीच्या भूमिकेत होती. आणि केटीची पहिली बायको बहुतेक मृणाल कुलकर्णी.

अरे एकदम सरंजामे साहेब गनमास्टर जी-९ झाले! >>>

आं! हे काय नवीन? मध्येच एखादा एपिसोड बघावा काय?

(मी आतापर्यंत या मालिकेचे फक्त ३ भाग पाहिले आहेत. ते ही सलग नाहीच. इथल्या पोस्टी मात्र सलग, न चुकता वाचल्या आहेत. Proud )

त्याचा पर डे बॅलन्स करायला इशाला घेतले पण आपली सहनशक्ती पर डे संपत जाणार त्याचे काय?>>>>
प्रेक्षकांनी पण इमानेईतबारे फक्त सुभाला बघावे बाकी कोण कसं काम करतंय स्टोरी कुठे चाललीय त्याकडे दुर्लक्ष करावे.

निधी... Biggrin

काल काय झालं? मी मिसला कालचा भाग...........................

एकट्या सुभासाठी काय काय सहन करावं लागतं रे देवा...
ते ईशाचे वडील म्हणजे ओव्हरॲक्टिंगचा बाप आहेत... निरुपा राॅय कुठचे Sad

खूप दिवसांनी कालचा भाग पहिला, कालचा सु भा चा अभिनय खूपच सुंदर होता, तो जेव्हा ईशाला जाब विचारात असतो तेव्हा काळजात चर्रर्र झालं अगदी

जेव्हा मीटिंग मध्ये सुभा तंद्रीत (ईशाच्या विचारात ) मायरा ऐवजी चुकून इशा असं म्हणतो त्यावेळचे त्याचे एक्सप्रेशन्स एकदम भारी .. >>>>>> एक नंबर !!

ती आईसाहेबांची दासी कसली अॅटिट्युडवाली आहे. जराही मान देत नाहीये आ. साहेबांना.
गोडधोड =खीर. श्रीमंत=केशर +बदाम - झीचं पररंपरा पालन चालू दिसतंय इथंही.
आईसाहेबांना सकाळपासूनच रप्प गच्च कपडे घालून वर ही sss एवढी जाड मोत्याची माळ घातल्याशिवाय आईसाहेब फिल येत नाही. त्यांना किती उकडत असेल ह्या विचारानं मीही जरा पंखा वाढवते.

DDLJ ची ट्यून वाजणार तुपारेमधे....चक्क....
नवीन प्रोमो...इशाने पत्रिका दिली...'माझं प्रेम त्याग आहे' वगैरे काहीतरी अचाट डायलाॅग मारत as usual...त्यावर सुभाचे 'दिल टूट गया' वाले एक्सप्रेशन्स...आणि पुढे डायलाॅग...'खरा त्याग कोण करतं ते बघू'...आणि सुभा चक्क पुढे सुटमधून थेट हाफ शर्ट आणि स्लिपर्समधे....घर सोडणार वाट्टं हिरो आमचा...

मायरा एकदम आवडली आजच्या एपिसोडात। एकतर ती fully professional वागते। मुळुमुळू रडत बसत नाही, आणि सतत कंपनीचा विचार करते। दुसरं म्हणजे स्वतःच्या अकौंटमधून पटकन चेक दिला इशाला, आणि ती बोलली सरांच्या समोर जायचं नाही ते लॉजिकली बरोबरच आहे ना। इशाचा विचार करून करून विक्रांतपण येड्यागत वागतोय हल्ली। रडतो काय गोळ्या काय मारतो । छे।

५लाखाचं कर्ज १०के पगारात फेडायचं तर सिरीयल किती वर्ष चालेल?आणि सरांना सांगू नका काय?
नविन employeeला ५ लाखाचं कर्ज हवय आणि ते कंपनीच्या मालकाला सांगायचं नाही?
ईशाच्या आईकडे सु भा चा नंबर कसा?त्या दिवशी कंपनीत आली होती तेंव्हा घेतला का?

ईशाच्या आईकडे सु भा चा नंबर कसा?त्या दिवशी कंपनीत आली होती तेंव्हा घेतला का?>>> ईशाच्या फोनमधून ढापला

मायरा एकदम आवडली आजच्या एपिसोडात। एकतर ती fully professional वागते। मुळुमुळू रडत बसत नाही>>> +१

fully professional>>>हौ तर. प्रोफेशनल बाईंनी १० दिवसापुर्वी जॉइन झालेल्या मुलीला लग्गेच ५ लाखाचा चेक दिला.

Sawnya च्या अंगावर पुन्हा तीच 30000वाली साडी पाहिली। फेकून दिली नाही का। तो बॉबी म्हणजे अगदीच बॉबी दिसतोय।
त्याग त्याग काय चाललंय हे वेड्यासारखं। इशा म्हणते मी करणार विक्रांत म्हणतो मी करणार Uhoh

होहो बिपिन आवडलाय. तो जास्त चांगलाय खरं तर. Happy
स्टोरी कायतरी गंडलिये. सुभाचा प्राॅब्लेम समजत नाहीये. कग्न तर करायचंय. ती तयार आहे हाही तयार आहे. बरं वयातलं जास्तीचं अंतर हा सिरिअस प्राॅब्लेमच आहे. आता तिचं लग्न ठरल्यावर चुक दुरुस्त करायला जाऊन शारूक्कानगिरी करण्याची गरज काय ? केड्याचं लाॅजिक उलगडत नाहीये.

Pages