मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> विद्याधर करंदीकरांची 'किनाऱ्यास' कविता या गाण्याच्या चालीवर म्हणायचो आम्ही

तसेच अजून एक दोन गाणी आठवतात. दुसऱ्या चालीवर एकदम फिट...

आमच्या कॉलेजात "डर" मधले 'जादू तेरी नजर, खुशबू तेरा बदन' गाणे 'ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे' च्या चालीत म्हणायचे कुणीतरी पसरवले होते.

अझिमो शान शहंशाह गाण्यातला तो शब्द परमारवा आहे(म्हणजे परमेश्वर असेल).मला ते गाणं म्हणजे 'तुम्हाला किती देवनागरी वर्ण आणि व्यंजनं येतात, सगळी म्हणून दाखवा बरं' टेस्ट वाटते Happy

विद्याधर करंदीकरांची 'किनाऱ्यास' कविता या गाण्याच्या चालीवर म्हणायचो आम्ही
तसंच
सागर जैसी आखोंवाली.. हे गाणं येऊ कशी कशी मी नांदायला या चालीवर पर्फेक्ट बसतं.

>>>"ऐ दिल मुझे बता दे, तू किस्किया गया है| वो कौन है दिवाकर, खाबो मचा गया<<<
आई गं मेले..

"ऐ दिल मुझे बता दे, तू किस्किया गया है| वो कौन है दिवाकर, खाबो मचा गया<<< >> आरारा रा Lol Rofl

ऐ दिल मुझे बता दे, तू किस्किया गया है| वो कौन है दिवाकर, खाबो मचा गया<<< Lol
एपिक
मला ते ग सशी तु आठवुनही मधेच हसु येतं.

ऐ दिल मुझे बता दे, तू किस्किया गया है| वो कौन है दिवाकर, खाबो मचा गया< << कळस Rofl Rofl

थोडं अवांतर पण राहवलं नाही म्हणून :
आम्ही 'कणा' ही कविता " हद कर दि आपने " title ट्रॅक च्या चालीवर गायचो. मस्त बसते. पाठान्तराच्या युक्त्यांमध्ये मात्र कवितेचा भाव हरवून जायचा

इथे ऑडिओ पाठवता आलं असता तर ते गाणं गाऊन रेकॉर्डिंग चिकटवली असती, अनु जी Lol Lol जाम मजा येते असं काही करायला

अझिमो शान शहंशाह गाण्यातला तो शब्द > 'फुर्वा रहा'...

अझिमो शान शहंशाह -2, फुर्वा रहा
हमेशा हमेशा सलामत रहे
तेरा हो क्या बयान, तू शान-ए-हिन्दुस्तान
हिन्दुस्तान तेरी जान, तू जान-ए-हिन्दुस्तान
मरहबा हो ओ ओ... मरहबा - (2)
अझिमो शान शहंशाह फर्मा रहा
हमेशा हमेशा सलामत रहे

फुर्वा - म्हणजे काय ते माहित नाही..

फुर्वा रहा >>> Happy
मरहबा असा आहे तो शब्द बहुतेक !

मरहबा हो ओ ओ... मरहबा - (2) >>इकडे आहे तोच मरहबा, पहिल्यांदा पण आहे असं वाटतंय.

@ श्रद्धा आणि इतरांनाही धन्स..
या गाण्यातील दुसरी ओळ मी, तेरा होगा भला ओ शाहे हिंदोस्तां अशी म्हणायचो... Wink आणि ते पटायचंही.

सध्याचं बॉम डीगी डीगी असं गाणं आहे. एकदम हिट्ट. सोनू के टीटू मधलं.
त्यात "Shes burning up like the summer" अशी ओळ आहे.
ती मला "Shes burning up like December" अशी ऐकू यायची.

मी खूप विचार करून तो सिनेमा ऑस्ट्रेलियात असेल असा निष्कर्ष काढला होता. Wink

ऐ दिल मुझे बता दे, तू किस्किया गया है| वो कौन है दिवाकर, खाबो मचा गया >>> खत्तरनाक!! Happy

मी तेरा होगा बयां ऐकते.म्हणजे तुझे किस्से लोक ऐकतील या अर्थाने<<<<< एकदम करेक्ट!

स्वारी.. पुन्हा ऐकले.
ते 'तेरा हो क्या बयां' आहे.. '(तू कसला लै भारी) कसं करू तुझं गुणवर्णन!' वगैरे अर्थाने!

अजून एक -
राजाच्या रंग-म्हाली .. सोन्याचा पाईप-रंग
- असं ऐकू यायचं

Pages