मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिम्मतवाली आंखोका मी ही म्हणायचे. Happy
काशमिरका कुली Lol

वेलकम मधलं उंचा लंबा कद वालं गाणं मला कधी कळलं नाहीये आणि खूप वेडपट वाटतं.
त्यात मुद्दे मांडले आहेत
१. तुझी उंची लांबसडक आहे
२. शिवाय तू एकदम हद्द चांगली आहेस
३. मुद्दा क्र. ३: तुझे रुप चमचम करत आहे

उपपरनिर्दिष्ट मुद्द्यांमुळे मी असे नमूद करतो की मी तुझ्यावर मरण्याचा निर्णय घेतलाय

बॉम्बे चित्रपटातील गीत. कहना ही क्या.. या गाण्यात सुरवातीला 'हमसे गोरी ना तू शरमा' अशी ओळ आहे. मला ते नेहमीच 'हमसे गोरीला तू शरमा' असे ऐकू यायचे.

हा किस्सा "मला ऐकूच न आलेला गाण्याचा भाग" अशा प्रकारचा आहे. 'आपकी कसम' चित्रपटातले "जय जय शिवशंकर..." हे प्रसिद्ध गाणे. किशोरकुमार यांनी गाण्यातच शेवटी म्हटले आहे:

"अरे बजाव रे बजाव इनामदारी से बजाव. अरे बजाव पचास हजार खर्चा कर दिये" Lol

आजवर इतक्या वेळा हे गाणे ऐकले पण हा संवाद कधी ऐकला नव्हता तो आज एक पोष्ट वाचल्याने कळला. हे गाणे ऐका...

https://www.youtube.com/watch?v=Mpy0UzbHNr0

आणि या ठिकाणी (05:06) ऐका तो संवाद Lol

किशोरकुमार यांनी तसे का म्हटले आहे त्यामागची कथा खूपच इंटरेस्टिंग आहे. या गाण्याच्या खाली एका कॉमेंट मध्ये मराठीत हा किस्सा अगदी तपशिलात लिहिला आहे. तो नक्की वाचा.

भारी किस्सा... Happy

या गाण्यात मला असं ऐकू यायचं....

साथिया ये तूने क्या किया... भेडिया ये तुने क्या किया.... Proud

हमसे गोरीला तू शरमा >>> Lol

डब केलेल्या गाण्यांचे शब्द समजायला कधीकधी जरा अवघडच जातात. चाल तशीच ठेवून शब्द बदललेल्या गाण्यांचंही तसंच.

म्हणजे एक धिप्पाड केसाळ गोरिला सगळ्या गाणार्‍या छेडणार्‍या बायकांसमोर लाजेने लाल होऊन उभा आहे Happy
(इथे मनिषा म्हणजे गोरिला वगैरे समीकरणे बनवू नयेत Happy )

मी नाही पण माझी मुलीला बाहुबली मधील गाणं असं ऐकु येतं-
गली गली तेरी लाॅल् जल्ली
जियो रे बाहुबल्ली.....
आणी शेवटी

सब गायेंगे, घबरायेंगे
अब तेरा जयजयकारा.
तेव्हापासुन मला सुद्धा असेच ऐकु येतंय. Happy

मी नाही पण माझी मुलीला बाहुबली मधील गाणं असं ऐकु येतं-
गली गली तेरी लाॅल् जल्ली
जियो रे बाहुबल्ली.....
आणी शेवटी

सब गायेंगे, घबरायेंगे
अब तेरा जयजयकारा.
तेव्हापासुन मला सुद्धा असेच ऐकु येतंय. Happy

Submitted by इला on 6 April, 2018 - 14:32

छान Happy

साउथ इंडियन चित्रपटात जी डब केलेली हिंदी गाणी असतात त्यातले बरेचसे शब्द विचित्र असतात किंवा नीट कळत नाहीत.

सपने मधलं हे गाणं
स्ट्रॉबेरी आखे सोचती क्या है, लडकी तुझे हर चीज मिली मर्सिडीज मिली असंच ऐकू येतं. खरोखर असे शब्द आहेत का?

मुकाबला मुकाबला मधले हे शब्द
जुरासिक पार्कमे सुंदरसे जोडे जाझ म्युझिक गाये मिलके, पिकासोकी पेण्टिण्ग मेरा पीछा पकडके टेक्सासमे नाचे मिलके
काऊबॉय देखे मुझे प्लेबॉय छेडे मुझे, सेक्स मेरे तनमे होये मेक्स मेरे मनमे होये
पॉप म्युझिक जैसी लैला स्ट्रॉबेरी जैसी आंखे लव्ह स्टोरी बन जाने दे, किक थोडी चढ जाने दे.
खरंच असे शब्द आहेत की मलाच असे ऐकू येते आहे ? Happy

तसंच गीतकार बहुतेक एकच असावा. स्ट्रॉबेरी आंखे रुपक त्याचं आवडतं दिसतं आहे Happy

>>>तसंच गीतकार बहुतेक एकच असावा. स्ट्रॉबेरी आंखे रुपक त्याचं आवडतं दिसतं आहे Happy
नाही
सपने ला जावेद अख्तर असावा
हमसे है मुकाबला --> द पी के मिश्रा Happy

चहुकडे बहरला राsssणाsss> असंच आहे ना
हा हा हा
चहुकडे बहरलं राssनssss आहे ते >>>> हे तु़झ्यात जीव रन्गलाच शिर्षकगीत आहे का?

जब दीप जले आना, जब शाम ढले जाना...

हे असं वाटायचं मला; आणि ते लॉजिकली करेक्ट वाटायचं कारण तो बहुतेक तिला आल्यासारखी एक दिवस राहुन जा असं म्हणत असावा असा काहितरी माझा समज होता... Proud

>> जब दीप जले आना, जब शाम ढले जाना...
+१ सेम Biggrin लहानपणी गाणे ऐकताना "मै पलकन डगर बुहारुंगा" याचा अर्थ मी पट्कन डोंगर उतरेन असा काहीसा असेल असे वाटायचे

हो, जावेद अख्तरांचे सपने Happy

स्ट्रॉबेरी आँखे
सोचती क्या है
लड़की तुम तो महलों में हो पली
वो आइस क्रीम हो जो है फ्रीझ में रखी
तुमने जो भी कहा
वो हमेशा हुआ
तुम्हे हर चीज़ मिली
मर्सिडीज मिली
फिर भी आँखों में है
कोई ग़म क्यों छुपा
फिर भी तुम खुश नहीं
बोलो है बात क्या

>>जब दीप जले आना, जब शाम ढले जाना..<<<
असेच तर आहे ना? हेच बरोबर आहे? >>>> जब दीप जले आनब, जब शाम ढले आना असं आहे. संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेस ये....

चीकू तु लिहिलेलं गाणं परफेक्ट आहे. तेच गाणं मला कसं ऐकू यायचं बघ

जुरासिक पार्कमे सुंदरसे जोडे जाझ म्युझिक गाये मिलके, त्तिकासोक्की बॅटिंग मेरा पीछा पकडके टेक्सासमे नाचे मिलके
काऊबॉय देखे मुझे प्लेबॉय छेडे मुझे, सेक्स मेरे तनमे होये मेक्स मेरे मनमे होये
पॉप म्युझिक जैसी लैला स्ट्रॉबेरी जैसी आंखे लव्ह स्टोरी बच्चा दे दे, एक थोडी चर्चा दे दे

Proud Rofl

Pages