मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उंची है बिल्डींग.... यात मला ऐकू यायचे:

आजा आजा आजा मेरे गाजरवाले राजा

लेकीला विचारले गाण्यात पंकज कपूर आहे का? तिच्या डोक्यावरून गेले.

मग समजले ते स्वॅगरवाले आहे

ज्युरासिक पार्क में सुंदर से जोड़े
जॅज़ म्यूज़िक गाए मिल के
पिकासो की पैंटिंग मेरा पिच्छा पकड़ के
टेक्सस में नाचे मिल के
काऊ बॉय देखें मुझे प्लेबॉय छेडे मुझे
सेक्स मेरे तन में हे मिक्स मेरे मन में हो
पॉप म्यूज़िक जैसी लैला स्ट्रॉबेरी जैसी आँखे
लवस्टोरी बन जाने दे पिक थोड़ी चल जाने दे
होंठों पे सबके दिल का तराना है

चिट्टियां (चिट्टिया म्हणजे मुंग्या) कलाइयां वे
ओ बेबी मेरी वाइट (बाईट/bite) कलाईयां वे..
असेच गात होतो वर्षभर.

>> मेरे गाजरवाले राजा Lol
>> साथिया ये तूने क्या किया... भेडिया ये तुने क्या किया.... Lol

एक जुने पण अतिशय गोड गाणे... दुनिया का मेला, मेले में लड़की, लड़की अकेली शन्नो नाम उसका
हे नेहमी मेले मिलनके असे ऐकायला यायचे Biggrin

सिक्स मेरे तन में हे मिक्स ....
मिक्स शी जुळाव आणि सेक्स सारख ऐकू याव म्हणून सिक्स

हिन्दुस्तानी मधलं माय मच्छिंद्रा गाण ऐका
मिस्त्री दिल का शास्त्री .... अस्ले लिरीक्स आहेत

ते मेला (ज्याने पाहिला तो मेलाच म्हणून समजा) पिक्चर मध्ये 'मेला दिलोका ' गाणं आहे त्यात शेवटी मेरी प्यारी सखी बुलबुल असे काहीतरी शब्द आहेत.कधी कळले नाहीत.पण मेला तिकीट काढून पूर्ण पाहणे हा मनावर झालेला आघात इतका असताना गाणं परत नीट ऐकायची शक्तीच राहिली नाही.

जब दीप जले आनब, जब शाम ढले आना असं आहे >>> पण जब दीप जले आना, जब शाम ढले जाना हेच योग्य वाटत अर्थाच्या दॄष्टीने. ते 'आनब' गाताना आणि ऐकताना खटकत.

स्ट्रॉबेरी आँखे
सोचती क्या है
लड़की तुम तो महलों में हो पली
वो आइस क्रीम हो जो है फ्रीझ में रखी
तुमने जो भी कहा
वो हमेशा हुआ
तुम्हे हर चीज़ मिली
मर्सिडीज मिली
फिर भी आँखों में है
कोई ग़म क्यों छुपा
फिर भी तुम खुश नहीं
बोलो है बात क्या >>>> हनीसिन्गच Rap Song आठवल. Proud

'कट्यार..' मधल्या 'भोला भंडारी' चे सुरुवातीचे शब्द असे ऐकू येतात नेहमी..
'सुख का त्यौहार, बजे डमरु गिटार.. "
गिटार ?? यो !!

हे गाणे नाही. एका फेरीवाल्या विक्रेत्याचे ओरडलेले शब्द आहेत. पण आता याच धाग्यात लिहितो.
बरीच वर्षे झाली. पुणे स्टेशनजवळ बस मध्ये बसलो होतो. बाहेरून आवाज ऐकायला आला, "मीठ दे, शेंदेलोण", "मीठ दे, शेंदेलोण"
मला वाटले मीठ, शेंदेलोण, पादेलोण वगैरे विकणारा कोणतरी असेल. पण पुन्हा कळेना "मीठ दे" का म्हणतोय?
म्हणून सहज बाहेर डोकावून पाहिले तर हा मिड-डे आणि संध्यानंद विकत होता Biggrin Lol Lol

☺️☺️☺️☺️☺️☺️

मला मोहरा मधले टीप टीप बरसा पानी 5 व्हाय ऍनालिसिस चे उत्तम उदाहरण वाटते.

इश्यू:
'काय करू' याबाबत हेल्पलेसनेस

ऍनालिसिस
१. व्हाय?
- माझे ओले अंग जळले
2. व्हाय?
तुझी आठवण आली
3. व्हाय?
हृदयात आग लागली
4. व्हाय?
पाण्याने आग लावली
5. व्हाय?
टीप टीप पाऊस पडला.

मुख्य कारण: मानसून सिझन ☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️

Lol

वीस पंचवीस वर्षापूर्वी एक गाणे आले होते "दिन बदिन मोहोब्बत बढती जाएगी"
हे "डिंब डिंब मोहोब्बत" असे ऐकायला यायचे

मला "रिक्षावाला हिरो तो माझा , तोच आहे माझ्या दिलाचा राजा" हे "रिक्षावला दिर तो माझा, तोच आहे माझ्या दिलाचा राजा" असा वाटायचं. मी विचार करायचे अस कस लिहिलंय गाणं. लाज कशी नाही वाटत असा लिहायला.

चुकीचं ऐकू आलेलं नाही, पण ते आताचं गाणं त्यात ती बाई खच्चून किरट्या आवाजात "तू खिच्च मेर्री फोटो , तू खिच्च मेर्री फोटो, तू खिच्च मेर्री फोटो पीयॉ" असा भुंगा नायकामागे इतक्यांदा लावते की जगातल्या पहिल्या सेल्फी स्टिक चा जनक तोच बिचारा असला पाहिजे असं वाटतं.

मी एकदा लग्नाच्या रिसेप्शनला गेलो होतो. छान वातावरण, समोर एक छोटा आर्केस्ट्रा सुरू होता. कोणी ऐकत नव्हते पण छान गात होता. मी प्लेट घेऊन समोर बसलो. त्यालाही बरे वाटले. काही वेळाने मी फर्माईश करायची, त्याने गायचे असं सुरू झाले. त्यालाही बिचाऱ्याला श्रोता भेटला होता. त्या नादात मी त्याला ‘तू औरो की क्यू हो गयी’ सांगीतलं. त्यानेही छान आवाज लावून गायलं. पुढचे काही सांगण्यासारखे नाही...

Pages