मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक अतिशय बकवास गाणं एकलं रेडिओवर,
मेहफूझ रखता हू दिल मे,
तेरे इश्क का,
पसारा! पसारा! पसारा!

घरी येवून गाणं शोधलं तर हेच एकायल येतय,

पसारा! पसारा!

॓अल्ला ते रोना
ईश्वर ते रोना
या गाण्याच्या दोन्ही ओळीत नाम हा शब्द स्पष्ट ऐकू येतो . एवढेच नाही तर ईश्वर तेरो नाम या ओळीत म वर किन्चित दाब आहे आणि त्यानन्तर हलकी लकेर पण आहे .

शाली ☺️☺️☺️☺️
लग्नाच्या मैफिलीत तू औरो की क्यू हो गयी गाणं..
मला मी मुलगा असेन आणि नवरा नवरी जाम शत्रू असतील तर प्यार इशक मोहब्बत चं गाणं वाजवायला आवडेल(मेरे बाद आबा किस को बरबाद करेगी )

हो, मोबाईल ऑटो करेक्ट कृपा.त्याला मी मराठीत लिहीत असल्याने अब पेक्षा आबा जास्त जिव्हाळ्याचे वाटले ☺️☺️☺️

हो, मोबाईल ऑटो करेक्ट कृपा.त्याला मी मराठीत लिहीत असल्याने अब पेक्षा आबा जास्त जिव्हाळ्याचे वाटले >>>> Lol

सुंदरा सोनिये सुंदरा आज खामोशियोसे दे रही हे सदा धडक नेहै दिवानी दिल भी कूच कह रहा है >> मला असं ऐकू आलं होतं
मूळ गाणं ... सुन जरा सोनिये सुन जरा

आणखी एक :
घुंघट की आड से दिलं बरं का , दिलं बरं का , दिलं बरं का, दिलं बरं का
(जुही आणि अमीर चं गाणं )

ते दिलबर का असं असेल ना.
मी मराठीत ऐकलं दिलं बरं का
काहीतरी देतेय नायिका आणि ३-३ वेळा सांगतीये दिलं आता परत मागू नको वगैरे

दिले ना दान
आता जास्त चकचक करायची नाय सांगून ठेवते Happy

आता जास्त चकचक करायची नाय सांगून ठेवते >> Rofl
दिलं बरं का - हे दिल्याबद्दल केवळ आठवण करून देतं तर 'ऐ दिले ना दान' - हा एक प्रकारचा वैताग व्यक्त होतो. Happy

दिलं बरं का - हे दिल्याबद्दल केवळ आठवण करून देतं तर 'ऐ दिले ना दान' - हा एक प्रकारचा वैताग व्यक्त होतो. >>>> Rofl

ऐ दिले ना दान?
दिलं बरं का दिलं बरं का दिलं बरं का

Both.... हा हा हा हा हा Biggrin Biggrin Biggrin

परवा बरेच दिवसांनी बिबॉ मधे हे गाणं ऐकून सहज आठवलं...
अजीमो शान शहंशाह, ______ हमेशा हमेशा सलामत रहे.
_______________, ओ शाहे हिंदोस्तां (हे तरी बरोबर आहे की नाही रायटराला आणि गाणार्यालाच ठावूक Uhoh )
यातल्या रिकाम्या जागी काय शब्द आहेत मला अजून तरी कळालेलं नाही. जाणकारांनी प्रकाश टाकावा प्लीज.

मी पण
दिलं बरं का दिलं बरं का दिलं बरं का Lol

"ऐ दिल मुझे बता दे, तू किस्किया गया है| वो कौन है दिवाकर, खाबो मचा गया है |"
हे गाणे मला पण अगदी असेच ऐकू यायचे. खरोखर .

"ऐ दिल मुझे बता दे, तू किस्किया गया है| वो कौन है दिवाकर, खाबो मचा गया है |">>> Lol

रच्याकने, विद्याधर करंदीकरांची 'किनाऱ्यास' कविता या गाण्याच्या चालीवर म्हणायचो आम्ही, सुंदर कविता आहे फार आणि या चालीवर इतक्या वेळा म्हणायचो की पाठच झाली होती. म्हणून बघा तुम्ही पण,

घननिळ सागराचा घननाद येतो कानी,
घुमती दिशा दिशांत लहरीमधील गाणी,

चौफेर सूर्य ज्वाला वारा अबोल शांत,
कोठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत,

आकाश तेज भारे माडावरी स्थिरावे,
भटकी चुकार होडी लाडात संथ धावे,

वाळूत स्तब्द झाला रेखाकृती किनारा,
जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा,

जलधी बरोबरीचे आभासमान नाते,
त्याची न त्यास धरती संकेत फक्त खोटे,

सानिध्य सागराचे आकाश पांघराया,
परी साथ ना कोणाची अस्तीत्व सावराया

- विद्याधर सीताराम करंदीकर

विद्याधर करंदीकरांची 'किनाऱ्यास' कविता या गाण्याच्या चालीवर म्हणायचो आम्ही>>अगदी अगदी..म्हणून हा कविता माझी आजही पाठ आहे.

Pages