मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला My heart is beating या गाण्याची lyrics मीळेल का? गुगलवर प्रत्येक लींक वर वेगळे बोल आहेत

कॉल अ ट्यून बेबी कॉल या ट्यून !!

तुझसा हसीन मैने देखाही नही
तेरे हरे कडा में कोई जादू है !!

नेमकं काय आहे गाणं ? कोणाला ट्यून म्हणायचंय

कॉल अ ट्यून बेबी कॉल या ट्यून !! Rofl

तुझसा हसीन मैने देखाही नही
तेरे हरे कडा में कोई जादू है !!--- Lol
'तेरी हर एक अदा मे कोई जादू है
अस आहे...

GRRA >>> Biggrin

साभारः गुगल Happy
GRRA
Acronym Definition
GRRA Greensboro Regional Realtors Association (Greensboro, NC)
GRRA Golden Retriever Rescue of Atlanta (Georgia)
GRRA Grand Rapids Rowing Association (Michigan)
GRRA Guam Road Racers Association
GRRA Gratiola Ramosa (branched hedgehyssop)
GRRA Global Reusable Resource Association, Inc.
GRRA Gun Rights Restoration Act
GRRA Gweru Residents and Ratepayers' Association (Zimbabwe)
GRRA Georgia Road Racers Association
GRRA Garvaghy Road Residents' Association

जहां चार्यार मिळ जाये वही रात हो गुजार
या गाण्यातल चार्यार हे चार्यार नसून चार यार असं आहे हे मला परवा एका मायबोलीकर मैत्रीणीचं फे बु स्टेटस बघून समजलं!!!!

ते एक रहम इ एक रहम बी एक रहम फत्ते एक रहम हम आहे त्या गाण्याचा 2 ओळीत (3 मार्कांचा प्रश्न) मतितार्थ कोणी मला सांगू शकेल का

हा नंदाचा कान्हा घालितो कसा धिंगाणा
कडी लाव तो नाना आणि नेमके त्याचवेळेस नाना टॉयलेटची कडी लावताना दिसायचे हे गाणे मी लहानपणी रेडिओवर ऐकताना हे व्हायचे पुढे नंतर मोठा झाल्यावर ते कडी नाही कळी आहे हे कळले

>> कडी लाव तो नाना Lol

गुलझार यांच्या एका गाण्यातली ओळ: इक रोज जिंदगी के रूबरू आ बैठे

हे रूबरू कोण अनेक दिवस कळले नव्हते Rofl

>>एक रहम इ एक रहम बी एक रहम फत्ते एक रहम हम

इक रहे इर, इक रहे बीर, इक रहे फते ते इक रहे हम

एक अस्तो इर, एक अस्तो बीर, एक अस्तो फतेह तर एक अस्तो मी स्वतः

अमिताभ च्या आवाजातलं मस्त गाणं आहे

मोहनाच्या तालावर कैर्‍या मागनं..
असं ऐकत होतो मी..
आता, कळलं ते
<मोहराच्या दारावर कैर्‍या मागणं> असं आहे..
कल्पना भारी आहे..

गाण्याचे ठिक च आहे... अश्या अनेक जाहिराती आहेत..ज्या मी कायच्या कै ऐकल्या आहेत... Lol
उदा: ती ये नंबर वन यारी है...ये नंबर वन यारी है वाली.. मी कैक दिवस ते ये वृंदावन यारी है.. ऐकत होतो.. का कुणास ठावूक Lol Lol

तसंच म्हणतो तो.हाय फाय दाखवायला नंबर मधला र अगदी मारुन टाकून ये नंबवन यॉरी है म्हणतो.ते घाईत काहीही ऐकू येतो.
शिवाय 'बाळ शाम,स्टाईल जपायला अक्षरं खातोस तसेच कोणी नंतर कान पुढे करुन आँ विचारल्यावर रागही खात(गिळत) जा हो!' असं शाममातेय वाक्य पण डोक्यात येतं. Happy

Lutfay main tujh say kia kahoon nadaan
Haye kambakht tu nay pi hee nahi☺️

वरच्या शेरात लुफ्टणसा एअर्वेस चा उल्लेख आहे.बाकी इंग्लिश वाचलं नै
बाय द वे आम्ही रेड वाइन आणि बियर आणि घोटभर शामपेन प्यायलेला आहे.

Pages