तेलुगू चित्रपट- लेखनाचा धागा!

Submitted by अज्ञातवासी on 27 June, 2017 - 12:55

मंडळी धागा बदलतोय.
आतापासून फक्त तेलुगुच नाही तर

१. तेलगू
२. तमिळ
३. कन्नड
४. मल्याळम

या चार प्रमुख दक्षिण भारतीय भाषेमधील चित्रपट चर्चा करूयात.
अर्थात माझं पहिलं प्रेम तेलुगुच असेल Wink

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आर्यनमॅन खूप खूप धन्स हं! Happy एक एक करत बघून टाकते.

मी साऊथच्या कुठल्यातरी फनी + हाॅरर मूव्हीबद्दल ऐकलं होतं. लीडिंग अॅक्टर खूपच घाबरट असतो, अगदी अंगावरच्या पांघरूणावरपण मारूतीचा फोटो असतो. मी पाहिलाही नाहीये आणि नावही माहीत नाहीये. कोणाला माहित आहे? ही मूव्ही बघायची खूप इच्छा आहे. Happy

हो,काशमोरा छाने सिनेमा,सुरुवात थोडीशी बोअरिंग आहे....पण मला आवडलेला,त्यातील व्हिलन ची खूप भीती वाटलेली ....

IRONMAN, ध्रुवा पाहिला का रामचरणचा???

दीदी >>> दीदी काय गं मेघातै! Wink

कँचना नाहीतर तू कँचना 2 पाहिलाय ग.. >>> मी पाहिलेला नाहीये. कुठेतरी ऐकलं होतं या मूवीबद्दल पण नाव माहित नव्हतं. धन्स Happy

ध्रुवा काय भारीय रामचरणचा! अगदी भारी अॅक्टिंग, स्टोरी.
हिंदीत अजय देवगणने आवाज दिलाय. अरविंदस्वामीची अॅक्टिंग पण जबरी आहे. कितीही वेळा पाहिला तरी आमच्या घरातलं कोणीही कंटाळत नाही.

मेघा बघितला आणि प्रचंड आवडला...
पण तू थानी उरुवन बघ. ओरिजिनल जबरा आहे....

बाय द वे, आज भाग्य उघडलय माझं. अज्ञातवासी सापडला आणि त्यासाठी सबटायटल सुद्धा.

आता तोच बघतोय.

द्वादशांगुला , सुलू >>>काही दिवसांपूर्वी एक बघायला सुरूवात केलेली, फॅमीली ड्रामा, जाॅइंट फॅमिली वगैरेवर होता. मला नाव माहित नाहिये. पण मी ती अर्ध्यावरच सोडली. एवढी नाही आवडली. >>> श्रीमन्ततुडू अस काहीतरी नाव आहे ना त्याच? नक्की माहित नाही पण त्यात रोहिणी हट्टन्गडी सुद्दा आहे >>> त्याचे नाव ब्रम्होत्सवम आहे. श्रीमन्तुडू छान आहे. एकदा बघाच Happy श्रीमन्तुडू हिन्दी मधे Real Tevar या नावाने आहे

काल 'कुत्त्रम २३' चे डब्ड व्हर्जन पाहिले. भारी सस्पेन्स थ्रिलर आहे, सटासट एडीटींग आणि कसलाही फालतूपणा, उगाच कॉमिक रिलिफ, गाणी असले काहीही नाही. अरुण विजय (हा अजून एक विजय!) खासच.

द्वादशांगुला>>>ध्रुवा काय भारीय रामचरणचा! अगदी भारी अॅक्टिंग, स्टोरी.
हिंदीत अजय देवगणने आवाज दिलाय. अरविंदस्वामीची अॅक्टिंग पण जबरी आहे. कितीही वेळा पाहिला तरी आमच्या घरातलं कोणीही कंटाळत नाही. >>> अगदी!

अजित यांचा विवेगम रिलीज झालाय नेटवर हिंदी डब. एकदा नक्की बघा.. वर्थ वाचींग. अजितच्या चाहत्यांनी नक्की बघा....

नमस्कार मंडळी !! मी गेल्या ४ वर्षांपासून मायबोलीची नियमित वाचक आहे. इथले सगळेजण त्यांच्या लिखाणामुळे किंवा प्रतिसादामुळे अगदी परिचयाचे आहेत माझ्या Happy भाऊ,मणिमोहोर, मामी,साती,विशाल, बेफिकीर,अभिषेक...पण मी आत्तापर्यंत फक्त "silent reader" असल्याने मला कोणी ओळखत नाही इथे.
बाकी हा धागा एकदम आवडीचा आहे .. अन इथे सुचवलेले बरेच सिनेमे पहिले अन आवडलेही! म्हणून हा प्रतिसाद प्रपंच Happy

Pages