तेलुगू चित्रपट- लेखनाचा धागा!

Submitted by अज्ञातवासी on 27 June, 2017 - 12:55

मंडळी धागा बदलतोय.
आतापासून फक्त तेलुगुच नाही तर

१. तेलगू
२. तमिळ
३. कन्नड
४. मल्याळम

या चार प्रमुख दक्षिण भारतीय भाषेमधील चित्रपट चर्चा करूयात.
अर्थात माझं पहिलं प्रेम तेलुगुच असेल Wink

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Khaidi no 150 हा पण पाहायचा आहे. कसा आहे सिनेमा? ??>>>>> विजय चा कथि (katthi) हा सिनेमा पहा मस्त आहे.

तेलुगु सिनेमा हे family drama अस्तात् त्यामुळे ते जास्त भावतात.
1) Brindavanam
2) Mirchi
3) Antertiki daredi
4) Govindadu Anderivadelu
5) Veera
आणि अजुन बरेच आहेत मस्त अगदि कुटुबासोबत पहाण्यासारखे

बोमारिल्लू , हैप्पी डेस बद्दल बोललं का कोणी??
माझे अत्यंत आवडते आहेत
नॉस्टॅल्जिक फील होतं.. हे चित्रपट पाहिले की

हैप्पी डेस खूप रिलेट होतो. मी तर तो एकदा M३ च्या पेपरच्या आदल्या दिवशी पाहिलेला!!
पेपर लिहिताना अरे रे गाणं वाजत होतं डोक्यात सारखं Lol Lol Lol

तेलगू चित्रपटातील गाणी पण सही असतात.
काही गाणी तर एकदम कॉमेडी असतात Lol Lol Proud
शब्द समजत नाहीत, पण छान वाटतात ऐकायला.

माझी आवडत्या गाण्यांची यादी :
१. हैप्पी डेस : सगळी गाणी, विशेषतः "अरे रे अरे रे"
२. जेयम: सिन्नधो
३. आर्या : सगळी गाणी , "आ अन्ते" तर जबरदस्त आहे
४: सैराट : कानडी मध्ये सैराट ची गाणी भारी आहेत
5: प्रिया प्रकाश वॉर्रीर बाईंचं ते डोळा मारलेलं गाणं पण झकास आहे !

बाकी अजून आठवलं तसं सांगते .
तुम्हीही सांगा

भारत अणे नेनु मी बघितला. खूप सुंदर आहे. प्रेस कॉन्फरन्सचा सिन तर बेस्ट.

विक्रम वेदा मध्ये न जाणे का मला विजय सेतूपती आवडला. हा माणूस खातो चित्रपट. २०१७ मधला सगळ्यात बेस्ट चित्रपट

भारत अणे नेनु >>>>>> तो महेशबाबूचा नुकता आलेला तोच ना?

मला तर रंगस्थलम , ना पेरू सूर्या बघायचाय. बघितलाय का कोणी?

अजितकुमारचे पंखे आहेत कां कुणी इथे?------ अजितकुमार यांचा उल्लेख जो अजितकुमार करतो तो पंखा नाहीच.....

आमच्या साठी फक्त थाला....

एक इंटरेस्टिंग माहिती.
कोरताला सीवा. यांनी फक्त तीन चित्रपट दिगदर्शीत केले आहेत. पण तीनही चित्रपट त्या त्या वर्षाचे हायेस्ट ग्रोस्सिंग मुव्हीज ठरल्या आहेत.
१. मिर्ची
२.श्रीमंतुडू
३. जनता गॅरेज

आणि आता यांचा भारत अणे नेनु येतोय!
विथ महेश बाबू! >>>>> IM ची एक टिप्पणी दिसली Happy भारत अणे नेनु पण हिट झालाय .

अजितकुमार यांचा उल्लेख जो अजितकुमार करतो तो पंखा नाहीच..... हो ..ना . आम्ही अजिथ म्हणतो . थाला माहित नव्हतं . मी एक-दोन चित्रपट पाहिले आहेत . जाम आवडला मला तो अ‍ॅक्टर . त्याचं हसणं किती गोड आहे .

सध्या आम्ही अलु अर्जून चे फॅन . लकी द रेसर ची पारायणं होतात .
सन ऑफ सत्यमूर्ती पण आवडतो . आणखी एक आहे ज्यात ती हिरॉईन त्याला बार्सिलोना की कुठे भेटते . आधिच्या भाडेकरू मुलीची डायरी वाचून त्याच्या प्रेमात पडते .

आणखी एक आहे ज्यात ती हिरॉईन त्याला बार्सिलोना की कुठे भेटते . >>>> स्वस्ति जी, तो पिच्चर इद्दराममयिलाथो iddarammayilatho हिंदीत डेंजरस खिलाडी 2
माझा फेव्हरेट पिक्चर. खूप आवडतो मला. अल्लूच्या डीजे नंतर हाच पिच्चर फेव्हरेट आहे माझा.

थँक्स स्वस्ति. मी हे लिहिलंय हे विसरूनच गेलो होतो.
आता मात्र अल्लू अर्जुन आणि कोरताला सीवा चा एकत्र चित्रपट येतोय. तो एवढा हिट जाणार नाही असं वाटतंय....

थाला म्हणजे ग्रेसफुली एजिंग च मूर्तिमंत उदाहरण. सगळ्या साऊथ च्या ऍक्टर मध्ये डॅशिंग, रावडी, माचो वगैरे दिसण्याची स्पर्धा असतान, महेश बाबू आणि थाला आपल्या स्माईलवर चित्रपट निभावून नेतात...

हिंदीत डेंजरस खिलाडी 2
माझा फेव्हरेट पिक्चर. खूप आवडतो मला. अल्लूच्या डीजे नंतर हाच पिच्चर फेव्हरेट आहे माझा. >>>>> okie. Thank you . DJ मला पण फार आवडला. AA चे movies फार entertaining असतात. हाणामारी पण तितकीच.

Thank you>>>> आता हे कशाला! साऊथ मूव्हीज, त्यातही माझ्या फेव्हरेट हिरोबद्दल तासन् तास लिहू शकते मी ! Happy उलट मी तुम्हालाच थॅन्कस बोलायला पाहिजे... या पिच्चरची आठवण करून दिलीत म्हणून! बघीन म्हणते आज. Happy

DJ मला पण फार आवडला. AA चे movies फार entertaining असतात. हाणामारी पण तितकीच. >>>>> +1111111111111

२०१

भारीय हा धागा. हा धागा काढल्याबद्दल धागाकर्त्यांना विशेष धन्स. Happy

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद.
हा धागा काढला तेव्हा कऊचे सर्वात जास्त प्रतिसाद असायचे. मिसिंग हर!!! आणि संशोधक सुद्धा!!! हे दोन्ही आता मायबोलीवर येतात कज नाही काही माहीत.

थँक्स मेघा, स्वस्ति, राहुल, आनंद, अमा, सस्मित आणि द्वादशांगुला. बाकीच्या प्रतिसादकांचेही मनापासून आभार. मध्यंतरी मी माबोवर अॅक्टिव नव्हतो, तेव्हा तुम्हीच हा धागा जिवंत ठेवलात.

पुन्हा एकदा आभार!!!!

अहो लोहपुरुष , आभार काय मानताय ???
उलट तुमच्या धाग्यामुळे काही चांगल्या चित्रपटांशी ओळख झाली .
अगोदर मी , माझ्या नवर्याने ते डब्ड सौंदिंडीयन चित्रपट लावले की मी वैतागायचे . हल्ली आम्ही हिन्दी चित्रपट फार कमी बघतो .
ऑफिसमध्ये माझी एक तेलगू मैत्रिण आहे , तिच्याशी चर्चा केली की तिही काही चांगले चित्रपट सुचवते .
हा धागा आणि तो अतरंगी (???) चा गाण्याचा धागा , दोन्ही मस्त .

काही दिवसांपूर्वी 'नानी'ची 'सूपर खिलाडी 4' अर्थात नेनू लोकल पाहिली. भारीय. खूप फनी आहे. ज्यांच्या आसपास (किंवा स्वतःतही) इंजिनियर आहेत, त्यांनी बघाच!

जय लव कुसा???
जय लव कुश आहे ना
Junior NTR चा

एकदा कटिंग करायला वाट पाहत बसलो असताना मोहनलालचा एक चित्रपट सुरू होता, बहुतेक मल्याळम होता, मोहनलाल, त्याची बायको आणि त्याचा एक मित्र बहुतेक जंगलात राहत असतात. खूप सुंदर लोकेशन होते ते. कुणाला माहितीय का हा चित्रपट? मोहनलाल थंड डोक्याच बायकोवर प्रेम करणारं आणि रागीट character करतोय

जय लव कुसा???
जय लव कुश आहे ना>>>>>>कवू तेलगू मध्ये जय लव कुसा.
हिंदी डब द पावर ऑफ थ्री....

एकदा कटिंग करायला वाट पाहत बसलो असताना मोहनलालचा एक चित्रपट सुरू होता, बहुतेक मल्याळम होता, मोहनलाल, त्याची बायको आणि त्याचा एक मित्र बहुतेक जंगलात राहत असतात. खूप सुंदर लोकेशन होते ते. कुणाला माहितीय का हा चित्रपट? मोहनलाल थंड डोक्याच बायकोवर प्रेम करणारं आणि रागीट character करतोय>>>>> राव पायील बहुतेक तुम्ही पुलीमुरुगण म्हणत असाल.

bettadaa jiva ani tase fimilar movies
far chan ahet
national var regional language varache barech picture baghitale khup chan ahet national award bhetalele

Pages