तेलुगू चित्रपट- लेखनाचा धागा!

Submitted by अज्ञातवासी on 27 June, 2017 - 12:55

मंडळी धागा बदलतोय.
आतापासून फक्त तेलुगुच नाही तर

१. तेलगू
२. तमिळ
३. कन्नड
४. मल्याळम

या चार प्रमुख दक्षिण भारतीय भाषेमधील चित्रपट चर्चा करूयात.
अर्थात माझं पहिलं प्रेम तेलुगुच असेल Wink

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

गिरिश कर्नद चे pictures संस्कार पण मला आवडलेला
youtube ला मिळून जाईल हि सर्व मोवी एकामागून एक

भारत अणे नेनु मी बघितला. खूप सुंदर आहे. प्रेस कॉन्फरन्सचा सिन तर बेस्ट.---
टीव्हीवर आलाय का???मला पण पहायचा आहे...युट्युबवर पाहिला का??लिंक द्या बरं...

गिरिश कर्नद चे pictures संस्कार पण मला आवडलेला
youtube ला मिळून जाईल हि सर्व मोवी एकामागून एक
P. Sheshadri चे मुवि पन बघा
Harihar Gundurao Dattatreya चे मुवि पन बघा

टीव्हीवर आलाय का???मला पण पहायचा आहे...युट्युबवर पाहिला का??लिंक द्या बरं...<<<<<<<<
मेघा मी थिएटर ला बघितला. विथ सबटायटल.

सुलू धंस....
कीर्ती सुरेश इतकी सुंदर दिसू शकते हे पहिल्यांदाच कळलं मला.

सुलू धंस....
कीर्ती सुरेश इतकी सुंदर दिसू शकते हे पहिल्यांदाच कळलं मला. >>>> आभार. सावित्रीदेवी नावाच्या तेलुगु अभिनेत्रीचा बायोपिक आहे.

आभार. सावित्रीदेवी नावाच्या तेलुगु अभिनेत्रीचा बायोपिक आहे.>>>>> हो. सावित्रीदेवींनाच त्यांच्या चाहत्यांनी महानटी ही पदवी दिली होती. (हे महादेव च्या चालीवर वाचावे)

सेट मॅक्स वर खतरनाक खिलाडी लागलाय.
कोरताला सीवा यांचा पहिला चित्रपट.
बरोबर प्रभास, अनुष्का आणि सत्यराज.
माझा ऑल टाइम फेव्हरिट.

स्पायडर बघितला..
एवढा खास नाही वाटला.
महेशबाबु च्या बाकीच्या मुवीजच्या तुलनेत फिका वाटला.

स्पायडर बघितला..
एवढा खास नाही वाटला.
महेशबाबु च्या बाकीच्या मुवीजच्या तुलनेत फिका वाटला. >>>> स्पायडर मला बघायचा होता खरंतर. ओटीडब्ल्यू ही नाहीये का? नाही म्हणजे मी माझे अडीच तास वाचवायच्या दृष्टीने विचारतेय. कशावर आधारित आहे मूव्ही?

मला महेशबाबूचा बिझनेसमॅन आवडलेला खूप. काही दिवसांपूर्वी एक बघायला सुरूवात केलेली, फॅमीली ड्रामा, जाॅइंट फॅमिली वगैरेवर होता. मला नाव माहित नाहिये. पण मी ती अर्ध्यावरच सोडली. एवढी नाही आवडली. या विषयावरची येवडू 2 च बेस्ट होती.

मला एक कळत नव्हतं, की महेश बाबू आणि मुरगदोस सारखी टीम असताना स्पायडर इतका गंडलाच कसा?
द डार्क नाइट ची कॉपी मारायचा प्रयत्न दिसला मला.

मर्सल आहे इलायथालापथी विजय यांचा. मस्ट वॉच. जरूर बघा.

dangerous khiladi 2 >>> अल्लूचा? दुसरा पण कोणाचातरी आहे ना याच नावाने? मी अल्लूचा कालच बघितला युट्युबवर, तिसर्यांदा.

काही दिवसांपूर्वी एक बघायला सुरूवात केलेली, फॅमीली ड्रामा, जाॅइंट फॅमिली वगैरेवर होता. मला नाव माहित नाहिये. पण मी ती अर्ध्यावरच सोडली. एवढी नाही आवडली. >>> श्रीमन्ततुडू अस काहीतरी नाव आहे ना त्याच? नक्की माहित नाही पण त्यात रोहिणी हट्टन्गडी सुद्दा आहे वाटत.

काही दिवसांपूर्वी एक बघायला सुरूवात केलेली, फॅमीली ड्रामा, जाॅइंट फॅमिली वगैरेवर होता. मला नाव माहित नाहिये. पण मी ती अर्ध्यावरच सोडली. एवढी नाही आवडली.>>
कदाचित सबसे बढकर हम 2 ही असेल.
प्रकाश राज, महेश, व्यंकटेश आहेत ती का??
ज्यामध्ये महेशबाबु आणि व्यंकटेश भाऊ आहेत.

सबसे बढकर हम 2 >>> कल्पना नाही. मला तर युटूबवर स्पायडर नावाने मिळालेली. पण स्पायडर नक्कीच नव्हती. नाव एक दिलेलं नि व्हिडिओ एक होता. भरमसाठ गाणी होती त्यात. काहीतरी घराच्या पेंटचा की काय बिझनेस दाखवलेला.

रंगस्थलम बघितला नुकताच.. टिपीकल साउथचा पिक्चर, पण सस्पेन्स जबरी ठेवलाय शेवटपर्यंत.. >>>> हो???? कसाय पिच्चर? मला कधीपासून बघायचाय. हिंदी डबिंगची वाट बघतेय. रामचरण ची अॅक्टिंग भारी असते.

एक नंबर आहे पिक्चर. राम चरणचा अभिनय भारी आहे एकदम, मी इंग्लिश सबटायटल्स मध्ये बघितला, कदाचित त्याच्या शिवाय पण कळला असता. पण काही डिटेल्स मिस होऊ शकतात. आय एम डी बी वर 9 च रेटिंग आहे. एका तेलगू मित्राला सांगितलं तर तो म्हणाला एकदम परफेक्ट पिक्चर बघितलास म्हणून.

हिम्सकुलजी, सांगितल्याबद्दल धन्स हं! बघायलाच हवा. पण मला डब्ड च आवडतात. आता वाट पहावी लागेल. कुठेतरी पाहिलेलं की डबिंग करायला घेतलंय त्यांनी.

Pages