तेलुगू चित्रपट- लेखनाचा धागा!

Submitted by अज्ञातवासी on 27 June, 2017 - 12:55

मंडळी धागा बदलतोय.
आतापासून फक्त तेलुगुच नाही तर

१. तेलगू
२. तमिळ
३. कन्नड
४. मल्याळम

या चार प्रमुख दक्षिण भारतीय भाषेमधील चित्रपट चर्चा करूयात.
अर्थात माझं पहिलं प्रेम तेलुगुच असेल Wink

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

महेश बाबूचा भारत अणे वेणू कुणी बघितलंय, त्यावर चर्चा नाही. अरविंद समेथा, एवढा क्लास चित्रपट त्यावर चर्चा नाही. >>> नेट वर आला कि बघणार Proud

लीडिंग अॅक्टर खूपच घाबरट असतो, अगदी अंगावरच्या पांघरूणावरपण मारूतीचा फोटो असतो

>>
तो चित्रपट कंचना २ असावा बहुतेक.

आत्ताच चेक केलं...लिंक ओपन होत नाहीये...बहुतेक कॉपीराइट प्रॉब्लेम...मिळाली मला लिंक की नक्की देते.

भारत अने नेनु असं आहे ते. Prime वर पाहिला. चांगला आहे. महेश बाबू अगदी परफेक्ट फिट या रोलसाठी.
महेश बाबूच्या नव्या MB थिएटरमध्ये जाऊन त्याचाच movie पाहायला आवडेल Happy
रंगस्थलम अर्धवट पाहिला. चेरी आणि समंथाच्या गमतीजमती आणि गाणी मस्त. खेड्याची वातावरण निर्मिती भारी पण शेवटपशेवटपर्यंत नाही पाहिला.

१. ९६ मधली सगळीच गाणी श्रवणीय आहेत, विशेषतः "Anthaathi" हे गाणं आता माझ्या फोनची रिंगटोन आहे

२. गोडाचारी प्राईमवर बघितला, आवडला, ट्विस्ट भारी आहेत.

३.." भारत अने नेनु" चा रिमेक सलमान "भारत" या नावाने करतोय.
जनता माफ नाही करेगी

भारत अने नेनु" चा रिमेक सलमान "भारत" या नावाने करतोय.
जनता माफ नाही करेगी>>>> का बरं?? आम्हाला नै माहित अणु रेणु. आम्ही सलमानचा भा र त बघणार Happy

रंगस्थलम अर्धवट पाहिला. चेरी आणि समंथाच्या गमतीजमती आणि गाणी मस्त. खेड्याची वातावरण निर्मिती भारी पण शेवटपशेवटपर्यंत नाही पाहिला. >>> नक्की बघा शेवट पर्यंत.. शेवटचा ट्वीस्ट जबरी आहे..

अर्जुन रेड्डी हा विजय देवरकोंडा ह्याचा चित्रपट जबरदस्त आहे . त्याचा स्टारडम खूपच वाढलाय ह्या मूव्ही मुळे.

मला विजय देवरकोंडा हा माणूस खूप ओव्हररेटेड वाटतोय. त्याच्या टॅक्सी ड्रायव्हरचा ट्रेलर बघितल्यावर अजून.
असाच एक ओवररेटेड ऍक्टर म्हणजे धनुष.
तेलगू मद्धे मला नानी, आणि तामिळ मध्ये विजय सेतुपती हे खूप अंडररेटेड वाटतात.
अर्थात हे माझे वैयक्तिक मत.
अर्जुन रेड्डी ही मला पूर्ण दिग्दर्शक याची कमाल वाटते. संदीप वंगा. महेश बाबूबरोबर याचा चित्रपट येत असल्याने अपेक्षा खूप उंचावल्यात...

यावर्षीची माझी लिस्ट. आवडलेल्या क्रमानुसार...
१. अरविंद सामेथा वीरा राघवा
२. रंगस्थळम
३. भारत अणे नेनु
४. २.०
५. विवेगम
६. अगण्यातवासी
७. ना पेरू सूर्या
८. एम सी ए
९. गुरू
१०. सरकार

*trailer

सरकार खरच भारी आहे, बच्चन ने मस्त काम केलंय. >>>>>> तो हा सरकार नव्हे, च्र्प्स, हा तामिळ अभिनेता विजयचा तामिळ चित्रपट ' सरकार'

Pages