तेलुगू चित्रपट- लेखनाचा धागा!

Submitted by अज्ञातवासी on 27 June, 2017 - 12:55

मंडळी धागा बदलतोय.
आतापासून फक्त तेलुगुच नाही तर

१. तेलगू
२. तमिळ
३. कन्नड
४. मल्याळम

या चार प्रमुख दक्षिण भारतीय भाषेमधील चित्रपट चर्चा करूयात.
अर्थात माझं पहिलं प्रेम तेलुगुच असेल Wink

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ओह तो कांचन २ काय ?
फर्स्ट हल्फ जबरदस्त आहे, सेकंड अतिशय फालतू दर्जा..
एन्ड तर महबोरे..

Kau, निदान subtitle असत तरी कळलं असता... कानदी नाही कळत.. पण धन्यवाद, नोट केलाय मोवी, dubbed आला की बघेल

ओह तो कांचन २ काय ?
फर्स्ट हल्फ जबरदस्त आहे, सेकंड अतिशय फालतू दर्जा..
एन्ड तर महबोरे..>>> Lol
नाव कंचना आहे कांचन नाही...तुमचा कोबोर्ड नको तिथे कानामात्रा देतोय.. Lol

Uhoh
कोणी पहात नाही कै आता???
मी २ दिवसांपुर्वी जांबाज कि जंग पाहिला..गोपीचंद चा..आवडला मला...

12 August पासून set max वर रात्री 8 वाजता तेलगू हॉरर films लागणार आहेत

तेलुगु चित्रपट सृष्टी बॉलीवूदच्या तोंडात मारील अशी आहे. तिथल्या नट्या बॉलीवूड इतकेच पैसे घेतात. हल्लीच्या आघाडीच्या हिंदी नट्या एक तर डेब्यू तिथून करतात अथावा नंतरही हौसेने कामे करतात कारण तगडे मानधन. कारण चित्रपट पाहणे हा तेलुगु पब्लिकचा धर्म नव्हे तर श्वास आहे. त्यामुळे त्या चित्रपटांचे कलेक्शन मोठे असते. दाक्षिणात्य लोकाना अमिताभ बच्चन ऐकून ठाउक असतो. पाहिलेला नसतो. तलैवा पेक्षा मोठे कोणीच नाही. तेलुगु लोकांचे सिनेमा प्रेम विलक्षण आहे. वेडच आहे ते ! हैद्राबाद शहर हे एकत्रित पुणे आणि पिंची एवढेच असावे. पुणे आणि पिंचित थिएटर्स किती आहेत ? ४० च्या वर नसावीत. हैद्राबदेत किती असावीत ? नाही , तुमचा आपला एक अंदाज? साडे तिनशे !!! आणि ती तुडुम्ब असतात. दोन हजार वस्तीच्या गावात २ एसी थिअ‍ॅटर्स पाहिल्यावर मी मनातच त्यांना सा . न. केला. आपल्यासारखे परीक्षण वाचून सिनेमा थेटरात पहायचा की टीव्ही वर आल्यावर फुकटात पहायचा असला विचार तेलुगु माणूस करीत नाही. त्यामुळे तेलुगु आणि एकूणच दाक्ष्णात्य चित्रपट सृष्टी अवाढव्य आहे. कलरफुल आहे, दर्जेदार ही आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले चित्रपट कितीतरी दाक्षिणात्य आहेत. मसाला तर आहेच.
हल्ली डबिंगमुळे , रिअ‍ॅलिटी शो मुळे ए आर रहमान, इलय राजा, क्रीम, अशा अद्भुत संगीत मंडळींचा परिचय झाला. जुन्या काळातली कितीतरी उत्तम दक्षिणी गीते आपल्याला माहीतही नाही.

काल रात्री पुलिस और टायगर पाहिला...खूप आवडला...
कुत्रा तर जाम आवडला..शेवटी मरतो बिचारा..रडवतोच...
एकदा बघनेबल आहे...

साऊथ मूव्हीज!!!! मी फॅन आहे साऊथ मूव्हीजची. काय भारी असतात एकेक. स्टोरी, अॅक्टिंग , एक्सप्रेशन्स, सगळंच. हल्ली सुट्टीत तर मी सपाटाच लावलाय या मूव्हीज बघायचा. लहानपणी टिव्हीवर बघायचे, पण त्या टाॅलीवूडच्या, हे माहीत नव्हतं.नंतर एकदा दीदीने रामचरणची 'मगधीरा' दाखवली नि मी फॅनच झाले. मगधीरा कितीतरी वेळा पाहिलाय त्यानंतर. एव्हरग्रीन मूव्ही आहे ती. रामचरणच्या सगळ्या मूव्हीज बघितल्या आहेत मी. नुकताच त्याचा' रंगस्थलम' आलाय. तो बघायला मजा येईल. यानंत एक महेशबाबूची बघितली, 'बिझनेसमॅन ' की काय. मग काही महेशबाबूची मूव्ही बघण्याचा योग आला नाही.

त्यानंतर दिदीने 'सन ऑफ सत्यमूर्ती' दाखवली. त्यानंतर मी अल्लू अर्जुनची फॅनच झाले. हल्ली त्याच्याच बघते आहे. त्याच्या अगदी जुन्या दोन-तीन नाही बघितल्यात, पण बाकीच्या सगळ्या बघून झाल्यात.

एक खरं, रामचरण नि अल्लू अर्जुन या चुलत भावांची अॅक्टिंग जबरी आहे. नुकतेच त्यांचे वाढदिवस येऊन गेले. त्या दोघांना एकसाथ 'येवडू' मध्ये बघितलं होतं. तीही भारी आहे मूव्ही.

पण मला अजून अल्लू अर्जुन ची आर्या आणि आर्या 2 यातला फरक नाही कळला. मुळात त्यातली मी जी एक बघितलीय ती पार्ट वन आहे की टू हेच माहीत नाही. युट्युबवरही गोंधळ घातलाय त्या चॅनेल्सवाल्यांनी. कोणी मला सांगाल का? आणि लिंक असेल तर द्या ना प्लिज. मी पाहिली त्यात काजल अग्रवाल होती.

मध्ये बाहुबली 1,2 बघितलेली त्या फेमस प्रश्नामुळे. नंतर वाटलं यापेक्षा मगधीरा मस्त होती. (समस्त बाहुबलीप्रेमींची माफी मागून)

नंतर प्रभासची एक बघितलेली, पण अर्ध्यावरच सोडली.

आणि सर्वोत्कृष्ट फनी अॅक्टर म्हणजे ब्रम्हानंदनम. तो असला की हमखास मूव्ही आवडतेच. त्याची अॅक्टिंग जबरी आहे.

अॅक्ट्रेस म्हटल्या की माझ्या फेव्हरेट काजल अग्रवाल, अनुष्का शेट्टी, रकुल प्रीत सिंग. भारी असते त्यांची अॅक्टिंग.

मला आवडलेल्या साऊथ मूव्हीजची लिस्ट-
1) मगधीरा
2) राछा / बेटिंग राजा
3) बिझनेसमॅन
4) डबल अॅटॅक / नायक
5) ब्रुस ली
6) ध्रुवा
7) येवडू
8) येवडू 2 / गोविंदूडू अंडरीवडेले
9) ऑरेंज
10) चिरूथा
11) डीजे / ध्रुव जगन्नाथ
12) सर्रईनोडू
13) इद्दरम्मयलीथो / खतरनाक खिलाडी 2
14) सन ऑफ सत्यमूर्ती
15) रेस गुर्रम / लकी द रेसर
16) आर्या टू
17) बनी
18) परूगू
19) रूद्रमादेवी
20) बाहुबली 1
21) बाहुबली 2

अर्थात यात अल्लू अर्जुन आणि रामचरणचं वर्चस्व आहे, कारण ते दोघेही माझे फेव्हरेट हिरो आहेत... Happy

काजल आहे म्हणजे आर्या२.
माझा आवडता तेलुगु मुव्ही आहे तो. काय जबरदस्त अ‍ॅक्टिंग केलीये त्यात अल्लू अर्जूनने..

अच्छा. धन्यवाद हं पुंबा.
खरंच त्या मूव्हीमध्ये कधीकधी त्याच्या विचित्र वागण्याची भीती वाटते, हा आता काय करेल म्हणून; तर कधी वाईट वाटतं, हा इतका भोळा कसा म्हणून. पण आर्या आणि अजयमधली फ्रेन्डशिप भारी दाखवलीय, खासकरून आर्याची. मि. पर्फेक्ट गाणं पण मस्त जमलंय.

तुमच्या कोणाकडे आर्या ची लिंक असेल तर द्याल का? युट्युबवर सापडतच नव्हता मला डब केलेला. काही ठिकाणी तर पद्धतशीरपणे दोन्ही पार्टस मध्ये घोळ घातला आहे.

Main hoon raja main hoon mantri पण चांगला सिनेमा आहे. >>> Biggrin . हो . माझ्या लेकाचा पण आवडता सिनेमा आहे .
तो हिरो , भल्लालदेव आहे , हे सांगितल्यावर त्याने डोळे मोठे करून एक्दम "खरं??" विचारलेलं .
राणा चा तो राधाला वाचवताना शर्ट फाटतो , तो सीन बघून त्याची खात्री पटली Lol

Main hoon raja main hoon mantri>>>>>>>>>>>> एक नंबर पकाव आहे. कैच्याकै.
ट्रेलर बघुन हा पिच्चर बघायचं ठरवलेलं. एकदा टीव्हीवर दिसला. डब्ड. म्हणुन काम थांबवुन बघायला बसले.
जाम पकाव आहे.

Dhruva हा सिनेमा पण मस्त आहे. >>>>>> हो ध्रुवा भारीय. भरपूर आवडतो मला. हिरो आणि विलन दोघांचीही अॅक्टिंग भारीय. स्टोरीही खिळवून ठेवेल अशीच आहे.

Pages