निसर्गाच्या गप्पा (भाग ३२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2017 - 05:46

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३२ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

वसंत ऋतुचे कौतुक करून, ग्रीष्माच्या पाठवणीची तयारी करून, ’वर्षा ’च्या स्वागताला आपण सर्व सज्ज झालो आहोत.
वसंतात नेत्रसुख मिळालं. विविध रंगाने, गंधाने, न्हालेला निसर्ग बघून मन हरखून गेलं. कोकिळकूजनाने कान तृप्त झाले.
ग्रीष्मात रसना तृप्त झाली. आंबे, फ़णस, जांभळं, कलिंगड, करवंद, जांभ, द्राक्षं, अशा विविध, फ़ळांनी आपलं मन जिंकलं.
आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती,

"घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ! "

खरं तर एकच गोष्ट, परत परत घडली तर आपल्याला कंटाळा येतो पण याचे मात्र आपण कौतुक करतो आणि म्हणतो,

" नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ! "

अशा या पर्जन्यराजाची आपण सर्वच फ़ार आतुरतेने वाट पहात आहोत. आपणच नव्हे तर उन्हाच्या चटक्याने लाही लाही झालेली
ही धरा, आपले अनंत हात पसरून भेटायला येणार्‍या पर्जन्याची आतुरतेने, नटून थटून वाट पाहत आहे.
पशु, पक्षी, झाडे, वेली, सर्वांनाच आता वेध लागलेत ते पावसाचे. त्यात चिंब भिजण्याचे.
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की आपण लगेच पोहोचतो बालपणात. थुईथुई नाचनारा मोर, त्या कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडणं,
मोठ्यांचं लक्ष चूकवून पावसात भिजणं, आणि साठलेल्या पाण्यात उड्या मारून स्वत: व दुसर्‍याला भिजवणं. अनंत आठवणी!

"पाऊस" ! पाऊस म्हटलं की मला आठवतो आणि आवडतो तो कोकणातला पाऊस. पण त्याच संपूर्ण वर्णन मी शब्दात करूच शकत नाही.
तो ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पावसाचा थयथयाट, पाण्याचा खळखळाट.
पहिल्या पावसाबरोबर दरवळणारा मृदगंध, ते लाल, मऊ मऊ रेशमी किडे, अंगणभर ऊड्या मारणारी, पायाखाली येणारी, अगदी
नखाएवढी छोटी बेडकांची पिल्ले, आपला पिटुकला देह नाचवत तिरके तिरके पळणारे चामटे, (खेकडे,)
अंगणात पडणार्‍या पागोळ्या, त्यात हात पाय़ भिजवणं, हळूच पाणी पिणं, हळूच अंगणात धाऊन परत येणं, छत्री घेऊन पावसात फ़िरणं.
घरात गळणार्‍या पाण्याखाली लावलेली भांडी, आनंदाने डोलणारी हिरवीगार झाडं, छोटे छोटे निर्झर, अळवाच्या पानांवर नाचणारे मोती.
सकाळीच शेतावर खोळ घेऊन निघालेले शेतकरी आणि बैल, बैलांच्या गळ्यातल्या घुगुरांचा नाद, थोड्याच वेळात न्याहारी घेऊन जाणार्‍या कारभारणी, नदीला आलेला पूर, त्यात वाहून जाणारी झाडे, साप, साकव, आणि ह्या सगळ्यात नम्र होऊन वाचलेली लव्हाळे!
झाडाखाली उगवलेली छोटी छोटी रोपं, आणि त्यात ते काजूचं असेल तर त्यावर मारलेला डल्ला. Happy सगळं कसं लख्ख उभं रहातं डॊळ्यासमोर!
तर अशा या पावसाचं आपण स्वागत करूया आणि एक वाक्य जरूर लक्षात ठेऊया,

"आला पावसाळा, तब्बेत सांभाळा! "

निसर्गाने आपल्याला मुक्त हस्ताने दान केलयं, "घेता किती घेशील दो कराने". पण आपण त्याची योग्य निगा राखली पाहिजे .
त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. त्याच संरक्षण, संवर्धन करायला पाहिजे.

वरील मोगर्‍याच्या अक्षरातील फोटो व मनोगत नि.ग. प्रेमी शोभा हिचे आहे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच फोटो सगळे.. कमळं, कृष्णकमळं, नाईट हेरॉन, धनेश, कांचन, काटेसावर, खाटीक, जायफळ, दालचिनी सगळेच..
\
माझ्याकडला मोगरा आता मस्त फुललाय..
जोडीला पेट्रियाच्या वेलाचा दुसरा बहार पन सुरु झालाय.
आयरिस कळीतच अटकलाय. मला वाटत ती तशीच जळून जाणार कळी Sad .
पाणी जास्त नाही..तब्येतीला पुरेल इतकच..उन्ह पन अति नाही तरी हे असं का व्हावं Sad

टिना माझ्या आयरीसच मागच्या वर्षी तस झालेल. मी ह्यावर्षी कुंडी सावलीत ठेवली आणि जीवामृत घातल. छान मोठी फुले येतात आता.

टिना माझ्या आयरीसच मागच्या वर्षी तस झालेल. मी ह्यावर्षी कुंडी सावलीत ठेवली आणि जीवामृत घातल. छान मोठी फुले येतात आता.>> जीवामृत कुठुन मिळायचे चान्सेस नाही गं मला. माझ्या कुंड्यापन सावलीत आहे. सकाळच दोन चार तासाच उन्ह मिळत त्यांना.. प्रखर उन्हात नाही त्या.. बघते जागा हलवून..

टिना तुझ्याजवळ असेल ते खत घालून बघ.

सरड्याने सध्या पक्षांच्या ढोलीची जागा घेतलेय. बरेच दिवस हा ढोलीतच दिसतोय.
१)

२)

३)

टीना तुला हवे असेल तर पुण्यात जीवामृत कुठे मिळेल ते सांगु शकेन
माझे एक नातेवाईक देतात करुन

टीना तुला हवे असेल तर पुण्यात जीवामृत कुठे मिळेल ते सांगु शकेन
माझे एक नातेवाईक देतात करुन>> धन्यवाद मृनिश.. सांगा मला म्हणजे विचारपूस करता येईल त्यांना..

फोटो सर्वच सुंदर.

सरड्याची भीती वाटते मला, मागे मी खाली ठेवलेल्या कुंड्यांना पाणी घालायला गेले, एका रोपावर सरडा होता, भारी घाबरले मी.

काल श्रावणीने मिनी गार्डन बनवल.
garden.jpg

सायुने इनमिनतिन मार्फत पाठवलेल्या चेरी टोमॅटोला टोमॅटो लागले आज राधाला पिकलेले काढायला सांगितले.
tomato.jpg

मिनी गार्डन मस्तच..
चेरी टोमॅटो...आहाहा..कसला ऐसपैस पसरलाय तो वेल..
मला कधी मिळणार बिया Sad

जागू,
टोमॅटो लगत लावलेल्या सगळ्या कॅमेंकोया मस्तच.. लाल, पिवळी, गुलाबी..केशरी दिसेना गं कुठं?

सद्ध्या मी हवेत आहे.. माझे ऑर्डर केलेले सक्युलंटस आलेत सारे घरी.. सुखरुप आहेत..
त्यांच प्रोपॅगेशन करुन विकण्याचा माझा मानस आहे.. बघु काम सुरु केलय ते कुठवर तडीस नेता येईल ते..
घरासमोरच्या मंदिरातून मागे आणलेल्या नारळाच्या बुर्‍या/शेंड्या आणून त्याचं कोकोपीट तयार केलं परत. जरा मेहनतीच काम आहे पण वर्थ इट. तसही जगताप नर्सरीमधील ५किलो कोकोपीटचे ब्लॉक बघताना ल्क्षात आलं कि त्यात बर्‍याचश्या शेंड्या निव्वळ तुकडे करुन ठेवल्या आहेत.. भुसा नव्हता दिसत एवढा. त्यामुळे म्हटल स्मॉल स्केलवर काम करताना हाताशी असलेल्या गोष्टी घेऊनच काम करावं.

हे बागेतले काही नविन मेंबर..

Echeveria black prince

.
.
Echeveria elegance

.
.
Graptosedum pink

.
.
हा आपला मोगरा..

.

आणखीपन आहेत सक्युलंट्स.. फोटो टाकते हळूहळू..

श्रावणीचे मिनी गार्डन मस्त आहे. चेरी टोमॅटोचा वेल असतो का? चेरी टोमॅटो खूप छान दिसत आहेत.

टीना, फोटो काहून दिसत न्हायी?

देवकी, क्रोमात बघ बर एकदा..

आज आणखी एक मस्त गंमत दिसली..
ताईच्या घरुन आणलेल्या झाडाच्या टाकून दिलेल्या पानाला पालवी फुटली..
मागच्या पानावर कुठेतरी मी Kalanchoe diagremontiana हे इवलालं रोपट टाकलं होत आणि त्याच कॉमन नेम Mother of thousands अस दिल होत ते खर तर Mother of millions आहे हे आत्ता केलेल्या अभ्यासावरुन कळलं मला त्यामुळे चुकीचे नाव दिल्याबद्दल क्षमस्व.
कुणाला फरक जाणून घ्यायचा असल्यास कृपया खालील लिंकला भेट द्यावी.
https://sublimesucculents.com/difference-mother-of-thousands-mother-of-m...

तर माझ्या त्या मदर ऑफ मिलीयनला कुंडीत (खरतर कुंडी म्हणावी का हि शंकाच आहे.. पार्सलचा पांढरा प्लॅस्टिकचा डबा आहे तो) त्याला रुजवताना खालची छॉटी पाने मी कुंडीतच टाकली. पूरली नाही; अगदी मातीवर ठेवली. तर त्यावर एक छोटूस रोप (? त्या दोन पानांच्या पिल्लाला काय रोप म्हणावं.. १मिमी सुद्धा व्यास नसेल त्या पानांचा.) उगवलय. घरी अश्या जातीतल एक झाडं होतं त्यामुळे पानांपासुन रुजायची महिमा माहिती होती पण एवढ्या लहानश्या पाच सहा पानांच्या रोपाच तोडलेलं पान रुजेल कि त्याची माती होईल याची शंकाच होती पण ते रुजल. फार मस्त वाटतय.

माझ्याकडे असलेलं झाडाच नाव आहे Brayophyllum houghtonii aka Mother of thousands..

साधनाताई तुम्ही दालचिनी आणि तमालपत्र ही दोन वेगळी झाडं आहेत म्हणताय पण तमालपत्र म्हणून जो फोटो दिलात तो दालचिनी च्या कोवळया पालवीचा दिलाय. आणि आमच्या कडे दालचिनी चे झाड आहे. त्याचीच पानं तमालपत्र म्हणून वापरतात.

श्रावणी मिनी गार्डन क्युट. गोड एकदम.

चेरी टोमाटो गोड.

बाकी टीनातायसाठी क्रोमात जायला लागणार. मध्ये क्रोम माबो बिनसलं होतं त्यामुळे आय इ वर आलेले. आता सुधारलंय त्यामुळे जायला हरकत नाही.

बाकी टीनातायसाठी क्रोमात जायला लागणार>>>> हो ना.आताच जाऊन आले.टीना,पहिला तिसरा फोटो खूप मस्त आहे.

साधनाताई तुम्ही दालचिनी आणि तमालपत्र ही दोन वेगळी झाडं आहेत म्हणताय पण तमालपत्र म्हणून जो फोटो दिलात तो दालचिनी च्या कोवळया पालवीचा दिलाय. आणि आमच्या कडे दालचिनी चे झाड आहे. त्याचीच पानं तमालपत्र म्हणून वापरतात.>>>>>>

कोवळ्या पालवीच्या फोटोत गडबड होणे शक्य आहे. कारण रस्त्याने चालताना एका घरासमोर झाड पाहिले व त्याचा फोटो काढला. ते तमालपत्र हे मात्र मी स्मृतीवर विसंबून सांगितलंय करण गेल्या महिन्यातच सेम पालवी मला तामलपत्राचे झाड म्हणून दाखवण्यात आलीय.

दालचिनीचा मात्र मालकाला विचारून काढलाय व त्याने ते तमालपत्र नाही तर दालचिनी आहे हे सांगितले. तमालपत्र आहे का हे मी विचारले होते. मी वास घेऊन बघितला, ताज्या व सुकलेल्या दोन्ही पानांना अजिबात वास नव्हता.

नंतर तिरोड्याला अजून एक प्रकारच्या तमालपत्राशी भेट झाली. पाने सुकलेली होती, खूप वास होता. हे पान इथे बाजारात मिळणाऱ्या तमालपट्रासारखे दिसत नाही पण वास तसाच होता.

त्यांच्याकडे ऑल स्पाईसचे देखील झाड होते, पण काळोख झाल्यामुळे फोटो काढता आला नाही.

हे तमालपत्र आंबोलीला एकाच्या घरी आहे. त्याने तमालपत्र म्हणून सांगितले, वासही तसाच होता.

अजून एक फोटो

मला दालचिनी व तमालपत्रातला वास सोडता इतर फरक सांगता येणार नाही कारण डोळ्यांना दोन्ही सारखीच वाटली. Happy

Pages