निसर्गाच्या गप्पा (भाग ३२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2017 - 05:46

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३२ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

वसंत ऋतुचे कौतुक करून, ग्रीष्माच्या पाठवणीची तयारी करून, ’वर्षा ’च्या स्वागताला आपण सर्व सज्ज झालो आहोत.
वसंतात नेत्रसुख मिळालं. विविध रंगाने, गंधाने, न्हालेला निसर्ग बघून मन हरखून गेलं. कोकिळकूजनाने कान तृप्त झाले.
ग्रीष्मात रसना तृप्त झाली. आंबे, फ़णस, जांभळं, कलिंगड, करवंद, जांभ, द्राक्षं, अशा विविध, फ़ळांनी आपलं मन जिंकलं.
आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती,

"घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ! "

खरं तर एकच गोष्ट, परत परत घडली तर आपल्याला कंटाळा येतो पण याचे मात्र आपण कौतुक करतो आणि म्हणतो,

" नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ! "

अशा या पर्जन्यराजाची आपण सर्वच फ़ार आतुरतेने वाट पहात आहोत. आपणच नव्हे तर उन्हाच्या चटक्याने लाही लाही झालेली
ही धरा, आपले अनंत हात पसरून भेटायला येणार्‍या पर्जन्याची आतुरतेने, नटून थटून वाट पाहत आहे.
पशु, पक्षी, झाडे, वेली, सर्वांनाच आता वेध लागलेत ते पावसाचे. त्यात चिंब भिजण्याचे.
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की आपण लगेच पोहोचतो बालपणात. थुईथुई नाचनारा मोर, त्या कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडणं,
मोठ्यांचं लक्ष चूकवून पावसात भिजणं, आणि साठलेल्या पाण्यात उड्या मारून स्वत: व दुसर्‍याला भिजवणं. अनंत आठवणी!

"पाऊस" ! पाऊस म्हटलं की मला आठवतो आणि आवडतो तो कोकणातला पाऊस. पण त्याच संपूर्ण वर्णन मी शब्दात करूच शकत नाही.
तो ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पावसाचा थयथयाट, पाण्याचा खळखळाट.
पहिल्या पावसाबरोबर दरवळणारा मृदगंध, ते लाल, मऊ मऊ रेशमी किडे, अंगणभर ऊड्या मारणारी, पायाखाली येणारी, अगदी
नखाएवढी छोटी बेडकांची पिल्ले, आपला पिटुकला देह नाचवत तिरके तिरके पळणारे चामटे, (खेकडे,)
अंगणात पडणार्‍या पागोळ्या, त्यात हात पाय़ भिजवणं, हळूच पाणी पिणं, हळूच अंगणात धाऊन परत येणं, छत्री घेऊन पावसात फ़िरणं.
घरात गळणार्‍या पाण्याखाली लावलेली भांडी, आनंदाने डोलणारी हिरवीगार झाडं, छोटे छोटे निर्झर, अळवाच्या पानांवर नाचणारे मोती.
सकाळीच शेतावर खोळ घेऊन निघालेले शेतकरी आणि बैल, बैलांच्या गळ्यातल्या घुगुरांचा नाद, थोड्याच वेळात न्याहारी घेऊन जाणार्‍या कारभारणी, नदीला आलेला पूर, त्यात वाहून जाणारी झाडे, साप, साकव, आणि ह्या सगळ्यात नम्र होऊन वाचलेली लव्हाळे!
झाडाखाली उगवलेली छोटी छोटी रोपं, आणि त्यात ते काजूचं असेल तर त्यावर मारलेला डल्ला. Happy सगळं कसं लख्ख उभं रहातं डॊळ्यासमोर!
तर अशा या पावसाचं आपण स्वागत करूया आणि एक वाक्य जरूर लक्षात ठेऊया,

"आला पावसाळा, तब्बेत सांभाळा! "

निसर्गाने आपल्याला मुक्त हस्ताने दान केलयं, "घेता किती घेशील दो कराने". पण आपण त्याची योग्य निगा राखली पाहिजे .
त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. त्याच संरक्षण, संवर्धन करायला पाहिजे.

वरील मोगर्‍याच्या अक्षरातील फोटो व मनोगत नि.ग. प्रेमी शोभा हिचे आहे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

पोर्निमा ,
तुझे सर्वांतर्फे स्वागत!
फोटो दिसत नाहीत.

जिप्सींचे फोटो एकदम झकास.त्यात गाभुळलेल्या चिंचांचे फोटो टाकून हालत बेकार केली.

अग टीना तू फोटो टाकतेस, माहिती आहे तुला बरीच ती देतेस. त्यापासून मी लांब.>>>.>> अन्जू, मीही तुझ्या बोटीत आहे ग.

पौर्णिमा दोन फोटोंमध्ये थोडी गॅप दे व तिथे काहीतरी लिही, नाहीतर फोटो एकमेकांना चिकटणार।

आणि तुझ्या img src चे शेवटचे "/> आहे ना त्यात " व / मध्ये स्पेस राहिलीय बघ.

जिप्सी,

सगळेच फोटो खूप खूप आवडले

जिप्सी चे फोटो म्हणजे केवळ नेत्र-सुख.
पपनस च्या फुलांना खुप सुवास असतो.

पोर्णिमा, ही आयरस आहे. खुप छान फोटो..

जिप्सी,
सर्वच प्रचे सुरेख.त्यात आंब्याचा मोहोर आणि हुरडा मस्तच.

पोर्णिमा,मस्तच ग!

इतके वर्षे बिचार्‍यांकडे कुणी ढुंकुणही पाहिल नाही. पण सोशल मिडियावर फोटो झळकले आणि याचं नसीबच पालटल. येणारे जाणारी लोक गाड्या थांबवून खास याला पाहु लागले. अहो इतकंच काय तर सेल्फी, प्री/पोस्ट वेडिंग शूट वाल्यांनाही याने भुरळ घातली. "घर कि मुर्गी दाल बराबर" उक्तीप्रमाणे घरच्या जवळ असुनही फोटो काढण्याइतपत याचं कोडकौतुक नव्हत. पण आज आमचेही पाय इथे पुन्हा वळले. अर्थात सोशल मिडियामुळे प्रसिद्ध झालेली हि "फॉरेनची वाट" फोटो काढणा-यांनी थोड्या प्रमाणात भरून गेली.

"Pink Tabebuia" किंवा "बसंतराणी" या नावाने ओळखला जाणारा हा वृक्ष दरवर्षी बहरतो अगदी तसाच यावर्षीही बहरला आहे पण यंदा सोशल मिडियाने त्याला जास्तच "बहरवलंय".

.

.

.

.

.

अरे वा! इथे तर मस्त रंगपंचमी साजरी झालेय. Happy

आता वाचते सगळी पानं. Happy

काल / परवाच आठवण झाली की जिप्सीने इकडे खूप दिवसात फोटो डकवले नाही. आणि आज दिसले. Happy

माझ्याकडे वर्षभरापूर्वी मोगर्‍याच रोप लावलेलं मी. जे दिसताना श्रब कॅटेगरीतल वाटल पण वाढताना मात्र वेलीप्रमाणे वाढतय. मला वाटल या हिवाळ्यात फुलं धरतील त्याला पन नाय तर म्हटल जाऊदे.
काल पाहिलं तर कळ्याच कळ्या दिसल्या लागलेल्या.. मार्च च्या उन्हाळ्यात फुलं येतील म्हणायचे. मॅडच आहे Wink .

मागे आणलेल्या बनाना स्ट्रिंग सक्युलंटला पिल्लावळ आलीए..कसल मस्त वाटतय माहितीए.
आणखी एक परपल रंगाचे छोटूले पानं असणार्‍या हँगिंग प्लांटच्या दोन तीन काड्या आणलेल्या त्यापन रुजल्या मस्त. नाव माहिती नाही मला त्याच. मिळाल तर टाकते फोटोसहित. Happy

मार्च च्या उन्हाळ्यात फुलं येतील म्हणायचे. मॅडच आहे>>>>>टिने, मोगर्‍याचा बहर उन्हाळ्यातच असतो. माझ्याकडचा मोगरा एप्रिल-मे आणि ऑक्टोबर नोव्हेंबरात फुलतो. Happy

टिने, मोगर्‍याचा बहर उन्हाळ्यातच असतो. >+१ उन्हाळ्यात खूप पांढरी फुलं फुलतात. निसर्गाचं वैभव !

Pages