सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३२ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
वसंत ऋतुचे कौतुक करून, ग्रीष्माच्या पाठवणीची तयारी करून, ’वर्षा ’च्या स्वागताला आपण सर्व सज्ज झालो आहोत.
वसंतात नेत्रसुख मिळालं. विविध रंगाने, गंधाने, न्हालेला निसर्ग बघून मन हरखून गेलं. कोकिळकूजनाने कान तृप्त झाले.
ग्रीष्मात रसना तृप्त झाली. आंबे, फ़णस, जांभळं, कलिंगड, करवंद, जांभ, द्राक्षं, अशा विविध, फ़ळांनी आपलं मन जिंकलं.
आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती,
"घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ! "
खरं तर एकच गोष्ट, परत परत घडली तर आपल्याला कंटाळा येतो पण याचे मात्र आपण कौतुक करतो आणि म्हणतो,
" नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ! "
अशा या पर्जन्यराजाची आपण सर्वच फ़ार आतुरतेने वाट पहात आहोत. आपणच नव्हे तर उन्हाच्या चटक्याने लाही लाही झालेली
ही धरा, आपले अनंत हात पसरून भेटायला येणार्या पर्जन्याची आतुरतेने, नटून थटून वाट पाहत आहे.
पशु, पक्षी, झाडे, वेली, सर्वांनाच आता वेध लागलेत ते पावसाचे. त्यात चिंब भिजण्याचे.
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की आपण लगेच पोहोचतो बालपणात. थुईथुई नाचनारा मोर, त्या कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडणं,
मोठ्यांचं लक्ष चूकवून पावसात भिजणं, आणि साठलेल्या पाण्यात उड्या मारून स्वत: व दुसर्याला भिजवणं. अनंत आठवणी!
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की मला आठवतो आणि आवडतो तो कोकणातला पाऊस. पण त्याच संपूर्ण वर्णन मी शब्दात करूच शकत नाही.
तो ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पावसाचा थयथयाट, पाण्याचा खळखळाट.
पहिल्या पावसाबरोबर दरवळणारा मृदगंध, ते लाल, मऊ मऊ रेशमी किडे, अंगणभर ऊड्या मारणारी, पायाखाली येणारी, अगदी
नखाएवढी छोटी बेडकांची पिल्ले, आपला पिटुकला देह नाचवत तिरके तिरके पळणारे चामटे, (खेकडे,)
अंगणात पडणार्या पागोळ्या, त्यात हात पाय़ भिजवणं, हळूच पाणी पिणं, हळूच अंगणात धाऊन परत येणं, छत्री घेऊन पावसात फ़िरणं.
घरात गळणार्या पाण्याखाली लावलेली भांडी, आनंदाने डोलणारी हिरवीगार झाडं, छोटे छोटे निर्झर, अळवाच्या पानांवर नाचणारे मोती.
सकाळीच शेतावर खोळ घेऊन निघालेले शेतकरी आणि बैल, बैलांच्या गळ्यातल्या घुगुरांचा नाद, थोड्याच वेळात न्याहारी घेऊन जाणार्या कारभारणी, नदीला आलेला पूर, त्यात वाहून जाणारी झाडे, साप, साकव, आणि ह्या सगळ्यात नम्र होऊन वाचलेली लव्हाळे!
झाडाखाली उगवलेली छोटी छोटी रोपं, आणि त्यात ते काजूचं असेल तर त्यावर मारलेला डल्ला. सगळं कसं लख्ख उभं रहातं डॊळ्यासमोर!
तर अशा या पावसाचं आपण स्वागत करूया आणि एक वाक्य जरूर लक्षात ठेऊया,
"आला पावसाळा, तब्बेत सांभाळा! "
निसर्गाने आपल्याला मुक्त हस्ताने दान केलयं, "घेता किती घेशील दो कराने". पण आपण त्याची योग्य निगा राखली पाहिजे .
त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. त्याच संरक्षण, संवर्धन करायला पाहिजे.
वरील मोगर्याच्या अक्षरातील फोटो व मनोगत नि.ग. प्रेमी शोभा हिचे आहे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825
मला हे भेंडी च झाड वाटलं ..
मला हे भेंडी च झाड वाटलं .. पण बहुतेक भेंडीची फुलं पिवळ्या रंगाची असतात का ? याची गुलाबी दिसतायत
देवकी अशी फुले महाबळेश्वरला
देवकी अशी फुले महाबळेश्वरला मी बगिचात पाहीली आहेत. त्यामुळे हे तण नसावे.
मॉर्निंग ग्लोरी आहे का हे ?
मॉर्निंग ग्लोरी आहे का हे ?
त्यामुळे हे तण नसावे.>>> मग
त्यामुळे हे तण नसावे.>>> मग बरे झाले ठेवले ते.खरे तर त्या फुलांमुळेच ठेवलंय.अशी २ झाडे आली आहेत.
कालची फुले
कालची फुले

पांढरा चाफा
तगर

झर्बेरा

१)
२)

सुपारीचे फुल

गुलाबातला माझा आवडता रंग

सर्वांचे सुंदर फोटो. मला ते
सर्वांचे सुंदर फोटो. मला ते सुपारीच फुल फार आवडत. मी कोकणातून फुल मागवून पेरली होती. रुजली, फुलली, फुलं जरा ल हानच होती. पण थोड्याच दिवसात रोपं मरून गेली.
आणि त्या नंतर लावायची भितीच वाटते.
तसाच शेवाळी गुलाब मला फार आवडतो . मागे मी लावलेला मरुनच गेला.
शेवाळी गुलाब मी अजून पाहीलाही
शेवाळी गुलाब मी अजून पाहीलाही नाही. शोभा फोटो असेल तर टाक ना प्लिज.
शेवाळी गुलाब मी अजून पाहीलाही
शेवाळी गुलाब मी अजून पाहीलाही नाही.>>>>>>>>>>अग, तु त्याला वेगळ्या नावाने ओळखत असशील. अग, ते नाजूक फ़ुल असतं बघ. सकाळी फ़ुलतं आणि संध्याकाळी बावतं. जमिनीवर पसरलेलं छोटसं रोप असतं. फ़ोटो नाही ग.
ऑफिस टाईम म्हणायचय का तुला.
ऑफिस टाईम म्हणायचय का तुला. माझ्याकडे दोन रंगात आहेत. उद्या टाकते फोटो.
ऑफिस टाईम म्हणायचय का तुला>>>
ऑफिस टाईम म्हणायचय का तुला>>>>>>>>उद्या फोटो बघून सांगते. (इतकी वर्ष नि.ग. वर राहून अजून इतकी अडाणी
)
ही सर्वांसाठी मेजवानी.
https://www.flowerpicturegallery.com/
जागू, बहुतेक त्याला "चिनी
जागू, बहुतेक त्याला "चिनी गुलाब" म्हणतात.
वॉव, सुरेख फोटो एकेक.
वॉव, सुरेख फोटो एकेक.
देवकी यांनी टाकलेली फुलांची झाडे खूप उगवतात इथे बऱ्याच ठिकाणी विशेषतः डोंबिवलीला लागून असलेल्या जवळपासच्या एरियात दिसतात.
बहुतेक त्याला "चिनी गुलाब"
बहुतेक त्याला "चिनी गुलाब" म्हणतात.>>>>>>चिनी गुलाब फक्त राणी कलरमधेच पाहिलंय.ऑफिस टाईम तशाच प्रकारचे असते,पण फुले वेगळ्या आकाराची(४-५ पाकळ्यांची) आणि रंगाची असतात.
बहुतेक त्याला "चिनी गुलाब"
बहुतेक त्याला "चिनी गुलाब" म्हणतात.>>>>>>चिनी गुलाब फक्त राणी कलरमधेच पाहिलंय.ऑफिस टाईम तशाच प्रकारचे असते,पण फुले वेगळ्या आकाराची(४-५ पाकळ्यांची) आणि रंगाची असतात.+१११
@ देवकी. > ती जंगली भेंडीच आहे.
सगळे प्रचि मस्तच .फ्रेश वाटलं
सगळे प्रचि मस्तच .फ्रेश वाटलं बघून
चिनी गुलाब भरगच्च असत आणि
चिनी गुलाब भरगच्च असत आणि ऑफिस टाईम चार-पाच पाकळ्यांच. चिनी गुलाब मध्ये पांढरा, पिवळा, पांढरा हे रंग मी पाहीले आहेत. नर्सरीमध्ये तर अजून व्हरायटी पाहीली आहे जसे दोन रंगातले वगैरे.
मी विशेष लक्ष देण्यासाठी काही भाजी टेरेसवर लावली आहे. चांगले उन आणि शेणखतामुळे रोपे चांगली रुजली आहेत.

भाजीवाल्याकडून सुकलेली चवळीची शेंग आणून अजून वाळवून ते बी रुजवले.
हे काकडीचे बी मी माझ्या छोट्या मुलीकडून लावून घेतले. अंकुर उगवले तेव्हा सगळ्यांना मोठ मोठ्याने सांगत सुटली बी उगवले म्हणून.

घरात मोड आलेले बटाटे होते त्या मोडाच्या खालून पातळ चकती कापून लावल्या आता छान रोपे उगवली आहेत.


सायली छोटीशीच आहे पण रोज भरभरून फुलते.

जागू,
जागू,
मस्त फोटो.लेकीकडून बी रुजवून घेण्याबाबत तुझे विशेष कौतुक!
देवकी, hollihock म्हणून सर्च
देवकी, hollihock म्हणून सर्च करून बघा....
जागु, फुले, झाडे मस्त...
साधना,
साधना,
लिंक पाहिली. हॉलिहॉकच आहे.विशेषतः पाने सेम आहेत.
https://www.youtube.com/watch?v=sl58qewO-F8
सर्वांना धन्यवाद!
हॉलिहॉक नर्सरीमधे विकायला
हॉलिहॉक नर्सरीमधे विकायला असतात ना..
मस्त दिसतात..
जागू नविन बाळं मस्तच..
राधाने रुजवलं का बी?
हिरवी आणि पोपटी अबोली
हिरवी आणि पोपटी अबोली


मनिम्याऊ ,
मनिम्याऊ ,
नवीनच अबोली पाहिली.वेगळी वाटली.
हो ग देवकी ताई. माझ्या आई आणि
हो ग देवकी ताई. माझ्या आई आणि मावशीला झाडांचे प्रचंड वेड आहे. त्या दोघींनी मिळून त्यांच्या माहेरच्या घरी खूप छान बाग केली आहे. ही अबोली तिथलीच. आणखीन खूप प्रकार आहेत
हा माझ्या कुंडीत रुजलेला
माझ्या कुंडीत रुजलेला पुदिना.

सर्वच फोटो मस्त मस्त.
सर्वच फोटो मस्त मस्त.
देविका ह्या रंगाची म्हणजे फिकट हिरव्या रंगाची अबोली नालासोपारा इथे खूप प्रमाणात बघायला मिळायची. काहीजण कोरांटी म्हणायचे पण सेम to सेम अबोली त्यामुळे मी अबोलीचं म्हणायचे.
मनिम्याऊ त्या अबोलीला खुप
मनिम्याऊ त्या अबोलीला खुप उग्र वास येतो का? माझ्या माहेरी आंब्याच्या झाडाखाली अशीच फुले येतात पण त्यांना फार उग्र वास येतो. फोटो आहे पण अपलोड होत नाही.
हिरवी अबोली रानफुल प्रकारात
हिरवी अबोली रानफुल प्रकारात येते ना???
<<मनिम्याऊ त्या अबोलीला खुप
<<मनिम्याऊ त्या अबोलीला खुप उग्र वास येतो का? >>
नाही. या अबोलीला अजिबातच वास नाही.
ही कुंभारमाशांची घरटी का?
ही कुंभारमाशांची घरटी का? जमिनीपासून ३-४ फुटांवर आहेत.
लाल मुंग्या पण अशीच घरटी
लाल मुंग्या पण अशीच घरटी करतात. पूर्वी दूरदर्शन वर सुरभी कार्यक्रमात याबद्दल एक एपिसोड दाखवला होता
Pages