सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३२ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
वसंत ऋतुचे कौतुक करून, ग्रीष्माच्या पाठवणीची तयारी करून, ’वर्षा ’च्या स्वागताला आपण सर्व सज्ज झालो आहोत.
वसंतात नेत्रसुख मिळालं. विविध रंगाने, गंधाने, न्हालेला निसर्ग बघून मन हरखून गेलं. कोकिळकूजनाने कान तृप्त झाले.
ग्रीष्मात रसना तृप्त झाली. आंबे, फ़णस, जांभळं, कलिंगड, करवंद, जांभ, द्राक्षं, अशा विविध, फ़ळांनी आपलं मन जिंकलं.
आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती,
"घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ! "
खरं तर एकच गोष्ट, परत परत घडली तर आपल्याला कंटाळा येतो पण याचे मात्र आपण कौतुक करतो आणि म्हणतो,
" नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ! "
अशा या पर्जन्यराजाची आपण सर्वच फ़ार आतुरतेने वाट पहात आहोत. आपणच नव्हे तर उन्हाच्या चटक्याने लाही लाही झालेली
ही धरा, आपले अनंत हात पसरून भेटायला येणार्या पर्जन्याची आतुरतेने, नटून थटून वाट पाहत आहे.
पशु, पक्षी, झाडे, वेली, सर्वांनाच आता वेध लागलेत ते पावसाचे. त्यात चिंब भिजण्याचे.
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की आपण लगेच पोहोचतो बालपणात. थुईथुई नाचनारा मोर, त्या कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडणं,
मोठ्यांचं लक्ष चूकवून पावसात भिजणं, आणि साठलेल्या पाण्यात उड्या मारून स्वत: व दुसर्याला भिजवणं. अनंत आठवणी!
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की मला आठवतो आणि आवडतो तो कोकणातला पाऊस. पण त्याच संपूर्ण वर्णन मी शब्दात करूच शकत नाही.
तो ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पावसाचा थयथयाट, पाण्याचा खळखळाट.
पहिल्या पावसाबरोबर दरवळणारा मृदगंध, ते लाल, मऊ मऊ रेशमी किडे, अंगणभर ऊड्या मारणारी, पायाखाली येणारी, अगदी
नखाएवढी छोटी बेडकांची पिल्ले, आपला पिटुकला देह नाचवत तिरके तिरके पळणारे चामटे, (खेकडे,)
अंगणात पडणार्या पागोळ्या, त्यात हात पाय़ भिजवणं, हळूच पाणी पिणं, हळूच अंगणात धाऊन परत येणं, छत्री घेऊन पावसात फ़िरणं.
घरात गळणार्या पाण्याखाली लावलेली भांडी, आनंदाने डोलणारी हिरवीगार झाडं, छोटे छोटे निर्झर, अळवाच्या पानांवर नाचणारे मोती.
सकाळीच शेतावर खोळ घेऊन निघालेले शेतकरी आणि बैल, बैलांच्या गळ्यातल्या घुगुरांचा नाद, थोड्याच वेळात न्याहारी घेऊन जाणार्या कारभारणी, नदीला आलेला पूर, त्यात वाहून जाणारी झाडे, साप, साकव, आणि ह्या सगळ्यात नम्र होऊन वाचलेली लव्हाळे!
झाडाखाली उगवलेली छोटी छोटी रोपं, आणि त्यात ते काजूचं असेल तर त्यावर मारलेला डल्ला.
सगळं कसं लख्ख उभं रहातं डॊळ्यासमोर!
तर अशा या पावसाचं आपण स्वागत करूया आणि एक वाक्य जरूर लक्षात ठेऊया,
"आला पावसाळा, तब्बेत सांभाळा! "
निसर्गाने आपल्याला मुक्त हस्ताने दान केलयं, "घेता किती घेशील दो कराने". पण आपण त्याची योग्य निगा राखली पाहिजे .
त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. त्याच संरक्षण, संवर्धन करायला पाहिजे.
वरील मोगर्याच्या अक्षरातील फोटो व मनोगत नि.ग. प्रेमी शोभा हिचे आहे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825
टीना
टीना
धन्स साधना ताई फायनली मला
धन्स साधना ताई फायनली मला फोटो टाकता आला ☺

हे मी नवीनच आणलेले कलंकोई चे झाड
मला झाड फुलांची खूप हौस आहे पण माझ्या खिडकीत थेट ऊन येत नाही त्यामुळे जास्त काही लावता येत नाही. पण इकडच्या गप्पां मुळे पुन्हा उत्साह आलाय आणि नर्सरी वल्याने हे ऊन शिवाय हि वाढेल सांगितलं हे झाड आणलाय.
सुंदरच गं जागू..
सुंदरच गं जागू..

किंमत दिसतेय.. १०० कि १८० कळेना..
इकडे काल वेगवेगळ्या नर्सरीमधुन फिरताना मला फार सुंदर सुंदर रंग दिसले कॅलेंकोईचे..
किंमतही मस्तच होती.. २५०/- ३००/-फक्त..
सर्वांना रंगपंचमीच्या
सर्वांना रंगपंचमीच्या शुभेच्छा.. मी तर खरच रंगात न्हाली आज .. आज मै उप्पर झालय.. >>> वाह, एन्जॉय.
वाह सुंदर रचना, मला हे रोप आणि नाव दोन्ही माहीती नव्हतं.
मस्त टीना
मस्त टीना
महाबळेश्वरला सुंदर फुललेले अंजन बघितले.
वाह सुंदर रचना, मला हे रोप
वाह सुंदर रचना, मला हे रोप आणि नाव दोन्ही माहीती नव्हतं.>>>+१.
रचना, सावलीत वाढणारी सुद्धा
रचना, सावलीत वाढणारी सुद्धा खूप झाडे आहेत, ती लावायची. दुधाची तहान ताकावर भागवायची पण छोडणेका नै

मागे मी 5 किलो रंगाच्या
मागे मी 5 किलो रंगाच्या डब्यात लावलेल्या शेवग्याबद्दल लिहिले होते. त्याला बऱ्याच शेंगा येऊन गेल्या. ही आत्ता आलेली. या पावसाळ्यात झाड अर्धे कापणार व मोठ्या डब्यात लावून खाली ठेवणार. इथे ऊन मिळत नाही त्यामुळे वाट लागतेय.
सगळ्यांना धन्स रोप आवडल्या
सगळ्यांना धन्स रोप आवडल्या बद्दल.
साधनाताई काही नाव सांगू शकाल का सावलीत वाढणाऱ्या झाडांची. सध्या काही गुलबक्षी च्या बिया रुजवल्यात.. बघू जगतात का.
रच्याकने सगळ्यांच्या इकडच्या गप्पा वाचून आणि फोटो बघून खूप मस्त वाटतं. जमेल तसे हळू हळू पूर्वीचे भाग वाचत आहे. सध्या आठव्या भागावर आहे. तिकडची इतकी माहिती वाचून येता जाता सगळ्या झाडांची निरीक्षण चालू आहेत आणि त्या माहिती मूळे रस्त्यात दिसणार्या एखाद्या झाडाचं नाव कळलं किंवा फुला फळा वरून झाड ओळखता आला कि खूप छान वाटतंय.
शेवग्याची शेंग मस्तच आहे.
शेवग्याची शेंग मस्तच आहे. शेवग्याचा झाड डब्यात लाऊन हि शेंगा आल्यात म्हणजे कमालच आहे ☺
साधना शेवग्याची शेंग सॉलिड
साधना शेवग्याची शेंग सॉलिड मस्त आहे.
काय हेल्दी शेंग आहे गं साधना.
काय हेल्दी शेंग आहे गं साधना..
आज म्हणजे काल मी खुप खुप मज्जा केली..
उद्या म्हणजे आज सांगते.. दुसया पोश्टीत...
आता झोपते.. शुरा..
(No subject)
डबल पाकळीचं गोकर्ण अरे वा...
डबल पाकळीचं गोकर्ण अरे वा...
गोकर्ण मस्त आहे.
गोकर्ण मस्त आहे.
मस्त गोकर्ण.
मस्त गोकर्ण.
माझे दोन निळे आणि एक पांढरा गोकर्ण खाली नेऊन ठेवला. कधी कधी अशा डबल पाकळ्यांची फुलं यायची. खालीपण येतात पण असाच वेल पसरलेला ग्रीलवर तो नीट काढता आला नाही मला. खूप पसरलेला.
जी अनुराग गोकर्ण मस्त.
जी अनुराग गोकर्ण मस्त.
रचना सुंदर आहेत फुले. माझ्याकडे अशी ऑरेंज रंगाची आहे कॅलेंचोई. फुले खुप दिवस टिकतात. आणि तुला आमच्यासारखच झालय प्रत्येक झाडाबद्दल उत्सुकता त्यामुळे निसर्गांच्या गप्पांत तुझ निसर्गमय स्वागत.
टिना तुझा उत्साह ही वाखाणण्याजोगा आहे.
निसर्गमय स्वागतसाठी आभारी (
निसर्गमय स्वागतसाठी आभार

Rachana, मस्तच.
Rachana, मस्तच.
माझ्याकडे अशी ऑरेंज रंगाची
माझ्याकडे अशी ऑरेंज रंगाची आहे कॅलेंचोई. फुले खुप दिवस टिकतात.>> जागू, मीपन ऑरेंज आणि गुलाबी रंगांची कॅलेंकोई मिळवली.. पिल्लु रोपं आहे पण चालसे.. लावलीत मी ती अन टवटवीत आहे म्हणजे मानवली माती त्यांना.
अग टीना सहज जगतात ती.
अग टीना सहज जगतात ती. पानफुटीच ती.
रचना गुलबक्षी सुंदरच. एकच झाड आहे की तीन झाडे आहेत वेगवेगळ्या रंगाची?
तीन आहेत वेगवेगळ्या रंगाची
तीन आहेत वेगवेगळ्या रंगाची जागू ताई. ऑफिस च्या खिडकीत लावली होती ☺
गुलबक्सि आपोआप मिक्स होते का
गुलबक्सि आपोआप मिक्स होते का माहीत नाही, पण होते. हे माझ्याकडे होते, काही दिवस अशी फुले आली, नंतर रंग ओसरत गुलाबी व पांढऱ्यावर स्थिर झाला. एकाच झाडावर 2 रंगाची फुले. पण एकत्र दुरंगी फुले पूर्ण बंद झाली.
हे दुरंगी
होत अस साधना. जास्वंदींच पण
होत अस साधना. जास्वंदींच पण होत. माझ्याकडे पांढरी आणि गुलाबी जास्वंद व्हायची आणि गुलबक्षीही व्हायची.
मस्त फोटो साधना.. आमच्याकडे
मस्त फोटो साधना.. आमच्याकडे कोणे एके काळी होती गुलबक्षी..
माझ्या घरी गेले काही महिने
माझ्या घरी गेले काही महिने तुळस टिकतच नाहीये. रोप विकणार्याने सांगितले की तुम्ही रोपाला रोज भरपूर पाणी देता. त्यामुळे मूळ वाढत नाही, कुजून जाते आणि झाड मरते. तेव्हा एक दिवसाआड थोडे पाणी द्या. पुढच्या रोपाला तसेही केले. पण थोडी वाढ झाल्यावर त्याची पाने आपोआप सुकत गेली. मग पाण्याचे प्रमाण वाढवले. पण पाने कोमेजून गळत गेली. आता कुंडीत 5-6 गांडूळ पण आहेत.... म्हटलं माती सुपिक राहील. आत्ता काही दिवसांपूर्वी लावलेल्या तुळशीची काही पाने कडेने करपत चालली आहेत. नवीन पानांची वाढ पण दिसत नाही. कुठे चुकत असेल तेच कळत नाही.
आत्ता काही दिवसांपूर्वी
आत्ता काही दिवसांपूर्वी लावलेल्या तुळशीची काही पाने कडेने करपत चालली आहेत. >> उन्ह जास्त होतय का?
ड्रेनेज व्यवस्थित आहे का? नुसत्या मातीनेपन दमकोंडी होते मुळाची.
माती कुठली आहे?
तुळशीला उन चालते. आमची तुळस
तुळशीला उन चालते. आमची तुळस उन्हातच आहे. माती बदलून पहा.
माझ्या घरी कुंडीत फुललेला
माझ्या घरी कुंडीत फुललेला हजारी मोगरा....
कवठी चाफा, गोकर्ण, रतन अबोली,
कवठी चाफा, गोकर्ण, रतन अबोली, गुलबाक्षी सगळेच फोटो मन प्रसन्न करणारे...:)
सेक्युलंट्स ही खुप गोड..
Pages