निसर्गाच्या गप्पा (भाग ३२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2017 - 05:46

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३२ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

वसंत ऋतुचे कौतुक करून, ग्रीष्माच्या पाठवणीची तयारी करून, ’वर्षा ’च्या स्वागताला आपण सर्व सज्ज झालो आहोत.
वसंतात नेत्रसुख मिळालं. विविध रंगाने, गंधाने, न्हालेला निसर्ग बघून मन हरखून गेलं. कोकिळकूजनाने कान तृप्त झाले.
ग्रीष्मात रसना तृप्त झाली. आंबे, फ़णस, जांभळं, कलिंगड, करवंद, जांभ, द्राक्षं, अशा विविध, फ़ळांनी आपलं मन जिंकलं.
आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती,

"घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ! "

खरं तर एकच गोष्ट, परत परत घडली तर आपल्याला कंटाळा येतो पण याचे मात्र आपण कौतुक करतो आणि म्हणतो,

" नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ! "

अशा या पर्जन्यराजाची आपण सर्वच फ़ार आतुरतेने वाट पहात आहोत. आपणच नव्हे तर उन्हाच्या चटक्याने लाही लाही झालेली
ही धरा, आपले अनंत हात पसरून भेटायला येणार्‍या पर्जन्याची आतुरतेने, नटून थटून वाट पाहत आहे.
पशु, पक्षी, झाडे, वेली, सर्वांनाच आता वेध लागलेत ते पावसाचे. त्यात चिंब भिजण्याचे.
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की आपण लगेच पोहोचतो बालपणात. थुईथुई नाचनारा मोर, त्या कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडणं,
मोठ्यांचं लक्ष चूकवून पावसात भिजणं, आणि साठलेल्या पाण्यात उड्या मारून स्वत: व दुसर्‍याला भिजवणं. अनंत आठवणी!

"पाऊस" ! पाऊस म्हटलं की मला आठवतो आणि आवडतो तो कोकणातला पाऊस. पण त्याच संपूर्ण वर्णन मी शब्दात करूच शकत नाही.
तो ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पावसाचा थयथयाट, पाण्याचा खळखळाट.
पहिल्या पावसाबरोबर दरवळणारा मृदगंध, ते लाल, मऊ मऊ रेशमी किडे, अंगणभर ऊड्या मारणारी, पायाखाली येणारी, अगदी
नखाएवढी छोटी बेडकांची पिल्ले, आपला पिटुकला देह नाचवत तिरके तिरके पळणारे चामटे, (खेकडे,)
अंगणात पडणार्‍या पागोळ्या, त्यात हात पाय़ भिजवणं, हळूच पाणी पिणं, हळूच अंगणात धाऊन परत येणं, छत्री घेऊन पावसात फ़िरणं.
घरात गळणार्‍या पाण्याखाली लावलेली भांडी, आनंदाने डोलणारी हिरवीगार झाडं, छोटे छोटे निर्झर, अळवाच्या पानांवर नाचणारे मोती.
सकाळीच शेतावर खोळ घेऊन निघालेले शेतकरी आणि बैल, बैलांच्या गळ्यातल्या घुगुरांचा नाद, थोड्याच वेळात न्याहारी घेऊन जाणार्‍या कारभारणी, नदीला आलेला पूर, त्यात वाहून जाणारी झाडे, साप, साकव, आणि ह्या सगळ्यात नम्र होऊन वाचलेली लव्हाळे!
झाडाखाली उगवलेली छोटी छोटी रोपं, आणि त्यात ते काजूचं असेल तर त्यावर मारलेला डल्ला. Happy सगळं कसं लख्ख उभं रहातं डॊळ्यासमोर!
तर अशा या पावसाचं आपण स्वागत करूया आणि एक वाक्य जरूर लक्षात ठेऊया,

"आला पावसाळा, तब्बेत सांभाळा! "

निसर्गाने आपल्याला मुक्त हस्ताने दान केलयं, "घेता किती घेशील दो कराने". पण आपण त्याची योग्य निगा राखली पाहिजे .
त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. त्याच संरक्षण, संवर्धन करायला पाहिजे.

वरील मोगर्‍याच्या अक्षरातील फोटो व मनोगत नि.ग. प्रेमी शोभा हिचे आहे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

साधना गुलबक्षी अशी मी पहिल्यांदा बघितली, भारी मस्त.

सायली कित्ती गोड हजारी मोगरा.

माझ्याकडे अति तुळस होते सगळया कुंड्यात बी आपोआप पसरून तीच रोपं उगवतात. परवा खाली कुंड्यांना पाणी घालायला गेले तर आमच्या वरच्या विचारत होत्या तुळस आहे का, मी म्हणाले बघा मंजिऱ्या पण आहेत सुक्या आणि रोपही मग दोन्ही घेऊन गेल्या.

मस्तच गं सायू..
येत राहा गं इथे वरचेवर..
आताशा फक्त मी, अन्जू अन जागूचं बागडतो बघ..
साधनापन कमी असते अन इतरपन..

धन्स टीना, अन्जु ताई..:)
येत राहा गं इथे वरचेवर.. हो ग! मी पण खुप मीस केला धागा.. आता येईन नियमीत.

हजारी मोगरा मस्तच ☺ ☺ किती वर्षांनी पहिला. माझ्या आजोळी होता पूर्वी. मला खूप आवडायचा. धन्स सायु ☺

धन्यवाद टीना आणि जागु. माती रोपवाटिकेतून घेतलेली आणि आधीच्या रोपांची अशी मिश्र आहे. लाल माती आहे, तिला चिकटपणा आहे. कुंडीत तळाला छोटे दगड, नारळाच्या शेंड्या टाकलेल्या आहेत.

सायु हजारी मोगरा माझ्या माहेरीही पूर्वी खुप पसरला होता. अगदी रोपे काढून टाकावी लागायची. आता दिसत नाही कुठे. रोप मिळाल की मी आणून लावेन.

एस. तळाला छोटे दगड कशासाठी?

साप कात टाकतात हे आपण सगळ्यांनी ऐकलेले असते, कित्येक कीटकही कात टाकतात.

ही प्रार्थना कीटक उर्फ प्रेयइंग मॅंटिसची कात. आमच्या भागात खूप जास्त असावेत कारण ही कात मला दोन तीनदा सापडलीय. फांदीला दोन फाटे फुटतात त्या चिंचोळ्या जागेत ही सापडलेली, म्हणजे त्याने तिथून घुसून आपले अंग सोडवून।घेतले.

साधना, सुरेख फोटो.. उक्षी आहे का ग?
साप कात टाकतात हे आपण सगळ्यांनी ऐकलेले असते, कित्येक कीटकही कात टाकतात.+ नवलच आहे..

उक्षी ...
मीपन कात पाहिलीए प्रेयिंग मॅंटिसची Happy

कित्येक कीटकही कात टाकतात.>>> आत्ता माहित झाले.
साधना ,फोटो किती सुरेख घेतला आहेस.त्याच्या पायांचे दातेही टिपले आहेस.

फेब्रुवारी महिन्यात औरंगाबादला जाणं झाल आणि मायबोलीकर डॉ. मानसीताई (सरीवा) यांच्यासोबत WALMI (Water And Land Management Institute) येथे निसर्ग भटकंती झाली. या भटकंतीत मानसीताईंमुळे बरीच झाडे पाहता आली. त्यातील काहिंचे फोटो. Happy

सध्या सर्वत्र फुलत असणारी टॅबेबुया उर्फ बसंतराणी फॅमिली
जांभळा टॅबेबुया

|

|

पिवळा टॅबेबुया

|

Wow,

जिप्सी मस्तच, सगळे फोटो अप्रतिम आहेत

अजुन काही प्रचि

नीलमोहर
 चित्रक
 सुकलेल्या फुलांचे सौंदर्य (उक्षी)

मस्त फोटो आणि मस्त माहिती.

कात फक्त साप आणि काही कीटकच टाकतात असे नाही माहीत नसेल तुम्हाला पण ढेकूण ही कात टाकतात.

सर्व प्रचि मस्तच जिप्सी.. हे ही आणि या आधीच्या सर्व भागातले ही ☺
सायू सुरेख बाग.
साधनाताई भरतकाम सुंदर. कीटकांचे कात टाकणे पहिल्यांदाच कळलं.

काय एकेक फोटो सॉलिड मस्त. नजरसुख.

जिप्सी, मिसिंग सुंदर कविता.

टीना मी फक्त बागडते, माझं योगदान ह्या धाग्यासाठी काहीच नाही. सध्या खाली असलेल्या लिंबाच्या झाडाला लिंब आलीयेत छोटी छोटी. कुंड्यांना पाणी घालायला जाते त्यामुळे दिसली.

मस्त फोटो जिप..

टीना मी फक्त बागडते, माझं योगदान ह्या धाग्यासाठी काहीच नाही. सध्या खाली असलेल्या लिंबाच्या झाडाला लिंब आलीयेत छोटी छोटी. कुंड्यांना पाणी घालायला जाते त्यामुळे दिसली.>> अन्जू, मीपन तुझ्याच बोटित आहे गं.. झाडात, पाना फुलात बागडायला आवडते म्हणुनच मीपन इथ येते Happy

काही दिवसांपूर्वी असच परत एकदा एम्प्रेस गार्डन मधे चक्कर मारुन आली अन न रहावता परत एक फुलावर असलेला पेट्रिया वोल्युबिलीसचा वेल घेऊन आली..
घरात आहे वर्ष झालेला एक .. त्याचं मी बोन्साय करणारे Happy अन हा वेल तसाच वाढु देणारे..
मज्जामा स्प्रिंग..

आणखी एक वडाचं झाड आणलं रुमीने.. तेपन तिला बोन्साय करायच आहे.
सोबत एक मिनिएचर हँगिंगपन आणल मी.. दावते त्यांचे फोटो..

अरे हो.. पेट्रियासोबतच त्याच पिशवीत भेरली माड्पन उगवलेला मिळाला मला.. तोपन लावलाय दुसर्‍या कुंडीत..
हा फुलावर असलेला माझा आवडता क्विन्स व्रेथ उर्फ सँडपेपर वाइन उर्फ पेट्रिया ..
.

.

मोठ्या आशेने मी यावेळी ब्राउनिया फुलला का ते बघायला गेली तर त्या झाडाची पार रया लागलेली होती Sad
हा मागच्याच वर्षीचा फोटो..
.

अग टीना तू फोटो टाकतेस, माहिती आहे तुला बरीच ती देतेस. त्यापासून मी लांब.>> तूपन तर तुझे बागकाम शेअर करते.. त्यांची पासपोच कळवते.. लोकांनी टाकलेले फोटो आवडीने न चुकता बघते..

Happy

छान फोटो. तो ब्राउनिया कित्ती गोड फोटो. मी हे पहिल्यांदा बघतेय.

यावर्षी का झाडाची रया गेली.

बागकाम म्हणजे कुंडीकाम काही नाही आता. कोरफड, तुळस आणि गोकर्ण दोन प्रकार आहेत. खाली नेऊन ठेवलेत. लिली आणि तुळस माझ्या ग्रीलमध्ये. लिली येते का बघूया यावर्षी.

Pages