सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३२ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
वसंत ऋतुचे कौतुक करून, ग्रीष्माच्या पाठवणीची तयारी करून, ’वर्षा ’च्या स्वागताला आपण सर्व सज्ज झालो आहोत.
वसंतात नेत्रसुख मिळालं. विविध रंगाने, गंधाने, न्हालेला निसर्ग बघून मन हरखून गेलं. कोकिळकूजनाने कान तृप्त झाले.
ग्रीष्मात रसना तृप्त झाली. आंबे, फ़णस, जांभळं, कलिंगड, करवंद, जांभ, द्राक्षं, अशा विविध, फ़ळांनी आपलं मन जिंकलं.
आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती,
"घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ! "
खरं तर एकच गोष्ट, परत परत घडली तर आपल्याला कंटाळा येतो पण याचे मात्र आपण कौतुक करतो आणि म्हणतो,
" नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ! "
अशा या पर्जन्यराजाची आपण सर्वच फ़ार आतुरतेने वाट पहात आहोत. आपणच नव्हे तर उन्हाच्या चटक्याने लाही लाही झालेली
ही धरा, आपले अनंत हात पसरून भेटायला येणार्या पर्जन्याची आतुरतेने, नटून थटून वाट पाहत आहे.
पशु, पक्षी, झाडे, वेली, सर्वांनाच आता वेध लागलेत ते पावसाचे. त्यात चिंब भिजण्याचे.
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की आपण लगेच पोहोचतो बालपणात. थुईथुई नाचनारा मोर, त्या कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडणं,
मोठ्यांचं लक्ष चूकवून पावसात भिजणं, आणि साठलेल्या पाण्यात उड्या मारून स्वत: व दुसर्याला भिजवणं. अनंत आठवणी!
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की मला आठवतो आणि आवडतो तो कोकणातला पाऊस. पण त्याच संपूर्ण वर्णन मी शब्दात करूच शकत नाही.
तो ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पावसाचा थयथयाट, पाण्याचा खळखळाट.
पहिल्या पावसाबरोबर दरवळणारा मृदगंध, ते लाल, मऊ मऊ रेशमी किडे, अंगणभर ऊड्या मारणारी, पायाखाली येणारी, अगदी
नखाएवढी छोटी बेडकांची पिल्ले, आपला पिटुकला देह नाचवत तिरके तिरके पळणारे चामटे, (खेकडे,)
अंगणात पडणार्या पागोळ्या, त्यात हात पाय़ भिजवणं, हळूच पाणी पिणं, हळूच अंगणात धाऊन परत येणं, छत्री घेऊन पावसात फ़िरणं.
घरात गळणार्या पाण्याखाली लावलेली भांडी, आनंदाने डोलणारी हिरवीगार झाडं, छोटे छोटे निर्झर, अळवाच्या पानांवर नाचणारे मोती.
सकाळीच शेतावर खोळ घेऊन निघालेले शेतकरी आणि बैल, बैलांच्या गळ्यातल्या घुगुरांचा नाद, थोड्याच वेळात न्याहारी घेऊन जाणार्या कारभारणी, नदीला आलेला पूर, त्यात वाहून जाणारी झाडे, साप, साकव, आणि ह्या सगळ्यात नम्र होऊन वाचलेली लव्हाळे!
झाडाखाली उगवलेली छोटी छोटी रोपं, आणि त्यात ते काजूचं असेल तर त्यावर मारलेला डल्ला. सगळं कसं लख्ख उभं रहातं डॊळ्यासमोर!
तर अशा या पावसाचं आपण स्वागत करूया आणि एक वाक्य जरूर लक्षात ठेऊया,
"आला पावसाळा, तब्बेत सांभाळा! "
निसर्गाने आपल्याला मुक्त हस्ताने दान केलयं, "घेता किती घेशील दो कराने". पण आपण त्याची योग्य निगा राखली पाहिजे .
त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. त्याच संरक्षण, संवर्धन करायला पाहिजे.
वरील मोगर्याच्या अक्षरातील फोटो व मनोगत नि.ग. प्रेमी शोभा हिचे आहे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825
टिने, मोगर्याचा बहर
टिने, मोगर्याचा बहर उन्हाळ्यातच असतो.>> माझ्याकडले हमेशा हिवाळ्यात फुलतात.. जानेवारी फेब्रुवारी मधे.. म्हणुन मला तस वाटल असणार.. यवतमाळच बालपण हाहा
तुझा हिवाळा मोगऱ्याचा
तुझा हिवाळा मोगऱ्याचा उन्हाळा
माझ्याकडे आता अनंत, मोगरा
माझ्याकडे आता अनंत, मोगरा फुलायला लागला आहे. सोबतीला कुंद, आयरीसही फुलायला लागलेयत.
माझा आयरिस अजुनही कळीतच
माझा आयरिस अजुनही कळीतच अटकलाय
पेट्रिया फुलुन गेलापन.
मोगर्याची पांढरी बाळं आता दिसायला लागलीए..
16 ते 18 मार्चला नेरूळमधील
16 ते 18 मार्चला नेरूळमधील वंडर्स पार्क येथे बारावे झाडे, फुले, फळे व भाजीपाला प्रदर्शन ..
मागील महिन्यांत काढलेले
मागील महिन्यांत काढलेले शाल्मली उर्फे काटेसावरीचे फोटो.

१)
२)
३

४

५


६
वा!! मस्तच काटेसावर!
वा!! मस्तच काटेसावर!
खूप दिवसानी आले इथे.
बरीच नवीन माहिती मिळाली.
आमच्या घरात फुललेले orchid!
आमच्या घरात फुललेले orchid!

Orchid -2
Orchid -2

Orchid - 3 - कळ्या
Orchid - 3 - कळ्या

इथले सुन्दर सुम्दर फोटो पाहुन
इथले सुन्दर सुम्दर फोटो पाहुन खूप छान वाटले.
आमच्याकदे एकदा बहरून गेला मोगरा.
सध्या कान्चनाचे झाड पण बहरून
सध्या कान्चनाचे झाड पण बहरून आले आहे.

अमृता ऑर्चिड मस्तच. खास काळजी
अमृता ऑर्चिड मस्तच. खास काळजी घ्यवी लागते का? उन लागत की सावली?
वाह, अहाहा काय एकेक सुरेख
वाह, अहाहा काय एकेक सुरेख फोटोज. नजरसुख.
सुंदर फ़ोटो.
सर्वांचे फ़ोटो सुंदर !
अमृता, ऑर्किड मस्तच.
अमृता, ऑर्किड मस्तच.
जिप्सी, tamruta अप्रतिम फोटो
जिप्सी, tamruta अप्रतिम फोटो
IMG_20180315_073430583.jpg
IMG_20180315_073430583.jpg (148.14 KB)

रानीखेतमधील फुले.
Yellow hornbill.JPG (168.06
यलो हॉर्नबील.शोधायला लागेल.
देवकी मस्त फुले व हॉर्नबिल
देवकी मस्त फुले व हॉर्नबिल दिसला, तोही राणीखेत मधला का
शोभा, देवकी सुरेख फोटो.
शोभा, देवकी सुरेख फोटो.
देवकीताई, अमृता
देवकीताई, अमृता
छान आहेत सगळे फोटो
तोही राणीखेत मधला का>>>>
तोही राणीखेत मधला का>>>> कॉर्बेटपार्कमधे दिसला.
फुले आणि धनेश सुंदर.
फुले आणि धनेश सुंदर.
काल नवी मुंबईच्या झाडांच्या प्रदर्शनाला भेट दिली आणि काही खरेदीही केली. मागील वर्षी पेक्षा जरा कमी झाडे होती अस वाटल.
जागु,
जागु,
orchid ला ऊन नाही लागत.
पण प्रकाश लागतो.
मी घरातच ठेवले आहे.
अजून ३ महिनेच झाले आहेत. फार काही काळजी घेतली नाही.
देवकी. रानीखेत मधली फुले
देवकी. रानीखेत मधली फुले सुन्दर!
Hornbill पण छान!!
काटेसावर फोटो अप्रतीम!!
काटेसावर फोटो अप्रतीम!!
धन्यवाद अमृता. खाटीक
धन्यवाद अमृता.
खाटीक


नुकतीच कोकण भेट घडली, त्या
नुकतीच कोकण भेट घडली, त्या दरम्यान एका नातेवाईकाच्या घरी परसदारी लावलेली मसाल्याची झाडे बघितली.
कच्चे जायफळ:
पिकत आलेले जायफळ, पूर्ण पिकल्यावर आपोआप उलते म्हणजे ती धार दिसते तिथून फुटते
पानासकट :
दालचिनीचे झाड :
फळे :
ह्याची पाने बघून तुम्ही दालचिनी म्हणजेच तमालपत्र या निष्कर्षाला येणार. मलाही तसेच वाटले होते, म्हणून पाने चुरडून पानांचा वास घेऊन बघितला. दलचिनीच्या पानांना अजिबात वास येत नाही, तमालपात्रांची पाने सुगंधी असतात.
तमालपत्रे:

साधना मस्त मसाले.
साधना मस्त मसाले.
आमच्या पाठीमागच्या आवारात एक करंजाचे मोठे झाड आहे त्यावर हे नाईट हेरॉन कायम वास्तव्य करतात.
१)
२)

Pages