निसर्गाच्या गप्पा (भाग ३२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2017 - 05:46

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३२ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

वसंत ऋतुचे कौतुक करून, ग्रीष्माच्या पाठवणीची तयारी करून, ’वर्षा ’च्या स्वागताला आपण सर्व सज्ज झालो आहोत.
वसंतात नेत्रसुख मिळालं. विविध रंगाने, गंधाने, न्हालेला निसर्ग बघून मन हरखून गेलं. कोकिळकूजनाने कान तृप्त झाले.
ग्रीष्मात रसना तृप्त झाली. आंबे, फ़णस, जांभळं, कलिंगड, करवंद, जांभ, द्राक्षं, अशा विविध, फ़ळांनी आपलं मन जिंकलं.
आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती,

"घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ! "

खरं तर एकच गोष्ट, परत परत घडली तर आपल्याला कंटाळा येतो पण याचे मात्र आपण कौतुक करतो आणि म्हणतो,

" नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ! "

अशा या पर्जन्यराजाची आपण सर्वच फ़ार आतुरतेने वाट पहात आहोत. आपणच नव्हे तर उन्हाच्या चटक्याने लाही लाही झालेली
ही धरा, आपले अनंत हात पसरून भेटायला येणार्‍या पर्जन्याची आतुरतेने, नटून थटून वाट पाहत आहे.
पशु, पक्षी, झाडे, वेली, सर्वांनाच आता वेध लागलेत ते पावसाचे. त्यात चिंब भिजण्याचे.
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की आपण लगेच पोहोचतो बालपणात. थुईथुई नाचनारा मोर, त्या कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडणं,
मोठ्यांचं लक्ष चूकवून पावसात भिजणं, आणि साठलेल्या पाण्यात उड्या मारून स्वत: व दुसर्‍याला भिजवणं. अनंत आठवणी!

"पाऊस" ! पाऊस म्हटलं की मला आठवतो आणि आवडतो तो कोकणातला पाऊस. पण त्याच संपूर्ण वर्णन मी शब्दात करूच शकत नाही.
तो ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पावसाचा थयथयाट, पाण्याचा खळखळाट.
पहिल्या पावसाबरोबर दरवळणारा मृदगंध, ते लाल, मऊ मऊ रेशमी किडे, अंगणभर ऊड्या मारणारी, पायाखाली येणारी, अगदी
नखाएवढी छोटी बेडकांची पिल्ले, आपला पिटुकला देह नाचवत तिरके तिरके पळणारे चामटे, (खेकडे,)
अंगणात पडणार्‍या पागोळ्या, त्यात हात पाय़ भिजवणं, हळूच पाणी पिणं, हळूच अंगणात धाऊन परत येणं, छत्री घेऊन पावसात फ़िरणं.
घरात गळणार्‍या पाण्याखाली लावलेली भांडी, आनंदाने डोलणारी हिरवीगार झाडं, छोटे छोटे निर्झर, अळवाच्या पानांवर नाचणारे मोती.
सकाळीच शेतावर खोळ घेऊन निघालेले शेतकरी आणि बैल, बैलांच्या गळ्यातल्या घुगुरांचा नाद, थोड्याच वेळात न्याहारी घेऊन जाणार्‍या कारभारणी, नदीला आलेला पूर, त्यात वाहून जाणारी झाडे, साप, साकव, आणि ह्या सगळ्यात नम्र होऊन वाचलेली लव्हाळे!
झाडाखाली उगवलेली छोटी छोटी रोपं, आणि त्यात ते काजूचं असेल तर त्यावर मारलेला डल्ला. Happy सगळं कसं लख्ख उभं रहातं डॊळ्यासमोर!
तर अशा या पावसाचं आपण स्वागत करूया आणि एक वाक्य जरूर लक्षात ठेऊया,

"आला पावसाळा, तब्बेत सांभाळा! "

निसर्गाने आपल्याला मुक्त हस्ताने दान केलयं, "घेता किती घेशील दो कराने". पण आपण त्याची योग्य निगा राखली पाहिजे .
त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. त्याच संरक्षण, संवर्धन करायला पाहिजे.

वरील मोगर्‍याच्या अक्षरातील फोटो व मनोगत नि.ग. प्रेमी शोभा हिचे आहे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

सगळ्या गप्पा , प्र. ची बहारदार. जागु खाटीक आणि ईतर पक्षी ही खुप छान.
जागु, टोमॉटोज मस्तच..:) बीयांपासुन छान रोप तयार केलेस ग.

IMG_20180413_174402_01
आला का सुगंध? Wink
पहिल्यांदाच झाडावरून स्वतः काढलेली बकुळ फुल

सायू गजरा सुंदर आणि तुती तर एकदम तोंपासू. कुंडीत लाऊनही मस्तच झालीय Happy
आणि शेजारी कमळ आहे का? त्याचा हि एक फोटो टाका जमल्यास.
रच्याकने राणीबागेतील गटग अजूनही होतात का? असेल कधी तर इथे कळेल ना? मला हि यायचंय.

होतात होतात, आमचा जन्मच गटग करायला झालाय... पुढच्या वेळेस गटगची टूम निघेल तेव्हा इथेच सुरवात करूया कोण कोण येतंय विचारायला..

वा, सगळे फोटो मस्तच, खूप दिवसांनी आले इथे छान वाटले

साधनाताई मी आली तर चालेल का गटग ला, मला आवडेल तुम्हा सर्वांना भेटायला

साधनाताई मी आली तर चालेल का गटग ला, मला आवडेल तुम्हा सर्वांना भेटायला>>>

त्यात विचारायचे काय, हक्काने यायचे. तारीख ठरवा ना एखादी...

मला ह्या महिना अखेरीस 4 दिवस सुट्ट्या आहेत, कदाचित सर्वांना असतील,
जर सगळ्यांना चालणार असेल तर ठरवा एखादी तारीख

रचना, मनीमाऊ मस्तच, सुंदर अगदी.

सायली काय ग ग्रीन ग्रीन फिंगर्स. तेरे हातोको चुमनेको जी करता है. ग्रेट गं बायो, सुरेख.

अग ठरले तर जाता येईल. मी बरेच महिने गेले नाहीय. मागे शांकली आलेली तेव्हा राणीबाग गटग झाले होते. बहुतेक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात. इथे बरेच नवे मेम्बर आलेत, नव्या ओळखी होतील. नव्यांना तारीख ठरवूदे, आपण आशीर्वाद द्यायचा Happy Happy

मानीम्यउ ही chlorophytum वाटताहेत. Chlorophytum flower म्हणून शोधा म्हणजे ओळख पटेल व नेमके नावही कळेल.

रचना, ही हल्लीची नवी बकुळफुलें, झाडाला सोडतच नाहीत, आमच्या वेळची फुले कधी एकदा आईला सोडून खालच्या अंगणात उतरतोय या घाईत असायची Happy Happy त्यामुळे तयाना कधीही देठ नसायचा.

सुगंध मात्र तोच.

हो साधनाताई मी सुद्धा आजवर झाड खाली पड्लेलीच बकुळ फुल बघितली होती गावी, हल्ली मी चालायला जाते त्या गार्डन मध्ये मला अचानक बकुळीच झाड भेटलं Happy पण झाडाखाली पूर्ण सुकलेलीच फुल दिसत होती ताजी फुल पडायची नि माझी जायची वेळ जमत नव्हती बहुतेक, शेवटी काल न राहवून खालच्या फांदी ला लागलेली फुलं तोडली देठा सकट.
हि फुल झाडावरच पूर्ण फुलल्या शिवाय देठा पासून सुटी होत नाहीत वाटत.. मी तोडलेली सुकून गेली तरी वेगळी नाही झाली देठ पासून आणि मुद्दाम करायला गेली तर तुटत होत फुल पण वेगळं नाही झालं.

सगळ्यांना धन्स..
आणि शेजारी कमळ आहे का? त्याचा हि एक फोटो टाका जमल्यास. + हो टाकते
तेरे हातोको चुमनेको जी करता है + हा हा हा.
हे हाथ मुझे देदे ठकुराइन.. हा हा हा.
बकुळ सुरेखच..
मनीम्याउ कीती गोड फुलं..

सध्या अनंत खुप फुलला आहे..

सुप्रभात
IMG_20180413_173956
सायु अनंत सुंदर.. सुगंध पोहोचला Happy

माझ्याकडे असलेल्या चार भूईचाफ्याच्या कांद्यांना भूईचाफा फुलला. रोज चार पाच सहा अशी फुले यायची.
chafa.jpg

गुलबक्षी छान. भुईचाफा पहिल्यांदाच पाहायला मिळाला. Happy
हे ब्रह्मकमळ म्हणवणारे निवडुंग, दार्जिलिंग मध्ये ह्या रंगात आणि भर दिवसा फुललेले पाहायला मिळाले.
IMAG0470_01

Pages